Author: अनंत पांगारकर

संगमनेर / अहिल्यानगर, ३ जुलै २०२५:  अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने संगमनेर तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीत सुरू असलेल्या एका मोठ्या जुगार अड्ड्यावर बुधवारी छापा टाकून तब्बल ११ लाख २४ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवाईत जुगार खेळणाऱ्या आणि खेळवणाऱ्या १४ आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे, अशी माहिती एलसीबीचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना दिले होते. त्यानुसार, पोलीस निरीक्षक आहेर यांच्या नेतृत्वाखालील पथके जिल्ह्यात अवैध व्यवसायांवर कारवाया करत आहे. एलसीबीच्या या कारवाईमुळे स्थानिक पोलिसांचे पितळ…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली, युवक काँग्रेसच्या अध्यक्षा आणि कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुक्यातील ५०० युवक आणि युवतींनी पंढरपूरच्या आषाढी पायी दिंडी सोहळ्यात सक्रिय सहभाग घेतला. ‘आम्ही संगमनेरी, विठुरायाचे वारकरी’ हे ब्रीदवाक्य घेऊन या युवा कार्यकर्त्यांनी वारकऱ्यांसाठी आरोग्य सेवांसह विविध सेवा पुरवून दोन दिवस त्यांची निःस्वार्थपणे सेवा केली. वारकऱ्यांची आरोग्य तपासणी व विविध सेवा- महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाच्या दर्शनासाठी आषाढी एकादशीनिमित्त राज्यभरातून अनेक पायी दिंड्या पंढरपूरकडे येत आहेत. या दिंडीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी डॉ. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखालील या युवा पथकाने संगमनेर, अहिल्यानगर मार्गे प्रवास करत संत निवृत्तीनाथ महाराज पालखीचे टेंभुर्णी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर तालुका कायम काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. याच परंपरेला पुढे नेत, जिल्हा परिषदेचे माजी सभापती अजय नारायण फटांगरे यांची संगमनेर तालुका काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच कोपरगाव ग्रामीणच्या तालुकाध्यक्षपदी नितीनराव मनोहर शिंदे आणि भिंगारच्या तालुकाध्यक्षपदी रिजवान शेख यांचीही निवड झाली आहे. माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली अजय फटांगरे यांनी यापूर्वी संगमनेर तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्षपद यशस्वीपणे सांभाळले होते. त्यावेळी त्यांनी तालुक्यात युवकांचे मोठे संघटन उभारले होते. तसेच, बोटा गटातून जिल्हा परिषदेचे उमेदवार म्हणून विक्रमी मताधिक्याने विजयी झाल्यानंतर, त्यांनी थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज –  महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, दोन धक्कादायक घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पुण्याच्या कोंढवा येथे कुरिअर डिलिव्हरीच्या नावाखाली घरात घुसून एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली आहे, तर दुसरीकडे इन्फोसिसच्या हिंजवडी कॅम्पसमध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा शौचालयात व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. पुण्यातील कोंढवा येथील एका उच्चभ्रू गृहसंकुलात बुधवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास एक भयावह घटना घडली. एका २५ वर्षीय तरुणी घरात एकटी असताना, आरोपी कुरिअर देण्याच्या बहाण्याने तिच्या घरी आला. “माझे कुरिअर नाही” असे तरुणीने सांगितल्यावरही, “सही करणे आवश्यक आहे” असे सांगत आरोपीने तिला दरवाजा उघडण्यास भाग पाडले. सेफ्टी डोअर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचे केंद्र बनली असून, मंगळवारी, (१ जुलै) बाजार समितीत ड्रॅगनफ्रूट आणि पेरूची मोठ्या प्रमाणात आवक झाली. या बाजार समितीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी चांगला भाव मिळत असल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. मंगळवारी केवळ संगमनेर तालुक्यातीलच नव्हे, तर राहुरी, अकोले, राहाता आणि सिन्नर तालुक्यांमधूनही अनेक शेतकऱ्यांनी आपला शेतमाल विक्रीसाठी आणला होता. रोहित जाधव (संगमनेर) आणि प्रवीण पवार (राहुरी) यांच्यासह आणखी काही शेतकऱ्यांनी ड्रॅगनफ्रूट, पेरू आणि डाळिंब मोठ्या प्रमाणावर बाजार समितीत विक्रीसाठी आणले होते. ड्रॅगनफ्रूटला प्रतिकिलो किमान ५० रुपये ते कमाल ८० रुपये असा भाव मिळाला. तर डाळिंबाची २६८८ क्रेट्सची विक्रमी आवक झाली.…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहर आणि तालुक्यात अवैध धंदे आणि कत्तलखान्यांनंतर आता चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. नुकत्याच शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत, निमोण आणि घारगाव येथे झालेल्या घरफोड्यांमध्ये लाखो रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने आणि रोकड लंपास करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, या सर्व घटना एकाच दिवशी घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. संगमनेरला पोलिस उपअधीक्षक दर्जाचे अधिकारी आणि संगमनेर शहर, संगमनेर तालुका आश्वी व घारगाव ही चार पोलिस ठाणी असूनही चोरट्यांवर पोलिसांचा कोणताही वचक राहिला नसल्याचे चित्र आहे. सोमवारी शहर हद्दीत रायते फाटा येथे झालेल्या घरफोडीत १ लाख ६६ हजारांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. मंगळवारी, संगमनेर तालुक्यातील पठार भागातील घारगाव पोलिस ठाण्याच्या…

