Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज  सिन्नर -चीनच्या ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये भारताच्या प्रगतीची प्रशंशा करताना फुदान विद्यापीठातील सेंटर फॉर साउथ एशियन स्टडीचे संचालक झांग जियाडोंग यांनी भारताचा जगात वेगाने वाढणाऱ्या प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक असा उल्लेख करत ‘भारत खरंच एक मोठी शक्ती’ असं म्हटलंय. वेगाने विकसित होणाऱ्या या भारतातील म्युच्युअल फंड उद्योगानेही ५० लाख कोटींचा टप्पा नुकताच पार केला असून या उद्योगाची भविष्यकालीन वाटचाल येत्या तीन ते चार वर्षात शंभर लाख कोटींची होईल, असा आशावाद कडलग इन्व्हेस्टमेंटचे संचालक सुनील कडलग यांनी व्यक्त केला. निमाचे अध्यक्ष धनंजय बेळे व मानद सचिव राजेंद्र अहिरे यांच्या पुढाकाराने नाशिक इंडस्ट्रीज अँड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन (निमा) सिन्नर आयोजित “नव्या युगाचे आर्थिक…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर शहरातील स्वामी समर्थ मंदिर ते गंगामाई घाटाकडे जाणारा म्हाळूंगी नदीवरील पूल तुटून दीड वर्षाचा कालावधी उलटला आहे. नव्याने या पुलाची उभारणी करण्यासाठी पालिका प्रशासनाकडून तिरंगा होत असल्याचा कारणावरून शुक्रवारपासून (ता. २ फेब्रुवारी) स्वामी समर्थ मंदिरापाशी नागरिक साखळी उपोषणास प्रारंभ करणार आहे. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून रखडलेला या पुलाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. तत्कालीन एका कामाच्या चुकीमुळे म्हाळूंगी नदीवरील पूल कोसळला होता. संगमनेर शहरातील अनेक विभागांना जोडणारा हा महत्त्वाचा पूल असल्याने या पुलाची बांधणी तातडीने करण्यात यावी अशी मागणी होती. पूल कोसळल्याने अनेकांची मोठी गैरसोय निर्माण झाली. मात्र पालिकेमध्ये प्रशासकीय राज सुरू असल्याने या पुलाच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अमळनेर येथे होणाऱ्या अखिल भारतीय साहित्य संमेलनामध्ये संगमनेर येथील पत्रकार व शिक्षण अभ्यासक संदीप वाकचौरे यांनी लिहिलेल्या ‘शिक्षणाचे परिवर्तन’ व ‘विनोबांची शिक्षण छाया’ या दोन पुस्तकांचे प्रकाशन रविवारी (ता. ४ फेब्रुवारी) मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती चपराक प्रकाशनचे प्रमुख पत्रकार घनश्याम पाटील यांनी दिली. प्रकाशनाच्यावतीने प्रकाशित होणाऱ्या ‘परिवर्तनाची वाट’ या पुस्तकाला महाराष्ट्राचे माजी शिक्षण संचालक शिवाजी तांबे यांची प्रस्तावना लाभली आहे. ‘विनोबांची शिक्षण छाया’ या पुस्तकाला संपादक घनश्याम पाटील यांची प्रस्तावना लाभली आहे. या प्रकाशन सोहळ्यात ज्येष्ठ पत्रकार जे. डी. पराडकर, सामाजिक कार्यकर्ते मयूर बागुल व पाटील यांच्यासह महाराष्ट्रातील नामवंत साहित्यिक उपस्थित राहणार आहेत. वाकचौरे यांचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – अयोध्येतील प्रभू श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे औचित्य साधून ‘संगमनेरी’ काका पुतण्याने सुयोग्य सुरावटींनी सजवून सादर केलेले संगमनेरचे सुपुत्र आणि प्रतिभाशाली कवी मुरारी देशपांडे यांच्या लेखणीतून हिंदीत साकारलेले “कश्मीर बोले शीश उठाकर बोले कन्याकुमारी, सदियो से थी मनोकामना आज पुरी हुई हमारी” असा मुखडा असलेले ‘राम गीत’ आता सातासमुद्रापार पोहोचले आहे. सोशल मिडीयावरील शेअरिंगच्या झपाट्याने दुबई पासून अमेरिका-इंग्लंड, ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, कानडा, स्वित्झर्लंडसह दक्षिण आफ्रिकेतील भागांमध्येही ‘संगमनेरी’ स्वर घुमतोय. संगमनेरचा नावलौकिक वाढविणाऱ्या या कामगिरीबद्दल येथील अनेक कला रसिकांनी मुरारी देशपांडे व सर्वेश देशपांडे यांचे अभिनंदन केले आहे. हे ‘रामगीत’ मुरारी देशपांडे यांनी लिहिले आणि त्याला चालही लावली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील ५८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नाही. याशिवाय श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचीदेखील