Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. २० मार्च – विशेष प्रतिनिधी संगमनेर शहरात सुरू असलेली गोवंश हत्या आणि शहरातील मोक्याच्या जागा तसेच तालुक्यातील सुकेवाडी, घुलेवाडी, पारेगाव येथील देवस्थान जमिनी वक्फ बोर्डाकडे बेकायदेशीरपणे नोंदणी झाल्याचा मुद्दा आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेत मांडून राज्य सरकारचे या मूलभूत प्रश्नांकडे लक्ष वेधले. संगमनेर शहरातील नगरपरिषदेच्या हद्दीतील नवीन नगररोडवरील सर्व्हे नंबर १४९ (जुना सर्व्हे नंबर ८०३), क्षेत्र ४ एकर १७ गुंठे या मिळकतीवर तसेच तालुक्यातील घुलेवाडी येथील सर्व्हे नंबर १६२ व १७९ येथील कानिफनाथ देवस्थान, सुकेवाडी येथील सर्व्हे नंबर १९४ मधील कान्होबा देवस्थान आणि पारेगाव येथील श्री अश्विनाथ महाराज मंदिर या देवस्थानांच्या हक्काच्या संपूर्ण जमिनीवर वक्फ बोर्ड चुकीच्या पद्धतीने…

Read More

नाशिक, दि. २० मार्च – नाशिक-पुणे महामार्गावरील बोधले नगरजवळील आंबेडकर वाडी येथे बुधवारी (१९ मार्च २०२५) रात्री ९ ते १० च्या सुमारास दोन सख्ख्या भावांची हत्या करण्यात आली. उमेश उर्फ मन्ना जाधव आणि प्रशांत जाधव अशी मृतांची नावे आहेत. या प्रकरणी पोलिसांनी तत्परता दाखवत अवघ्या सहा तासांत पाच संशयित आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, परिसरात वर्चस्व राखण्याच्या उद्देशाने ही हत्या करण्यात आली. क्राईम ब्रांच युनिट १ च्या पथकाने तपास सुरू केला असता, पोलीस नाईक मिलिंदसिंग परदेशी आणि हवालदार विशाल काठे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, संशयित आरोपी सागर गरड आणि त्याचे साथीदार नाशिकच्या छत्रपती संभाजीनगर रोडवरील डाळिंब मार्केट येथे…

Read More

संगमनेर, दि. २० मार्च – प्रतिनिधी “सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यक्षेत्रात एकरी ऊस उत्पादन वाढवणे ही काळाची गरज आहे आणि त्यासाठी आता आगामी काळात आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) सारख्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करणे अपरिहार्य आहे. या तंत्रज्ञानामुळे शेतकऱ्यांना उसासंबंधीची सर्व माहिती ऑनलाईन उपलब्ध होईल,” असे स्पष्ट मत माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केले. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या ५८ व्या गळीत हंगामाच्या सांगता समारंभात ते बोलत होते. यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन बाबासाहेब ओहोळ होते, तर व्यासपीठावर मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. कांचनताई थोरात, सौ. दुर्गाताई तांबे, बाजीराव पा. खेमनर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते…

Read More

मुंबई – विशेष प्रतिनिधी  शासकीय कर्मचाऱ्यांच्या सोशल मीडिया वापरासाठी लवकरच नियमावली तयार करण्यात येणार आहे. महाराष्ट्र नागरी सेवा (वर्तणूक) नियम, १९७९ मध्ये सोशल मीडिया संदर्भात कोणताही उल्लेख नसल्याने, बदलत्या काळानुसार आणि सोशल मीडियाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, पुढील तीन महिन्यांत नियमांमध्ये बदल करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. शासकीय कर्मचाऱ्यांकडून समाज माध्यमांच्या वाढत्या वापरावर बंधने नसल्याबाबत सदस्य डॉ. परिणय फुके, प्रवीण दरेकर आणि विक्रम काळे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती, ज्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, शासकीय कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियाचा उपयोग जनतेशी संवाद साधण्यासाठी आणि सार्वजनिक हितासाठी करावा. या संदर्भात…

