Author: अनंत पांगारकर
सोमवार, ०८ जुलै नुकतेच संगमनेरच्या स्थानिक वृत्तपत्रात बहुजन पालक छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाबाबद वृत्त प्रसिद्ध झाले आहे. छत्रपती शिवरायांच्या स्मारकासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा महसूलमंत्री यांनी जिल्हा नियोजन आणि विकास समितीच्या माध्यमातून १ कोटी रुपये मंजूर केल्याचे खात्रीलायक सूत्रांनी वृत्तपत्रांना माहिती दिल्याचे प्रसिद्ध झाले आहे. याबरोबरच छत्रपती शिवरांयाच्या स्मारकासाठी एसटी महामंडळाच्या जागेला माननीय मुख्यमंत्र्यांनी परवानगी दिल्याचे या बातमीत म्हटले आहे. याचे सर्व श्रेय संबंधितांनी माननीय पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे. स्मारकाची संकल्पना हीच मुळात माननीय पालकमंत्र्यांची आहे तेव्हा इतरांनी श्रेय घेऊ नये असेही पालकमंत्र्यांच्या समर्थकांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे संगमनेरच्या लोकप्रतिनिधींनी देखील या पूर्णाकृती स्मारकाबद्दल मुख्यमंत्र्यांच्या पातळीवर प्रयत्न केल्याचा…
सोमवार, ०८ जुलै अहमदनगर जिल्ह्यात आज व उद्या (दिनांक ८, ९ जुलै) दुजांच्या कडकडाटासह वादळी वारा व अतिवृष्टीची शक्यता हवामान खात्याकडून वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने केले हे आवाहन … मेघगर्जनेच्या वेळी, वीजा चमकत असताना किंवा वादळीवारे वाहत असतांना झाडाखाली किंवा झाडांजवळ उभे राहू नये. विजेपासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. धोकादायक ठिकाणी सेल्फी काढू नये. गडगडाटीच्या वादळादरम्यान व विजा चमकतांना कोणत्याही विद्युत उपकरणांचा वापर करू नये. वीजेच्या सुवाहक भागांशी संपर्क टाळावा. ट्रॅक्टर्स, शेतीची अवजारे, मोटारसायकल, सायकल यांचेपासून दूर रहावे. मोकळे मैदान, झाडाखाली, टॉवर्स, ध्वजांचे खांब, विद्युत, दिव्यांचे खांब,…
सोमवार, ०८ जुलै हवामान खात्याने मुंबईला ऑरेंज अलर्ट दिला असून राज्य आपत्ती नियंत्रण विभाग, मुंबई महापालिका, रेल्वे प्रशासन एकत्रितपणे काम करून मुंबईकरांना दिलासा देण्याचं काम करीत आहेत. मुंबईत काल रात्रीपासून २६७ ते ३०० मिलीमीटर एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला आहे. नागरिकांना मदतीसाठी सर्वोच्च प्राधान्य दिले जात असून सर्व यंत्रणा २४ तास अलर्ट मोडवर असल्याची ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मंत्रालयातील राज्य आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री शिंदे यांनी मुंबई महापालिकेच्या नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुंबईच्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांच्या समवेत मुंबई शहरचे पालकमंत्री दीपक केसरकर, मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, ग्रामविकास विभागाचे मंत्री गिरीष महाजन, मुख्य…
सोमवार, ०८ जुलै आई आणि पत्नीच्या कर्ज थकबाकीपोटी पतसंस्थेला दिलेला धनादेश न वटता परत आल्याने दाखल असलेल्या खटल्यात श्याम दिगंबर मयूर (रा. मयूर ज्वेलर्स, संगमनेर) या आरोपीला संगमनेरच्या अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी गुरुवारी एक वर्ष साध्या कारावासाची आणि १० लाख ६० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा ठोठावली. अधिक माहिती अशी, आरोपी श्याम दिगंबर मयूर यांची आई वत्सलाबाई दिगंबर मयूर आणि पत्नी संगीता शाम मयूर यांनी संगमनेर शहरातील गृहलक्ष्मी महिला सहकारी पतसंस्थेकडून प्रत्येकी एक वर्षाच्या कालावधीसाठी २ लाख ७५ हजार रुपये कर्ज घेतले होते. या कर्जासाठी आरोपी शाम मयूर हा जामीनदार होता. कर्जदार कर्जाची रक्कम भरण्यात अपयशी ठरल्याने ते संस्थेत थकबाकीदार…
सोमवार, ०८ जुलै आदरणीय एकनाथ (दादा) शिंदे मुख्यमंत्री – महाराष्ट्र राज्य दादा! पत्र लिहिण्यास कारण की, तू सुरू केलेली लाडकी बहीण माझी या योजनेअंतर्गत आम्हाला तू दर महिन्याला १५००/- रुपये देणार आहेस. पण दादा हे पैसे आम्हाला नको. या बदल्यात तू … गॅसचे दर कमी कर, विजेचा दर कमी कर, चांगले रस्ते तयार कर, ट्रॅफिक समस्या सोडण्याचा प्रयत्न कर. जेणेकरून असा विचार केलास तर तुझ्या भाओजीनां पैशाची चणचण लागणार नाही. त्यांच्या कमी पगारात, कमाईतपण तुझी बहीण सुखी राहील. दादा, आणखी एक विनंती करते, तुझ्या लाडक्या भाचा-भाचीची शाळेची फी पण काय कमी करता येते का बघ जेणे करून तुझे भाचे सगळ्याना…
