Author: अनंत पांगारकर

वाळू वाहतुकीकरिता खुली परवानगी देणार मोदी आवास योजनेअंतर्गत मागील त्याला घरकुल देणार वाळू तस्करांना पाठीशी घालणारे महसूल पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई करणार महाराष्ट्र संवाद न्यूज पुणतांबे :- वाळू धोरणात सुटसुटीतपणा आणून वाळू वाहतूकीकरिता खूली परवानगी देण्यात येईल. ओबीसी समाजाच्या घरकुलासाठी मोदी आवास योजना केंद्र शासन आणत आहे‌, यात मागेल त्याला घरकुल देण्यात येईल तसेच गायरान जागेवर बांधण्यात आलेले घरकुले नियमित करण्यात येतील. अशा महत्त्वपूर्ण घोषणा राज्याचे महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे केल्या. राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील पहिल्या शासकीय वाळू केंद्राचे उद्घाटन व लोकार्पण महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते झाले.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी, उत्तर नगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याच्या चाचणी शुभारंभ कार्यक्रमास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा कार्यक्रम होणार असल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. ३१ मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाची तयारी धरण स्थळावर सुरू करण्यात आली असून, लाभक्षेत्रातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने आनंददायी अशा सोहळ्यास उपस्थित राहावे, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना केली होती. त्यांनी या कार्यक्रमास येण्याचे मान्य केले असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पाणी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर :- पुण्याहून संगमनेरमध्ये विक्रीसाठी आणलेला गांजा संगमनेर शहर पोलिसांनी पकडला आहे. दोन किलो गांजा सह पोलिसांनी गांजा विक्रीसाठी आणलेली आलिशान टाटा कंपनीची नेक्सन कार आणि विवो कंपनीचा मोबाईल असा 4 लाख 28 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे दोन कर्मचारी पेट्रोलिंग करत असताना सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास जोर्वे रोडने जाणाऱ्या एका संशयित वाहनचालकाला त्यांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र वाहन चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करत वाहन वेगात घेऊन पळून जाण्याचा प्रयत्न करत असताना पथकाने त्याला कोल्हेवाडी रस्त्यावरील चर्चजवळ पकडले. वाहनाचे झडती घेतली…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज आळंदी :- शिक्षणाचा मूल्याधिष्ठीत विचार हा संत साहित्यात सातत्याने प्रतिबिंबीत झाला आहे. समाजाला योग्य दिशेने घेऊन जाण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. मात्र शिक्षण अधिकाधिक मूल्याधिष्ठीत होण्यासाठी संताच्या विचारातील शिक्षण विषयक दृष्टीकोन जाणून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी शिक्षण संचालक शिवाजीराव तांबे यांनी केले. चपराक प्रकाशनच्यावतीने संदीप वाकचौरे लिखित ‘शिक्षणाचे पसायदान’ या पुस्तकाच्या आळंदी येथे झालेल्या व्दितीय आवृत्तीच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी राज्य शासनाचा कंठसंगीत पुरस्कार विजेते जेष्ठ संगीतकार कल्याण गायकवाड, सुप्रसिध्द गायिका कार्तिकी गायकवाड, माजी शिक्षण उपसंचालक मकरंद गोंधळी, चपराक प्रकाशनचे प्रमुख जेष्ठ संपादक घनश्याम पाटील, रवींद्र कामठे, अरूण कमळापूरकर, आळंदी देवस्थानचे जनसंपर्क अधिकारी…