Read More

अहिल्यानगर –  अहिल्यानगर जिल्ह्यात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ होत असताना, आता एक अत्यंत धक्कादायक आणि घृणास्पद प्रकार समोर आला आहे. एका व्यक्तीने आपल्या पत्नीला गुंगीचे औषध देऊन तिला परपुरुषांशी संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी लोणी येथील एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. पीडित महिलेने (वय २९) दिलेल्या फिर्यादीनुसार, २०१४ मध्ये विवाह झाल्यानंतर सुरुवातीचे काही महिने ठीक होते. मात्र, त्यानंतर पतीने तिला मारहाण आणि शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. सासू आणि सासरे यांनीही तिला वाईट वागणूक दिली. दीड वर्षांपूर्वी तिला लोणी येथे एका बंगल्यावर नेण्यात आले, जिथे एका अनोळखी व्यक्तीने तिच्यासोबत बळजबरीने शरीरसंबंध केले. या कृत्याची वाच्यता केल्यास फोटो…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील पठार भागातील म्हसवंडी गावच्या परिसरात मंगळवारी दुपारी एका दुर्दैवी घटनेत डोंगराला लागलेल्या भीषण आगीत एका गुराख्याचा आणि त्याच्या एका गाईचा होरपळून मृत्यू झाला. सिताराम तुकाराम जाधव (वय अंदाजे ५० वर्षे) असे मृत गुराख्याचे नाव आहे. ते म्हसवंडी गावच्या परिसरातील जाधव वस्ती येथे वास्तव्यास होते आणि जनावरे चारण्याचा व्यवसाय करत होते. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी दुपारी सिताराम जाधव हे त्यांच्या गाई चरायला घेऊन वनविभागाच्या हद्दीत गेले होते. दुपारच्या सुमारास अज्ञात कारणांमुळे डोंगरावर आग लागली. वाऱ्यामुळे आग वेगाने पसरली आणि जाधव तसेच त्यांच्या गाई आगीच्या कचाट्यात सापडले. आगीची तीव्रता…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी  छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड जगाचे दैवत आहे. मात्र भाजप महायुतीने सातत्याने शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर महायुतीने उभारलेल्या कमानीवर छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा होती. महाराजांची प्रतिमा लावलेली कमान पडणे हे दुर्दैव असून, यामुळे महाराजांच्या प्रतिमेचा अवमान झाला आहे. त्यामुळे या घटनेला जबाबदार असणाऱ्या आयोजकांवर तातडीने गुन्हे दाखल करावे, अशी मागणी माजी नगराध्यक्ष विश्वास मुर्तडक यांनी केली आहे. फक्त राजकीय उद्देश ठेवून छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती साजरी करणारे संगमनेरचे शिवसेनेचे स्थानिक लोकप्रतिनिधी व महायुतीचे समर्थक यांच्या गलथान कारभारामुळे कमान कोसळल्याची घटना बुधवारी घडली. शिवजयंती उत्सव समितीच्या माध्यमातून गेल्या सोळा वर्षांपासून छत्रपती शिवाजी…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी  बुधवार संगमनेरकरांसाठी दुर्घटनावर ठरला आहे. शहरालगतच्या कासारवाडी शिवारातील मालपाणी हेल्थ क्लबच्या मालपाणी पॅलेसमध्ये लग्न समारंभासाठी तयार करण्यात आलेल्या स्टेजला आग लागून एक जण या आगीत गंभीर जखमी झाल्याच्या प्रकार घडला असताना शिवजयंतीसाठी महायुतीने बस स्थानकासमोर उभारलेली कमान कोसळली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणालाही इजा झाली नाही. जागेवरून झालेल्या दोन गटातील वादानंतर सोमवारी संगमनेर मध्ये भव्य दिव्य शिवजयंती साजरी झाली. मोठ्या संघर्षानंतर दोन्ही गटांना प्रशासनाने दोन ठिकाणी परवानगी दिली होती. महायुतीने परवानगी दिलेल्या जागेवर किल्ला तर शिवजयंती उत्सव समिती स्वाभिमानी संगमनेर शहर तालुका यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मंदिराचा देखावा उभारला होता. शिवजयंती झाल्यानंतर हे देखावे…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी  कासारवाडी शिवारात असलेल्या मालपाणी हेल्थ क्लब येथील विवाह समारंभासाठी वापरल्या जाणाऱ्या मालपाणी पॅलेस मध्ये उभारण्यात आलेल्या स्टेजला बुधवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. लागलेल्या आगीमध्ये एक जण गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर एक जण बचावला असल्याची माहिती समोर येत आहे. घटनास्थळी अग्निशामक दल, रुग्णवाहिका, नगरपरिषद आणि हजर झाले आहे. आगीचे निश्चित कारण समजू शकले नसले तरी स्टेज उभारण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कटरच्या निर्माण झालेल्या ज्वालांमुळे थर्माकोलने पेट घेतल्याने ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज आहे. मालपाणी पॅलेसचा वापर विवाह समारंभासह अन्य काही कारणांसाठी केला जातो. बुधवारी दुपारी पॅलेसच्या…

Read More

संगमनेर, दि. १९ मार्च – प्रतिनिधी बौद्ध धर्मीयांचे महाविहार, लेणी, दीक्षाभूमी ही ठिकाणे बौद्धांच्या ताब्यात नसून ही सर्व बौद्ध स्थळे भारतीय बौद्ध महासंघ राष्ट्रीय संस्थेच्या ताब्यात देण्यात यावी. बौद्ध गया मंदिर अधिनियम १९४९ रद्द करावा, या मागणीसाठी येथील वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रांताधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. वंचित बहुजन आघाडीच्यावतीने मंगळवारी दुपारी हे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी उत्कर्षाताई रुपवते, चंद्रकांत पवार, राजू मुन्तोडे, रामदास भालेराव, एकनाथ मेढे, अशोक गायकवाड, रवींद्र भालेराव, विशाल रुपवते, संगिता मिसाळ, शकुंतला जाधव, गौतम रोहम, संध्या खरे, सुनिता भालेराव, वैभव मोकळ आदी उपस्थित होते. यावेळी उत्कर्षा रुपवते म्हणाल्या, अशोक सम्राट यांनी ८४ हजार स्तुप बांधले. यात…

Read More