सोमवार, ०८ जुलै शीतपेयाच्या खरेदीपोटी व्यापाऱ्याला दिलेले चार चेक न वटल्याने तसेच मागणी करूनही आरोपीने पैसे न दिल्यामुळे त्याच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या संगमनेर न्यायालयातील चार वेगवेगळ्या खटल्यात न्यायालयाने आरोपीला मोठी शिक्षा ठोठावली आहे. रोहित बाळासाहेब हासे (रा. गुंजाळवाडी, संगमनेर) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायाधीश गिरीश देशमुख यांच्या न्यायालयाने नुकताच हा निर्णय दिला. आरोपी रोहित हासे याने या खटल्यातील फिर्यादी ऋषिकेश एजन्सीचे मालक अनंत दिगंबर कल्याणकर यांच्याकडून पेप्सी, पेप्सी कोला इत्यादी पेये विक्रीसाठी खरेदी केले होते. या खरेदी पोटी त्याने कल्याणकर यांना प्रत्येकी ५० हजार, ६० हजार, ५२,६०५, ६० हजार रुपयांचे असे चार चेक दिले होते. मात्र कल्याणकर…
सोमवार, ०८ जुलै आपल्या शुद्ध आयुर्वेद उपचारपद्धतीसाठी महाराष्ट्रात नावाजलेल्या आणि उत्तर महाराष्ट्रातील सर्वांत अद्ययावत असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद हॉस्पिटतर्फे बालकांसाठी मोफत सुवर्णप्राशन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर सोमवारी (८ जुलै) होणार असून सकाळी ९ ते दुपारी ३.३० वाजेपर्यंत बालकांना सुवर्णप्राशन संस्कार केले जाणार आहेत. जास्तीत जास्त नागरिकांनी त्यांच्या बालकांना मोफत सुवर्णप्राशन करण्यासाठी भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे. सिन्नर-घोटी रस्त्यावर धामणगाव येथे एसएमबीटी सेवाभावी संस्थेचे एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालय आहे. उत्तर महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या क्षमतेचे आणि तज्ज्ञ चिकित्सक असलेल्या एसएमबीटी आयुर्वेद रुग्णालयाकडून मोफत सुवर्णप्राशन व विशेष आयुर्वेद चिकित्सा शिबिर आयोजित केले आहे. सुवर्ण प्राशन हे लहान मुलांच्या शारीरिक विकासासाठी…
रविवार ७ जुलै | अनंत पांगारकर पोलीस उपअधीक्षक, प्रांत अधिकारी कार्यालय, संगमनेर शहर पोलीस ठाणे आणि दारूबंदी विभागाच्या कार्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील शक्तिमान टॉवर्समध्ये अवैध धंदे बोकाळले असून याकडे पोलीस यंत्रणेचे दुर्लक्ष झाल्याने हॉटस्पॉट बनलेल्या या परिसरात गंभीर घटना घडण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. सुसंस्कृत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संगमनेरला अवैध धंद्यांवर नियंत्रण ठेवण्यात अयशस्वी ठरलेल्या अधिकाऱ्यांच्या अवकृपेने अवैध धंद्यांचा कलंक लागला आहे. शहरातील अवैध धंदे राजरोसपणे सुरू असून पोलिस आणि संबंधित यंत्रणांच्या एजंट मार्फत होणाऱ्या अर्थपूर्ण नात्यामुळे याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आहे. विविध विकास कामे, मोठी बाजारपेठ आणि सहकारी…
रविवार, ०७ जुलै १६ वर्षांपूर्वी सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या एका खटल्यातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना या नव्या पक्षाची स्थापना केली. २००७ साली स्थापन केलेल्या मनसे पक्षाच्या सुरुवातीच्या काळातच राज यांनी मराठीच्या मुद्द्यावरुन सांगली जिल्ह्यातील शिराळा येथे आंदोलन केले होते. २००८ साली रेल्वे भरतीमध्ये मराठी मुलांना प्राधान्य देण्याच्या मुद्द्यावरुन मनसेनं रान उठवलं होतं. मध्य रेल्वेने विविध पदांसाठी भरती सुरु केली होती. त्यात मराठी मुलांना संधी द्यावी यासाठी मनसेने महाराष्ट्रभर आंदोलन सुरू केले होते. या आंदोलनाला शिराळा तालुक्यात काही ठिकाणी हिंसक वळण…
रविवार, ०७ जुलै दुधाला ४० रुपये प्रति लिटर भाव मिळावा या मागणीसाठी दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीच्यावतीने राज्यभर आंदोलने सुरू आहेत. अकोले तालुक्यातील कोतुळ येथे सुरू असलेल्या आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशी शेतकऱ्यांचा मोठा सहभाग वाढला असून युवक शेतकरी मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी होत आहेत. अकोले तालुक्याचे आमदार डॉ. किरण लहामटे यांनी कोतुळ येथे जाऊन आंदोलकांची भेट घेतली. दूध उत्पादकांचे व शेतकऱ्यांचे प्रश्न समजून घेतले व प्रश्न सोडवण्यासाठी यथायोग्य सहकार्य करू असे आश्वासन दिले. राज्य सरकारने दुधाला ३० रुपये भाव सहकारी व खाजगी संघांनी द्यावा व सरकार ५ रुपयाचे अनुदान देईल, याप्रमाणे ३५ रुपये भाव देण्याचा शासन आदेश काढलेला आहे. मात्र राज्यातील…
