Author: अनंत पांगारकर

संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी – वारकरी परंपरेचे सामाजिक समतेसाठी मोठे योगदान राहिले आहे. वारकरी संतांचे कार्य सामाजिक जडणघडणीसाठी ऐतिहासिक ठरले आहे. खऱ्या अर्थाने वारकरी धर्माने मराठी मनाची मशागत केली असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी केले. साहित्यिक पठारे यांच्या हस्ते ह. भ. प. ज्ञानेश्वर बंडगर लिखित ‘होय होय वारकरी’, व डॉ. श्रीरंग गायकवाड यांच्या संत एकनाथ महाराजांवरील विशेष अंकाचा प्रकाशन सोहळा रविवारी पार पडला. संगमनेर तालुका वारकरी संघटना, श्री विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाज आणि सांदिपनी गुरुकुल, घुलेवाडी यांच्यावतीने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. विठ्ठल मंदिर ऑफ नामदेव शिंपी समाजाच्या जनसखा भवनात पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी…

Read More

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी – तत्कालीन महसूलमंत्र्यांचे सातत्याने फसलेले वाळू धोरण महसूल विभागाच्या जीवावर बेतले आहे. गेल्या काही वर्षातील एकही महसूल मंत्री अथवा महसूल प्रशासन या वाळू तस्करांचा माज उतरवू शकलेले नाही. राजकीय पक्ष नेत्यांच्या वरदहस्ताने संगमनेर तालुक्यातील सर्व नद्यांचे वाळूच्या रुपाने लचके तोडण्याचे काम तस्करांकडून सुरू आहे. अशाच एका अवैध वाळू उपशावर महसूल विभागाची रविवारी मध्यरात्री वक्रदृष्टी पडली होती. महसूल विभागाच्या रात्र गस्तीवर असलेल्या पथकाने संगमनेर तालुक्यातील कनोली येथे प्रवरा नदीपात्रातून सुरू असलेल्या वाळू तस्करीवर कारवाईचा प्रयत्न केला. मात्र संतापलेल्या वाळूतस्करांनी थेट या पथकाच्या अंगावरच जेसीबी घालण्याचा प्रयत्न केला, प्रसंगावधान राखत पथकातील अधिकारी कर्मचारी बाजूला झाल्याने मोठा अनर्थ टळला…

Read More

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी  सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर केलेल्या वादग्रस्त विधानानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य केले. त्यामुळे सोलापूरकरांविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे. मंगळवारी सकाळी वंचित बहुजन आघाडी आणि आरपीआयने सोलापूरकर यांच्या घरासमोर आंदोलन केले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी वादग्रस्त विधान केल्याचा व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर सोलापूरकर यांच्या कोथरूड येथील घराबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आले होते. सोलापूरकर यांच्या घराबाहेर आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला होता. मात्र शिवाजी महाराजांबद्दल आक्षपार्ह वक्तव्य प्रकरण कुठे थांबत नाही तोच आता पुन्हा सोलापूरकर यांनी डॉ. बाबासाहेब…

Read More

संगमनेर, दि. ११ फेब्रुवारी – घरासमोर तात्पुरता आडोसा करून उभारण्यात आलेल्या बाथरूममध्ये आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ काढल्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील या घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. अकबर युनूस सय्यद (रा. चिंचोली गुरव, संगमनेर) या आरोपी विरोधात संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात बालकाचे लैंगिक अपराधापासून संरक्षण (पोक्सो), अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायदा, भारतीय न्याय संहिता कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, मोलमजुरी करणाऱ्या कुटुंबातील दहावीमध्ये शिकत असलेली सोळा वर्षीय वयाची पीडित तरुणी घरासमोर बॅनरच्या कागदाचा आडोसा करून तयार करण्यात आलेल्या बाथरूममध्ये सोमवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास आंघोळ करत होती. वरतून छत नसलेल्या…

Read More

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – गेल्या काही दिवसांपासून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना धक्क्यावर धक्के दिले जात आहे. शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांच्या कार्यकाळातील लोकप्रिय योजनांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ब्रेक लावल्याची माहिती समोर आली आहे. लाडक्या बहिणींना द्यावयाच्या प्रत्येकी दीड हजार रुपयांनी सरकारी तिजोरीवर मोठा ताण पडल्याने आता हा ताण कमी करण्यासाठी ‘आनंदाचा शिधा’, ‘शिवभोजन थाळी’ आणि मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना थांबविण्याचा राज्य सरकारचा विचार सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. विधानसभा निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्रिपदी असताना एकनाथ शिंदेंनी तीर्थदर्शन योजनेची घोषणा केली होती. ज्येष्ठ नागरिकांना प्रमुख स्थळांचे तीर्थदर्शन मोफत घडवले जात होते. मात्र आता ही तीर्थदर्शन योजना थांबवण्याचा निर्णय देवेंद्र फडणवीसांनी घेतला आहे.…

