Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 22 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला, असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. बुधवारी 31 मे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली जात आहे. आमदार थोरात यांनी गेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.‌ अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे,…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर-अकोलेच्या पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार भुसावळ येथून बदलून आलेल्या सोमनाथ वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी स्वीकारला. संगमनेरचे प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या पदावर गृह विभागाने वाकचौरे यांची नियुक्ती केल्याने त्यांचा येथील कार्यकाळ कसा राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. संगमनेरचे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांची नागपूरला बदली झाल्यापासून संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संगमनेरची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनातील आपल्या कार्यालयात प्रभारी डीवायएसपी संजय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्‍यात बसून ईतरांचा पकडा पकडीचा खेळ बघत होता. कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता. मी त्याला विचारले… ” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?” त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले . “आय नको म्हनत्या…” “आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !” त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला. मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना…. “मला माहीती आहे, आई तूला खेळायला का…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज रविवार विशेष लेख व्यवस्थेला पोखरून स्वत:चे खिसे भरणार्‍या पांढर्‍या पोषाखातल्या नव्या डाकूचा सीबीआयने नुकताच शोध लावला आहे. या डाकूने त्याच्या इलाख्यातील जंगलांची लयलूट केलीच, पण आपल्या विरोधकांना नामोहरम करण्यासाठी त्याला शहरात घुसण्याचा मार्ग भाजपने आखून दिला. विरोधी पक्षांना त्रासदायक ठरलेल्या चार यंत्रणांमधील नाकोर्टिक ही आणखी एक संस्था बनली. आता अति झाल्यावर या डाकूवर छापेमारी सुरू झाली आहे. पांढर्‍या डगल्यातला हा इसम यंत्रणेला पोखरतो आहे, असा जाहीर आरोप करणार्‍या नवाब मलिक यांना देशद्रोही ठरवून देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या अतिआत्मविश्‍वासूंनी या डाकूला साथ दिली. खर्‍याचं खोटं करणार्‍या या इसमाचं नाव आहे समीर वानखेडे.  एका महत्वपूर्ण खात्याच्या विभागीय जबाबदारीतून समीरचा ‘अमीर’…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे – पुण्याचे भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभेची पोट निवडणूक लागण्याची शक्यता आहे. अशी माझी आतल्या गोटातील माहिती असल्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनी सांगितले. बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागणार असल्याची चर्चा गेल्या काही दिवसापासून राजकीय वर्तुळात गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. यावर अजित पवार यांनी भाष्य करत या चर्चांना दुजोरा दिला आहे. टिंबर मार्केटमधील गोडाऊनमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्या नुकसानीचा आढावा आज अजित पवार यांनी घेतला. आगीच्या घटनेची चौकशी व्हावी, तसेच आगीत झालेल्या नुकसानीची भरपाई मिळावी, अशी मागणी त्यांनी राज्य सरकारकडे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज घारगाव – गावाकडे साकुर येथे घरी आलेल्या दोन जावांमधील वादाची परिमिती नवरा-बायकोने महिलेला मारहाण करून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करत तिचा विनयभंग करण्यापर्यंत पोहोचली. वादामध्ये महिलेच्या बोटालाही चावा घेऊन तिच्या अंगावरील कपडे फाडण्यात आले. संगमनेरच्या पठार भागात साकुर येथे गुरुवारी हा प्रकार घडला. पीडित महिला आपल्या पतीसह गावी साकुर येथे राहावयास असून पतीच्या नोकरी निमित्ताने चिंचवड पुणे येथे रहावयास आहे. अधून मधून कुटुंबीयासह पीडित महिलेचे आपल्या पतीच्या गावी साकुर येथे येणे-जाणे असते. साकुर येथील घरी महिलेचा दीर आपल्या कुटुंबीयासह रहावयास आहे. गावाकडे आल्यानंतर हे सर्वजण एकत्र राहत असत. गुरुवारी रात्री साडेनऊ वाजण्याच्या सुमारास पीडित महिलेचे पती बाहेरून येताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – उन्हाची तीव्रता सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याने सर्वांगातून घामाच्या धारा वाहत असतांना संगमनेरच्या गीता परिवार संचलित संस्कार बाल भवनच्या शंभरावर मुलांनी जलक्रीडेचा आनंद घेतला. मालपाणी हेल्थ क्लबच्या सहकार्याने यासर्व मुलांना जीव रक्षकांच्या निगराणीत जलतरण तलावात सोडण्यात आले. यावेळी लहान मुलांसाठी असलेल्या स्वतंत्र वर्तुळाकार हौदात बाल भवनमधील सर्वाधीक लहान मुलांची धम्माल अनुभवायला मिळाली. मुलांनी पाण्यात मनसोक्त डूंबण्याचा आनंद घेतला. गीता परिवाराच्यावतीने दरवर्षी उन्हाळ्यात ज्या प्रमाणे संस्कार शिबिरांचे आयोजन होते, त्या धर्तीवर बाल भवनच्या संचालिका अनुराधा मालपाणी यांनी बाल भवनमधील मुलांसाठी वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन केले आहे. सध्या सुट्ट्यांचा काळ असल्याने बरीच लहान मंडळी पाहुणे म्हणून संगमनेरात आली आहेत. त्यांच्यासह…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – शहरातील मोठ्या वर्दळीच्या नवीन नगर रस्त्यावर दुपारी साडेबाराच्या सुमारास एका वृक्षाची धोकादायक फांदी अचानक तुटून रस्त्यावर पडली. फांदी रस्त्यावर पडत असताना तेथून जाणाऱ्या-येणाऱ्याचा अंगावर पडण्याची शक्यता होती. मात्र सतर्कता दाखविल्याने दुर्घटना टळली. शहरातील नवीन नगर रस्त्यावर एका डेरेदार वृक्षाच्या काही धोकादायक फांद्या तुटून रस्त्यावर पडण्याची चिन्हे निर्माण झाली होती. दरम्यान शनिवारी दुपारी साडेबाराच्या सुमारस कडकड करत एक फांदी अचानकपणे तुटून मोठ्या वर्दळीच्या रस्त्यावर पडली. यावेळी रस्त्यावरून नागरिकांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू होती. फांदी तुटत असताना मोठा आरडाओरडा झालेला येथून लोक बाजूला पळाले. तुटणारी फांदी एका त्वचा की जवळ पडली त्यामुळे दुचाकी चालविणारा वृद्ध गृहस्थ आणि…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  काय ग !!!! कालच तुला खडसावून सांगितले, की बंगल्याच्या भिंतीला पण स्पर्श करायचा नाही… तरी तू आज परत आलीस फुलं मागण्यासाठी ? ती कळकट मळकट फ्रॉक घातलेली ८-९ वर्षांची मुलगी अंत्यत केविलवाणा चेहरा करून करुणेच्या स्वरात आवाजात कापर भरत बोलली ….. ताय, वंजळभरच पायजेती.. द्याकीव. तुमच्या झाडाला हायती बी फुलं म्हणून मागत्या. इथं कुठच येवढी फूलं नायत, फकस्त तुमच्याच बंगल्यात हायत. ती आठ नऊ वर्षांची मुलगी काकुळतीला येऊन अनघाला तिच्या बंगल्यातील मोगऱ्याची फुले मागत होती. अनघा – नाही म्हणून सांगितले ना. निघ इथून. असं म्हणून अनघा बंगल्यात गेली. कुठून कुठून येतात फुलं मागायला. काय फुकट येतात का?…

Read More