Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर धावपळीच्या जीवनात सकस आहाराची गरज असताना, रासायनिक खतांच्या अतिवापरामुळे अन्नाची गुणवत्ता घटत आहे. निरोगी समाजासाठी विषमुक्त शेती अत्यावश्यक आहे आणि सेंद्रिय शेतीमध्ये रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध आहेत, असे प्रतिपादन जयहिंद लोकचळवळीचे संस्थापक माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात कृषी महाविद्यालय आणि जयहिंद लोकचळवळ यांच्या संयुक्त विद्यमाने द्रोणागिरी हॉलमध्ये ‘शाश्वत शेती व युवा उद्योजक’ कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना डॉ. तांबे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. मनोहर पाचोरे होते. व्यासपीठावर राहुरी कृषी विद्यापीठाचे मृदा शास्त्रज्ञ डॉ. अनिल दुर्गुडे, सेंद्रिय शेती संशोधन प्रकल्प प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. उल्हास…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर तालुक्यातील एका तरुणीला फसवून मुंबईतील मालाड येथे नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी संगमनेर पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे, यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी कॉलेजमध्ये परीक्षेसाठी जात असल्याचे सांगून घरातून निघाली होती. पेपर दिल्यानंतर कॉलेजबाहेर असताना तिला एका अज्ञात मुलाचा फोन आला. त्याने तिला घुलेवाडी येथे एका महिलेच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ती तिथे गेली. त्यानंतर, तेथे उपस्थित असलेल्या दोन संशयित तरुणांनी तिला जबरदस्तीने थार गाडीमध्ये बसवून मालाड येथे नेले. मालाडमधील एका हॉटेलमध्ये तिला चार ते पाच दिवस डांबून ठेवण्यात आले. या दरम्यान,…
नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गुरुवारी (८ मे) या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “आज सर्वपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. हे ऑपरेशन योग्य दिशेने सुरू आहे आणि सुरक्षा दलांनी यात मोठे यश मिळवले आहे. मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत आणि दहशतवादी संघटनांचे कंबरडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय २२, रा. सोनई, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठ्या युक्तीने जेरबंद केले आहे. आरोपी वैरागर याला जमावाच्या मारहाणीनंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय वैरागर याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. २ मे २०२५ रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. आरोपी फरार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर पोलिसांनी काल (०७ मे) शहरातील मदिनानगर परिसरात छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लगेचच कार्यालयातील पोलीस नाईक राहूल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ.…
नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला. खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण…
