Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – राष्ट्र सेवा दल संगमनेरच्या कार्याध्यक्षपदी अनुराधा आहेर, सचिवपदी रवी दिवे तर खजिनदारपदी विश्वनाथ भुजबळ यांची निवड करण्यात आली. स्वातंत्र्यसैनिक भास्करराव दुर्वे नाना स्मारक येथे रविवारी तालुका अध्यक्ष राम चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राष्ट्र सेवा दल संगमनेर केंद्राच्या विशेष बैठकीत नवीन कार्यकारिणीची घोषणा करण्यात आली. चन्ना यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या बैठकीत संघटनेच्या भविष्यातील वाटचालीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीच्या सुरुवातीला राष्ट्र सेवा दलाची विचारधारा, समाजप्रबोधन, युवक संघटन आणि संविधान मूल्यांच्या संरक्षणासह लोकशाही बळकटीकरणावर भर देण्यात आला. आगामी काळात संगमनेर तालुक्यात संघटनेचा विस्तार करून सामाजिक, शैक्षणिक आणि लोकजागृतीचे उपक्रम अधिक प्रभावीपणे राबविण्याचा निर्धार नवनियुक्त पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. यावेळी…
संगमनेर, प्रतिनिधी – श्री क्षेत्र खंडोबा देवगड देवस्थानचा ‘ब’ वर्गात समावेश झाला असून, या तीर्थक्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी शासनस्तरावरून आवश्यक तो सर्व निधी उपलब्ध करून दिला जाईल, अशी ग्वाही आमदार अमोल खताळ यांनी दिली. हिवरगाव पावसा येथील प्रतिजेजुरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवगड खंडोबा यात्रोत्सवानिमित्त आमदार खताळ यांनी पत्नी नीलम खताळ यांच्यासह खंडोबा मल्हार मार्तंडाची महाआरती केली. यावेळी त्यांनी रथाचे सारथ्य करत भाविकांचा उत्साह वाढवला. यात्रोत्सवानिमित्त आयोजित अश्व व पशुपक्षी प्रदर्शनाचे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. देवस्थान परिसरातील रस्त्यांची कामे आणि पुलाचा प्रश्न आधीच मार्गी लावला असून, आद्य क्रांतिवीर राजे उमाजी नाईक यांचे स्मारक व पाणीपुरवठ्यासाठीची उपसा सिंचन योजना पूर्णत्वास नेण्यासाठी आपण…
संगमनेर, प्रतिनिधी – मोदी सरकारने आज सादर केलेला अर्थसंकल्प देशासमोरील आर्थिक आणि सामाजिक प्रश्नांवर उपाय शोधण्याण्याऐवजी ते प्रश्न अधिक गंभीर करणारा आहे. हा अर्थसंकल्प म्हणजे थकलेल्या आणि दिशाहीन सरकारचा दाखला असून, सर्वसामान्यांच्या हितापेक्षा केवळ घोषणाबाजीला यात प्राधान्य देण्यात आले आहे, अशी तीव्र प्रतिक्रिया माजी मंत्री आणि काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. आजच्या अर्थसंकल्पावर भाष्य करताना थोरात म्हणाले की, या अर्थसंकल्पात गरिबांसाठी कोणताही दिलासा देण्यात आलेला नाही. महागाई आटोक्यात आणण्यासाठी सरकारकडे कोणतीही ठोस योजना नाही आणि बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देण्यासाठी कोणतेही प्रभावी उपाय योजले गेलेले नाहीत. ठप्प झालेली वेतनवाढ, बाजारपेठेतील कमकुवत मागणी आणि खासगी गुंतवणुकीतील मंदी ही…
संगमनेर, प्रतिनिधी – केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा महाराष्ट्रातील शेतकरी, तरुण, आरोग्य आणि उद्योग क्षेत्राच्या सर्वांगीण विकासाला नवी दिशा देणारा असून, विकसित भारताच्या दिशेने टाकलेले हे एक खंबीर पाऊल आहे, अशी प्रतिक्रिया आमदार अमोल खताळ यांनी व्यक्त केली. आमदार खताळ म्हणाले की, या अर्थसंकल्पात बळीराजाच्या कष्टाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली आहे. ‘व्हर्च्युअल इंटीग्रेटेड सिस्टम टू एक्सेस अॅग्रीकल्चर रिसोर्स’ या बहुभाषिक एआय (AI) टूलमुळे शेतकऱ्यांना आधुनिक माहिती सहज मिळणार असून, कोकणातील नारळ बागायतदारांसाठीची विशेष योजना आणि मत्स्योद्योगातील तरतुदी ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळ देणाऱ्या आहेत. तरुणांच्या भविष्याचा विचार करून १५ हजार शाळांमध्ये ‘कंटेंट क्रिएटर लॅब्स’ आणि गेमिंग-VFX क्षेत्रात २० लाख युवकांना प्रशिक्षण देण्याचा…
संगमनेर, प्रतिनिधी – अहिल्यानगर जिल्ह्यात गुन्हेगारी टोळ्या आणि सराईत गुन्हेगारांविरुद्ध पोलीस प्रशासनाने ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले आहे. सार्वजनिक शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी जानेवारी २०२६ मध्ये श्रीरामपूर विभागातील १७ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तब्बल ३४ अट्टल गुन्हेगारांविरुद्ध हद्दपारीचे (तडीपारीचे) प्रस्ताव सादर करण्यात आले आहेत. अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांनी गेल्या १० वर्षांतील गुन्हेगारांचा सविस्तर ‘क्राइम डेटाबेस’ तयार केला असून, त्याद्वारे ही मोठी कारवाई करण्यात आली आहे. हद्दपारीच्या प्रस्तावातील गुन्हेगार___ श्रीरामपूर शहर व तालुका- योगेश सचिन गुंजाळ (२३ वर्षे, बेलापूर बुद्रुक), भारत विष्णू धोत्रे (३० वर्षे, तीन बाजारतळ), तंजील गफार खान (२५ वर्षे, हुसेन नगर), प्रशांत संजय थोरात (२७ वर्षे, शिरसगाव), मनोज…
