महाराष्ट्र संवाद न्यूज
संगमनेर – गुरुवारी (ता. 03 ऑगस्ट) संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत झालेल्या कांदा लिलावात एकुण 9577 गोण्या कांद्याची आवक झाली. लिलावात चांगल्या दर्जाच्या एक नंबर कांद्याला 1500 ते 1825 रुपये भाव मिळाला.
याच लिलावात दोन नंबर कांद्याला 1200 ते 1400 रुपये, तीन नंबर कांद्याला 800 ते 1100 रुपये इतका भाव मिळाला तसेच गोल्टी कांदा 500 ते 700 रुपये भावाने विकला गेला.
टोमॅटोलाही मिळाला असा भाव : तसेच टोमँटो या शेतमालाची एकुण 14700 क्रेटस आवक झाली. त्यास 1000 ते 2500 रुपयांचा भाव मिळाला. डाळींबाचीदेखील 1881 क्रेटस आवक झाली असून 1 नंबर डाळीबास 111 ते 135 रुपये प्रति किलो, 2 नंबर डाळींबास 85 ते 100 रुपये प्रति किलो, 3 नंबर डाळिंबास 60 ते 80 रुपये, व 4 नंबर डाळिंबास 20 ते 35 रुपये प्रति किलोप्रमाणे भाव मिळाला.
उत्पादक शेतकऱ्यांनी आपला शेतीमाल, कांदा, डाळींब व टोमँटो संगमनेर बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सभापती शंकरराव खेमनर, सचिव सतिषराव गुंजाळ यांनी केले आहे.