छत्रपती संभाजी नगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर येथून वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस सह आयुक्त असलेले व नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – ज्यामध्ये विविध स्वरूपाची विविधता आहे. त्या विविधतेमध्ये देखील एकात्मता साधली गेली आहेत. रंग, वर्ण, भाषा, आचरण पद्धती यावरून भारतीय संस्कृती कोणाला विभागत नाही. देशात हजारो वर्षांपासून लोकशाही अस्तित्वात आहे. पूर्वी येथे राजाही लोकांमधून निवडला जायचा. लोकशाही या भूमीला नवीन नाही, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी व्यक्त केले. चाणक्य मंडल परिवारातर्फे संगमनेर येथील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे “प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास” व भूषण केळकर संपादित ‘यशोगाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्णा धर्माधिकारी, अनिल नागणे, भूषण केळकर, उपस्थित होते. माजी आयएएस अधिकारी व संचालक अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ऊस वाहतूक करणाऱ्या मालट्रकचा वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने संपूर्ण मालट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने झालेल्या अपघातात मालट्रकने पेट घेतला. यात वाहन चालकाचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील खांबा-वरवंडी शिवारामध्ये बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष राणू मोटे असे अपघातात मृत झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष मोटे हा मालट्रक चालक आपल्या ट्रकमध्ये राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून ऊस घेऊन संगमनेरच्या दिशेने येत होता. खांबे शिवारामध्ये रस्त्यावरून आडव्या गेलेल्या वीज वाहक तारेला ट्रकमधील उसाचा स्पर्श झाल्याने या तारेतील वीज प्रवाह संपूर्ण मालट्रकमध्ये उतरला.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान संगमनेरमध्ये सादर होत आहे. जाणता राजा मैदानावर होणाऱ्या या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात असून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या तयारीची पाहणी करत आढावा घेतला. आमदार थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेरकरांसाठी मोफत प्रयोग असलेल्या या महानाट्याची उत्सुकता ताणली गेली आहे. चार दिवस दररोज सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचे प्रयोग होणार आहे. यासाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना मोफत पास वाटप देखील सुरू आहे. थोरात दरवर्षी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत असतात. यावर्षी मात्र कार्यकर्त्यांनी पुढाकार…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे: राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२, रा. वैध मापनशास्त्र, श्रीरामपूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. गायकवाड याने राज्य मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करुन स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाच लुचपतच्या नगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड याला पकडले होते. त्यानंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदर घटनेच्या केसच्या सद्यस्थितीबाबत व केसमधील प्रलंबित विषयाबाबत माहिती दिली. तसेच कुळधरण ग्रामपंचायत पोलीस पाटील समीर पाटील यांनी गावातील विविध विकासकामांबाबतचे निवेदन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना दिले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सदर केसच्यामध्ये शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांना सांगितले. तसेच या प्रकरणाची सद्यस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळधरण ग्रामपंचायत विकासासाठी सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.

Read More