Author: अनंत पांगारकर
‘अच्छे दिन’ची विझणारी शेगडी! संपादकीय:- जागतिक घडामोडींचे कारण पुढे करत केंद्र सरकारने ‘प्रधानमंत्री उज्ज्वला योजने’च्या लाभार्थ्यांना दिलेल्या अनुदानित गॅस सिलिंडरच्या संख्येत ९ वरून थेट ४ वर कपात केली आहे. आधीच महागाईच्या वरवंट्याखाली भरडल्या जाणाऱ्या सामान्य आणि गरीब कुटुंबांच्या जखमेवर हा निर्णय म्हणजे मीठ चोळण्यासारखाच आहे. निवडणुकीच्या काळात ‘अच्छे दिन’ आणि ‘सबका साथ, सबका विकास’च्या घोषणा देणाऱ्या सरकारच्या या धोरणामुळे सर्वसामान्यांच्या घरातली शेगडी पेटणार कशी, असा संतप्त सवाल आता विचारला जाऊ लागला आहे. उज्ज्वला योजनेची सुरुवात २०१६ मध्ये झाली, तेव्हा वर्षाला १२ अनुदानित सिलिंडर दिले जात होते. गेल्या वर्षी हा कोटा ९ वर आणला गेला आणि आता तो थेट ४ वर…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहवर्धक आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेला असेल. कार्यक्षेत्रात तुमच्या कार्यशैलीचे कौतुक होईल आणि प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे गती घेतील. आर्थिक आघाडीवर धनलाभाचे उत्तम योग निर्माण होत आहेत, ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होईल. कौटुंबिक जीवनात सुख आणि शांतीचे वातावरण राहील, तसेच जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे फायदेशीर ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र फलदायी ठरणार आहे. व्यवसायात नवीन योजनांवर काम सुरू करण्यासाठी अनुकूल वेळ आहे, परंतु कोणताही मोठा आर्थिक निर्णय घेताना घाईगडबड करू नका. नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडण्याची शक्यता आहे, ज्या तुम्ही आत्मविश्वासाने पार…
महाराष्ट्र संवाद न्यूज | संगमनेर: सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात अमृतवाहिनी सहकारी बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या उत्कृष्ट कामकाजाची दखल घेत उत्तर प्रदेशातील लखनऊ येथे संपन्न झालेल्या ‘भारत को-ऑपरेटिव्ह बँकिंग समिट २०२६’ मध्ये बँकेला देश पातळीवरील सर्वोच्च ‘भारतरत्न सहकारिता पुरस्कार २०२६’ ने सन्मानित करण्यात आले. या मुख्य पुरस्कारासोबतच बँकेला इतर तीन महत्त्वाचे राष्ट्रीय पुरस्कारही मिळाले आहेत. या समिटमध्ये अमृतवाहिनी बँकेचे चेअरमन सुधाकर जोशी यांना ‘बेस्ट चेअरमन’, मुख्य कार्यकारी अधिकारी सुशील गुजराती यांना ‘बेस्ट सीईओ’ आणि बँकेने सातत्याने राखलेल्या शून्य टक्के नेट एनपीएबद्दल ‘बेस्ट एनपीए मॅनेजमेंट’चा पुरस्कार प्रदान करण्यात आला. आसाम राज्य सहकारी बँकेचे चेअरमन व आमदार…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर: अकोले व संगमनेर परिसरातील समृद्ध ऐतिहासिक वारसा जतन करून तो नव्या पिढीपर्यंत प्रभावीपणे पोहोचवण्याच्या उद्देशाने ‘हेरिटेज वॉक’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत रविवारी पेमगिरी येथील ऐतिहासिक शहागड आणि महाकाय वटवृक्ष या ठिकाणी तिसऱ्या अभ्यास सहलीचे अत्यंत उत्साहपूर्ण वातावरणात आयोजन करण्यात आले होते. सहकार महर्षी भाऊसाहेब संतुजी थोरात महाविद्यालयाचा इतिहास विभाग व जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने हा स्तुत्य उपक्रम पार पडला. सकाळी संगमनेर बसस्थानकातून या अभ्यास सहलीला प्रारंभ झाला. पेमगिरी येथे पोहोचल्यानंतर सहभागी सदस्यांनी शहागडाचा इतिहास, तेथील स्थापत्यवैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक महत्त्व जाणून घेतले. यावेळी इंजिनिअर नानासाहेब खर्डे यांनी प्राचीन ते…
संगमनेर | मोहसीन शेख मुंबईवरून संगमनेरकडे परतत असताना समृद्धी महामार्गावर नागपूर कॅरीडोरवर रविवारी रात्री २ वाजेच्या सुमारास कारचा टायर फुटल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात संगमनेर तालुक्यातील जोर्वे येथील रावसाहेब रेवजी काकड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर तालुक्यातील प्रतिष्ठित व्यक्ती शरद नाना थोरात, विनोद गिरी आणि चालक गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, जोर्वे येथील हे सर्वजण स्विफ्ट गाडीने मुंबईहून संगमनेरकडे परतत होते. रात्री दोन वाजेच्या सुमारास समृद्धी महामार्गावर घोटीच्या जवळ आले असता अचानक गाडीचा टायर फुटला. टायर फुटल्याने चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडीला भीषण अपघात झाला. हा अपघात इतका तीव्र होता की, गाडीमधील रावसाहेब रेवजी काकड यांचा…
