Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील एका डॉक्टरने संस्थेमधील अल्पवयीन मुलीचा विनयभंग करून तिच्याशी अश्लील वर्तन केल्याच्या कारणावरून डॉक्टर विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात विनयभंग आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे संगमनेर तालुक्यातील वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. २९ नोव्हेंबरच्या रात्री साडेआठ वाजता गोल्डन सिटीमधील प्रियदर्शनी ग्रामीण व आदिवासी संस्थेमध्ये हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. पीडित मुलीच्या नातेवाईकांनी या संदर्भात शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली आहे. आरोपीने या मुली बाथरूममध्ये जावून काय करतात असे विचारणा करत तिचा विनयभंग केला तसेच उद्या नवऱ्याच्या घरी गेल्यावर काय करणार असे म्हणत चल माझ्या गाडीत बस, असे विचित्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाहनाचे सारथ्य केले. निमित्त होते, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धीच्या नागपूर ते शिर्डी या महामार्गाच्या पाहणीचे. समृद्धी महामार्गाचे लोकार्पण ११ डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर ते शिर्डी या पहिला टप्प्यातील ५२० किलोमीटरच्या पूर्ण झालेल्या कामांची व सुविधांची आज पाहणी केली. या प्रवासादरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वत: वाहन चालवत होते. त्यांच्या बाजूला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बसले होते. नागपूर येथील समृध्दी महामार्गाचा झिरो पॉईंट येथून सुरू झालेला मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांचा हा पाहणी दौरा सायंकाळी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला असे सांगणारे भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या विधानाबद्दल ट्विटरद्वारे दिलगिरी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी एवढ्या गंभीर चुकीसाठी व्हिडीओ ट्विट करत त्यांनी फक्त दिलगिरी व्यक्त केली, माफी मागितलीच नाही. त्यामुळे राष्ट्रवादीकडून त्यांना लक्ष्य करण्यात येत आहे. आमदार लाड यांनी छत्रपतींबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे राज्यभरात त्यांच्या विरोधात संतापाची लाट निर्माण झाली असून यामुळे राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. छत्रपती संदर्भात चुकीचे वक्तव्य केल्याने भारतीय जनता पक्ष आधीच अडचणीत सापडला असताना लाड यांचे वक्तव्य पक्षासमोर अडचणी निर्माण करणारे ठरले आहे. या पार्श्वभूमीवर आमदार लाड यांनी ट्विटरवर एक व्हिडिओ अपलोड करत त्यात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. त्यांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर झालाय. हे अख्ख्या जगाला माहिती आहे, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे तर “छत्रपती शिवरायांचा जन्म कोठे झाला हा नवा वाद भाजपा उपटसुंभानी उकरून काढला. हे ठरवून चाललंय का? औरंगजेब, अफजल खानाने सुपारी दिल्या प्रमाणे हे लोक शिवरायांवर बदनामीचे रोज घाव घालीत आहेत. करारा जवाब मिलेगा असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाला, असं अजब विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केल्यानंतर राज्यात नवा वाद उभा राहिला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना खासदार संजय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म कोकणात झाला आहे, असे वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले. राष्ट्रवादी काँग्रेस आणि खासदार अमोल कोल्हे यांच्या ट्विटर हँडल वरून यासंबंधीचा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. लाड यांच्या या वक्तव्याने राज्यात पुन्हा नवा वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवरून राज्यात सुरू असलेली वादाची मालिका थांबण्याची चिन्हे दिसत नाही. विशेष म्हणजे हा वाद भाजप नेत्यांच्या बेताल वक्तव्यामुळे पेटला आहे. छत्रपती विषयी अवमानकारक बोलणाऱ्या भाजपच्या वाचाळवीरांमध्ये आता प्रसाद लाड यांची वाढ झाली आहे. काही दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वादग्रस्त टिप्पणी केली होती. राज्यपाल पदावरील…

Read More

रविवार विशेष एसएमबीटीच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कॉलेज ऑफ फार्मसी व इन्स्टिट्यूट ऑफ डी फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. योगेश उशीर व प्रा. डॉ. सुदर्शन सिंग यांच्या संशोधनाला पेटंट मिळाले आहे. या पेटंटचे पुढील २० वर्षांपर्यंत ‘एसएमबीटी’कडे अधिकार राहणार आहेत. या संशोधनामुळे गुडघेदुखी, सांधेदुखी किंवा शरीरावर सूज येणाऱ्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. लहानपणी घरातील वृध्द आजीबाई काही दुखत असल्यास जायफळ व तेल यांचे मिश्रण शरीरावर लावत असे. त्याच संकल्पनेतून जायफळात नेमके काय असावे? याचा शोध डॉ. उशीर व त्यांच्या समूहाने घेतला. अनेक वर्षे बारीक सारीक गोष्टींचा अभ्यास सुरु होता. दरम्यान, जायफळात अशी काही गुणसत्व आहेत जी…

