Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, विशेष प्रतिनिधी: विधानसभेचे अधिवेशन संपल्यानंतर राज्य शासनाने प्रशासकीय पातळीवर मोठे बदल केले आहेत. यात पाच अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जारी करण्यात आले आहेत. नाशिक जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांची जालना जिल्हाधिकारीपदी बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी ओंकार पवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर तुकाराम मुंढे यांची वीस वर्षाच्या कार्यकाळात 23व्यांदा बदली करण्यात आली आहे. बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांच्या नवीन नियुक्त्या: तुकाराम मुंडे – सचिव, दिव्यांग कल्याण विभाग, मुंबई. नितीन काशीनाथ पाटील – विशेष आयुक्त, राज्य कर, महाराष्ट्र, मुंबई. अभय महाजन – व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य कापूस उत्पादक पणन महासंघ, मुंबई. ओंकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई, प्रवीण पुरो: महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका दिवाळीच्या सुट्ट्यांनंतर, म्हणजेच ऑक्टोबरच्या शेवटी सुरू होतील, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिली आहे. नाशिक विभागातील आगामी निवडणुकांचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते. सर्वोच्च न्यायालयाने चार महिन्यांच्या आत निवडणुका घेण्याचे आदेश दिल्यानंतर, त्यानुसार महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगरपालिका या सर्व निवडणुका टप्प्याटप्प्याने घेण्याचा कार्यक्रम आखला जात आहे. नाशिक विभागात एकूण ५० लाख ४५ हजार मतदार आहेत, ज्यासाठी ४,९८२ मतदान केंद्र आहेत. या निवडणुकीसाठी ८,७०५ कंट्रोल युनिट्स आणि १७,००० पेक्षा जास्त मतदान यंत्रांची गरज लागेल. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मनुष्यबळाची मोठी कमतरता…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: साळी समाजाचे आराध्य दैवत भगवान जिव्हेश्वर उत्सवा निमित्ताने साई निर्मल सेवाभावी संस्था आणि स्वकुळ साळी समाज (लक्ष्मी नारायण देवस्थान ट्रस्ट), संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. एसएमबीटी हॉस्पिटल, घोटी यांच्या सहकार्याने हे शिबिर दिनांक ०७ ऑगस्टला सकाळी १०:०० ते दुपारी ४:०० या वेळेत लक्ष्मी नारायण मंदिर, कॅप्टन लक्ष्मी चौक, रंगारगल्ली, संगमनेर येथे होणार आहे. या शिबिरात रक्तदाब, शुगर, उंची, आणि वजन यांची तपासणी केली जाईल. तसेच, डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार ईसीजीची सुविधाही उपलब्ध असेल. तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत सल्ला आणि उपचारही दिले जाणार आहेत. साई निर्मल सेवाभावी संस्थेचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई विशेष प्रतिनिधी / संगमनेर: संगमनेर शहरातील इंदिरानगर व शिवाजीनगर परिसरातील रहिवाशांना त्यांच्या घरांचे मालकी हक्क मिळवून देण्यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी मंगळवारी (5 ऑगस्ट) पुन्हा एकदा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतली. मंत्री बावनकुळे यांनी यासंदर्भात तात्काळ संबंधितांना निर्देश दिले आहे. https://www.facebook.com/share/p/1AMAUE11k8/ या भेटीत आमदार तांबे यांनी, संगमनेर बुद्रुक येथील सर्वेक्षण क्रमांक १०४, १०५, १०६ (४४२) आणि २१९ मधील ‘पोकळीस्त’ आणि इतर हक्कांच्या नोंदी रद्द करून, प्रत्यक्ष रहिवाशांच्या नावावर सात-बारा (7/12) आणि सिटी सर्व्हे अभिलेखात नोंद करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना देण्याची विनंती करत व या भागातील नागरिकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे लक्ष वेधले. https://x.com/satyajeettambe/status/1952684256733679652?t=AVPYxI1ZUXjBgZA9uTZ4Ug&s=19 या महत्त्वपूर्ण मागणीवर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन मुंबई: सत्ताधारी पक्षाचे प्रवक्तेपद भूषवलेल्या व्यक्तीची थेट न्यायाधीशपदी नेमणूक करण्याच्या संभाव्य निर्णयामुळे राजकीय आणि न्यायालयीन वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरदचंद्र पवार) आमदार रोहित पवार यांनी यावर तीव्र शब्दांत आक्षेप घेत ही नियुक्ती म्हणजे लोकशाहीवर केलेला सर्वांत मोठा आघात असल्याचे म्हटले आहे. आमदार पवार यांनी या प्रकरणी काही महत्त्वाचे प्रश्न उपस्थित केले आहेत. केवळ न्यायाधीश होण्याची पात्रता आहे म्हणून थेट राजकीय व्यक्तींना या पदावर नेमणे म्हणजे न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का? संविधानाने सत्तेचं केंद्रीकरण टाळण्यासाठी आणि ‘चेक्स अँड बॅलन्सेस’ (नियंत्रण आणि संतुलन) राखण्यासाठी ‘सेपरेशन ऑफ पॉवर’ (अधिकारांचे विभाजन) हे तत्त्व स्वीकारले आहे. राजकीय…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नाशिक: श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी नाशिकमध्ये केलेल्या एका जाहीर भाषणात अनेक वादग्रस्त विधाने केली आहेत. