Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – २०२३-२०२४ या आर्थिक वर्षाकरिता ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजना अंतर्गत संगमनेर तालुक्यातील विविध गावांमधील विकास कामासाठी एक कोटी तीन लाख रुपयांचा निधी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते,आमदार बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून मंजूर झाल्याची माहिती थोरात कारखान्याचे संचालक इंद्रजीत थोरात यांनी दिली. संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावात आरोग्य, शिक्षण, दळणवळण, सिमेंट बंधारे, रस्ते, पिण्याच्या पाण्याच्या योजनासह अनेक विकासाच्या योजना आमदार थोरात यांनी सातत्याने राबविल्या. सहकारातून समृद्धी निर्माण झालेला हा तालुका राज्यात विकसित असलेल्या पहिल्या पाच तालुक्यांमध्ये गणला जातो. सन २०२३-२०२४ या आर्थिक वर्षासाठी ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती योजनेअंतर्गत संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथे येळुशी ठाकरवाडी वस्ती अंतर्गत सामाजिक सभागृहाचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आज सकाळी किरकोळ कारणाने बायकोशी कटकट झाली, वैतागून दवाखान्यात आलो होतो. ओपीडी मध्ये नर्सने एक केसपेपर आत आणून दिला. पेशंटचं नाव वाचलं, पुढे वय लिहिलं होतं…१०३ वर्षे! मी सिस्टरला आत बोलवून ‘नीट वय विचारत जा!’ असं म्हणालो. “सर, त्याहून जास्ती असेल असं घरचे म्हणताहेत” ती म्हणाली. मी खुर्चीवरून उठून पलीकडे गेलो. टेबलावर कृश, छोटीशी आजी, अबोली रंगाची साधीशी नऊवारी नेसलेली, सुरकुत्याने भरलेला चेहरा, तोंडचं बोळकं, चेहऱ्यावर मिश्किल हसू.. ऐकायचा प्रॉब्लेम असेल असं उगाच गृहीत धरून मी बरोबर उभ्या असलेल्या सुनेला ‘काय होतंय” असं विचारलं. ती काही सांगणार इतक्यात “मला इचारा, मी सांगते की” आजी हसून म्हणाली. “मला…