Read More

महाराष्ट्रात भाजपाने शिंदे गटाशी युती केल्यानंतर अनेक धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी सरकारने प्रयत्न सुरू केले आहे. काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समान नागरी कायद्याच्या अनुषंगाने विधान केले, खरंतर त्यांनी समान नागरी कायदा हा लोकसंख्या नियंत्रणाच्या कामी गरजेचा असल्याचे म्हटले आहे. गुजरात निवडणूकीनंतर हा कायदा महाराष्ट्रात लागू करण्याचे संकेत दिले. भारतात गोवा राज्यामध्ये समान नागरी कायद्याची अंमलबजावणी झालेली आहे. उत्तराखंड राज्यांमध्ये सदर कायदा मंजूर होण्याच्या मार्गावर आहे. आता त्यापाठोपाठ महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्यांमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याबाबत जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. हा कायदा भाजपाच्या निवडणूक जाहीरनाम्यातील सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. खरंतर हा कायदा काय आहे, त्याबाबत अनेक अफवा, समज- गैरसमज…

Read More

रविवार विशेष । प्रवीण पुरो (लेखक दैनिक आपलं महानगरचे माजी निवासी संपादक आहेत) अभिसार शर्मा, प्रसुनकुमार बाजपेयी, राजदीप सरदेसाई, आशुतोष, नवीनकुमार, अजित अंजूम, निखिल वागळे या दिग्गजानंतर आता वेळ आलीय रविश कुमार यांची. सत्तेला जे पचत नाही त्यांना मुळासकट उखडून टाकण्याचा बाणा मोदी सरकारने हाती घेतलाय. या बाण्याचे देशातील पत्रकारांमधले सत्तरावे बळी ठरलेत रविश कुमार. सारी माध्यमं सरकारपुढे लोटांगण घालत असताना जाब विचारणाऱ्या एनडीटीव्हीला टाळं ठोकण्याचा पराक्रम मोदी सरकारने करून पाहिला. प्रणव रॉय आणि त्यांच्या पत्नी राधिकांवर नको-नको ती बंधनं घालण्याचा प्रयत्न झाला. पण तरीही आपला आवाज एनडीटीव्हीने तेवत ठेवला. रविश कुमार यांच्या माध्यमातून सरकारला सळो की पळो करून सोडलं.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज दिव्यांगांसाठी राज्यात स्वतंत्र कल्याण मंत्रालयाची घोषणा करत २०६३ पदांची भरती केली जाणार आहे. खोके-खोके सरकार म्हणणाऱ्यांना जर दिव्यांगांच्या एवढे बौद्धिक डोके आले तरी खूप झाले. ज्यांनी रोखीने व्यवहार केले त्यांना फक्त खोक्यांचीच भाषा समजते. तुम्ही आरोप करत रहा, मात्र आम्ही कामातून उत्तर देऊ, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेला लगावला आहे. मुंबईत जागतिक दिव्यांग दिनानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यात स्वतंत्र दिव्यांग कल्याण मंत्रालय स्थापन केले जाणार असल्याची घोषणा केली. दिव्यांगांसाठी हा मोठा निर्णय समजला जात आहे. दिव्यांग मंत्रालय स्थापन करणारे महाराष्ट्र देशातील पहिले राष्ट्र ठरले आहे. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, राज्यात स्वतंत्र…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नव्याने बांधण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामावर असलेल्या सुरक्षारक्षकासह त्याच्या साथीदाराला लोखंडी गजाने मारहाण करून मोबाईल लंपास करणाऱ्या आरोपीचा शोध लावण्यास तब्बल पाच महिन्यानंतर पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाला यश आले आहे. ऋषिकेश सदाशिव वाव्हळ (वय २३ वर्ष) या तरुणाला पोलीस उपाधीक्षकांच्या पथकाने अटक केली आहे. राजेंद्र होंडा शोरूम च्या पाठीमागे असलेल्या एका इमारतीचे बांधकाम सुरू असताना लक्ष्मण चांगदेव फटांगरे हे सुरक्षारक्षक म्हणून काम करत होते. यावेळी त्यांच्यासह आणखी एक सहकारी होता. ५ जुलैला रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास त्यांना हालचाल जाणवली, त्यामुळे त्यांनी संबंधित व्यक्तीला हटकले असता तेथे असलेल्या लोखंडी गजांची चोरी करण्याचा प्रयत्न असलेल्या चोरट्याने त्यांच्या डोक्यात गजाने प्रहार केला.…

Read More