Author: अनंत पांगारकर
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई – महिला आणि अल्पवयीन मुलींवर बलात्कार करून त्यांचा खून करणाऱ्या नराधमांना सर्वोच्च न्यायालयात आरोप सिद्ध होऊन फाशीची शिक्षा सुनावली तरी त्यांना राष्ट्रपती यांच्याकडे दयेचा अर्ज करण्याचा अधिकार आहे. अशा अर्जावर राष्ट्रपती कार्यालयाकडून दीर्घ काळ निर्णय घेतला जात नाही, पर्यायाने अशा गुन्हेगारांची फाशी लांबते. त्यामुळे अशा घटनेतील पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला न्याय मिळण्यासाठी राष्ट्रपतींनी असे दयेचे अर्ज नाकारावे आणि अर्जावर लवकरात लवकर निर्णय घ्यावा, अशी विनंती विधान परिषदेच्या उपसभापती डॉ नीलम गोऱ्हे यांनी महामहीम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना केली. राष्ट्रपतींनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला, अशी माहिती डॉ. गोऱ्हे यांनी दिली. विधान परिषदेच्या शतक महोत्सवी कार्यक्रमाच्या समारोपानंतर…
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबईच्या रिक्त पदी असलेल्या मुख्य अभियंता पदी गेल्या काही दिवसापासून पदस्थापनेच्या प्रतीक्षेत असलेल्या राजेंद्र रहाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राहणे यांनी नव्या पदाचा पदभार त्वरित स्वीकारण्याचे आदेश देण्यात आले आहे. राज्य सरकारने बुधवारी त्यांच्या बदलीचे आदेश काढले आहे. राहणे गेल्या काही दिवसापासून नव्या नियुक्तीच्या प्रतीक्षेत होते. अखेरीस त्यांची सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभागाच्या मुख्य अभियंतापदी मुंबईत नियुक्ती करण्यात आली आहे.
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर महाराष्ट्रात महिला अत्याचाराचे प्रमाण वाढले असून दररोज नवीन घटना समोर येत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीच्या नगरसेवकानेच बारा वर्षीय अल्पवयीन मुलीशी लज्जास्पद वर्तन केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारतीय जनता पक्षाचा नगरसेवक असलेल्या हितेश कुंभार याला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. दररोजच्या अत्याचाराच्या आणि गुन्हेगारीच्या घटनांमुळे महाराष्ट्रात नेमकं चाललय तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. नगर जिल्ह्यातील अकोले येथे नगरसेवकानेच अल्पवयीन मुलीची छेड काढत तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. आरोपी जबाबदार नागरिक आणि नगरसेवक असल्याने त्याच्या विरोधात जनमानसात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. एकीकडे महायुतीचे सरकार राज्यात ‘मुख्यमंत्री…
बुधवार, दि. ०४ सप्टेंबर पोलीस प्रशासनाच्या भूमिकेमुळे सातत्याने वादात सापडणाऱ्या शांतता समितीच्या बैठकीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. शांतता समितीचे नेमके सदस्य कोण असा प्रश्न उपस्थित करत या बैठकीला जाणीवपूर्वक डावल्याचा आरोप आरपीआय आठवले गटाचे शहराध्यक्ष कैलास कासार यांनी केला आहे. मंगळवारी (ता. ३ सप्टेंबर) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनाच्या सभागृहात पोलीस प्रशासनाच्या वतीने गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीच्या बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावर्षी संगमनेर शहराची, येथील सण उत्सवाची कोणतीही पार्श्वभूमी माहीत नसलेल्या अधिकाऱ्यांच्या (बढतीवर बदली झालेल्या पोलीस उपअधीक्षकांचा अपवाद वगळता) हातात गणेशोत्सवाची सूत्रे गेल्याने काही ठराविक लोकांनाच त्या बैठकीचे निमंत्रण दिले गेले. अचानक तणावात्मक परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस खात्याचे अधिकारी समाजातील…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विभागीय, जिल्हा प्रशासनाला सूचना बुधवार, दि. ०४ सप्टेंबर मुंबई : विशेषतः मराठवाड्यातील जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यासह मुसळधार पावसामुळे नुकसान झालेल्या विदर्भासह इतर भागातील जिल्हे किंवा तालुक्यांमध्ये नुकसानीचे पंचनामे आणि मदतीची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत. पिकांचे झालेले नुकसान, घरांची पडझड, पशुधनाची हानी अशा सर्व बाबींची माहिती घेण्यात यावी, यासंदर्भात त्वरित पंचनामे करण्यात यावेत. अतिवृष्टीमुळे तात्पुरते स्थलांतर केलेल्या लोकांना सर्व आवश्यक सुविधा देण्यात याव्यात. त्यांना आवश्यक ती सर्व मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. विभागीय आयुक्त, जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन, मदत व पुनर्वसन विभाग, स्थानिक नगरपालिका, महानगरपालिका, ग्रामपंचायती, पोलीस प्रशासन…
