Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

28/09/2026

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » एक तरल मनाचा मनस्वी कलाकार…
सामाजिक

एक तरल मनाचा मनस्वी कलाकार…

वाढदिवस विशेष लेख
Annant PpangarkarBy Annant Ppangarkar04/08/2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

महाराष्ट्र संवाद न्यूज

आज 4 ऑगस्ट ज्येष्ठ तमाशा कलाकार कलाभूषण रघुवीर खेडकर यांचा वाढदिवस. रघुभाऊ माझे मानस बंधु… एक तरल मनाचा मनस्वी कलाकार, 1961 मध्ये आजच्या दिवशी मुंबईत जन्मलेल्या रघुभाऊचा तमाशा रंगभूमीवर पहिला प्रवेश झाला तो वयाच्या पाचव्या दिवशी. तमाशामहर्षि तुकाराम खेडकर आणि कान्ताबाई सातारकर यांच्या पोटी जन्मलेल्या रघुभाऊच्या रक्तातच तमाशा आहे. वयाच्या नवव्या वर्षापासुन स्टेज गाजवत हम भी कुछ कम नही हे भाऊने दाखवुन दिले. 1980 च्या दरम्यान भाऊने आई कांताबाईच्या तमाशाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली.

मागील 300-350 वर्षाच्या काळात तमाशाने अनेक संकटांशी सामना केला आहे. दर शतकात 2-3 वेळा तमाशात मोठमोठे बदल झाले. 80 चे दशकही असेच होते. रंगीत टीव्हीचे आगमन झाले होते, व्हिडिओ नावाचे करमणुकीचे यंत्र आले होते, सिनेमातही बदल झाला होता, अँग्री यंग मन सिनेमाचा हीरो झाला होता, डिस्को नावाचा नाच लोकप्रिय होत होता, ऑर्केस्ट्रा नावाचा रंगमंचीय अविष्कार खुपच लोकप्रिय झाला होता, कपड्यांच्या फॅशन बदलल्या होत्या… यातले तमाशात काहीच नव्हते.

रघु भाऊ नावाच्या दूरदॄष्टीच्या पोरसवदा तरुणाने हे सारे बदल नेमकेपणाणे टिपले. महाराष्ट्रीय ग्रामीण आणि निमशहरी रसिकांची मानसिकता जाणुन भाऊने तमाशातच सिनेमा, ऑर्केस्ट्रा आणि नाटक दाखवायला सुरुवात केली… आणि तमाशा पुन्हा जिवंत झाला, पळू लागला. तमाशाला नवसंजीवनी देण्याच काम याकाळात रघुभाऊने केले. तमाशात हेलिकॉप्टर दाखवणे असो, बॉंब स्फोटाचे दृश्य असो भाऊने सारे काही हुबेहूब केले. नगीनाच्या गाण्यासाठी तर भाऊने चक्क 3-4 जिवंत नाग स्टेजवर आणले होते.

नागपूरच्या अक्कु यादवचा संतप्त महिलांनी खुन केल्यावर महिनाभरात त्या विषयावरचा वग सादर केला. दिल्लीच्या कॉमन वेल्थ गेम्सच्या वेळी दिल्लीत तमाशा सादर केला. अनेक पुरस्कार मिळाले. रसिकांचे खुप प्रेम मिळवले, अमाप लोकप्रियता मिळाली-मिळते आहे. भाऊला तमाशाचा अमिताभ बच्चन म्हटले जाते ते उगीच नाही.

पण कुठलाही जोकर, कॉमेडीयन, सोंगाड्या एक वेदना घेऊन जगत असतो. भाऊ तर तमाशातला सर्वात लोकप्रिय सोंगाड्या… त्याची वेदनाही तेव्हढी मोठी. तरुणपणातच बायको गेल्यावर पाचव्या दिवशी रसिकांना हसवणारा हा सोंगाड्या आजही लोकांना हसवतो आहे. मागील 30-35 वर्षात शाळा, वाचनालये, मंदिरे, अनेक गरजू लोकांना मदत म्हणून जे मोफत कार्यक्रम केले त्यातून सुमारे दिड-पावणे दोन कोटी रूपये मुक्तपणे वाटले. कुठे बातमी दिली नाही की फोटो. हे दान घेणाऱ्या 99% लोकांनीही कुठे भाऊचे नाव लावले नाही. लोकांना तमासगिरांचा पैसा चालतो पण नावाचा विटाळ होतो हेच खरे!

आज भाऊ ६३ व्या वर्षांत पदार्पण करीत आहे. तमाशाला दिशा देण्याच काम करीत आहे. काही मोजके सन्माननिय अपवाद वगळता अनेक लोक तमाशाला आजही नावे ठेवीत आहेत पण मुळात तमाशा पोटासाठी सादर केला जातो. कलेतून मिळणारा आनंद वगैरे नंतरच्या गोष्टी त्यामुळे तमाशा न बघता भरल्यापोटी त्याला नावे ठेवणारे ठेवीत राहतील.

आमचा भाऊ स्वतःच्या पोटासाठी… ज्यांना रोजच्या जगण्याची भ्रांत आहे अशा कलेच्या भुकेल्या रसिकांसाठी तमाशा सादर करीत राहो याच शुभेच्छा.

डॉ. संतोष खेडलेकर, संगमनेर

anantpangarkar
Annant Ppangarkar

Post Views: 543
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
Annant Ppangarkar
  • Website

Related Posts

संगमनेर ड्रग्ज प्रकरणातील सत्य जनतेसमोर आणा; सोशल मीडियावरील ‘मीडिया ट्रायल’ त्वरित थांबवा! — काँग्रेस कार्याध्यक्ष अमोल शेलकर यांचे पोलीस प्रशासनाला आवाहन; वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेऊन पारदर्शक चौकशीचे पुरावे मांडण्याची मागणी

24/09/2026

संगमनेर शहरात वाहतूक कोंडीचा बोजवारा: बेशिस्त रिक्षाचालक, फुटपाथवरील अतिक्रमणे अन् अवैध पार्किंगमुळे नागरिक त्रस्त; पोलीस प्रशासन ढिम्म

24/09/2026

‘संगमनेर फेस्टिव्हल’ हा संगमनेरकरांचा सांस्कृतिक मानबिंदू : मनीष मालपाणी १८ व्या संगमनेर फेस्टिव्हलचा सांगता सोहळा उत्साहात; विनोदी नाटकाने प्रेक्षकांना हसवले मनमुराद

22/09/2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
महाराष्ट्र संवाद विशेष

१०० वे पुण्यात, तर १०१ वे साहित्य संमेलन संगमनेरमध्ये, दुर्गाताई तांबे यांची मोठी घोषणा!

By Annant Ppangarkar28/09/20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन- महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि वैचारिक परंपरा समृद्ध असणाऱ्या संगमनेर शहरात लवकरच अखिल…

कांदा व्यापाऱ्यावर कोयत्याने वार करणारा फरार आरोपी अखेर दोन वर्षानंतर एलसीबीच्या जाळ्यात

28/09/2026

संगमनेरमधील एका निष्ठावान शिवसैनिकाचा अनुभव व्हायरल; तत्कालीन मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यावरील शाईफेकीने चर्चेत आलेले ठाकरे गटाचे तत्कालीन पदाधिकारी भाऊसाहेब हासे यांनी केलेले वक्तव्य चर्चेत! बाळासाहेब थोरात यांना… ते तर…!

28/09/2026

सोमवार २८ सप्टेंबर — जाणून घ्या आजच्या दिवसाचे राशिभविष्य

28/09/2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.