Author: अनंत पांगारकर
संगमनेर दि. ६ मविआ सरकारच्या काळातील रामेश्वर देवस्थानच्या निधीला महायुती सरकारने सत्तेवर येताच दिलेली स्थगिती उच्च न्यायालयाने उठविल्याने रामेश्वर देवस्थान सुशोभीकरण व सुधारणेचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे या कामाचे भूमिपूजन माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, इंद्रजीत थोरात व डॉ. जयश्री थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तत्कालीन महाविकास आघाडी सरकारमधील महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील प्रत्येक गावाच्या विविध विकास कामांसाठी मोठा निधी मिळाला. यात रामेश्वर देवस्थानच्या ६ कोटी रुपयांच्या निधीचा समावेश होता. राज्यात सत्तांतर होताच महायुती सरकारने या निधीला स्थगिती दिल्याने देवस्थानच्या पदाधिकाऱ्यांना उच्च न्यायालयात धाव घ्यावी लागली होती. न्यायालयाने स्थगिती उठविल्यानंतर आधीच्या सहा कोटी रुपयांच्या निधीत…
लोकसभा निवडणुकीसंदर्भात प्रदेश काँग्रेसची मुंबई वगळून २० लोकसभा मतदारसंघाची चर्चा – नाना पटोले लोकसभेचे उमेदवार स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा करुन देणार, जास्तीत जास्त जागा जिंकण्यावर भर मुंबई, दि. ५ मार्च लोकसभा निवडणुकीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून काँग्रेस पक्षाने आज मुंबई वगळता राज्यातील २० लोकसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली. उमेदवार देताना स्थानिक पदाधिकाऱ्यांशी चर्चा केली जाईल व त्यानंतर उमेदवारांची नावे निश्चित केले जाईल. काँग्रेसच्या पक्षाच्या संभाव्य जागांवरील स्थानिक पदाधिकारी यांचे मते व राजकीय परिस्थिती याची चर्चा करण्यात आली. मविआच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा संकल्प केल्याची माहिती महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिली. प्रदेश काँग्रेसचे कार्यालय टिळक भवन येथे…
अहमदनगर, दि. ५ अहमदनगर जिल्हयात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी जिल्हादंडाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी त्यांना प्राप्त अधिकारानुसार संपूर्ण अहमदनगर जिल्हा महसूल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियमाचे कलम ३७ (१) व ३७(३) अन्वये २ फेब्रुवारी ते १५ मार्चपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. या आदेशानुसार नमूद केलेल्या कालावधीत व ठिकाणी कोणत्याही इसमास पुढीलप्रमाणे कृत्ये करण्यास मनाई करण्यात आली आहे. शस्त्रे, मोटे, तलवारी, भाले, दंडुके, बंदुका, सुरे, काठ्या किंवा लाठ्या किंवा शारीरिक इजा करण्यासाठी वापरता येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे. दगड किंवा इतर क्षेपणास्त्रे, किंवा क्षेपणास्त्रे सोडावयाची किंवा फेकावयाची उपकरणे किंवा साधने जवळ बाळगणे, जमा करणे किंवा तयार करणे.…
अहमदनगर, दि.५ भारतीय सैन्यात भरतीसाठीची अधिसूचना www.joinindianarmy.nic.in या संकेतस्थळावर प्रसिद्धी करण्यात आली असुन इच्छुक उमेदवारांनी संकेतस्थळास भेट देऊन प्रोफाइल तयार करावी व २२ मार्च, २०२४ पर्यंत अर्ज सादर करण्याचे आवाहन स्क्वॉड्रन लिडर विद्यासागर कोरडे, (निवृत्त), जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे. सैन्यदलात अग्निवीर जीडी, अग्निवीर टेक्निकल, अग्निवीर ऑफिस असिस्टंट, अग्निवीर ट्रेड्समन (१०वी आणि ८ वी पास), मिलिटरी पोलिसांसाठी अग्निवीर महिला प्रवर्ग आणि एनए सप्टेंबर मधील नियमित प्रवेशासाठी अर्ज खुले आहेत. फार्मा, टप्पा ०१ मध्ये उमेदवारांना संगणक आधारित ऑनलाइन परीक्षेला उपस्थित राहणे आवश्यक आहे. अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी सूचना सविस्तरपणे वाचाव्यात. विषय अधिसूचनेनुसार एनसीसी उमेदवार, तांत्रिकदृष्ट्या पात्र व्यक्ती,…
सोलापूर, येत्या २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत मराठा समाजाने शेकडोने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. एकट्या बीडमध्ये साडेतीन हजार उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लोक तयार आहेत. निवडणुकीत एवढे उमेदवार उभे राहताय की, आता यांचे चिन्हच दिसणार नाही. आम्हाला न्याय मिळत नसेल तर, आधी दोन कोटी मराठा घेऊन आलो होतो आता चार कोटी मराठा घेऊन येईल असा दणदणीत इशारा मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे. जरांगे सोलापूरमधील सभेत बोलत होते. ते म्हणाले समाजाने लोकसभा निवडणुकीसाठी मोठ्या संख्येने उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय मराठा समाजाचा आहे. मी समाजाचा मालक नाही, समाज माझा मालक आहे. फडणवीसांची भाषा…
