Author: अनंत पांगारकर
निवडणूक विशेष | अनंत पांगारकर अहिल्यानगर जिल्ह्याची राजकीय पायाभरणी सहकाराच्या माध्यमातून झाली आहे. या जिल्ह्यात सहकारातील दिग्गज नेते असून आपापला सहकार त्यांनी आपल्या माध्यमातून शाबूत राखला आहे. जिल्ह्यातील या दिग्गजांमध्ये आजी-माजी मंत्री राधाकृष्ण विखे आणि बाळासाहेब थोरात यांचा बोलबाला आहे. तसेच या दोन्ही नेत्यांमध्ये लोकसभा निवडणुकीपासून विशेषतः अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात तत्कालीन खासदार सुजय विखे यांच्या पराभवानंतर असलेले राजकीय वैर मोठ्या प्रमाणात वाढले होते. परिणामी संगमनेरमधून बाळासाहेब थोरात यांना पराभवाला सामोरे जावे लागले आणि अमोल खताळ यांच्या रूपाने महायुतीच्या नव्या आमदाराचा उदय झाला. विधानसभा निवडणुकीनंतर संगमनेरची राजकीय गणिते बदलण्याची चिन्हे निर्माण झाली. खताळ यांच्या विजयामध्ये विखे पिता पुत्रांची ताकद असल्याने…
कोल्हापूर, दि. ९ एप्रिल – छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल कथित वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या प्रशांत कोरटकर याला कोल्हापूर न्यायालयाने आज जामीन मंजूर केला. काही दिवसांपूर्वी प्रशांत कोरटकर याने कोल्हापूरमधील इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांना दूरध्वनीवरून धमकी दिली होती. याच संभाषणात त्याने छत्रपती शिवाजी महाराजांविषयी आक्षेपार्ह टिप्पणी केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी सावंत यांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती, त्यानंतर कोरटकरला अटक करण्यात आली होती. यापूर्वी न्यायालयाने कोरटकरला पाच दिवसांची पोलीस कोठडी आणि त्यानंतर १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. त्याने दाखल केलेला जामीन अर्ज यापूर्वी फेटाळण्यात आला होता, त्यामुळे त्याचा कळंबा कारागृहातील मुक्काम वाढला होता. आज झालेल्या सुनावणीत न्यायालयाने त्याला…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर सहकारी साखर कारखान्याच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत सहभागी न होण्याचा निर्णय विरोधी गटातील प्रमुख नेत्यांनी सर्वानुमते घेतला आहे. आमदार अमोल खताळ, ज्येष्ठ नेते बापूसाहेब गुळवे, वसंतराव गुंजाळ आणि संतोष रोहोम यांनी आज एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ संपल्यानंतर विरोधी महायुतीकडून या संदर्भात माध्यमांना आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून तातडीने प्रसिद्धी पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. प्रसिद्धी पत्रकात कारखान्याने जाणीवपूर्वक सभासद मतदारांच्या शेअर्सची रक्कम भरून न घेणे, अनेक मृत सभासदांच्या वारसांची नोंद न करणे आणि अकोले तालुक्यातील सुमारे दोन हजार सभासदांना निवडणुकीत उभे राहण्याचा अधिकार नाकारणे यांसारख्या गंभीर…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी बुधवारी उमेदवारी अर्ज भरण्याच्या अखेरच्या दिवसाखेर तब्बल १३३ इच्छुकांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करणाऱ्यांमध्ये माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांचा मोठा समावेश असून विरोधकांकडून फारसे उमेदवारी अर्ज दाखल झाले नाही. विरोधी उमेदवार मैदानात नसल्याने आणि विरोधकांनी कारखान्याविरोधात समाज माध्यमातून निर्माण केलेले चित्र संपुष्टात आल्याने माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्यासाठी ही निवडणूक पुन्हा एकदा सोपी झाली आहे. कारखान्यावरील त्यांचे अधिपत्य कायम राहणार आहे. त्यामुळे कारखान्याची वाटचाल बिनविरोध निवडणुकीकडे असल्याच स्पष्ट होत आहे. संगमनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली महायुतीकडून कारखान्याचे निवडणूक लढविण्याचे…
संगमनेर, दि. ९ एप्रिल – प्रतिनिधी संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील घारगांव गावाच्या हद्दीत खंडोबा माळ परिसरातील वनविभागात एका अनोळखी तरुणाचा लिंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला. ही दुर्दैवी घटना आज, (बुधवार दि. ९ एप्रिल) सकाळी उघडकीस आली. योगेश भारत आहीरे (वय २५ वर्षे, रा. रामतीर, पो. करे, ता. बागलाण, जि. नाशिक) असे मृत तरुणाचे नाव असून तो पुण्यात एका सुरक्षा कंपनीत कामाला होता आणि तो आपल्या गावी जात असतानाही घटना घडली असल्याची माहिती मिळाली आहे. घारगांव परिसरातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गाजवळ असलेल्या खंडोबा माळ परिसरातून सकाळी ये-जा करणाऱ्या नागरिकांना लिंबाच्या झाडाला एक मृतदेह लटकलेला दिसला. कुरकुंडी गावचे तंटामुक्ती अध्यक्ष…
