Author: अनंत पांगारकर

संगमनेर – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या विचारांची आज केवळ देशालाच नाही, तर जगालाही गरज आहे. देशातील लोकशाही वाचवण्यासाठी महात्मा गांधी यांचे विचार घेऊन एक मोठी लोकचळवळ उभी करावी लागेल, असे मत काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. जयहिंद लोक चळवळीच्यावतीने महात्मा गांधी यांची १५६ वी जयंती, लालबहादूर शास्त्री यांची जयंती आणि आंतरराष्ट्रीय अहिंसा दिनानिमित्त संगमनेर येथे आयोजित भव्य प्रभात फेरीत ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, दुर्गाताई तांबे, उत्कर्षा रुपवते, डॉ. मैथिलीताई तांबे आदी उपस्थित होते. थोरात म्हणाले की, जुलमी ब्रिटिशांविरुद्ध महात्मा गांधी यांनी भारतातील सर्व…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत स्थानिक गुन्हे शाखेने बुधवारी (१ ऑक्टोबर) अवैध दारू वाहतुकीविरोधात एकाच दिवशी मोठी मोहीम राबवून तीन वेगवेगळ्या कारवायांमध्ये पाच आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. धडक कारवाईत पोलिसांनी ३,८१,४६०/- रुपये किमतीची विदेशी आणि देशी दारू आणि ती वाहतूक करण्यासाठी वापरलेली दोन वाहने जप्त केली आहेत. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात वेदांत वाईन्सच्या चालक मालकांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या आदेशानुसार पो.कॉ. बाळासाहेब गुंजाळ, पो.हे.कॉ. गणेश लोंढे, पो.हे.कॉ. संतोष खैरे आणि पो.ना. राहुल डोके यांच्या पथकाने ही कारवाई यशस्वी केली. विशेष म्हणजे, अवैध विक्री आणि पुरवठा…

Read More

मुंबई – राज्यातील ३२ जिल्हा परिषदा आणि त्याअंतर्गतच्या ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी सदस्यपदाचे आरक्षण निश्चित करण्याकरिता १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढण्यात येणार असल्याची राज्य निवडणूक आयोगाने माहिती दिली आहे. असा आहे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम: सूचना प्रसिद्धी- संबंधित जिल्हाधिकारी १० ऑक्टोबर २०२५ रोजी वृत्तपत्रात आरक्षण सोडती संदर्भातील सूचना प्रसिद्ध करतील.  आरक्षण सोडत आणि अधिसूचना- १३ ऑक्टोबर २०२५ रोजी आरक्षण सोडत काढल्यानंतर प्रारूप आरक्षणाची अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल. हरकती व सूचना दाखल करण्याची मुदत- प्रारूप आरक्षणावर १४ ते १७ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील. अंतिम आरक्षण प्रसिद्धी- प्राप्त झालेल्या हरकती व सूचनांचा विचार करून…

Read More

संगमनेर – संगमनेर शहरात बुधवारी (०१ ऑक्टोबर) सकाळी भररस्त्यातून एका ३० वर्षीय विवाहित महिलेचे ‘फिल्मी स्टाईल’ अपहरण झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. शहरातील रंगारगल्लीतील शनी मंदिर ते जाजू पेट्रोल पंप दरम्यान ही घटना घडली असून, घटनेनंतर तातडीने सूत्रे हलवत पोलिसांनी अपहरणकर्त्यांचा व अपहृत महिलेचा कसून शोध घेण्यास सुरुवात केली आहे. भरदिवसा शहराच्या मध्यभागी ही घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नगरपालिकेच्या वतीने रस्त्यांची साफसफाईचे काम करणारी ३० वर्षीय महिला बुधवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास स्वामी समर्थ मंदिर ते जाजू पेट्रोल पंपाकडे जाणाऱ्या रस्त्यावर काम करत होती. त्याच वेळी, जिथे रंगारगल्ली परिसर चारचाकी वाहनातून आलेल्या काही तरुणांनी तिला…

Read More

मेष – प्रॉपर्टी आणि गुंतवणुकीची कामे मार्गी लावू शकाल. काहींना प्रवासाचे योग येतील. आजच्या शुभ दिवशी तुमच्या प्रयत्नांना यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – तुमची दैनंदिन कामे वेळेत पूर्ण होतील. आरोग्याच्या किरकोळ तक्रारी कमी होतील. कामामध्ये स्थिरता आणि समाधानी भावना राहील. मिथुन – कोणाच्याही सहकार्याची अपेक्षा न ठेवता स्वतःच्या हिमतीवर काम करणे योग्य ठरेल. वादविवाद टाळण्याचा प्रयत्न करा, अन्यथा मानसिक शांतता भंग होऊ शकते. कर्क – भागीदारीच्या व्यवसायात किंवा कामात सुयश लाभेल. तुम्हाला नवी दिशा आणि नवा मार्ग सापडेल, जो भविष्यात फायदेशीर ठरेल. सिंह – खर्चाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे, त्यामुळे अनावश्यक खर्च टाळा. वाहने जपून चालवावी लागतील. कन्या -…