संगमनेर, प्रतिनिधी – भाविकांच्या श्रद्धेचा विषय असलेल्या पायी दिंडीवर चोरट्यांनी डल्ला मारल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगमनेर तालुक्यातील चंदनापुरी येथील साईबाबा मंदिर परिसरात मुक्कामी असलेल्या दिंडीच्या पालखीतील ३६० ग्रॅम चांदीच्या पादुका आणि एक मोबाईल अज्ञात चोरट्याने लंपास केला आहे. घारगाव येथील ‘साई सह्याद्री तरुण मित्र मंडळाची’ पायी दिंडी दरवर्षीप्रमाणे शिर्डीकडे प्रस्थान करत असताना २९ जानेवारी रोजी चंदनापुरी येथे मुक्कामी थांबली होती. शुक्रवारी (३० जानेवारी) पहाटेच्या सुमारास चोरट्याने संधी साधून पालखीतील चांदीच्या पादुका चोरल्या. त्याचवेळी मंदिरात झोपलेल्या एका भाविकाचा मोबाईलही लंपास करण्यात आला. सखाराम कुरकुटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर तालुका पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे, या…
13 वर्षांहून अधिक काळ राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून ज्यांनी उत्तम जबाबदारी सांभाळली त्या अजित पवारांचं अकाली जाणं ही महाराष्ट्रातील काम करणार्या तमाम कार्यकर्त्यांसाठी अपरिमित हानी होय. दादा आज आपल्यात नाहीत, याचं शल्य आज सारेच व्यक्त करत आहेत. दादांना त्यांच्या सडेतोडपणाला दोष देत होते ते आणि त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करणारेही हळहळत आहेत, यावरून या नेत्याची महाराष्ट्राची असलेली नाळ स्पष्ट दिसते. त्यांच्याकडे काम घेऊन गेलेला अगदी सामान्यातला सामान्य माणूस खाली हाताने परत येईल, असं कधी झालं नाही. यामुळे प्रत्येकजण दादांच्या अकाली जाण्यावर हळहळला आहे. काम होणार नसेल तर होणार नाही, असं सांगणारा मंत्रालयातील एक मंत्री म्हणजे दादा होत. बेकायदा कामं आणू नका असं…
आजचे राशिभविष्य: मेष आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा असेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. कौटुंबिक जीवनात सुख-शांती नांदेल, मात्र जोडीदारासोबत बोलताना शब्दांचा वापर जपून करा. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य असून गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींना आज नशिबाची चांगली साथ लाभणार आहे. रखडलेली कामे मार्गी लागल्यामुळे मनावरचा ताण हलका होईल. व्यवसायात नवीन संधी उपलब्ध होतील, ज्यामुळे भविष्यात आर्थिक फायदा होऊ शकतो. सामाजिक कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीमुळे मन प्रसन्न राहील. आहारावर नियंत्रण ठेवावे. मिथुन आजचा दिवस तुमच्यासाठी धावपळीचा ठरू शकतो. कामाचा ताण वाढल्यामुळे…
मुंबई: विशेष प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याच्या राजकारणात एक मोठी घडामोड घडली आहे. अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनी आज (शनिवार) महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राजभवन येथे आयोजित एका छोटेखानी समारंभात राज्यपालांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. अजित पवारांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदी सुनेत्रा पवार यांची एकमताने निवड करण्यात आली असून, दिलीप वळसे-पाटील यांनी मांडलेल्या प्रस्तावाला छगन भुजबळ यांनी अनुमोदन दिले. या ऐतिहासिक शपथविधी सोहळ्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुतीतील नेते उपस्थित होते. शपथविधीनंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ‘अजित दादा अमर रहे’ अशा घोषणा…
मेष मेष राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साहाचा राहील. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल आणि वरिष्ठ तुमच्या कामाचे कौतुक करतील. व्यवसायात नवीन भागीदारीचे योग आहेत. आर्थिक बाजू भक्कम राहील, मात्र गुंतवणुकीचे निर्णय विचारपूर्वक घ्यावेत. कौटुंबिक जीवनात सुख-शांती राहील आणि जोडीदारासोबतचे संबंध दृढ होतील. वृषभ वृषभ राशीच्या व्यक्तींना आज आरोग्याची विशेष काळजी घ्यावी लागेल. कामाचा ताण वाढल्यामुळे थकवा जाणवू शकतो. आर्थिक बाबतीत दिवस सामान्य आहे, अनावश्यक खर्च टाळणे हिताचे ठरेल. रखडलेली कामे पूर्ण करण्यासाठी अधिक मेहनत घ्यावी लागेल. मित्रांच्या मदतीने काही महत्त्वाचे प्रश्न सुटू शकतात. मिथुन मिथुन राशीसाठी आजचा दिवस संमिश्र फलदायी आहे. नवीन योजना आखण्यासाठी वेळ अनुकूल आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासात…