मुंबई, दि. ९ एप्रिल – महाराष्ट्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाने राज्यातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना जारी केली आहे. त्यानुसार, शासनाचे महत्वाचे ऑनलाइन सेवा पोर्टल, ‘आपले सरकार’, येत्या १० एप्रिल २०२५ (गुरुवार) ते १४ एप्रिल २०२५ (सोमवार) या पाच दिवसांच्या कालावधीत तात्पुरते बंद राहणार आहे. या काळात पोर्टलवर पूर्वनियोजित देखभाल आणि तांत्रिक सुधारणांचे काम केले जाणार आहे. माहिती तंत्रज्ञान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, ‘आपले सरकार’ पोर्टलच्या हार्डवेअरमध्ये सुधारणा करणे आणि प्रणाली अद्ययावत करणे आवश्यक आहे. यामुळे पोर्टलची कार्यक्षमता वाढण्यास मदत होईल आणि नागरिकांना अधिक चांगली सेवा मिळू शकेल. हे काम सुरळीतपणे पार पाडण्यासाठी १० एप्रिल ते १४ एप्रिल या दरम्यान पोर्टलवरील सर्व…
कोल्हापूर, दि.९ एप्रिल – राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद टिप्पणी करणारा प्रशांत कोरटकर याच्या जामीन अर्जावर आज, ९ एप्रिल रोजी निर्णय येणार आहे. न्यायाधीश डी. व्ही. कश्यप यांनी दोन्ही बाजूंचे युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर निर्णय राखून ठेवला होता. १२ एप्रिल रोजी कोरटकरची न्यायालयीन कोठडी संपणार असून, त्यापूर्वी न्यायालय त्याला जामीन देणार का, याकडे आता लक्ष लागले आहे. इतिहास अभ्यासक इंद्रजित सावंत यांच्यावतीने वकील असीम सरोदे यांनी न्यायालयात बाजू मांडताना सांगितले होते की, कोरटकरने पहिल्यांदा कॉल केल्यावर सावंत यांनी तो कट केला. दुसऱ्यांदा कॉल केल्यावर वेगळी भाषा वापरल्याने सावंत यांनी संभाषण रेकॉर्ड केले. मात्र, कोरटकरने पोलिसांना…
मुंबई, दि. ८ एप्रिल – विशेष प्रतिनिधी राज्याच्या नव्या वाळू रेती धोरणाला आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. सध्या राज्यात सुरू असलेली वाळूची डेपो पद्धती बंद करण्यात येणार असून सध्या सुरू असलेल्या डेपो येथील वाळू संपल्यावर बंद करण्यात येईल, असा निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात घरकुल उभारण्यासाठी पाच ब्रास वाळू विनामूल्य देण्यात येईल तसंच प्रत्येक वाळू डेपोत दहा टक्के आरक्षण घरकुलासाठी असेल, असं जाहीर करण्यात आलंय. खाडीपात्रासाठी तीन वर्षांसाठी आणि नदीपात्रासाठी दोन वर्षांसाठी अशा लिलाव पद्धतीने वाळू उपसा करण्यास परवानगी देण्यात येईल. सरकारी विविध इमारतींच्या बांधकामामध्ये एम सँड म्हणजे कृत्रिम वाळूचा वापर केला जाईल. तसंच पुढील कॅबिनेटमध्ये नैसर्गिक वाळू देण्याचं…
मुंबई, दि. ८ एप्रिल विशेष – प्रतिनिधी राज ठाकरे आणि मनसेविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे तिरस्कार पसरवत असून त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्यात यावी अशी मागणी याचिकेतून करण्यात आली आहे. उत्तर भारतीय विकाससेना नामक पक्षाच्या सुनील शुल्कांनी ही याचिका दाखल केली आहे. सुनील शुक्ला मुंबईचेच रहिवासी असून त्यांच्या पक्षाच्या कार्यालयावर गेल्या वर्षी मनसेच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केल्याचा आरोप आहे. दरम्यान या शुक्लाचा बोलवता धनी हा भारतीय जनता पक्ष असल्याचा आरोप मनसेचे मुंबई शहर अध्यक्ष संदिप देशपांडे यांनी केला आहे. उत्तर भारतीयांविरोधात राज ठाकरे हिंसेला पाठिंबा देत असल्याचा आरोप सुनील शुक्लाने केला आहे. राज ठाकरेंविरोधात…
संगमनेर, दि. ८ एप्रिल – प्रतिनिधी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीच्या रणधुमाळीने चांगलाच वेग घेतला आहे. उद्या (९ एप्रिल) उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत असल्याने आज दिवसभर इच्छुकांनी मोठ्या संख्येने अर्ज दाखल केले. विशेष म्हणजे, या निवडणुकीत विरोधकांनी देखील सक्रिय सहभाग दर्शविला असून, विद्यमान संचालकांनीही आपले अर्ज भरले आहेत. उद्या सत्ताधारी आणि विरोधक यांच्याकडून आणखी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे उमेदवारी अर्ज माघारी घेतल्यानंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, दाखल झालेल्या अर्जांची छाननी ११ एप्रिल रोजी होणार आहे. या निवडणुकीत राज्याचे मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि…