Read More

संगमनेर: राजापूर (ता. संगमनेर) येथे राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केलेल्या वैभव हासे याच्या पत्नीसह सासरच्या चार जणांना संगमनेर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. २५ ऑगस्ट २०२५ रोजी राजापूर येथील रहिवासी वैभव नवनाथ हासे यांनी राहत्या घरात गळफास घेत आत्महत्या केली होती. या घटनेनंतर मृत वैभव यांची पत्नी माधुरी वैभव हासे, सासरे शिवाजी तुकाराम वाडेकर, बाळासाहेब तुकाराम वाडेकर, मेहुणा तुषार शिवाजी वाडेकर (सर्व रा. चास-पिंपळदरी, ता. अकोले) यांच्याविरुद्ध संगमनेर शहर पोलिस स्टेशनमध्ये भारतीय न्याय संहिता (B.N.S.) कलम १०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात अटक टाळण्यासाठी सर्व आरोपींनी संगमनेर येथील जिल्हा व सत्र…

Read More

मेष – कामाची अधिकता राहील. सरकारी कामांमध्ये यश मिळेल. नोकरीसाठी प्रयत्न करणाऱ्यांना यश मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – आज धन लाभाच्या संधी आहेत. वेळेचा आणि ऊर्जेचा योग्य वापर करा. जुन्या कामांचे प्रकल्प वेळेत पूर्ण होतील.  मिथुन – गुरुजनांचे आशीर्वाद लाभतील. धार्मिकतेकडे कल राहील. आपल्या शब्दाला आज उचित प्राधान्य मिळेल.  कर्क – यश मिळवण्यासाठी कठोर मेहनत करावी लागेल. तुमच्या व्यक्तिमत्त्वाचा इतरांवर प्रभाव राहील. सिंह – जिद्दीने एखादे महत्त्वाचे काम हाती घेऊन पूर्ण करण्यात यश मिळेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. कन्या – आर्थिक परिस्थिती सुधारल्यामुळे चिंता कमी होतील. नियोजनाने आणि संयमाने कामे मार्गी लागतील. तूळ – नवीन ओळखी होतील आणि आर्थिक चिंता मिटेल.…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई राज्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पूरग्रस्त शेतकऱ्यांना दुष्काळाच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सर्व सवलती लागू करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी (30 सप्टेंबर) केली आहे. यासोबतच, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी तातडीची मदत आणि दीर्घकालीन उपाययोजना दिवाळीपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. राज्य मंत्रिमंडळ बैठकीनंतर माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी नुकसानीची माहिती दिली. राज्यात अतिवृष्टीमुळे सुमारे 60 लाख हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले असून, पहिल्या टप्प्यात 2 हजार 215 कोटी रुपये वितरित करण्यास सुरुवात झाली आहे. ही मदत देण्यासाठी केवायसीच्या अटी शिथिल करून ॲग्री स्ट्रक्चर रेकॉर्डच्या आधारे दिली…

Read More

संगमनेर – यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड तालुक्यातील ढाकणी या गावी एका अल्पवयीन शालेय विद्यार्थिनीवर झालेल्या अमानुष अत्याचाराच्या घटनेने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. या दुःखद घटनेत पीडित मुलीचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी तत्परता दाखवत आरोपीला अटक केली आहे. या क्रूर कृत्याविरोधात संगमनेरच्या पद्मशाली समाज मंडळ, आणि महिला पद्माशाली समाज मंडळच्यावतीने सोमवारी तीव्र संताप आणि निषेध व्यक्त करण्यात आला. समाज बांधवांमध्ये या घटनेमुळे प्रचंड रोष असून, दोषी आरोपीला फाशीची कठोर शिक्षा व्हावी आणि पीडित कुटुंबाला त्वरित न्याय मिळावा, या प्रमुख मागणीसाठी हा निषेध नोंदविण्यात आला. पद्मशाली समाज मंडळाचे अध्यक्ष गणेश सायन्ना मादास आणि महिला पद्माशाली समाज मंडळाच्या अध्यक्षा लक्ष्मी दत्तात्रय इटप यांच्या नेतृत्वाखालील…

Read More

संगमनेर – ब्रिटन आणि जपानलाही मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था २०२५ च्या मध्यात ४ ट्रिलियनचा टप्पा ओलांडून जगातील चौथी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची अर्थव्यवस्था मजबूत असल्याने भारत एक आश्वासक गुंतवणूक केंद्र बनला आहे. याच बळावर, असोसिएशन ऑफ म्युच्युअल फंड्स इन इंडिया (AMFI) नुसार म्युच्युअल फंड उद्योगाची मालमत्ता (AUM) ७५.१९ लाख कोटींवर पोहोचली असून, महिन्याला एसआयपी (SIP) द्वारे येणारी रक्कम २८,२६५ कोटी असल्याने, हा उद्योग लवकरच शंभर लाख कोटींच्या उंबरठ्यावर असेल, असे महत्त्वपूर्ण प्रतिपादन अर्थतज्ज्ञ सुनील कडलग यांनी केले. ‘सहकारातून समृद्धी’ या अभियानांतर्गत सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कर्मचाऱ्यांसाठी ‘चला अर्थसाक्षर होऊयात’ या विशेष अर्थसाक्षरता कार्यशाळेचे सोमवारी…

Read More