Author: अनंत पांगारकर

मुंबई, दि. २३ मार्च विशेष प्रतिनिधी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे ॲक्शन मोडवर आले असून त्यांनी पक्षात मोठे संघटनात्मक बदल केले आहेत. मुंबई शहर अध्यक्षपदी संदीप देशपांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. रविवारी रवींद्र नाट्यमंदिरात झालेल्या पक्षाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. या बैठकीत राज ठाकरे यांनी मनसेतील नवीन पदे आणि पदाधिकाऱ्यांची घोषणा केली. त्यानुसार विभाग अध्यक्ष असलेल्या मनसेत आता शहर अध्यक्ष आणि उप-शहर अध्यक्ष या नव्या पदांची निर्मिती करण्यात आली आहे. राज ठाकरे यांनी सांगितले की, ही केंद्रीय समिती मनसेतील सर्व पदाधिकाऱ्यांच्या कारभारावर देखरेख ठेवेल. तसेच, कार्यकर्त्यांना कामाची आखणी २ एप्रिलपर्यंत मिळेल आणि शहर…

Read More

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी  आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी आणि नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण करण्यासाठी संगमनेर पोलिसांनी आज रविवारी शहरातून रूट मार्च काढला, अशी माहिती संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी दिली आहे. सकाळी ११ ते १२ या वेळेत काढलेल्या या रूट मार्चमध्ये पोलीस स्टेशन, बस स्टँड, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा, मेन रोड, गवंडीपुरा, सय्यद बाबा चौक, तेली खुंट, नेहरू चौक, चंद्रशेखर चौक, माळीवाडा या प्रमुख मार्गांचा समावेश होता. या रूट मार्चमध्ये नवी मुंबई येथील रॅपीड ॲक्शन फोर्सच्या १०२ बटालियनच्या असिस्टंट कमांडर प्रियंकासिंग परिहार, पोलीस निरीक्षक दत्तात्रय मोहिते, पोलीस हवालदार दुधाणे यांच्यासह ३२ जवान,…

Read More

संगमनेर, दि. २३ मार्च – प्रतिनिधी कांद्याच्या घसरलेल्या भावामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकऱ्यांना केंद्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क अखेर रद्द करण्यात आले आहे. १ एप्रिल २०२५ पासून याची अंमलबजावणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून कांद्याच्या भावात मोठी घसरण होत असल्याने बळीराजा चिंतेत होता. केंद्र सरकारने आज शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय घेऊन कांद्यावरील २० टक्के निर्यात शुल्क रद्द करण्यात आल्याचे जाहीर केले. केंद्र सरकारच्या वित्त मंत्रालयाने परिपत्रक काढून कांद्यावर असलेले २० टक्के निर्यात शुल्क रद्द करून शून्य करण्यात आल्याचे जाहीर केले असून हा निर्णय १ एप्रिल २०२५ पासून लागू होणार आहे. कांद्याचे वाढलेले भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सुमारे…

Read More

गेल्या आठवड्यात नागपूरमध्ये घडलेल्या घटनेची दखल आता सर्वदूर घेतली जाऊ लागली आहे. राज्य आणि केंद्र सरकार या दंगलीकडे एकांगाने पाहणार हे अगदी स्पष्टपणे दिसू लागल्याने यामागच्या डोक्याची चिरफाड करणं अत्यंत गरजेचं आणि तितकंच आवश्यक बनलं आहे. सरकार पुरस्कृत दंगल कशी असते हे नागपूरच्या घटनेने दाखवून दिलं. सरकारी पक्षाची लोकं भाजपचे नेते आणि यंत्रणा या दंगलीनंतर ज्याप्रकारे आग ओकण्याचं काम करत आहेत, ते पाहिलं तर ही दंगल सरकार पुरस्कृतच आहे, असं चित्र आहे. सरकारला विकली गेलेली माध्यमं आणि शासकीय यंत्रणांकडून यातलं खरं काय ते कळू देलं जात नाही. तरी समाजमाध्यमांनी केलेला पोलखोल सारं काही सांगून जात आहे. यामुळेच कोणत्याही परिस्थितीत समाज…

Read More

नाशिक, दि. २२ मार्च जिल्हा बँकेच्या कोट्यवधींच्या कर्जवाटपात अनियमितता झाल्यामुळे २५ माजी संचालक आणि त्यांच्या वारसांवर निश्चित केलेल्या आर्थिक जबाबदारीच्या प्रकरणात सहकार विभागाने संबंधितांना नोटीस बजावली आहे. यात राज्याचे कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांच्यासह सत्ताधारी पक्षांचे चार विद्यमान आमदार आणि काँग्रेसच्या खासदार डॉ. शोभा बच्छाव यांचा समावेश आहे. एक काळ असा होता, जेव्हा नाशिक जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा देशात नावलौकिक होता. परंतु, संचालकांच्या मनमानी कारभारामुळे ही बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. आज शेतकऱ्यांना कर्ज वाटप करणे आणि ठेवीदारांना पैसे परत करणेही बँकेला जड जात आहे. बँकेचा परवाना रद्द होण्याची शक्यता आहे. काही वर्षांपूर्वी तत्कालीन विभागीय सहनिबंधक गौतम बलसाने यांनी बँकेच्या…

