Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर : दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण सुरू केले आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी काही आरोपी अटकेत असून काही…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – तात्काळ माहिती दिली नाही याचा राग येऊन ग्रामसेवकास लाथा बुक्क्यांनी मारहाण करून ग्रामपंचायत कार्यालयात कोंडून ठेवणाऱ्या आरोपीस संगमनेर जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने तीन महिने सश्रम कारावास आणि वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दत्तात्रय विठ्ठल गोंदके (रा. करंडी, तालुका अकोले) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. करंडे गावचे ग्रामसेवक सोमा मुरलीधर येडे, पाणीपुरवठा कर्मचारी शशिकांत गोंदके, ग्रामपंचायत शिपाई विठ्ठल गोंदके, रोजगार सेवक सोमनाथ वायाळ हे सर्व ग्रामपंचायत करंडी येथे कार्यालयात दैनंदिन काम पहात होते. रोजगार हमी योजनेचा फेर सर्व्हे करावयाच्या असल्याने कृषी सहाय्यक अनिल फापाळे यांच्यासोबत या सर्वांना जायचे होते. त्याचवेळी गावातील दत्तात्रय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम 37 (1) व 37(3) अन्वये 26 ऑक्टोबर 2023 पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद कालावधीत कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे… शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे. जाहीरपणे घोषणा देणे,…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते तथा मा. महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून साकारलेला हॅप्पी हायवेवर आज विद्युत रोषणाईचा लखलखाट झाला असून संगमनेरकरांच्या आनंदात भर पडली आहे. गणेश उत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली सर्व संगमनेरकरांनी एकत्र येत हॅप्पी हायवेचा लोकार्पण सोहळा भर पावसात मोठ्या उत्साहात आणि आनंदाने साजरा केला. यामध्ये शहरातील बालक, नागरिक, युवक, युवती, महिलांनी अत्यंत आनंदाने सहभागी होऊन रस्त्याच्या दुतर्फा सजावट करून सर्वांनी रस्त्यावर ढोल ताशांच्या गजरात व भर पावसात फटाक्यांच्या आतिषबाजीत विविध खेळांमध्ये सहभाग घेतला. यामध्ये झुम्बा डान्स, लेझीम, कबड्डी, लावणी नृत्य, पारंपारिक ड्रेपरी, तायकोंदो ,रांगोळी अशा विविध स्पर्धांमधून अनेकांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज हॉटेल बंद झाल्यानंतर जेवण मागितले, मात्र हॉटेल मालकाने जेवण दिले नाही या कारणावरून हॉटेल मालक, त्यांचा मुलगा, वॉचमन यांना मारहाण करून हॉटेलमध्ये गोंधळ घालत खुर्च्यांची फेकाफेक करीत हॉटेल मालकाची सोन्याची चैन आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या चौघा जणांविरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात जबरी चोरी आणि मारहाणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश सूर्यवंशी, सम्राट हासे, विकास डमाळे डमाळे व दीपक रणसुरे (पूर्ण नाव पत्ते माहित नाही सर्व रा. संगमनेर) अशी चौघा गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. या चौघा जणांविरोधात हॉटेल व्यवसायिक अंकुश सुरेश अभंग यांनी दिलेल्या फिर्यादीवरून भारतीय दंड विधान संहिता कलम 394, 452, 427, 323,…