Read More

मंगळवार, दि. ११ फेब्रुवारी – सराईत गुन्हेगार असलेल्या श्रीरामपूर तालुक्यातील शाहरुख रज्जाक शेख (वय ३२, रा. खैरी, ता. श्रीरामपूर) याला अहिल्यानगरच्या स्थानिक गुन्हे शाखेने गावठी कट्ट्यासह पकडले आहे. त्याच्याकडून एक गावठी पिस्तुल, चार जिवंत काडतुस, एक टोयोटा कंपनीची फॉरच्युनर, एक मोबाईल असा एकुण १० लाख ७४ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. अहिल्यानगरचे पोलीस अधिक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना जिल्ह्यातील अवैध धंदयाची माहिती घेऊन कारवाई करणेबाबत आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या आदेशानुसार पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत थोरात, पोलीस अंमलदार गणेश लोंढे, फुरकान…

Read More

अहिल्यानगर, दि. ११ फेब्रुवारी – मतदान यंत्र पडताळणी प्रक्रियेत केवळ नेवासा मतदारसंघातील शिवसेनेचे (ठाकरे गट) पराभूत उमेदवार शंकरराव गडाख यांचाच अर्ज राहिल्याने गडाख यांच्या अर्जानुसार मतदान यंत्राची पडताळणी होणार आहे. लोकसभा निवडणुकीतील एक व विधानसभा निवडणुकीतील १० अशा एकूण ११ पराभूत उमेदवारांनी निवडणुकीतील मतदान यंत्र पडताळणीसाठी अर्ज केले असले तरी प्रत्यक्षात मात्र आता केवळ एकच उमेदवार पडताळणीच्या रिंगणात राहिला आहे. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर अहिल्यानगर मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार डॉ. सुजय विखे यांनी तसेच विधानसभा निवडणुकीनंतर बाळासाहेब थोरात (काँग्रेस, संगमनेर), प्राजक्त तनपुरे (राष्ट्रवादी-शरद पवार), प्रभावती घोगरे (काँग्रेस, शिर्डी), अभिषेक कळमकर (अहिल्यानगर, राष्ट्रवादी-शरद पवार), संदीप वर्पे (राष्ट्रवादी-शरद पवार, कोपरगाव), राम शिंदे (भाजप,…

Read More

मुंबई, दि. ११ फेब्रुवारी – मंगळवारपासून (११ फेब्रुवारी) राज्यात बारावीच्या परीक्षांना सुरुवात होत आहे. ११ ते १८ मार्च दरम्यान ही परीक्षा होत आहे. राज्यभरातून या परीक्षेला पंधरा लाखाहून अधिक विद्यार्थी सामोरे जात आहे. यंदाच्या वर्षी बारावीच्या परीक्षेला एकूण १५ लाख ५ हजार ३७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. या एकूण संख्येपैकी ८ लाख १० हजार ३४८ मुले, तर ६ लाख ९४ हजार ६५२ मुली आहेत. याशिवाय या परीक्षेला ३७ तृतीयपंथीयांनी देखील नोंदणी केली आहे. महाराष्ट्रात एकूण १० हजार ५५० कनिष्ठ महाविद्यालयातील या विद्यार्थ्यांची नोंदणी झालेली असून या परीक्षेसाठी संपूर्ण राज्यातील विद्यार्थ्यांसाठी ३ हजार ३७३ मुख्य केंद्रावर परीक्षा आयोजित करण्यात आली आहे.…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुहेरी धक्का दिला आहे. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडील एसटी महामंडळाची जबाबदारी सनदी अधिकाऱ्याकडे देण्याचा निर्णय घेत पहिला धक्का दिला. आता राज्याच्या आपत्कालीन व्यवस्थापन प्राधिकरणावरही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना स्थान न देण्याचा निर्णय घेत फडणवीस यांनी या प्राधिकरणातून शिंदे यांना बाजूला केल्याची चर्चा सुरु झाली आहे. जुलै २००५ रोजी मुंबईत आलेल्या महापुराच्या धर्तीवर राज्य शासनाने मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची स्थापना केली होती. मात्र, आता राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या पुनर्रचनेत काही सुधारणा करण्यात आल्यात. यातून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना वगळ्यात आलंय. त्यामुळं एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Read More

संगमनेर, दि. १० फेब्रुवारी – तिळगुळ देणे हा सण भारतीय परंपरेत पवित्र मानला जातो. मात्र तिळगुळ या समारंभाच्या नावाखाली महिलांना एकत्र करून तमाम महिला भगिनीसमोर लोकप्रतिनिधींनी वेगवेगळ्या गाण्यांवर केलेला डान्स आणि धांगडधिंगा घालून संगमनेरमधील महिला भगिनींचा अपमान करणे, हे अत्यंत दुर्दैवी आहे. संगमनेर तालुक्यात अशी असभ्य संस्कृती मान्य नसल्याने संपूर्ण तालुक्यामध्ये या प्रकाराचा तीव्र निषेध नोंदवला जात आहे. शहरातील जाणता राजा मैदानावर तिळगुळ या कार्यक्रमाच्या नावाखाली महिलांना एकत्र करण्यात आले. अत्यंत गोंधळ झालेल्या या कार्यक्रमात महिलांची कोणतीही सुविधा नव्हती. फक्त राजकीय उद्देशाने सर्व महिलांना एकत्र केले होते. बक्षिसाच्या नावाखाली महिला भगिनींना लाच देण्याचा प्रकार काहीसा यामधून दिसत होता. बेशिस्त आणि…

Read More