Author: अनंत पांगारकर

शनिवार, २१ डिसेंबर  नागपूर – राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर तब्बल महिनाभराने मंत्रिमंडळाचे रखडलेले खातेवाटप शनिवारी जाहीर करण्यात आले. फडणवीस शिंदे पवार सरकारच्या मंत्रिमंडळातील खाते वाटपाला अखेर मुहूर्त लाभला असून राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडील महसूल खात्याच्या चाव्या दुसऱ्या मंत्र्यांकडे देण्यात आल्या आहे. विखेंकडील महत्त्वाचे खाते काढून आता त्यांच्याकडे जलसंधारण (गोदावरी व कृष्णा खोरे विकास) खात्याचा पदभार सोपविण्यात आला आहे. तर गृह खाते मुख्यमंत्र्यांनी आपल्याकडेच ठेवले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगर विकास आणि गृहनिर्माण मंत्रालयाचे तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे अर्थ खात्याची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. हिवाळी अधिवेशनाच्या एक दिवस आधी मंत्रिमंडळाचा शपथविधी पार पडला होता. महायुतीच्या ३९…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – सातत्याने विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन होत असलेल्या संगमनेरमध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेला कला महोत्सव नक्कीच आनंद महोत्सव ठरेल, असे प्रतिपादन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलामध्ये जयहिंद लोक चळवळीच्या माध्यमातून कला महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. यावेळी ते बोलत होते. जयहिंद लोक चळवळीचे संस्थापक अध्यक्ष माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, संगमनेरच्या माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, बालभारतीचे डॉ. अजितकुमार लोळगे, पुणे व्यवसाय मार्गदर्शन केंद्राच्या दिपाली जोगदंड, राजेंद्र वाकळे, प्रकल्पप्रमुख…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – लोकशाही आणि संविधानाच्या नावावर निवडून सत्तेवर यायचे आणि त्यानंतर संविधानाची सर्व मूल्य पायदळी तुडवायची ही भाजपची नीती असून केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विरोधात केलेले वक्तव्य भाजपाची समाजविरोधी चालत आलेली कायमची प्रवृत्ती दर्शवत असल्याची टीका काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. यासाठी झाले आंदोलन – महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर केलेल्या वक्तव्याचा निषेध तसेच आंबेडकर चळवळीतील कार्यकर्ता सोमनाथ सूर्यवंशी व बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुषपणे झालेल्या मृत्यूच्या निषेधार्थ महाविकासह आघाडीच्यावतीने आयोजित निषेध आंदोलनात थोरात बोलत होते यांची उपस्थिती – माजी…

