Author: अनंत पांगारकर
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी ठेकेदारी संस्कृती आणि माफीयाराजला पाठबळ देणाऱ्यांनी चाळीस वर्षात जनतेच्या प्रश्नांची उत्तर दिली नाहीत. वर्षानुवर्षे या तालुक्याचे प्रश्न प्रलंबित आहेत. आता कुठेतरी तालुक्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. जनता मोकळा श्वास घेवू लागली आहे. पालकमंत्र्यांनी घेतलेल्या बैठकीवर टिका करण्यापेक्षा चाळीस वर्ष आपण काय केले याचे आत्मपरिक्षण करा आणि नव्या विकास प्रक्रीयेत खोडा घालण्याचे काम करु नका असा सल्ला आमदार अमोल खताळ यांनी दिला. पालकमंत्री राधाकृष्ण विखे यांनी संगमनेरमध्ये घेतलेल्या बैठकीवर माजी आमदार बाळासाहेब थोरात यांनी केलेल्या टिकेला उत्तर देत खताळ म्हणाले, चाळीस वर्ष ज्यांना कोणताच प्रश्न सोडविता आला नाही, ज्यांचे प्रश्न फक्त ठेकेदार आणि माफीयांशी गुंतलेले होते…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहर शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रभारी शहर प्रमुख पदी रवींद्र कानकाटे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्हा प्रमुखांच्या आदेशावरून सह संपर्कप्रमुख व उपजिल्हाप्रमुख यांनी ही निवड केली आहे. कानकाटे यांना देण्यात आलेल्या नियुक्ती पत्रात म्हटले आहे की, सध्याचे शहर प्रमुख असलेले आप्पा केसेकर यांनी पक्षविरोधी काम केल्याने तसेच तिथीनुसार होत असलेल्या शिवजयंती साजरी करण्यासाठी कोणतीही जबाबदारी न घेतल्याने त्यांच्या पदाला आपण स्थगिती देत असल्याचे सहसंपर्कप्रमुख ॲड. दिलीप साळगट आणि उपजिल्हाप्रमुख अशोक सातपुते यांनी म्हटले आहे. विद्यमान शहर प्रमुख यांच्या पदाला स्थगिती देत कानकाटे यांची प्रभारी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती करत असल्याचे पत्रात म्हटले…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाने शनिवारी बोलावलेल्या शांतता समितीचीच्या बैठकीत मिरवणुकीच्या परवानगीवरून शिवसेनेच्या दोन्ही गटांनी दावा ठोकल्याने वाद निर्माण झाला. दोन्ही गटाचे उत्सव समितीचे कार्यकर्ते, शिवसैनिक, पदाधिकारी एकमेकांवर धावून गेले. निर्माण झालेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधिकाऱ्यांनी थेट “कायदा हातात घ्याल तर तो वापरण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे, तुमची इज्जत येथे घालवू नका” अशा शब्दात सर्वांना सुनावल्याने निर्माण झालेला वाद निवळला. संगमनेरचे पोलीस उप अधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे, पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या उपस्थितीत शनिवारी (१५ मार्च) यशवंतराव चव्हाण प्रशासकीय भवनामध्ये मार्च एप्रिल मध्ये होणाऱ्या सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर शांतता समितीची बैठक बोलवण्यात आली होती.…
संगमनेर, दि. १५ मार्च – प्रतिनिधी राज्याचे जलसंपदा व जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्यासमोर महायुतीच्या कार्यकर्त्यांनी छात्र भारतीचे कार्याध्यक्ष अनिकेत घुले आणि त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करण्याचा प्रकार गुरुवारी संगमनेरमध्ये घडला होता. या पार्श्वभूमीवर आज शनिवारी (१५ मार्च) माजी आमदार कपिल पाटील यांच्यासह राज्यभरातील शेकडो कार्यकर्ते संगमनेरमध्ये येऊन धडकणार आहे. यामुळे गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चांगलीच अडचण होणार असल्याचे दिसते. छात्र भारतीची राज्य कार्यकारिणी बैठक संगमनेरात… छात्र भारती महाराष्ट्र राज्य कार्यकारणीने हे प्रकरण गंभीरतेने घेतले असून आज थेट संगमनेरातच भास्करराव दुर्वे स्मारक भवन येथे त्यांनी राजस्तरीय बैठकीचे आयोजन केले आहे. यात आंदोलनाची पुढील…
संगमनेर – प्रतिनिधी थोर स्वातंत्र्यसेनानी भाऊसाहेब थोरात यांनी स्वातंत्र्यलढ्यातील सहभागानंतर संगमनेर तालुका हा आपले कुटुंब मानले. गोरगरीब सर्वसामान्य माणसाच्या जीवनात आनंद निर्माण करण्यासाठी त्यांनी आयुष्यभर काम केले. संगमनेर तालुक्याची विकासकामांमधून झालेली वाटचाल ही कौतुकास्पद आहे. हे वातावरण चांगले राहावे यासाठी आपल्याला काम करायचे आहे. सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्यामुळे तालुक्याच्या जीवनात समृद्धी निर्माण झाली असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. अमृत उद्योग समूहाच्या वतीने सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात कारखाना कार्यस्थळावर आयोजित १५ व्या स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, बाबा ओहोळ, रणजितसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, इंद्रजीत…