असा असेल आजचा आपला दिवस… मेष – बाहेरगावी जाण्याचे योग. आर्थिक लाभ होण्याचा दिवस. पोटाचे आजार संभवतील. वृषभ – रागावर नियंत्रण ठेवा. आज तुमची कामे संथ गतीने होतील. वाहन चोरीची शक्यता, वाहन सांभाळा. मिथुन – जितका लाभाचा तितकाच खर्चाचा दिवस. चिडचिड, संतापावर नियंत्रण ठेवा. कर्क – आजचा दिवस अतिशय फायदेशीर असा आहे. जिथे जाल तिथे तुमचा सन्मान केला जाईल. मात्र भाऊबंदकीपासून चार हात दूर राहा. सिंह – अतिशय प्रेमळ आणि आपुलकी जपणारी व्यक्ती आज तुमच्या आयुष्यात येत आहे, तिला मान द्या. पैसा जास्त खर्च करू नका. कन्या – रडका आणि रडविणारा असा आजचा दिवस आहे. आज मित्रांपासून सावध राहा. कोणतेही…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर राज्य परीवहन महामंडळ म्हणजेच एसटी कर्मचारी संघटनांनी संप पुकारला आहे. एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्यावतीने आजपासून बेमुदत धरणे आंदोलनाला बसले आहेत. आज एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाचा पहिलाच दिवस असून याचा एसटीच्या महसूलावर मोठा परिणाम झाला आहे. संपामुळे अंदाजे १४ ते १५ कोटी रुपयांचा महसूल बुडाल्याची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच एसटी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे, प्रलंबित महागाई भत्ता आणि फरक, वाढीव घरभाडे भत्ता आणि फरक, वेतनवाढीच्या दराचा फरक तसेच ४८४९ कोटी रुपयांमधील शिल्लक रकमेचे वाटप आणि नुकत्याच मुळ वेतनात जाहीर केलेल्या पाच हजार, चार हजार आणि अडीच हजार रुपयांऐवजी…
महिलांना मानसिक व आर्थिक सक्षम करणारा महोत्सव मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर संगमनेर : भारतीय जनता पक्षाच्या राजवटीमध्ये विकृत मानसिकता वाढली आहे. पुरोगामी महाराष्ट्रामध्ये आज महिला, चिमुकल्या सुरक्षित नाही. महिलांवरील अत्याचार वाढले असून बदलापूर घटनेनंतर पोलीस पीडीतेचा एफआयआरदेखील दाखल करून घेत नव्हते. दिल्लीत कुस्तीपटूंवर झालेल्या अन्यायाची कोणी दखल घेत नाहीत अशा परिस्थितीत भ्रष्टाचार देखील वाढला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या कोसळलेला होता भ्रष्टाचाराच प्रतीक असल्याचा खासदार प्रणिती शिंदे यांनी म्हटल आहे. संगमनेरच्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर एकविरा फाउंडेशन आणि अमृत उद्योग समूहाच्या पुढाकारातून पंधरा हजार महिलांच्या उपस्थितीत आयोजित ‘इंदिरा महोत्सव’ शुभारंभ प्रसंगी कार्यक्रमात खासदार प्रणिती शिंदे बोलत होत्या.…
ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा मुंबईत शुभारंभ मंगळवार, दि. ३ सप्टेंबर मुंबई : ई गव्हर्नन्स हे फक्त तंत्रज्ञान नसून लोकांची विचार प्रवृत्ती बदलण्याचे माध्यम आहे. यामुळे पारदर्शकता येत असल्याने सामान्य नागरिकांमध्ये प्रशासनावर विश्वास निर्माण होतो. मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण या योजनेच्या पहिल्या दोन हप्त्याची रक्कम अतिशय कमी वेळेत थेट लाभार्थ्यांच्या खात्यात केवळ ई गव्हर्नन्समुळे शक्य झाल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. ई गव्हर्नन्स विषयक २७ व्या राष्ट्रीय परिषदेचा आयोजन मुंबई येथे मंगळवारी करण्यात आले होते. “विकसित भारत : सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा वितरण” अशी संकल्पना असलेल्या या दोन दिवसीय परिषदेचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते…
मंगळवार, दि. ०३ सप्टेंबर मुंबई / संगमनेर : राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी मंगळवारपासून प्रलंबित मागण्यांसाठी संप पुकारला आहे. आर्थिक बाबी, खासगीकरण अशा मागण्या विधानसभेच्या आचारसंहितेपूर्वी मान्य कराव्या, असा इशारा देत एसटी कर्मचारी संपावर गेले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर, शिर्डी, श्रीरामपूरसह राज्याच्या अनेक भागातील कर्मचारी संपात उतरल्याने आता ऐन गणेशोत्सवात लालपरीची चाके थांबलेली दिसत आहे. राज्य मार्ग परिवहन महामंडळ म्हणजेच एसटी कामगारांच्या आर्थिक मुद्द्यांची सोडवणूक तातडीने व्हावी, यासाठी सोमवारी राज्यभर तीव्र निदर्शने करण्यात आली, तर मंगळवारपासून संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला होता. सोमवारी दुपारी १.३० वाजता मुंबई सेंट्रल येथे कृती समितीच्यावतीने निदर्शने व द्वारसभा आयोजित करण्यात आली होती, त्याचवेळी सरकारला संपावर जाण्याचा…