Read More

शनिवार २१ डिसेंबर  संगमनेर – सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याकडून २०२४-२५ या वर्षाच्या गळीत हंगामासाठी कार्यक्षेत्रातील ऊसाला प्रति टन २८०० रुपये व २०० रुपये उसविकास अनुदान याप्रमाणे प्रति टनामागे तीन हजार रुपयांचा भाव देण्यात येणार असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ यांनी दिली आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या आदर्श तत्वावर वाटचाल करणाऱ्या व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि सभासदांचे हीत सातत्याने जोपासले आहे. सातत्याने सर्वाधिक भाव देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कार्यक्षेत्रासह कार्यक्षेत्र बाहेरील ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी कारखान्यावर मोठा विश्वास दर्शविला…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २१ डिसेंबर २०२४ ते ३ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्र व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेतयात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – परभणी येथील घटना व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सभागृहामध्ये भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विषयी अवमानकारक वक्तव्य केले. भाजपला आंबेडकरांविषयी असलेला राग या वक्तव्याच्या निमित्ताने समोर आला आहे. या वक्तव्यामुळे देशवासीयांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. यामुळे संगमनेरमध्ये शनिवारी सकाळी नऊ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ निषेध आंदोलन करण्यात येणार आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री बाळासाहेब थोरात, नाशिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीमध्ये महाविकास आघाडीच्या वतीने हे निषेध आंदोलन होत असल्याची माहिती काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी दिली आहे. दिवटे म्हणाले, संसदेमध्ये संविधानावर चर्चा…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर संगमनेर – अंत्योदय अन्न योजना लाभार्थ्यांची निवड आणि योजनेची अंमलबजावणी यासंदर्भात प्रशासनाची भूमिका संशयास्पद वाटत आहे. या योजनेचा लाभ गरीब झोपडपट्टी धारक, अल्पभूधारक, छोटे व्यवसाय, टपरीधारक, हातगाडीवर व्यवसाय करणारे, विधवा, ज्येष्ठ नागरिकांना व पात्र गरजूंना देण्यात यावा, अशी मागणी करत यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा निवेदनाद्वारे प्रशासनाला देण्यात आला आहे. गरीब गरजू नागरिक व शिवसेनेच्यावतीने गुरुवारी (१९ डिसेंबर) प्रांताधिकार्‍यांना यासंदर्भातील निवेदन देण्यात आले. गरजूंना या योजनेचा लाभ मिळत नसून सध्या दिवसेंदिवस वाढणारी महागाई आणि बेरोजगारी यामुळे अंत्योदय योजनेतून अनेक गरीब कुटुंबांचा उदरनिर्वाह होतो, मात्र या योजनेचा लाभ गरजूं ऐवजी नोकरदार…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर  संगमनेर – एकीकडे दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमती, वाढत असलेली महागाई, शेतमालाचे वाढते भाव आणि दुसरीकडे सातत्याने पाडले जात असलेले शेतीमालाचे भाव यामुळे शेतकरी मेटाकुटीला आला आहे. शेतीमालाचे भाव सरकारकडून विचार करूनच पाडले जाताय की काय? असा प्रश्न आता प्रत्यक्ष शेतकऱ्यालाच पडू लागलेला आहे. यावरून आता शिवसेना उद्धव ठाकरे आक्रमक झाली असून सरकारचे डोके ठिकाणावर आहे का असा प्रश्न शेतकरी शिवसैनिक पंकज पडवळ यांनी उपस्थित केला आहे. पडवळ म्हणाले, गेल्या दोन वर्षापासून आम्ही संगमनेर, अकोले व श्रीरामपूर तालुक्यातील शेतकरी सातत्याने दूध दरावर आंदोलन करत आहोत. परंतु यावरही तात्पुरती मलमपट्टी करून सरकार शेतकऱ्यांचीच गळचेपी करण्याची भूमिका सातत्याने घेत…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर नागपूर – राज्यातील शेतकरी, युवा वर्ग, ज्येष्ठ नागरिक, वंचित घटकाला दिलेली आश्वासने पूर्ण केली जातील. शासनाच्या सुरु असलेल्या योजना बंद होऊ देणार नाही, राज्यातील लाडक्या बहिणींना त्यांचा देय हप्ता अधिवेशन संपल्यावर देण्यात येईल, अशी ग्वाही देत महाराष्ट्र कालही नंबर एक होता, आजही नंबर एक आहे आणि उद्याही नंबर एकच राहील, महाराष्ट्राशी कोणीही स्पर्धा करू शकत नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिमानाने व आत्मविश्वासाने विधानसभेत स्पष्ट केले. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात राज्यपाल महोदयांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलत होते. महाराष्ट्र थेट परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर… मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रात १ जुलै…

Read More

शुक्रवार २० डिसेंबर अहिल्यानगर – जिल्ह्यात सध्या कडाक्याची थंडी जाणवत असून तापमान वारंवार १० अंश सेल्सिअसच्या खाली घसरत आहे. आगामी काळातही थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी थंडीपासून बचावासाठी आवश्यक ती काळजी घ्यावी, असे आवाहन प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी शाहूराज मोरे यांनी केले आहे. थंडीच्या लाटेबाबत स्थानिक हवामान अंदाज रेडिओ, टीव्ही व वर्तमानपत्रांद्वारे नियमित तपासावा. नागरिकांनी स्वेटर, मफलर, कानटोपी, हातमोजे, पायमोजे तसेच चादर यांसारखे पुरेसे उबदार कपडे वापरावेत. शक्यतो थंड वाऱ्यात बाहेर जाणे टाळावे व शरीर कोरडे ठेवावे. शरीर ओले झाल्यास त्वरीत कपडे बदलून शरीरातील उष्णता टिकवावी. निरोगी अन्न, विशेषतः…

Read More