संगमनेर – तालुक्यात खंडणीचे उद्योग सुरू झाले आहेत, काम बंद पाडून लोकांना फोन जात आहेत, हे कोणाच्या आशीर्वादाने? भूसंपादनासाठी निधी वितरित झालेला असतानाही नाशिक-पुणे रेल्वेचा प्रश्न आत्ताच निर्माण होण्याचे कारण काय? अचानक नवीन मार्ग शोधण्याचे कारण काय? वीज पुरवठा सुरळीत होत नाही, शेतीसाठी पूर्ण दाबाने वीज मिळत नाही, त्याचे उत्तर काय? संगमनेर शेजारील गावे तोडून आश्वी बुद्रुकला अप्पर तहसील कार्यालय निर्माण करण्याचा हेतू काय? याची उत्तरे लोकांना हवी होती, दुर्दैवाने ती मिळाली नाही, त्यामुळे आजची आढावा बैठक ही निव्वळ राजकीय आरोप प्रत्यारोपासाठी होती का, असा प्रश्न सामान्य जनतेच्या मनात निर्माण झाला आहे, असे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी म्हटले आहे.…
अहिल्यानगर, दि. १४ मार्च – प्रतिनिधी शनिवारी रात्री संगमनेर तालुक्यातील काकडवाडी येथील महालक्ष्मी मंदिरातून झालेल्या देवीच्या दागिने चोरीच्या गुन्ह्याची उकल करण्यात आहिल्या नगरच्या गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. या पथकाने लोणी कोल्हापूर मार्गावर गुरुवारी सहा जणांचे टोळी पकडली असून संगमनेर सह आणखी काही गुन्ह्यांची आरोपींनी कबुली दिली असल्याची माहिती पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिली आहे. सुयोग अशोक दवंगे (वय २१, रा. हिवरगाव पावसा, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर), संदीप किसन साबळे (वय २३, रा. पाचपट्टावाडी, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), संदीप निवृत्ती गोडे (वय २३, रा. सोमठाणे, ता. अकोले, जि. अहिल्यानगर), अनिकेत अनिल कदम (वय २१, रा. टिटवाळा, ता. कल्याण,…
संगमनेर, दि. १३ मार्च मंत्री पदाची संविधानिक शपथ घेतल्यानंतर देखील दोन धर्मीयात जातीय तेढ निर्माण करणारे वक्तव्य करणाऱ्या मंत्री नितेश राणे यांना मंत्रिमंडळातून काढून टाकावे, या मागणीचे निवेदन पालकमंत्र्यांना देण्यासाठी गेलेल्या छात्र भारतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आमदार अमोल खताळ यांच्यासमोरच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गुरुवारी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर नगर परिषदेमध्ये आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीसाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ उपस्थित होते. बैठक संपल्यानंतर पालकमंत्री व आमदार बाहेर पडत असताना छात्र भारतीचे कार्यकर्ते मंत्रिमंडळातून नितेश राणे यांची हकालपट्टी करा अशा घोषणा देत पालकमंत्र्यांना निवेदन देण्यासाठी…
संगमनेर दि. १३ मार्च – शहरातील पाणी पुरवठा यंत्रणेतील त्रृटी तातडीने दुरूस्त करून नागरीकांना शुध्द पाणी उपलब्ध करून द्यावे, शहारातील क्रीडा संकुल सर्व नागरीकांना उपलब्ध करण्याचा लवकर निर्णय करावा, तसेच नदी सुधार प्रकल्पाचा निर्णय करण्यापुर्वी अन्य ठिकाणची माहीती घेण्यासाठी पालिकेने समिती नेमावी, अशा सूचना जलसंपदा तथा पालक मंत्री राधाकृष्ण विखे यांनी केल्या. नगरपालिकेच्या सभागृहात मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत आयोजित केलेल्या आढावा बैठकीत महायुती सरकारच्या निधीच्या माध्यमातून सुरू असलेल्या विकास कामांचा आढावा तसेच नागरीकांच्या समस्या जाणून घेण्यात आल्या. यावेळी आमदार अमोल खताळ, अतिरीक्त जिल्हाधिकरी बाळासाहेब कोळेकर, प्रांताधिकारी शैलेंद्र हिंगे, तहसिलदार धीरज मांजरे, मुख्याधिकारी रामदास कोकरे यांच्यासह माजी उपनगराध्यक्ष जावेद…
मुंबई, दि. १३ मार्च – महसूल व वन विभागाने राज्यातील जन्म-मृत्यू नोंदणी प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी उशिरा जन्म व मृत्यू प्रमाणपत्र देण्यावर लावलेली स्थगिती उठविण्यात आल्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानपरिषदेत निवेदनाद्वारे जाहीर केले. विलंबित नोंदणीबाबत सुधारणा आणि पारदर्शक प्रक्रिया जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, १९६९ आणि सुधारित अधिनियम, २०२३ नुसार, जन्म-मृत्यूच्या विलंबित नोंदणी प्रक्रियेत काही महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या होत्या. पूर्वी, जन्म किंवा मृत्यूची नोंद एक वर्षाच्या आत न झाल्यास प्रथम वर्ग दंडाधिकारी किंवा इलाखा शहर दंडाधिकाऱ्यांच्या आदेशावरून नोंदणी केली जात असे. मात्र, ११ ऑगस्ट २०२३ रोजी केंद्र सरकारने सुधारणा करत जिल्हा दंडाधिकारी, उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकारी यांना अधिकृत केले. बनावट…