Read More

आरोपींनी केला लाकडी दांडके, फायटर, चॉपर, रॉड, तलवारीचा वापर; सतर्क पोलिसांमुळे परिस्थिती नियंत्रणात… गुन्हा दाखल, आरोपींचा शोध सुरू महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – पिकअप मधून जाताना शहरातील जोर्वे नाका येथे हॉर्न वाजविल्याच्या कारणावरून पिकअपमधील लोकांना टोळक्याकडून मारहाण करण्यात आली. यासंदर्भात पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करून उपचारानंतर घरी परतत असणाऱ्या या लोकांवर पुन्हा शंभर ते दीडशे लोकांनी “ये वही लोग है जो अपने खिलाफ पोलीस स्टेशन को तक्रार देने गये थे, आज इन्हे जिंदा घर नही जाने देंगे” असे म्हणत तलवार, चॉपर, फायटर, लाकडी दांडके आणि लोखंडी रॉडने हल्ला करीत त्यांना जिवे मारण्याची घटना रविवारी संध्याकाळी घडली. या हल्ल्यात आठ जण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज स्मिता मांजरे नावाची एक मध्यमवर्गीय सुखवस्तू कुटुंबातील मुलगी. बारावी झाल्यावर तिला वैद्यकीय शिक्षण घ्यायचे होते. पण घर थोडे जुन्या वळणाचे, काय करायचे मुलीला इतके शिकवून, असा विचार करून जवळच्याच कॉलेजमध्ये तिला बी.ए.साठी प्रवेश घेऊन दिला. या युवतीला थोडे वाईट वाटले, पण आहे त्या परिस्थितीशी जुळवून घ्यायचे आणि पुढे जायचे हा तिचा मूळ स्वभाव!! बीए करतांना भरपूर वेळ मिळायला लागला. अभ्यास थोडासा असायचा, त्यातून मग खेळाची आवड निर्माण झाली. सामाजिक कार्याची आवड निर्माण झाली. अभाविप, छात्र युवा संघर्षवाहिनी यांचे आंदोलने कार्यक्रम यात ती सहभागी होऊ लागली. पदवी परीक्षा उत्तीर्ण झाल्यावर काहीतरी व्यवसायाभिमुख शिक्षण घेतले पाहिजे असे तिच्या मनात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – जीवनाचे ध्यासपर्व मानून निळवंडे धरण आपण पूर्ण केले. अनेक अडचणीवर मात करून कालव्यांची कामे मार्गी लावली. रात्रंदिवस काम सुरू ठेवून ऑक्टोबर 22 मध्येच दुष्काळी भागाला पाणी द्यायचे होते. सरकार बदलले त्यामुळे कामे मंदावली मात्र आता दहा टीएमसी पाणी शिल्लक असताना श्रेयवादासाठी उशीर न करता तातडीने पाणी सोडले पाहिजे. धरणाचे काम कोणी केले हे सर्वांना माहीत असून नशिबाने तुम्हाला संधी मिळाली आहे तर पाणी सोडण्यास उशीर का केला, असा सवाल निळवंडे धरणाचे जनक काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी केला. बुधवारी 31 मे निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी घेतली जात आहे. आमदार थोरात यांनी गेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी – उत्तर अहमदनगर जिल्ह्याला वरदान ठरणाऱ्या निळवंडे धरणाच्या कालव्यातून पाणी सोडण्याची चाचणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ३१ मे २०२३ रोजी घेण्यात येणार आहे. पाच तालुक्याचे लाभक्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी हा ऐतिहासिक क्षण असणार आहे, अशी माहिती महसूल, पशुसंवर्धन, दूग्ध व्यवसाय विकासमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.‌ अकोले तालुक्यातील निळवंडे धरणाच्या कार्यस्थळावर महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी अधिकारी-कर्मचाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जलसंपदा विभागाचे अभियंता अरूण नाईक, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाकचौरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता श्रीनिवास वर्पे, कृषी विभागाचे गायकवाड, माजी मंत्री मधुकर पिचड, वैभव पिचड, सिताराम भांगरे,…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर-अकोलेच्या पोलीस उपअधीक्षक पदाचा पदभार भुसावळ येथून बदलून आलेल्या सोमनाथ वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी स्वीकारला. संगमनेरचे प्रभारी डीवायएसपी संजय सातव यांच्याकडून त्यांनी आपल्या पदाची सूत्रे घेतली. दीर्घकाळ रिक्त असलेल्या या पदावर गृह विभागाने वाकचौरे यांची नियुक्ती केल्याने त्यांचा येथील कार्यकाळ कसा राहतो हे येत्या काही दिवसात स्पष्ट होईल. संगमनेरचे तत्कालीन डीवायएसपी राहुल मदने यांची नागपूरला बदली झाल्यापासून संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक पद रिक्त होते. या पदाचा अतिरिक्त पदभार शिर्डीचे पोलीस उपाधीक्षक संजय सातव यांच्याकडे सोपविण्यात आला होता. संगमनेरची नियुक्ती निश्चित झाल्यानंतर वाकचौरे यांनी शनिवारी सायंकाळी नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भावनातील आपल्या कार्यालयात प्रभारी डीवायएसपी संजय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एका बांधकामाच्या साईटवर कामगारांची काही मुले खेळत होती. वाॅचमनचा छोटा पोरगा (साधारण वय वर्ष आठ) एका कोपर्‍यात बसून ईतरांचा पकडा पकडीचा खेळ बघत होता. कुणी धडपडले तर टाळ्या वाजवत होता, हसत होता. पण खेळत नव्हता. मी त्याला विचारले… ” बारक्या ! तू का रे खेळत नाहीस ?” त्याने खेळावरील नजर न हटवता मला ऊत्तर दिले . “आय नको म्हनत्या…” “आई खेळायला कशाला नको म्हणेल ? तूच काहीतरी आगाऊपणा करत असशील !” त्याने ऊत्तर देण्याचे टाळले. माझ्याकडे एक कटाक्ष टाकून पुन्हा खेळ बघत बसला. मलाच त्याला चिडवण्याची खुमखूमी गप्प बसू देईना…. “मला माहीती आहे, आई तूला खेळायला का…

Read More