अहमदनगर, दि. ३ नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीमध्ये कौशल्य शिक्षणाला दिलेले प्राधान्य विचारात घेवून औद्योगिक क्षेत्राला आवश्यक असलेले मनुष्यबळ निर्माण करण्याचे काम विद्यापीठाच्या उपकेंद्रातून व्हावे अशी अपेक्षा राज्याचे महसूल तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अहमदनगर येथील उपकेंद्राचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत झाले. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील दुरदृष्य प्रणालीव्दारे या कार्यक्रमात सहभागी झाले होते. खासदार डॉ. सुजय विखे पाटील, जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा बॅकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डीले, विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र विखे पाटील, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्रभारी कुलगुरु डॉ. पराग काळकर यांच्यासह व्यवस्थापन परिषदेचे सदस्य उपस्थित होते.…
संगमनेर, दि. ३ ग्रामीण भागातील नागरिकांच्या समृद्धीसाठी स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी आदर्श तत्त्वावर उभ्या केलेल्या सहकाराने आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अत्यंत पारदर्शीपणे केलेल्या रचनात्मक वाटचालीमुळे संगमनेरचे हे सहकाराचे मॉडेल हे भारतासाठीच नव्हे तर संपूर्ण जगासाठी अनुकरणीय असल्याचे गौरवोद्गार लंडनमधील शिष्टमंडळाने काढले. युरोपमधील व लंडनमधील शिष्टमंडळाने सहकाराच्या अभ्यास दौऱ्यासाठी संगमनेरच्या विविध सहकारी संस्थांना भेटी दिल्या. लंडन विद्यापीठाचे डीन जिरेमी स्मिथ, वरिष्ठ पत्रकार नाथाली मायरोथ, चैतन्य मार्कपवार यांचा समावेश होता. नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे, कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ, दूध संघाचे चेअरमन रणजितसिंह देशमुख, संतोष हासे, कार्यकारी संचालक जगन्नाथ घुगरकर, डॉ. सुजित खिलारी, संभाजी वाकचौरे आदींसह विविध अधिकारी…
प्रवीण पुरो (मुंबई) बुडत्याचा पाय खोलात गेला की तो बाहेर येण्यासाठी जिवाचा आटापिटा करत असतो. संकटच ते. यातून बाहेर पडण्यासाठी मग आसपासच्यांना आणाभाका कराव्या लागतात. हे संकट सर्वच ठिकाणी असतं. ते सामाजिक जीवनात असं संकट आ वासून उभं असतं, तसा राजकीय आणि आर्थिक जीवनातही त्याचा फटका बसत असतो. राज्याचे उपमुख्यमंत्री असलेले अजित अनंतराव पवार हे ही अशाच संकटात सापडल्याचं दिसतं. गेल्या आठवड्यात एक परिपत्रक जारी करून त्यांनी आपल्यावरच्या संकटाला वाट मोकळी करून दिली. हे संकट दूर करण्यासाठी त्यांनी राज्यातील जनतेला विकास पर्वाची आठवण करून देणारं पत्र लिहिलं आहे. हे पत्र बाहेर आल्यापासून या पत्राचा राज्यातील जनता शोध आणि बोध घेत…
संगमनेर दि. – २ एसएमबीटी ही संस्था आता देशातील आरोग्य सेवेचा ब्रँड नेम ठरली आहे. दररोज हजारो शस्त्रक्रिया एसएमबीटीमध्ये होत आहे. संगमनेर तालुक्यातील रुग्णांना सोयीस्कर व्हावे यासाठी अमृतवाहिनी रोलर हॉस्पिटलमध्ये एसएमबीटीची बाह्य रुग्णसेवा उपलब्ध करून देण्यात आली असल्याचे प्रतिपादन नासिक पदवीधर मतदारसंघाचे माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी केले. संगमनेरमधील गोरगरीब आणि सामान्य नागरिकांना आरोग्याच्या अत्याधुनिक व दर्जेदार सुविधा त्वरित व माफक दरात उपलब्ध व्हाव्या, या हेतूने काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली अमृतवाहिनी हॉस्पिटलमध्ये एसएमबीटी क्लिनिकचा पूर्णवेळ सुपर स्पेशालिटी बाह्य रुग्ण विभाग शनिवारी सुरू करण्यात आला. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे बोलत होते. माजी आमदार तांबे यांच्यासह…
संगमनेर, दि. २ संगमनेर शहर व तालुका हद्दीतील सर्वच प्रकारचे अवैध धंदे ५ मार्चपर्यंत बंद न झाल्यास नाशिकला विशेष पोलीस महानिरीक्षकांच्या कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा शिवसेना (ठाकरे) गटाचे माजी शहरप्रमुख तथा राज्य दारूबंदी कृती समितीचे जिल्हाध्यक्ष अमर कतारी यांनी दिला असून यासंबंधीचे निवेदन पोलीस उपाधीक्षकांना देण्यात आले आहे. कतारी यांनी म्हटले आहे की, संगमनेर शहर व तालुक्याच्या हद्दीमध्ये दारू, मटका, जुगार अड्डे, गांजा विक्री आदी प्रकारचे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे. काही ढाबे व हॉटेलमध्येही मोठ्या प्रमाणात दारू विक्री सुरू आहे. परवानगी असलेल्या बार चालक, दारू विक्रेत्यांकडून रात्री बारा ते एक वाजेपर्यंत बेकायदेशीर रित्या दारू विक्री सुरू असते. यापूर्वी…
