Author: अनंत पांगारकर

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर  विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता कोणत्याही क्षणी लागू शकते. त्यामुळे राज्य सरकारने निर्णयांचा धडाका लावला आहे. त्याचबरोबर जीआर, सरकारी जाहिराती आणि स्थानिक आमदार मंत्र्यांकडून उद्घाटनाच्या जाहिरातींचा माध्यमांना सपाटा सुरू आहे. या सर्व गोष्टींवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे कर्जत-जामखेडचे रोहित पवार यांनी ट्विटच्या माध्यमातून जोरदार टीका केली आहे. ट्विटमध्ये पवार म्हणाले, केवळ निवडणुका समोर ठेवून मंत्रिमंडळ बैठकीत घेतले जाणारे निर्णय, GR, आणि जाहिराती बघता आता पगारही होतील की नाही अशी चर्चा अधिकारी आणि कर्मचाऱ्यांमध्ये दबक्या आवाजात सुरू असून या महिन्याच्या पगाराची तर आशासुद्धा सर्वांनी सोडलीय. सहकारी पक्षांची आर्थिक बेशिस्त आणि हवेतल्या घोषणांना कंटाळून कालच्या मंत्रिमंडळ बैठकीतून अर्थमंत्री तर पहिल्या…

Read More

शुक्रवार, ११ ऑक्टोंबर सहकार कायद्यानुसार एखाद्या संस्थेची थकबाकी असताना संचालकपदावर राहता येत नाही, या नियमाचा आधार घेत संगमनेर मधील उद्योजक आणि काँग्रेसचे नेते कैलास पानसरे यांचे दोन संस्थांवरील संचालकपद सहकारी संस्था उपनिबंधक संतोष कोरे यांनी रद्द ठरविले आहे. यामुळे संगमनेरच्या सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. रायते विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था आणि दुर्गामाता ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था या दोन संस्थांवरील संचालक पद कैलास बाळासाहेब पानसरे गमवावे लागले आहे. पानसरे हे रायते विविध कार्यकारी सेवा सोसायटीमध्ये संचालक म्हणून निवडून आले होते. त्यांनी शारदा पतसंस्थेमधून कर्ज घेतले होते. या कर्जाची थकबाकी आहे. सहकार कायद्यानुसार थकबाकी असताना संचालकपदासाठी काम करणे बेकायदेशीर आहे.…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस शुक्रवार दि. ११ ऑक्टोंबर मेष – आपले कार्य वाढवण्यासाठी आपणास सुसंधी मिळणार आहे. आपल्या कार्यक्षेत्रात यश मिळणार आहे तसेच प्रसिद्धीही आपणास मिळू शकते. नवीन कामास प्रारंभ करू शकता. वृषभ – आपण आज जे कार्य कराल त्यामध्ये आपणास यश येईल. काम करण्याची कार्यक्षमता वाढणार आहे. उत्तम मनोबल असल्यामुळे आनंदाने काम कराल. आपणास सहकाऱ्यांचे उत्तम सहकार्य लाभेल. मिथुन – कामात यश येण्यासाठी आपण खूप काम कराल. सातत्याने काम करून यश मिळवा. परदेशातून काही संधी आपणास येण्याची अपेक्षा असेल तर, आज ती सुसंधी निश्चित येईल. कर्क – आर्थिक लाभाचे योग आहेत. पण तसे आपण खर्चही कराल. कुटुंबामध्ये अचानक…

Read More

गुरुवार, १० ऑक्टोंबर  अहिल्यानगर – अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी अहिल्यानगर जिल्ह्यात २३ ऑक्टोंबरपर्यंत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश लागू केले आहे. मुंबई पोलिस अधिनियम १९५१ चे कलम ३७ (१) व ३७ (३) अन्वये हे आदेश लागू करण्यात आले असून सदरचे आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, लग्न मिरवणुका किंवा प्रेत यात्रेच्या जमावास लागू राहणार नाहीत. तसेच हा आदेश पोलीस अधिकारी, कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना, सभा अगर मिरवणूका काढण्यास रितसर परवानगी घेतली असलेल्या व्यक्तींना लागू नाही. आदेशाचा भंग करणाऱ्या विरोधात कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Read More

गुरुवार, १० ऑक्टोबर  पुणे – सुनेने न्यायालयात केलेल्या फसवणूक आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या तक्रारीमुळे आणि न्यायालयाने काढलेल्या नोटीसीमुळे राज्याचे माजी आदिवासी विकासमंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते मधुकरराव पिचड, पत्नी कमल आणि संबंधितांच्या यांच्या अडचणीत आगामी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाढ झाली आहे. पिचड यांनी त्यांच्या द्वितीय पत्नी कमल या आदिवासी नसतांना त्यांचा खोटा व बनावट आदिवासी जातीचा दाखला बनून त्याआधारे आमच्या सून श्रीमती सरोज जितेंद्र पिचड यांची संपत्ती हडप करून फसवणूक केली असल्याचे म्हटले आहे. या संदर्भात श्रीमती पिचड यांनी अनुसूचित जाती जमाती तपासणी समितीचे सह आयुक्त यांच्याकडे २०१८ पासून तसेच शहापूर पोलीस निरीक्षक यांच्याकडे देखील तक्रारी केल्या मात्र…

