Author: अनंत पांगारकर

गुरुवार, २९ ऑगस्ट मुंबई : मालवण तालुक्यातील राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्यामागची कारणे शोधणे व एकूणच या दुर्दैवी घटनेसंदर्भात विस्तृत कारणमीमांसा करण्यासाठी स्थापत्य अभियंते, तज्ञ, आयआयटी तसेच नौदलाच्या अधिकाऱ्यांचा समावेश असलेली एक तांत्रिक संयुक्त समिती नेमण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. ही समिती जबाबदारी निश्चित करेल. छत्रपती शिवाजी महाराजांचा त्यांच्या कर्तुत्वाला साजेसा भव्य आणि अत्युत्कृष्ट पुतळा उभारण्याच्या दृष्टीने देशातील उत्तम शिल्पकार, स्थापत्य अभियंते, तज्ञ, नौदलाचे अधिकारी यांची एक समितीही नेमण्याचे निर्देश त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले. या घटनेसंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वर्षा येथे संबंधितांची बैठक बोलाविली होती. बैठकीस उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री आणि पालकमंत्री…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट संगमनेर : शेतात मेंढपाळ कळपासह मुक्काम करत असताना मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी गेलेल्या बिबट्याला रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने गुराखी महिलेला ओरबाडले. पती मदतीसाठी धावताच बिबट्या पळाला यात महिला जखमी झाल्याची घटना वडगाव लांडगा येथे घडली. याबाबत अधिक माहिती अशी, साकुर येथील मेंढपाळ आपला मेंढ्याचा कळप घेवून फिरत असतांना रात्रीच्या वेळी मारुती लांडगे यांच्या शेताजवळ मुक्कामासाठी थांबले. मंगळवारी (२६ ऑगस्ट) पहाटे साडेचारच्या सुमारास बिबट्या मेंढ्याची शिकार करण्यासाठी आला. याच ठिकाणी मेंढपाळ पती-पत्नी येथेच झोपलेले होते. कळप पाहून बिबट्याने मेंढ्यावर हल्ला करण्यासाठी झडप टाकली. मात्र रात्रीच्या अंधारात अंदाज न आल्याने बिबट्याचा पंजा महीलेच्या गालाला लागल्याने त्यांना जाग आली. यामुळे…

Read More

गुरुवार, २९ ऑगस्ट चालढकल आणि गांभीर्य नसणे यावर सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी ताशेरे ओढत राज्य सरकारला पुन्हा एकदा ‘लाडकी बहीण योजना’ थांबविण्याचा इशारा देत संबंधित अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. सर्वोच्च न्यायालयाने दुसऱ्यांदा या योजनेच्या अनुषंगाने सरकारचे कान पिळले आहेत. पुण्यातील पाषाण परिसरातील खाजगी मालकीची जमीन अधिग्रहित केल्यानंतर राज्य सरकारने मूळ जमीन मालकांना त्या जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही. त्यामुळे जमीन मालकांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली. जमीन अधिग्रहण प्रकरणाच्या या नुकसान भरपाईवरून राज्य सरकार चालढकल करत असून सरकारला याचे गांभीर्य नसल्याचे स्पष्ट करत सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी राज्य सरकारवर ताशेरे ओढले. राज्य सरकारने अर्जदाराला देण्याची भरपाईची रक्कम पुन्हा मोजून सादर न…

Read More

गुरूवार दि. २९ ऑगस्ट २०२४ मेष – अचानक धनलाभाचे योग. परंतु आज खिसा, पाकीट सांभाळा. आर्थिक फसवणुक होण्याची शक्यता. वृषभ – अतिशय यशस्वी दिवस. आपल्या रागावर नियंत्रण ठेवा. संततीमुळे आज मानहानी संभवते. मिथुन – महादेवाची उपासना लाभदायक होईल. वाहन सांभाळून चालवा. कर्क – आजचा दिवस कटकटीचा असेल. पाकीटासह महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. सिंह – आपली हुशारी व आपल्या समय सूचकतेनुसार आजच्या दिवसाचे आर्थिक नियोजन यशस्वी कराल. कन्या – गणेशाची आराधना करा. दिवस आनंदात जाईल. पोटदुखीने हैराण व्हाल. तूळ – आनंदी व लाभदायक दिवस. आईकडील नातलग भेटण्याचा दिवस. वृश्चिक – भाग्यशाली दिवस. आज जे मागाल ते मिळण्याचा दिवस. प्रेमी युवकांसाठी भाग्यशाली दिवस.…

Read More

बुधवार, २८ ऑगस्ट अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी या पदाचा कार्यभार डॉ. किरण मोघे यांनी आज बुधवारी स्वीकारला. डॉ. किरण मोघे हे अहमदनगर येथे रूजू होण्यापूर्वी पुणे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून २०२१ पासून कार्यरत होते. त्यांच्या जागेवर अहमदनगरचे जिल्हा माहिती अधिकारी डॉ. रवींद्र ठाकूर यांची बदली झाली आहे. अहमदनगर जिल्हा माहिती अधिकारी पदावर रूजू झाल्यावर त्यांचे शिर्डी उपमाहिती कार्यालयाचे माहिती अधिकारी सुरेश पाटील यांनी त्यांचे स्वागत केले. जिल्हा माहिती कार्यालयाच्यावतीने संतोष गुजर, धनंजय जगताप, सुरज लचके, प्रविण मुठे, चिंतादेवी जयस्वार यांनी त्यांचे स्वागत केले. डॉ. मोघे यांनी यापूर्वी नांदेड, रत्नागिरी, नाशिक, नंदुरबार येथे जिल्हा माहिती अधिकारी म्हणून आणि मुख्यमंत्री सचिवालयात माहिती…

