Author: अनंत पांगारकर

मंगळवार, १५ ऑक्टोंबर अहिल्यानगर – केंद्रीय निवडणूक आयोगाकडून विधानसभा निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर सर्व शासकीय-निमशासकीय विभागांनी निवडणूक आचारसंहितेची तात्काळ अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित शासकीय यंत्रणांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहूल पाटील आणि विविध शासकीय यंत्रणांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सालीमठ म्हणाले, निवडणूकीची घोषणा झाल्यानंतर शासकीय मालकीची कार्यालये, शासकीय इमारती आणि त्यांच्या संरक्षक भिंतीवरील जाहिराती, भित्तीपत्रके, कापडी फलक, कट आऊट, जाहिरात फलकावरील संदेश, झेंडे…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोंबर  संगमनेर नगर परिषदेकडे मोठ्या प्रमाणात कर्मचारी असताना देखील शहराच्या विविध भागात, नवीन नगर रस्त्यावर किरकोळ विक्रेत्यांवर प्लास्टिक बंदीची कारवाई करणारे पथक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. कारवाई करणाऱ्या माणसांकडे कोणत्याही प्रकारचे ओळखपत्र अथवा कारवाईसाठी प्राधिकृत केल्याचे पत्र नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे प्लास्टिक बंदीच्या नावावर कारवाई करणारे हे कर्मचारी कोण असा प्रश्न उपस्थित झाला आहे. मंगळवारी दुपारी नवीन नगर रस्त्यावर काही फळ विक्रेत्यांकडे असलेल्या प्लास्टिक पिशव्यांची तपासणी करत ते जप्त करण्याचे काम दोन-तीन तरुण करत होते. या कर्मचाऱ्यांना पथविक्रेता समितीचे सदस्य दीपक साळुंके यांनी याबाबत विचारणा केली असता, तुम्ही नगरपालिकेत जाऊन मुख्याधिकाऱ्यांशी बोला. त्यांनी आम्हाला कारवाईसाठी पाठवले, अशा…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोंबर येत्या २६ नोव्हेंबरला महाराष्ट्राच्या विधानसभेची मुदत संपत आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने सोमवारी केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्राच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला असून एकाच टप्प्यात २० नोव्हेंबरला निवडणूक घेण्यात येणार आहे. तर २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार असून महाराष्ट्राची सत्ता कोणाच्या हातात जाणार हे स्पष्ट होईल.दीपावली पूर्वीच राज्यात आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने तसेच ऐन दीपावली दरम्यान निवडणूक कार्यक्रम सुरू राहणार असल्याने मतदारांची देखील दिवाळी गोड होण्याची चिन्ह आहे. २९ ऑक्टोंबर ते ४ नोव्हेंबर दरम्यान दीपावली सणाचा जल्लोष राहणार असल्याने याच दरम्यान उमेदवारी अर्ज भरण्याची तसेच मागे घेण्याची अखेरची तारीख असल्याने ऐन दिवाळीत आता निवडणुकीचा देखील माहोल रंगणार आहे. त्यातच राज्यभरात…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोंबर प्रवरा नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा मृत्यू झाला होता. नदीपात्रात या मुलांचा शोध व बचाव सुरू असताना सुगाव बुद्रुक (अकोले) येथे शोध कार्य करणाऱ्या पथकाची बोट उलटून तीन पोलीस अधिकारी कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला होता. या दिवंगत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाने नुकसान भरपाई व अन्य लाभ म्हणून गृह विभागाने ४४.६८ लाखाची नुकसान भरपाई मंजूर केली आहे. यासंबंधीचे आदेश नुकतेच काढण्यात आले. २३ मे २०२४ रोजी अकोले तालुक्यातील सुगाव बुद्रुक येथे ही दुर्घटना घडली होती. पाण्याचा प्रवाहात पोहण्यासाठी गेलेल्या दोघा मुलांचा बुडून मृत्यू झाला होता. या बुडून मृत्यू झालेल्या मुलांपैकी एकाच्या शोधासाठी बचाव पथकाची मदत घेण्यात आली. बचाव कार्य सुरू…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोबर  संगमनेर – आमदार बाळासाहेब थोरात यांच्या सततच्या कामातून संगमनेर तालुका ग्रामीण विकासाचे मॉडेल ठरला आहे. समृद्ध म्हणून गौरविल्या जाणाऱ्या तालुक्याला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा लाभली आहे. मात्र या तालुक्याचा सर्वांगीण विकास काही शक्तींना पहावत नाही. दडपशाही निर्माण करणाऱ्या अशा प्रवृत्तींना आपल्या सर्वांना एकजुटीने रोखायच असल्याचे प्रतिपादन तालुका युवक काँग्रेस अध्यक्ष डॉ. जयश्री थोरात यांनी केले. जयश्री थोरात यांच्या नेतृत्वाखाली पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागडावरून सुरू झालेल्या युवा संवाद यात्रेदरम्यान त्या बोलत होत्या. यात्रेचे धांदरफळ, निमगाव बुद्रुक, खांडगाव, निमज, सांगवी, चंदनापुरी, झोळे, सावरगाव तळ आदी गावांमध्ये उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. हजारो तरुणांच्या सहभागाने तालुक्यात यात्रेच्या निमित्ताने उत्साहाचे वातावरण तयार झाले…

