Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. २२ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगरपरिषदेने अन्यायकारक शास्तीकर आणि दंडाचा बोजा टाकला आहे. यातून दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आपल्या फेसबुक या समाज माध्यमात दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या-मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली. मात्र, नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि २% व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी…

Read More

मुंबई, दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. न्यायदंडाधिकारी समितीने नुकताच या प्रकरणाचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला आहे. या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत असताना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचे विधान केले होते.…

Read More

अहिल्यानगर, दि. २१ मार्च –  राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठीही ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाने पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका नसल्याने ती वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज मोटार वाहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://transport.maharashtra.gov.in)…

Read More

मुंबई, दि. २० मार्च २०२५: परभणीतील आंबेडकरी चळवळीतील तरुण सोमनाथ सूर्यवंशी यांच्या संशयास्पद मृत्यूमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांच्या मारहाणीमुळे त्यांचा मृत्यू झाला, असा आरोप असतानाही, पोलिसांनी ‘आकस्मिक मृत्यू’ असा अहवाल देऊन प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला. आता न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातही मारहाणीमुळेच मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे. “पोलिसांच्या मारहाणीमुळे सोमनाथ सूर्यवंशी यांचा मृत्यू झाला, हे न्यायदंडाधिकाऱ्यांच्या अहवालातून स्पष्ट झाले आहे. तरीही फडणवीस सरकार दोषी पोलिसांवर हत्येचा गुन्हा दाखल करून त्यांना बडतर्फ करत नाही, हे दुर्दैवी आहे. परभणीतील घटना अत्यंत गंभीर आणि माणुसकीला काळिमा फासणारी आहे. संविधानाच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज – सातारा, दि. २१ मार्च राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि भाजप नेते जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप करणाऱ्या महिलेला खंडणी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. महिलेने गोरे यांच्याकडे हे प्रकरण मिटवण्यासाठी तीन कोटी रुपयांची मागणी केली होती. त्यापैकी एक कोटी रुपये स्वीकारताना तिला सातारा पोलिसांनी अटक केली. काही दिवसांपूर्वी या महिलेने माध्यमांसमोर येत जयकुमार गोरे यांच्यावर गंभीर आरोप केले होते. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती. महिलेने गोरे यांच्यावर नग्न फोटो पाठवल्याचा आरोप केला होता. हा मुद्दा विधानसभेतही गाजला होता. आता या प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. आरोप करणाऱ्या महिलेलाच खंडणी प्रकरणात अटक झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.…

Read More

अहिल्यानगर, दि. २१ मार्च – अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर अत्याचार केल्याच्या घृणास्पद गुन्ह्यात, विशेष न्यायालयाने आरोपी अजय उर्फ विनायक राजेंद्र गर्जे (२०, खडांबे खुर्द, राहुरी, अहिल्यानगर) याला २० वर्षे सक्तमजुरीची कठोर शिक्षा ठोठावली आहे. याशिवाय, विविध कलमांनुसार त्याला दंडाची शिक्षाही सुनावण्यात आली आहे, अशी माहिती विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे-शिंदे यांनी दिली. विशेष जिल्हा न्यायाधीश माधुरी मोरे यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकारच्यावतीने विशेष सरकारी वकील मनीषा केळगंद्रे यांनी प्रभावी युक्तिवाद केला. खटल्यात एकूण १० साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली. ही धक्कादायक घटना १७ डिसेंबर २०२२ रोजी घडली, त्यावेळी पीडित मुलगी १२ वर्षे २ महिन्यांची होती. आरोपी अजय उर्फ विनायक…

Read More

संगमनेर, दि. २१ मार्च – प्रतिनिधी  संगमनेर खुर्द येथील नगरपालिकेच्या कचरा डेपोला काल (गुरुवारी) सायंकाळी भीषण आग लागली. या आगीमुळे परिसरात धुराचे मोठे साम्राज्य पसरले होते. यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत होता, तसेच वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता. संगमनेर खुर्द येथे नगरपालिकेचा कंपोस्ट डेपो आहे. संगमनेर शहर व उपनगरातील सर्व कचरा या डेपोत आणून टाकला जातो. तेथे या कचऱ्यावर प्रक्रिया केली जाते. गेल्या काही दिवसांपासून या डेपोत मोठ्या प्रमाणात कचरा साचला होता. या डेपोला काल सायंकाळी ६.३० वाजण्याच्या सुमारास अचानक आग लागली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले आणि धुराचे लोट परिसरात पसरले. आगीची माहिती मिळताच संगमनेर नगरपालिकेच्या…

Read More

मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी  गोहत्या करणाऱ्यांवर यापुढे थेट महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यानुसार (मकोका) कारवाई करण्यात येईल, असा सक्त इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिला. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील ससाणे नगर येथे फटाके फोडण्यावरून दोन गटात झालेल्या हिंसक घटनेच्या पार्श्वभूमीवर, अहिल्यानगरचे आमदार संग्राम जगताप यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचना मांडली. या घटनेत कुरेशी आणि ससाणे कुटुंबात झालेल्या हाणामारीत ससाणे कुटुंबातील एका व्यक्तीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. जगताप यांनी आरोप केला की, कुरेशी कुटुंब हे गो तस्करीमध्ये गुंतलेले असून, त्यांच्या दहशतीमुळे पोलिसांनी सुरुवातीला गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली. तसेच, आरोपीला अटक होऊनही लगेच जामीन मिळाला. जामिनावर सुटल्यानंतर त्याने…

Read More

मुंबई दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी महाराष्ट्राच्या विधान परिषद आणि विधानसभा सभागृहांमध्ये सभापती आणि विधानसभा अध्यक्ष पक्षपाती आणि एकांगी भूमिका घेत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. गुरुवारी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची भेट घेऊन त्यांना यासंदर्भात निवेदन दिले. विधानसभेच्या दोन्ही सभागृहांच्या कामकाजात संसदीय परंपरांचे पालन व्हावे, नियमबाह्य कामकाज होऊ नये, अशी मागणी विरोधी पक्षांनी राज्यपालांकडे केली आहे. विरोधी पक्षाच्या शिष्टमंडळाने सभापती आणि अध्यक्षांच्या मनमानी आणि एकांगी कामकाजाची तक्रार राज्यपालांकडे केली. विरोधी पक्ष हा संसदीय प्रणालीतील महत्त्वाचा घटक असून, त्यांची भूमिका सरकारविरोधी नसून सरकारचे निर्णय आणि धोरणांवर अंकुश ठेवणारी आहे. आवश्यक तेथे टीका करणे आणि पर्यायी…

Read More

पुणे, दि. २० मार्च –  हिंजवडी येथे एका धावत्या मिनी बसने अचानक पेट घेतल्याने झालेल्या भीषण दुर्घटनेला आता धक्कादायक वळण मिळाले आहे. या जळीत कांडात व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या चार कर्मचाऱ्यांचा होरपळून मृत्यू झाला होता, तर सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. सुरुवातीला हा अपघात असल्याचे सांगण्यात आले, मात्र आता पोलिसांनी केलेल्या तपासात चालकानेच कट रचून या चौघांना जाळल्याचे उघड झाले आहे. हिंजवडी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मिनी बसचा चालक जनार्धन हंबर्डे याने पूर्वनियोजित कट रचून हे कृत्य केले. त्याने गाडीमध्ये एक लिटर बेंझीन सोल्युशन केमिकल आणून ठेवले होते. त्यासोबत कापड्याच्या चिंध्या आणि काडीपेटीही त्याने आधीच गाडीत ठेवली होती. तपासात गाडीमध्ये शॉर्ट…

Read More