Read More

गुरुवार, १० ऑक्टोंबर मुंबई – ज्येष्ठ उद्योगपती पद्मविभूषण रतन टाटा यांना आज राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतचा शोकप्रस्ताव बैठकीत मांडला. यावेळी टाटा यांचे कार्यकर्तृत्व लक्षात घेऊन त्यांना भारतरत्न देण्याची केंद्राला विनंती करणारा प्रस्तावही संमत करण्यात आला. या शोकप्रस्तावात म्हटले आहे की, उद्यमशीलता हादेखील समाज उभारणीचा प्रभावी मार्ग असतो. नवनवीन उद्योगांच्या उभारणीनेच देश प्रगतीपथावर नेता येतो, मात्र त्यासाठी हृदयात निस्सीम देशप्रेम आणि आपल्या समाजाप्रती तितकाच प्रामाणिक कळवळा हवा. रतन टाटा यांच्या रुपाने आपण अशाच विचारांचा एक समाजसेवी, द्रष्टा आणि देशप्रेमी मार्गदर्शक गमावला. भारताच्या उद्योगक्षेत्रातच नव्हे, तर समाजउभारणीच्या कामातही टाटा यांचे योगदान अपूर्व होते. ते…

Read More

गुरुवार, १० ऑक्टोंबर अहिल्यानगर – आधारभूत किंमत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यासाठी पणन महासंघाने मूग, उडिद व सोयाबीन खरेदीसाठी १८ केंद्रांना मंजूरी दिली. याशिवाय मूग, उडिद व सोयाबीन हमीभावाने खरेदीच्या तारखा निश्चित करण्यात आल्या असून जिल्ह्यातील १२ खरेदी केंद्रावर शेतकऱ्यांची नोंदणी करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा पणन अधिकारी बी. आर. पाटील यांनी दिली. हंगाम २०२४-२५ साठी मूग या पिकासाठी हमीभाव ८ हजार ६८२ प्रति क्विंटल, उडिद ७ हजार ४०० प्रति क्विंटल तर सोयाबीनसाठी ४ हजार ८९२ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात येणार आहे. मूग व उडिद पीकाची १० ऑक्टोबर २०२४ ते ७ जानेवारी २०२५ तर सोयाबीन पिकाची १५ ऑक्टोबर २०२४ ते…

Read More

गुरुवार, १० ऑक्टोबर  मुंबई : ज्येष्ठ उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी चेअरमन रतन टाटा यांची बुधवारी रात्री वयाच्या ८६ व्या वर्षी प्राणज्योत मालवली. रतन टाटा यांच्या निधनाने संपूर्ण देशासह जगभरातूनही हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. रतन टाटा यांच्या निधनाचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेतले. राज्यातील सर्व मनोरंजन आणि उत्सवाचे कार्यक्रम रद्द करण्यात येत आहेत. तसेच, त्यांच्या पार्थिवावर पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येतील, अशी माहिती मुख्यमंत्री शिंदे यांनी दिली. ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या निधनाने उद्योगपतींपासून मनोरंजन, राजकारण आणि क्रीडा जगतात शोककळा पसरली आहे. गुरुवारी त्यांचे पार्थिव श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एनसीपीए येथे ठेवण्यात येणार…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस गुरुवार, दि. १० ऑक्टोंबर मेष – संयमाने वागणे आवश्यक आहे. नवीन ओळख झालेल्यांची आती मैत्री करू नका. व्यवहार करताना फार दक्षता बाळगणे आवश्यक आहे. नव्या संकल्पनासाठी ज्येष्ठ व्यक्तींचा सल्ला मोलाचा ठरणार. वृषभ – मनासारखी आर्थिक प्राप्ती असणार आहे. त्यामुळे कार्य उत्साहाने कराल. मित्र परिवारामध्ये सावधगिरी बाळगावी. आर्थिक व्यवहार निश्चितच टाळा. प्रवासात मोठा त्रास संभवतो. मिथुन – आज आपणास अडचणीच्या मार्गातून काम करावे लागेल. अडचणींवर मात करावीच लागेल. कर्ज देणे घेण्याचे व्यवहार नीट करावे. या कामासाठी प्रवास करावा लागेल दक्षता घेणे आवश्यक आहे. कर्क – कामाचे स्वरूप वाढणार आहे. आपले नियोजन व्यवस्थित होणार आहे. कामे मार्गी…

Read More

बुधवार ०९ ऑक्टोबर नित्याच्याच बनलेल्या दुचाकी चोऱ्या, महिलांच्या गळ्यातील दागिने पळविणे, रोकड लंपास करणे या घटनांमुळे संगमनेर पोलिसांचे चोरट्यांवरील नियंत्रण पूर्णतः सुटले असल्याचे समोर येत असून ऐन सणासुदीत संगमनेरकर महिला असुरक्षित बनल्या आहे. सातत्याने वाढणाऱ्या या घटनांमध्ये मंगळवारी आणि बुधवारी आणखी भर पडली. त्यामुळे चोरीची ही मालिका कधी खंडित होणार असा प्रश्न संगमनेरकरांनी उपस्थित केला आहे. चोरट्यांसाठी अतिशय सॉफ्ट ठरलेल्या एसटी बस स्थानकातून महिलेचे दागिने लंपास करण्याच्या घटनेला काही तास होत नाही तोच पुन्हा घडलेल्या घटनांनी पुन्हा एकदा नव्या पोलीस उपअधीक्षक, निरीक्षकांसह पूर्ण पोलिस यंत्रणेला आव्हान निर्माण केले आहे. त्यामुळेच की काय पोलिसांकडून चोरीचे स्वतंत्र गुन्हे नोंदविण्याऐवजी एकाच गुन्ह्यात दुसरा…

Read More