Read More

मुंबई, दि. २ जुलै २०२५:  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. आतापर्यंत कधीही न झालेल्या थेट मुलाखतींद्वारे तालुकाध्यक्षांची निवड प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. या माध्यमातून कार्यक्षम आणि मेहनती कार्यकर्त्यांना संघटनेत महत्त्वाची पदे देऊन तळागाळापर्यंत पक्ष मजबूत करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखालील निवड समितीने आतापर्यंत ८३ तालुकाध्यक्षांच्या नियुक्त्या केल्या आहेत. यात ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, आ. विजय वडेट्टीवार, आ. सतेज पाटील, नसीम खान, खासदार चंद्रकांत हंडोरे, खा. प्रणिती शिंदे, बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, आणि ॲड. गणेश पाटील यांचा समावेश आहे. पक्ष निरीक्षकांनी केलेल्या शिफारसी आणि मुलाखतींच्या आधारे ही…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरातील अवैध कत्तलखान्यांबाबत शासनाला खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती दिल्याप्रकरणी संगमनेरचे उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (PI) यांच्यावर कारवाई करून त्यांना निलंबित करण्याची जोरदार मागणी आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडे केली.  संगमनेरमधील कत्तलखान्यासंदर्भात खताळ यांनी सभागृहात मंगळवारी प्रश्न उपस्थित केला होता त्यावर राज्याचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिले. फडणवीस यांच्या उत्तरानंतर पोलिसांनी सभागृहाला खोटी माहिती पुरविल्याचे खताळ यांनी बुधवारी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, संगमनेर शहरात सर्रासपणे अवैध कत्तलखाने सुरू आहेत. मात्र, शहर पोलीस त्यांच्यावर केवळ थातुरमातुर कारवाई करत आहेत. गोवंश हत्याबंदी कायद्यातील…

Read More

पंढरपूर:  आषाढी वारीसाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना, महाराष्ट्र राज्य सरकारने वारकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. यंदाच्या वारीदरम्यान कोणत्याही वारकऱ्याचा अपघात, विषबाधा किंवा नैसर्गिक कारणांमुळे मृत्यू झाल्यास, त्यांच्या वारसांना आता 4 लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल. याशिवाय, वारीदरम्यान अपंगत्व आल्यास किंवा रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आल्यास देखील आर्थिक मदतीची तरतूद करण्यात आली आहे. महसूल विभागाने याबाबतचे परिपत्रक नुकतेच जारी केले आहे. गेल्या वर्षीप्रमाणेच यंदाही आषाढी एकादशीसाठी मानाच्या 10 पालख्यांसोबतच्या 1109 दिंड्यांना प्रत्येकी 20 हजार रुपये अनुदान वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली होती. आता या नव्या निर्णयामुळे वारकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी सरकारने आणखी एक पाऊल पुढे…

Read More

अहिल्यानगर:  बिगरशेती (Non-Agriculture – NA) कायद्यातील सुधारणा नियमांचे उल्लंघन करत, सातबारा उताऱ्यांमध्ये विनापरवाना फेरफार केल्याप्रकरणी अहमदनगर जिल्हाधिकाऱ्यांनी संगमनेरमधील चार महसूल कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. या गंभीर प्रकरणात तत्कालीन तहसीलदारांचीही चौकशी करण्याची शिफारस विभागीय आयुक्तांकडे करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून ही माहिती मिळाली असून, यामुळे महसूल विभागात खळबळ उडाली आहे. जवळपास वर्षभरापूर्वीचे हे प्रकरण असून, या प्रकरणी तत्कालीन ग्राम महसूल अधिकारी भीमराज शांताराम काकड, मंडलाधिकारी वैशाली अंबादास मोरे, तलाठी पोमल दत्तात्रय तोरणे, आणि महसूल सहायक वसंत निवृत्ती वाघ या चौघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. नेमकं काय घडलं?- संगमनेर नगरपालिका हद्दीतील तसेच गावठाणातील जागांशी संबंधित हे प्रकरण आहे. ४२ ब, ४२…

Read More