Read More

शिर्डी, दि. २२ मार्च –  संत साहित्य आणि विचारांमधून समाजात एकतेचा संदेश दिला जातो. संतांची भूमिका नेहमीच लोकांच्या कल्याणासाठी असते. संत साहित्य जोपर्यंत जिवंत राहील, तोपर्यंत समाजातील विषमता नष्ट होईल आणि एकता निर्माण होईल. संत विचारांमध्ये समाजाला एकत्र ठेवण्याची ताकद आहे, असे राज्याचे जलसंपदा आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. वारकरी साहित्य परिषदेतर्फे आयोजित १३ व्या अखिल भारतीय मराठी संत साहित्य संमेलनाला शिर्डी येथे सुरुवात झाली. या कार्यक्रमाला केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ, संमेलनाध्यक्ष ह.भ.प. संजय महाराज देहूकर, मागील संमेलनाचे अध्यक्ष ह.भ.प. माधव महाराज शिवणीकर, वारकरी साहित्य परिषदेचे अध्यक्ष विठ्ठल पाटील,…

Read More

मुंबई, दि. २२ मार्च –  राज्यभरातील महसूल प्रकरणांवरील सुनावण्या डिजिटल स्वरूपात होणार असून, त्यादिशेने शुक्रवारी ‘प्रत्यय’ ही पेपरलेस रिव्हिजन व अपील प्रणाली सुरू करत महसूल विभागाने महत्वाकांक्षी पाऊल टाकले. प्रत्यय प्रणालीमुळे फेरफार, तक्रारी, अपील, पुनर्विलकन अर्ज आदी विषय ऑनलाईन पद्धतीने हाताळता येतील. यामुळे नागरिकांना मुंबई किंवा इतर ठिकाणी प्रत्यक्ष हजर राहण्याची गरज भासणार नाही. असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले. ‘प्रत्यय’(PAPERLESS RIVISION & APPEALS IN A TRANSPERANT WAY) प्रणालीचा शुभारंभ महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. यावेळी महसूल विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजेश कुमार, प्रधान सचिव संतोष कुमार, जमाबंदी आयुक्त सुहास दिवसे,…

Read More

मुंबई, दि. २२ मार्च – प्रतिनिधी संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांवर नगरपरिषदेने अन्यायकारक शास्तीकर आणि दंडाचा बोजा टाकला आहे. यातून दिलासा मिळावा, यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करण्यात आला असून, त्यांनी लवकरच बैठक घेऊन हा विषय मार्गी लावण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी दिली. आपल्या फेसबुक या समाज माध्यमात दिलेल्या माहितीमध्ये खताळ म्हणाले, संगमनेर शहरातील अनेक कष्टकरी कुटुंबांनी आपल्या आयुष्यभराच्या कमाईतून छोट्या-मोठ्या जागा घेतल्या आणि हक्काची घरे उभारली. मात्र, नगरपरिषदेने त्यांना अनधिकृत बांधकामांचे कारण सांगत शास्तीकर आणि २% व्याजासह मोठी रक्कम भरण्याच्या नोटिसा पाठवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांना ही रक्कम भरणे शक्य नसल्याने त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी…

Read More

मुंबई, दि. २१ मार्च – विशेष प्रतिनिधी परभणीतील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणाने राज्यात खळबळ उडवून दिली आहे. न्यायदंडाधिकारी समितीने नुकताच या प्रकरणाचा अहवाल राज्य मानवाधिकार आयोगाकडे सादर केला आहे. या अहवालात सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाल्याचे स्पष्टपणे नमूद करण्यात आले आहे. या अहवालामुळे राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली असून, विरोधकांनी गृह मंत्रालय आणि पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. न्यायदंडाधिकारी समितीच्या अहवालानुसार, सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस कोठडीत असताना गंभीर मारहाण करण्यात आली. या मारहाणीमुळेच त्यांचा मृत्यू झाला, असे अहवालात नमूद करण्यात आले आहे. यापूर्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूर्यवंशी यांचा मृत्यू श्वसनाच्या त्रासामुळे झाल्याचे विधान केले होते.…

Read More

अहिल्यानगर, दि. २१ मार्च –  राज्यातील जुन्या वाहनधारकांसाठी उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविण्याची अंतिम मुदत ३० जून २०२५ पर्यंत वाढविण्यात आली आहे, अशी माहिती प्रादेशिक परिवहन अधिकारी विनोद सगरे यांनी दिली. केंद्रीय मोटार वाहन नियम १९८९ च्या नियम ५० नुसार, १ एप्रिल २०१९ नंतर नोंदणी झालेल्या सर्व नवीन वाहनांसाठी एचएसआरपी पाटी बंधनकारक आहे. तसेच, १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणीकृत वाहनांसाठीही ही नंबर प्लेट बसवणे अनिवार्य आहे. यासाठी शासनाने पूर्वी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत दिली होती. मात्र वाहनधारकांचा प्रतिसाद अपेक्षेइतका नसल्याने ती वाढवून ३० जून २०२५ करण्यात आली आहे. एचएसआरपी नंबरप्लेटसाठी अर्ज मोटार वाहन विभागाच्या अधिकृत संकेतस्थळावर (https://transport.maharashtra.gov.in)…

Read More