Read More

Maharashtra sanvad news Anant Pangarkar संगमनेर – अहमदनगरसह नाशिक व पुणे जिल्ह्याचे कार्यक्षेत्र असलेल्या आणि व्यापाऱ्यांची आर्थिक कामधेनू म्हणून परिचित असलेल्या संगमनेर मर्चंट बँकेची निवडणूक बिनविरोध होणार की बँकेची निवडणूक लागणार? याचा आज दुपारपर्यंत अंतिम निर्णय समोर येणार आहे. दरम्यान सत्ताधारी गटाने निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन केल्यानंतर अनेक उमेदवारांनी निवडणूक रिंगणातून माघार घेतली. नव्या जुन्यांचा मेळ साधत सत्ताधारी गटाने आपल्या व्यापारी एकता पॅनलची अंतिम यादी जाहीर केली आहे. बँकेची पंचवार्षिक निवडणूक जाहीर झाले असून शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस आहे. सत्ताधारी गटाच्या काही संचालकांनी दुसऱ्या इच्छुक उमेदवारांना संधी मिळावी यासाठी यावेळी उमेदवारी अर्ज भरले नाही. राखीव जागेपैकी एका…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर – महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाच्या वतीने ३ व ४ जूनला भंडारदर्‍याच्या पांजरे गावात काजवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या काजवा महोत्सवाला जास्तीत जास्त पर्यटकांनी भेट देण्याचे आवाहन नासिक पर्यटन संचालनालयाच्या उपसंचालक श्रीमती मधुमती सरदेसाई-राठोड यांनी केले आहे. सरदेसाई-राठोड यांनी यासंदर्भात दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे की, काजवा महोत्सवामध्ये सहभागी होणाऱ्या पर्यटकांना प्रशिक्षित मार्गदर्शकासोबत काजवे बघण्याची संधी मिळणार आहे. याशिवाय विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचा देखील आनंद घेता येणार आहे. तसेच या महोत्सवाच्या ठिकाणी स्थानिक आदिवासी लोकांनी उत्पादन केलेल्या विविध वस्तूंचे प्रदर्शन व विक्री देखील करण्यात येणार आहे. यामध्ये भंडारदरा परिसरामध्ये विशेष करुन घेतल्या जाणाऱ्या काळा भात व…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – कांदा अनुदान मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केले मात्र ज्या शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यावर ई पीक पेऱ्याची नोंद झाली नाही अशा शेतकऱ्यांनी समितीचे अहवाल संबंधितांकडे सादर करण्याचे आवाहन संगमनेरच्या सहकारी संस्थेचे उपनिबंधक संतोष कोरे यांनी केले आहे. या संदर्भात कोरे यांनी म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाकडील कांदा अनुदान योजनेप्रमाणे कृषी उत्पन्न बाजार समिती, खाजगी बाजार, चेट पणन अनुज्ञाप्ती धारक व नाफेडमध्ये शासन निर्णय दिनांक २७ मार्च २०२३ नुसार दिनांक १ फेब्रुवारी २०२३ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतक-यांनी कांदा अनुदान मिळणेसाठी प्रस्ताव सादर केलेले आहेत. परंतु ज्या ठिकाणी शेतक-यांचा ७/१२ उता-यावर ई पीक पे-यांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  अहमदनगर – आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्याना योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयापर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत असुन या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करुन घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. या योजनेंतर्गत अहमदनगर जिल्ह्यात ४४ अंगीकृत रुग्णालये असुन १ हजार २०९ प्रकारच्या विविध आजारावर मोफत उपचार केले जातात. या आजारामध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारावर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात. या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्याना दिला…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – वैद्यकीय व्यवसायासाठीचे परवानगी नसताना देखील रुग्णांच्या जीवाशी खेळणाऱ्या बनावट डॉक्टरवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जावेद आयुब शेख, (रा. नवरंग कॉम्प्लेक्स, बागवानपुरा, संगमनेर) असे या बनावट डॉक्टरचे नाव आहे. विशेष म्हणजे संगमनेर शहरात या डॉक्टरचा दवाखाना राजरोसपणे सुरू होता. संगमनेर नगर परिषदेच्या कॉटेज रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी प्रतिभा कचकुरे यांच्या तक्रारीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र वैद्यकीय व्यवसाय अधिनियम 1961 अधिनियमाचे कलम 33 व 37 प्रमाणे संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. प्रशासनाच्या ही बाब निदर्शनास आल्यानंतर संगमनेर नगर परिषदेचे मुख्याधिकारी तथा बोगस डॉक्टर शोध समितीचे अध्यक्ष राहुल वाघ यांनी संबंधित डॉक्टरवर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – आपल्या ताब्यातील दुचाकी हयगयीने व भरधाव वेगात चालवून दुसऱ्या दुचाकीला पाठीमागून जोराची धडक देत दुचाकीवरील पती-पत्नीच्या अपघातास व त्यांच्या दुखापतीस कारणीभूत ठरलेल्या विचारते स्वरावर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान संहिता व मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक दशरथ सहाणे (रा. चिखली, ता. संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शंकर बाबुराव तोरकडी (रा. धांदरफळ, ता. संगमनेर) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातात फिर्यादी अशोक सहाणे आणि त्यांची पत्नी सुनीता हे दोघेजण जखमी झाले होते. या संदर्भात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस कॉन्स्टेबल धनवट करत आहे.

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर- कोरोनासारखे संकटे आली, सोशल माध्यमांची स्पर्धा वाढली तरी मुद्रित माध्यमांचे महत्व कधीही कमी होणार नाही. मात्र वृत्तपत्रांनी उथळ बातम्या देण्याऐवजी विश्‍लेषणात्मक लेखन आपल्या वृत्तपत्रातून करावे. ती काळाची गरज आहे. सध्या राजकारणाचा दर्जा झपाट्याने घसरला आहे अशावेळी माध्यमांनी सवंग लोकप्रियतेसाठी धावणार्‍या वाचाळ नेत्यांना माईक व लेखनीबंदी करावी तरच माध्यमांचा दर्जा टिकवून राहील, असे प्रतिपादन राज्याचे माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संपादक व पत्रकार सेवा संघ महाराष्ट्र संघटनेच्या वतीने रविवारी संगमनेरात संपादक राज्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी आ. थोरात बोलत होते. व्यासपीठावर माजी आ. डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. वि. ल.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शुक्रवारी (ता. २ जून) सकाळी सव्वा आठ वाजता छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुर्गाभिषेक करून महाआरती केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक दिनाला यावर्षी ३५० वर्षे पूर्ण होत असल्याने विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जगतगुरू संत तुकोबारायांचे ११ वे वंशज ह.भ.प. शिरीष मोरे महाराज यांचे जाहीर व्याख्यान शनिवारी (ता. ३ जून) सायंकाळी सहा वाजता नगर परिषदेसमोरील लालबहादूर शास्त्री चौक येथे होणार आहे. यासाठी संगमनेरकरांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्कृती संवर्धन मंडळ व सकल हिंदू समाज, बजरंग दल प्रखंड संयोजक…

Read More