मुंबई: मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर महसूल गुप्तचर संचालनालयाने (डीआरआय) ‘ऑपरेशन गोल्डन नेक्सस’ अंतर्गत एक मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत सुमारे ५ कोटी रुपये किमतीचे ३.२ किलो वजनाचे २४ कॅरेट सोन्याची भुकटी जप्त करण्यात आली असून, सोने तस्करीचे मोठे रॅकेट उद्धवस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी डीआरआयने भाजप कामगार संघटनेचा चिटणीस आणि मुंबई विमानतळ कर्मचारी असलेला अजित आचरेकर याच्यासह सात जणांना अटक केली आहे. ६ जून २०२६ रोजी पहाटे विमानतळाजवळील ‘हॉटेल फेअरमॉँट’ परिसरात डीआरआय अधिकाऱ्यांनी सापळा रचून ही कारवाई केली. विमानतळ कर्मचाऱ्यांच्या मदतीने हे सोने विमानतळाबाहेर पोहोचवण्याचा कट होता, मात्र गुप्त माहितीच्या आधारे अधिकाऱ्यांनी आरोपींना रंगेहात पकडले. अटकेत…
बुलढाणा: राज्यभर खळबळ उडवून देणाऱ्या जळगाव जामोद येथील कथित ‘फेक मर्डर केस’ प्रकरणात तपासात गंभीर हलगर्जीपणा केल्या ठपक्यावरून तत्कालीन एलसीबी पोलीस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि तपास अधिकारी नितीन पाटील या दोन अधिकाऱ्यांना अमरावती पोलीस आयुक्तांनी निलंबित केले आहे. जळगाव जामोद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील राजुर धरण परिसरात काही दिवसांपूर्वी एका अनोळखी तरुणीचा मृतदेह सापडला होता. या मृतदेहाची ओळख पटण्यापूर्वी आणि डीएनए अहवाल येण्याआधीच पोलिसांनी तो मृतदेह ‘शिवानी’ नावाच्या तरुणीचा असल्याचा दावा केला. धक्कादायक बाब म्हणजे, शिवानी प्रत्यक्षात जिवंत असतानाही पोलिसांनी तिला मृत घोषित केले आणि तिच्या कथित हत्येच्या आरोपाखाली तिच्या वडील व भावाला अटक केली. पोलिसांनी आपल्याला उलटे टांगून मारहाण केली…
आजचे राशीभविष्य मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी कमालीचा उत्साहाचा राहील. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या अंगावर पडतील, ज्या तुम्ही लीलया पेलून न्याल. आर्थिक स्थिती बळकट करण्यासाठी केलेले प्रयत्न यशस्वी होतील. कुटुंबातील सदस्यांसोबत आनंदाचे क्षण घालवण्याची संधी मिळेल. आरोग्याची बाजू उत्तम राहील, मात्र आहारावर थोडे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. वृषभ: आज तुम्हाला नशिबाची भक्कम साथ लाभणार आहे. प्रदीर्घ काळापासून रेंगाळलेली कामे मार्गी लागल्याने मानसिक शांतता लाभेल. व्यवसायात धनलाभाचे उत्तम योग दिसून येत आहेत. घरात एखाद्या धार्मिक किंवा मंगल कार्याची रूपरेषा ठरेल. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ आणि मधूर होतील. मिथुन: आजचा दिवस संमिश्र फलदायी ठरेल. कामाच्या ठिकाणी काही आव्हानांचा सामना करावा लागू शकतो, परंतु संयम…
पुणे: पुण्यातील आळंदी-मरकळ रस्त्यावरील एका बंगल्यात शनिवार मध्यरात्री सुरू असलेल्या हाय-प्रोफाईल ‘प्रोजेक्ट एक्स’ हाऊस पार्टीवर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. लोणीकंद पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तुळापूर परिसरात पोलिसांनी हा छापा टाकला. या हाय-प्रोफाईल हाऊस पार्टी प्रकरणात पोलिसांनी अधिकृतपणे गुन्हा दाखल केला असून, आयोजकांसह तब्बल ७८ जणांवर कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, एकूण ७ आयोजकांनी मिळून या पार्टीचे आयोजन केले होते. या धडक कारवाईमुळे पुणे परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.
संगमनेर: अधिकमासाच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या अखंड हरिनाम सप्ताहाच्या आठव्या पर्वाची पंचक्रोशीत मोठी चर्चा रंगली असून, या भव्य सोहळ्याची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. सप्ताह समितीच्या वतीने करण्यात येत असलेल्या गावभेटी आणि अहोरात्र परिश्रमांमुळे या सोहळ्याचे वारे संपूर्ण तालुक्यात वाहू लागले आहेत. भक्ती, अध्यात्म, संस्कार, कृषी, ज्ञान आणि समाजप्रबोधनाचा अनोखा संगम घडवून आणणाऱ्या या सप्ताहाबद्दल भाविकांमध्ये कमालीचा उत्साह पाहायला मिळत आहे. विश्वगौरव विभूषित महायोगी प.पू. गगनगिरी महाराज यांच्या प्रेरणेतून सुरू झालेली ही परंपरा यंदा ८ ते १५ जून या कालावधीत राजापूर रोड येथील जयवंतराव व बाळासाहेब गुंजाळ पाटील गुंजाळवाडी मळा येथे मोठ्या थाटात पार पडणार आहे. सप्ताह समिती, गगनगिरी…
