Close Menu
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
What's Hot

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

June 5, 2026

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
Facebook X (Twitter) Instagram
महाराष्ट्र संवादमहाराष्ट्र संवाद
Home » गृहमंत्री फडणवीस विरोधकांना म्हणाले… ‘महिला सुरक्षित नाही’ असा नेरेटिव्ह सेट करु नका सांगत महिलांच्या गुन्ह्यांची आणि बेपत्ता झालेल्या महिला-मुलींना परत आणल्याची आकडेवारीच मांडली
राजकारण

गृहमंत्री फडणवीस विरोधकांना म्हणाले… ‘महिला सुरक्षित नाही’ असा नेरेटिव्ह सेट करु नका सांगत महिलांच्या गुन्ह्यांची आणि बेपत्ता झालेल्या महिला-मुलींना परत आणल्याची आकडेवारीच मांडली

पावसाळी अधिवेशन
अनंत पांगारकरBy अनंत पांगारकरAugust 4, 2023No Comments3 Mins Read
Facebook Twitter WhatsApp
Share
Facebook Twitter Email Telegram WhatsApp

विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवरच ठेवले होते बोट…

महाराष्ट्र संवाद न्यूज

मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा शुक्रवारचा शेवटचा दिवस आहे. अधिवेशन काळात विरोधकांनी बेपत्ता महिला मुलींसंदर्भात प्रश्न उपस्थित करत गृह खात्याला धारेवर धरले होते. अधिवेशनात अंतिम आठवडा प्रस्तावाला उत्तर देताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी महाराष्ट्रात ‘महिला सुरक्षित नाही’ असा नेरेटिव्ह सेट करु नका, असे सभागृहात सांगत महिलांच्या गुन्ह्यांची आणि बेपत्ता झालेल्या महिला-मुलींना परत आणल्याची आकडेवारीच मांडली.

अधिवेशनादरम्यान विविध प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. राज्यातील अनेक घटनांचे दाखले देत महिला मुलींच्या संदर्भात प्रश्न उपस्थित करत विरोधकांनी कायदा व सुव्यवस्थेवरच बोट ठेवले होते. एकूणच राज्यात महिला, मुली सुरक्षित नसल्याचे विरोधकांनी या घडलेल्या घटनांमधून स्पष्ट होत असल्याचे म्हटले होते.

महाराष्ट्र गुन्हेगारीत देशात तिसऱ्या नव्हे तर सहाव्या क्रमांकावर : विरोधकांच्या या सर्व प्रश्नांना उत्तर देताना फडणवीस म्हणाले, कायदा व सुव्यवस्थेचा विचार आपण आकड्यांवर करतो. मुंबईचा विचार केला तर महिलांनाही मुंबई सेफ्टी वाटते. दहा वाजताही त्या लोकलने प्रवास करतात. विरोधकांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र गुन्ह्यांमध्ये तिसरा आहे. मात्र तसे नाही, महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्र मोठा आहे. येथील लोकसंख्या जास्त आहे. तेव्हा दर लाख गुन्ह्यामागील आकडेवारीचा विचार केला तर महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये देशात दहाव्या क्रमांकावर असल्याचे सांगत 2022, 2023 या वर्षाच्या गुन्ह्यांमधील संख्येचा दाखला देत यावर्षी 5 हजार 493 एवढी गुन्ह्यामध्ये घट झाली असल्याचे त्यांनी सांगितले.

बेपत्ता महिलादेखील शोधून आणल्याची संख्या जास्त : महिला बेपत्ता होण्यामागे अनेक कारणे असतात, मात्र आपण त्या बारकाव्यात जात नाही. महिला आणि बालकं यांच्या गुन्ह्यासंबंधी सर्वोच्च न्यायालयाने आपल्यावर काही निर्बंध टाकले आहेत. त्याचे पालन करून 72 तासांत एफआयआर दाखल करावी लागते. मात्र महिला व बालकांवरील अत्याचारामध्ये महाराष्ट्र 12 व्या क्रमांकावर आहे. बाल लैंगिक गुन्ह्याबाबत विचार केला तर 17 वा क्रमांक आहे. महिला बेपत्ता होतात. त्या वेगवेगळ्या कारणांने बेपत्ता होतात. 2021 साली 87 टक्के महिला परत आणण्यात यश आले. 2022 मध्ये 80 टक्के तर 2023 च्या जानेवारी-मे दरम्यान 63 टक्के घटना उघडकीस आणल्या आहेत.

34 हजारापर्यंत बालके घरापर्यंत : 2015 पासून सुरू करण्यात आलेल्या ऑपरेशन मुस्कान अंतर्गत महाराष्ट्रात बालके शोधून त्यांना घरापर्यंत पोहचविण्याचे काम सुरू आहे. पोलिसांनी 2021 मध्ये 96 टक्के, 2022 मध्ये 91 टक्के तर 2023 मध्ये आतापर्यंतच 71 टक्के बालके परत आणण्यात यश मिळविले. यामुळे महाराष्ट्र पोलिसांचा विशेष उल्लेख केंद्राने संसदेत केला हे आपल्या पोलिसांसाठी गौरवाची बाब असल्याचे ते म्हणाले.