Read More

बुधवार, २८ ऑगस्ट अवैध धंद्यासाठी बहुचर्चित असलेल्या शक्तिमान टॉवरचा अखेर संगमनेर शहर पोलिसांना पत्ता सापडला असून पोलिसांच्या डिटेक्शन ब्रांचच्या (डीबी) कर्मचाऱ्यांनी येथील एका गाळ्यात सुरू असलेल्या मटका अड्ड्यावर सोमवारी साडेसहा वाजता छापा टाकला. कल्याण मटक्याचे आकडे घेणाऱ्या एकाला पोलीस पथकाने पकडत त्याच्यावर कारवाई केली, मात्र याचवेळी येथे सुरू असलेल्या अन्य अवैध धंद्यांकडे पोलीस पथकाने दुर्लक्ष केल्याचे दिसून आले. राज्यात सुसंस्कृत म्हणून पुढे येत असलेल्या संगमनेरला गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांचा कलंक लागला असून गल्लोगल्ली हे धंदे राजरोसपणे रस्त्यांवर सुरू आहे. पोलिसांसह अन्य संबंधित सर्वच विभागांचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याचा आरोप सातत्याने केला जातो. अवैध धंदे करणाऱ्यांमध्ये राजकीय पक्षाचे पदाधिकारी…

Read More

बेजबाबदार शासनाला जनतेने शिक्षा द्यावी – माजी आमदार डॉ. तांबे मालवणची घटना दुर्दैवी व वेदनादायी – डॉ. जयश्री थोरात बुधवार, २८ ऑगस्ट संगमनेर – महाराष्ट्रासह देशवासीयांची अस्मिता असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा रत्नागिरी समुद्रकिनाऱ्यावरील पुतळा अवघ्या आठ महिन्यातच कोसळल्याने राज्यभरात भ्रष्ट सरकार विरोधात संतापाचे वातावरण निर्माण झाले असून या घटनेचा सर्वत्र निषेध होत आहे. बुधवारी संगमनेरमध्ये देखील महाविकास आघाडीच्यावतीने निषेध व्यक्त करत आंदोलन करण्यात आले. प्रांताधिकार्‍यांना या संदर्भातील निवेदन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी दिले आहे. संगमनेरकर नागरिक, शिवप्रेमी आणि महाविकास आघाडीच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांचा यात समावेश होता. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापाशी जमलेले सर्वजण भ्रष्ट भाजप सरकार विरोधात घोषणा देत प्रांताधिकारी कार्यालयात आले होते.…

Read More

बुधवार, २८ ऑगस्ट  शाळेत विद्यार्थिनी गैरवर्तन केल्याप्रकरणी चार महिन्यांपूर्वी न्यायालयात आरोप सिद्ध झालेल्या प्राथमिक शिक्षकाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर सेवेतून बडतर्फ केले आहे. मदन रंगनाथ दिवे असे कारवाई झालेल्या या प्राथमिक शिक्षकाचे नाव आहे. डिसेंबर २०२२ मध्ये राहुरी तालुक्यात जिल्हा परिषदेच्या शाळेवर उपाध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या शाळेतील विद्यार्थिनी सोबत गैरवर्तन केल्याचा प्रकार घडला होता. याप्रकरणी राहुरी पोलीस ठाण्यात दिवे याच्याविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३५४(अ), बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात शिक्षक दिवे याला पोलिसांनी अटक देखील केली होती. त्यामुळे संबंधित शिक्षकावर जिल्हा परिषदेने निलंबनाची कारवाई केली होती. न्यायालयीन खटल्या दरम्यान…

Read More

बुधवार, २८ ऑगस्ट गोविंदा पथकांच्या पाठीशी हे शासन नेहमीच खंबीरपणे उभे आहे आणि यापुढेही राहील. शासनाकडून गोविंदांसाठी जे-जे शक्य आहे ते सर्व काही करण्यात येईल. ‘लाडक्या बहिणी’ प्रमाणेच ‘सुरक्षित बहीण’ ही जबाबदारी देखील शासनाचीच आहे, शासनाने ही जबाबदारी निश्चितपणे स्वीकारली आहे. हे शासन कोणत्याही गुन्हेगाराला सोडणार नाही, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. प्रताप सरनाईक फाउंडेशन आणि संस्कृती युवा प्रतिष्ठान आयोजित दहीहंडी उत्सवात ते बोलत होते. यावेळी खासदार नरेश मस्के, आमदार प्रताप सरनाईक, पूर्वेश सरनाईक, संस्कृती युवा प्रतिष्ठानचे इतर सर्व पदाधिकारी, विविध गोविंदा पथके व गोविंदाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, हा खेळ पाहून आम्हालाही आमचे…

Read More

बुधवार, २८ ऑगस्ट विश्व हिंदू परिषद हीरक महोत्सवानिमित्त बजरंग दलाच्यावतीने संगमनेरमध्ये भव्य हिंदू संमेलनासह विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेस यावर्षी साठ वर्षे पूर्ण होत आहे भारतासह संपूर्ण विश्वातील हिंदूंची सेवा सुरक्षा व संस्कार करणे हे ध्येय समोर ठेवून विश्व हिंदू परिषद अखंड कार्य करीत आहे. श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी आंदोलन, न्यायालयीन लढा आणि मंदिराच्या निर्माण पर्यन्त चे नेतृत्व विश्व हिंदू परिषदेने केले आहे. अनेक मोठमोठ्या आंदोलनात विश्व हिंदू परिषदेने यशस्वीपणे आपली भूमिका घेतली आहे. आणि यापुढेही हिंदू हिताचे कार्य अखंडितपणे चालू राहणारच आहे. रविवारी (१ सप्टेंबर) सकाळी दहा वाजता नाशिक-पुणे मार्गावरील शेती…

Read More