Read More

गोवंश कत्तलीसाठी कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याचे शेड केली नेस्तनाबूत! महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर –  गेल्या काही दिवसांपासून संगमनेरच्या पोलीस उपाधीक्षकांनी लक्ष घातलेले बेकायदेशीर कत्तलखाने आता चोरी-चुपके सुरू आहेत. अशाच एका कत्तलखान्यावर बुधवारी पोलिस उपाधीक्षक सोमनाथ वाकचौरे यांच्या पथकाने कारवाई केली. या कारवाईत गोवंश जनावरांची मोठ्या प्रमाणात कत्तल केल्याचे पोलिसांना आढळून आले. तब्बल तीन हजार किलो गोवंश जनावरांच्या कत्तल केलेल्या मांसासह सुमारे सात लाख रुपयांचा मुद्देमाल या कारवाईत हस्तगत करण्यात आला असून तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कत्तलीसाठी वापरली जाणारी पत्र्याची शेड प्रथमत:च या कारवाईमध्ये नेस्तनाबूत करण्यात आली आहे. पोलिसांच्या शेकडो कारवायानंतर देखील सुरू संगमनेर मधील कत्तलखाने सुरूच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ अनंत पांगारकर संगमनेर – आज मिळेल, उद्या मिळेल या आशेवर गेल्या दोन वर्षांपासून असलेल्या दूधगंगा नागरी पतसंस्थेतील ठेवीदारांचा संयम अखेर सुटला आहे. घोटाळेबाज भाऊसाहेब कुटे यांच्यासह फरार असलेल्या आरोपींना अटक करावी, ठेवीदारांच्या ठेवी परत मिळाव्यात या मागणीसाठी ठेवीदार-खातेदार शनिवारी (१४ ऑक्टोंबर) प्रांताधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश व उपोषण करणार आहे. दुधगंगा नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये ठेवीदारांच्या तब्बल ८१ कोटी रुपयांच्या रकमेचा राजकीयदृष्ट्या प्रतिष्ठित असलेल्या चेअरमन भाऊसाहेब कुटे याच्यासह त्याच्या नातेवाईक आणि अन्य काहीजणांनी अपहार केला असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात चेअरमन व राजकीय प्रतिष्ठित असलेल्या भाऊसाहेब कुटे याच्यासह तब्बल २१ जणांविरोधात विविध कलमान्वये गुन्हा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावच्या शिवारात एका बेकायदेशीर डिझेल विक्री केंद्रावर पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांच्या मार्गदर्शनाखाली छापा सोमवारी टाकण्यात आला. या छाप्यात या डिझेल पंपाच्या माध्यमातून अवैधरित्या, असुरक्षित अवैध चोरटी डिझेल विक्री होत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघाजणांवर गुन्हा दाखल केला आहे. नासिक-पुणे मार्गावरील चंदनापुरी शिवारात असलेल्या हॉटेल पांडुरंग समोर एका बंद ढाब्याच्या पाठीमागे बेकायदेशीर डिझेल विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांना मिळाली होती. वाकचौरे यांनी संगमनेर तालुका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक देविदास ढुमणे यांना या संदर्भात कारवाईचे आदेश दिले होते. नासिक-पुणे मार्गावरील हिवरगाव पावसा…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या प्रयत्नातून ‘संगमनेर बस स्थानक ते इंजिनिअरिंग कॉलेज’ या हॅप्पी हायवेच्या चौपदरीकरणासह पथदिवे व सुशोभीकरणाचे काम झाले. हॅपी हायवेच्या लोकार्पण सोहळ्यात संपूर्ण शहरवासीय सहभागी झाले. मात्र हा आनंद काही लोकांना पहावत नसल्याने त्यांनी लाईट बंद करण्यासाठी अनेक उद्योग केले. चांगल्या कामात खोडा घालण्याचा प्रयत्न केला. आज तेच लोक लाईट चालू करण्यासाठी निवेदन देतात ही प्रसिद्धीसाठी केवीलवाणी स्टंटबाजी असल्याची टीका शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे यांनी केली आहे. सोमेश्वर दिवटे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, गणेशोत्सवाच्या काळामध्ये आमदार बाळासाहेब थोरात यांच्या संकल्पनेतून संपूर्ण शहरवासीय एकत्र येत हॅपी हायवेचा मोठा आनंद…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज @ संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावरील बंद पडलेले पथदिवे तातडीने सुरु करावेत, पथदिवे सुरु करण्यात अडचणी असतील तर या संपूर्ण कामाची चौकशी करुन संबंधित ठेकेदार कारवाई करण्याची मागणी भारतीय जनता पक्षाच्यावतीने प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. पथदिवे लवकर सुरु न झाल्यास आंदोलनाचा इशाराही देण्यात आला आहे. आठ दिवसांपूर्वी पुणे-नाशिक महामार्गावरील पथदिव्यांचे उद्घाटन करण्यात आले होते. मात्र उद्घाटन झाल्यानंतर एकही दिवस हे पथदिवे सुरु झालेले नाहीत. ही बाब भाजपाच्या शिष्टमंडळाने प्रांताधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. या महामार्गाच्या सुशोभिकरणासाठी केंद्र सरकारने निधीची उपलब्धतता करुन दिली आहे. पथदिव्यांचे कामही पूर्ण झाल्यामुळे याचे उद्घाटनही करण्यात आले. परंतू उद्घाटन झाल्यानंतर पथदिवे…

Read More