राज्यातील गुन्हेगारी आटोक्यात : राज्यातील गुन्हेगारी आटोक्यात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. 2023 मध्ये 1651 प्रकरणांमध्ये तडीपार, एमपीडीएची 132 प्रकरणे, सीआरपीसीची 1 लाख 66 हजार 428 प्रतिबंधात्मक कारवाया केल्या. त्या मागील वर्षीच्या तुलनेत 31 हजाराने जास्तीच्या आहेत. तर 92 प्रकरणात मकोका लावण्यात आला असून, गुन्हेगारांवर जरब बसविण्यासाठी राज्य सरकार कटीबद्ध आहे.

अंमली पदार्थ नष्ट केले जाताहेत: अंमली पदार्था संदर्भात जिल्हाधिकारी, एसपी यांची कमेटी तयार करुन शाळा, महाविद्यालयाजवळच्या पान टपऱ्यांवर कारवाई केली जात आहे. अतिक्रमण काढून टाकण्यात आलेले आहे. अंमली पदार्थ नष्ट केले जात आहे. ड्रग्सची वाहतूक होऊ नये म्हणून, कुरीअर कंपन्याना काही सूचना देण्यात आल्या. ड्रग्स रॅकेटच्या शेवटच्या टोकापर्यंत जात आहोत, सर्व केमिस्ट दुकानामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहे. अवैध दारु विक्री, जुगारांवर मोठ्या प्रमाणात कारवाई केल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र : महिलांवरील गुन्ह्यांमध्ये 60 दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करुन गुन्ह्यांचे निर्गतीकरण केले जात आहे. निर्गती कशी होईल यासाठी पोर्टल तयार केले आहे. 2019 मध्ये 24 टक्के, 2020 मध्ये 44 टक्के, 2021 मध्ये 57 टक्के, 2022 मध्ये 72 टक्के तर 2023 मध्ये 85 टक्के प्रकरणात 60 दिवसांत दोषारोपत्र दाखल केल्याचे ते म्हणाले.

anantpangarkar
अनंत पांगारकर

Post Views: 389
Share. Facebook Twitter Pinterest WhatsApp
अनंत पांगारकर
  • Website

Related Posts

घुलेवाडी सरपंच व तीन सदस्यांच्या अपात्रतेला अप्पर विभागीय आयुक्तांची स्थगिती; जिल्हाधिकार्‍यांच्या निर्णयाविरोधात दिलासा

June 4, 2026

विधानपरिषद निवडणूक : भाजपकडून दिडशे कोटींची सौदेबाजी.. मविआच्या सर्व उमेदवारांची माघार! खा. संजय राऊत यांचा गंभीर आरोप

June 4, 2026

विधान परिषद निवडणूक बिनविरोध करण्यासाठी भाजपाकडून कोट्यवधींच्या ऑफर्स; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांचा घणाघाती आरोप

June 4, 2026
Leave A Reply Cancel Reply

Document
Our Picks
  • Facebook
  • Twitter
  • Pinterest
  • Instagram
  • YouTube
Advertisement 1 Advertisement 2 Advertisement 3 Advertisement 4
Don't Miss
अपघात

संगमनेर बायपासवर चालत्या कंटेनरला आग; लाखो रुपयांच्या चारचाकी गाड्या जळाल्याने मोठे नुकसान

By अनंत पांगारकरJune 5, 20260

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गावरील संगमनेर बायपास जवळ असणाऱ्या कृष्णा लॉन्स परिसरात…

पोलिसांची मोठी कारवाई: कत्तलीसाठी चालवलेल्या गोवंशासह तिघांना पकडले; ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

June 5, 2026

माजी आमदार डॉ. सुधीर तांबे ‘साने गुरुजी जीवन गौरव’ पुरस्काराने सन्मानित; पुणे येथील सोहळ्यात गौरव

June 5, 2026

मी आत्महत्या करेन… पानसरेंचा रुसवा आणि विखे-जगतापांचे ‘मास्टर’ नियोजन! अखेर तनपुरे बिनविरोध

June 5, 2026
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow
Thumbnail 1
Thumbnail 2
Thumbnail 3
Thumbnail 4
previous arrow
next arrow

तुमचे हक्काचे व्यासपीठ

Facebook YouTube
Our Picks
June 2026
M T W T F S S
1234567
891011121314
15161718192021
22232425262728
2930  
« May    
  • Home
  • आंदोलन
  • आरोग्य
  • इतिहास
  • क्रिडा व कला
  • गुन्हेगारी
  • न्यायालय
  • पत्रकारिता
  • फोटो / गॅलरी
  • महाराष्ट्र संवाद विशेष
  • राजकारण
  • विकास
  • विश्लेषण
  • शिक्षण
  • शेती व सहकार
  • सामाजिक
  • CONTACT US
  • ABOUT US
  • PRIVACY POLICY
© 2026 ThemeSphere. Designed by ThemeSphere.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.