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्याचं प्रतीक असलेल्या तिरंग्याऐवजी लाल किल्ल्यावर भगवा ध्वज फडकवण्याचं आवाहन करतानाच सर्वधर्म समभावाला ‘ढोंगीपणा’ म्हणत ‘भारत मातेच्या भविष्याशी केलेली प्रतारणा’ असं संबोधलं. नाशिक दौऱ्यावर असताना राणेनगरमध्ये श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानने उभारलेल्या 51 फूट उंच हिंदवी स्वराज्य ध्वजस्तंभाच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. ‘भारतीय स्वातंत्र्य आणि आपण व हिंदवी स्वराज्य सुवर्ण सिंहासन’ या विषयावर बोलताना भिडे म्हणाले, “आपण तिरंगा आणि संविधान मानले पाहिजे, पण भगवा ध्वज हे हजारो वर्षांपासून देशाचे प्रतीक आहे. 15 ऑगस्टला तिरंगा फडकवूच, पण दिल्लीच्या लाल…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचं निधन झालं आहे. मंगळवारी (5 ऑगस्ट) वयाच्या 79 व्या वर्षी त्यांनी दिल्लीतील राम मनोहर लोहिया (RML) रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते आणि त्यांच्यावर उपचार सुरू होते. https://x.com/ANI/status/1952643366279061747?t=7Y3jHGgQ2YWlsZapmBai-A&s=19 सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये कलम 370 हटवण्याच्या ऐतिहासिक निर्णयावेळी राज्यपाल म्हणून जबाबदारी सांभाळली होती. त्यावेळी राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात त्यांची भूमिका महत्त्वाची होती. त्यांच्या निधनामुळे राजकीय वर्तुळातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष (ग्रामीण) जयंत वाघ यांनी अखेर सोमवारी (४ ऑगस्ट) आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी हा राजीनामा सादर केला आहे. ६ फेब्रुवारी २०२४ रोजी वाघ यांची जिल्हाध्यक्ष म्हणून निवड झाली होती, परंतु काही व्यक्तिगत कारणांमुळे त्यांनी पदाची जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडता येत नसल्याने राजीनामा देण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन वर्षांत जिल्ह्याच्या राजकारणात अनेक बदल झाले आहेत. जानेवारी २०२३ पासूनच्या नाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत काँग्रेसमध्ये झालेल्या घडामोडींमुळे अनेकांनी पक्षाची भूमिका स्पष्ट केली होती. काँग्रेसचे तत्कालीन…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन नवी दिल्ली: महाराष्ट्रातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. यामुळे राज्यात निवडणुका लवकर होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने निवडणुकीसंदर्भात दाखल केलेल्या दोन याचिका फेटाळून लावल्या आहेत. नवीन प्रभाग रचनेनुसारच निवडणुका होतील आणि यामध्ये २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला आहे. या निर्णयामुळे ओबीसी समाजातील नेत्यांनी समाधान व्यक्त केले आहे. राज्य सरकारला प्रभाग रचना करण्याचा अधिकार न्यायालयाने प्रभाग रचना करण्याचा अधिकार हा पूर्णपणे राज्य सरकारचा असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या राज्य सरकारने निश्चित केलेल्या नवीन प्रभाग रचनेनुसारच होणार आहेत. लातूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन संगमनेर, प्रतिनिधी: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर मध्ये सातत्याने चर्चेत असलेल्या महाराणा प्रताप गणेशोत्सव मंडळाची महिला कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. स्वाती संतोष अंकाराम यांची अध्यक्षपदी तर आरती पवन पासकंटी व गीतांजली शैलेंद्र शेरे यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. सामाजिक उपक्रमात अग्रेसर असलेल्या आणि गणेशोत्सवामध्ये सामाजिक देखाव्यातून प्रबोधन करणाऱ्या महाराणा प्रताप मंडळाच्या देखाव्याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागलेले असते. याशिवाय वर्षभर विविध उपक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवर महिला मंडळाचे नवे कार्यकारिणी निवडण्यात आली आहे. कार्यकारिणीमध्ये यांचा आहे समावेश… वैशाली काशिनाथ आडेप व साईसुधा विलास वन्नम (कार्याध्यक्ष), ललिता हिरालाल दुस्सा व लता किसन कोम्पेल्ली (सहकार्याध्यक्ष), वैशाली अंबादास आडेप (खजिनदार), जयश्री…