Read More

मंगळवार, १६ ऑक्टोबर  संगमनेर – सन २०२४-२५ या गळीप हंगामात श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड साखर कारखान्याने साडेपाच लाख मॅट्रिक टन ऊस गाळप आणि चांगला साखर उतारा मिळविण्याचे उद्दिष्ट समोर ठेवल्याची माहिती कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष रवींद्र बिरोले यांनी दिली. विजयादशमीच्या दिवशी बिरोले यांच्या हस्ते पठाण भागाच्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरलेल्या कवठे मलकापूर येथील श्री गजानन महाराज शुगर लिमिटेड या साखर कारखान्याच्या मिल व बॉयलिंग हाऊसमधील मशिनरीचे विधिवत पूजन करत गळीत हंगामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते अण्णासाहेब वर्पे, संचालक हरिभाऊ गीते, जनरल मॅनेजर अण्णासाहेब शेंडे, चीफ इंजिनियर रोहिदास रसाळ, प्रशासन व्यवस्थापक भाऊसाहेब मंडलिक, इंजिनीयर केशव वर्पे, संतोष नान्नर, शिवाजी…

Read More

मंगळवार, १५ ऑक्टोंबर सोमवारी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत महायुतीच्या राज्यपाल नियुक्त बारा सदस्यांपैकी सात सदस्यांची नावे निश्चित झाली असून मंगळवारी दुपारी बारा वाजता उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे नवनियुक्त आमदारांना सदस्यत्वाची शपथ देणार आहेत. विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यास काही तास उरले असतानाच या सात जणांना आमदारकीची संधी मिळाली आहे. राज्यपाल नियुक्त सात सदस्यात महायुतीचा ३-२-२ असा फॉर्मुला वापरण्यात आला असून यात भारतीय जनता पक्षाच्या तीन, शिवसेना शिंदे गटाच्या दोन, आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दोन आमदारांचा समावेश आहे. भारतीय जनता पक्षाकडून नियुक्त करण्यात आलेल्या तीन सदस्यांमध्ये श्रीमती चित्रा किशोर वाघ, विक्रांत पाटील व धर्मगुरू बाबुसिंग महाराज राठोड यांचा समावेश…

Read More

असा असेल तुमचा आजचा दिवस  मंगळवार, दि. १५ ऑक्टोंबर मेष – आपली दैनंदिन कामे सुरळीत होतील. कामामध्ये यश मिळेल. महत्त्वाच्या कामांमध्ये आपण आपल्या जोडीदाराचा सल्ला घ्या, तो आपणास लाभकारक ठरेल. नोकरीत दिवस नॉर्मल जाईल. वृषभ – नोकरी करणाऱ्यांना आजचा दिवस चांगला जाईल. काम जास्त असलं तरी कामात अडचणी येतील, मात्र आज कोणाचेही सहकार्य मिळणार नाही हे लक्षात असू द्या. त्याप्रमाणे कामाचे नियोजन करा. मिथुन – आपणास आज जिद्द व चिकाटीने काम पूर्ण करावे लागणार आहे. नवीन ओळखी होतील. ओळखीचा फायदा सामाजिक क्षेत्रात आपणास होईल सामाजिक क्षेत्र विस्तारेल. संतती सौख्य मिळेल. कर्क – आज आपले मनोबल उत्तम राहील. आत्मविश्वासाने कामे कराल.…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोबर  अहिल्यानगर – जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेची सोमवारी बैठक पार पडली असून या बैठकीत ऊर्जा मित्र बैठक पूर्ववत सुरू करणे, अवैध गुटखा विक्री, स्वयंपाक गॅस वितरणातील गैरप्रकार, सेतू कार्यालयातील अवैध सेवाशुल्क, भेसळयुक्त मिठाईची विक्री, एसटी थांबा आदी विषयावर चर्चा झाली.‌ जिल्हा पुरवठा अधिकारी तथा सदस्य सचिव हेमा बडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा ग्राहक संरक्षण परिषदेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. बैठकीस अशासकीय सदस्य अतुल कुराडे, विलास जगदाळे, शाहूराव औटी, अमित कोहली, दिनेश थोरात, अशोक शेवाळे, रणजित श्रीगोड, उमा म्हेत्रे, बाबासाहेब भालेराव, डॉ. राजेंद्र कळमकर, विलास सोनवणे, सुनिल दळवी, डॉ. गोरख बारहाते व प्रकाश रासकर आदी उपस्थित होते.…

Read More

सोमवार, १४ ऑक्टोबर  मुंबई – शिवसेना (ऊबाठा) प्रमुख आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना हृदयाशी संबंधित समस्यांमुळे मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ६४ वर्षीय ठाकरे यांना सोमवारी सकाळी ८ च्या सुमारास गिरगाव येथील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले. जिथे त्यांची अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली. वृत्तानुसार, उद्धव ठाकरेंच्या हृदयात ब्लॉकेज आढळल्यानंतर डॉक्टरांनी त्यांच्यावर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया केली आहे. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक लक्ष ठेवून आहे. तथापि, शिवसेनेच्या (ऊबाठा) सूत्रांचे म्हणणे आहे की, माजी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या मागील आरोग्य समस्यांमुळे नियमित तपासणीसाठी एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज किंवा उद्या त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज मिळू शकतो.…

Read More