Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे मंगळवारी 28 नोव्हेंबर संगमनेर आणि राहाता येथे शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या सहा तालुक्यातील युवा वॉरियर्सशी संवाद साधून संघटनात्मक कार्याचा आढावा घेणार आहे, अशी माहिती भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी दिली. पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल तोंडावर असतानाच भारतीय जनता पक्षाने लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा मंगळवारी आढावा घेणार आहे. लोकसभा प्रवास योजनेच्या माध्यमातून प्रदेशाध्यक्ष बावनकुळे राज्यातील मतदारसंघाचा दौरा करत आहे. या दौऱ्याअंतर्गत संगमनेर आणि राहाता येथे संघटनात्मक कार्याचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बावनकुळे यांचे सकाळी शिर्डी विमानतळावर आगमन झाल्यानंतर संगमनेरमध्ये…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) राज्यात संघटनात्मक बांधणीसाठी भर दिला असून त्यासाठी विभागीय नेत्यांची यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये नगर आणि शिर्डी लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांच्याकडे देण्यात आली आहे. राऊत यांच्याकडे नगर, शिर्डीसह उत्तर महाराष्ट्र आणि पुणे जिल्ह्याची जबाबदारी सोपविण्यात आली. त्यामुळे राऊत यांच्या नेतृत्वाखाली आता नव्याने संघटना बांधणीला वेग येण्याची चिन्हे आहे. या बांधणी दरम्यान काही पदाधिकारी देखील बदलले जाण्याची शक्यता व्यक्त होत आहे. नाशिक, दिंडोरी, जळगाव, रावेर, धुळे, नंदुरबार, अहमदनगर, शिर्डी, पुणे, बारामती, शिरूर, मावळ या लोकसभा मतदारसंघासह विधानसभा मतदारसंघ पिंपरी चिंचवड व मावळची जबाबदारी राऊत यांच्यावर सोपविण्यात आली आहे.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज एका लग्न समारंभात अल्पवयीन मुलीशी झालेल्या ओळखीनंतर तिचे नको त्या अवस्थेतील फोटो काढून ते समाज माध्यमात व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर वेळोवेळी अत्याचार करणाऱ्या फोटोग्राफरविरुद्ध अहमदनगर मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नगर तालुक्यातील एका अल्पवयीन मुलीने दिलेल्या फिर्यादीनंतर पोलिसांनी महेश गोवर्धन कराळे (वय २३, रा. आगडगाव ता. नगर, हल्ली रा. नालेगाव, दिल्ली गेट) याच्याविरोधात विनयभंग, अत्याचार, पोक्सो आदी कलमान्वये गुरूवारी (दि. २३) रात्री तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. १४ डिसेंबर २०२२ रोजी पीडित मुलगी केडगाव येथे मावस भावाच्या लग्नासाठी गेली होती. त्यावेळी तिची तेथे फोटोग्राफीसाठी आलेल्या महेश कराळे सोबत तिची ओळख झाली होती. आरोपीने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच नगर, नाशिकच्या धरणांमधून जायकवाडीसाठी पाणी सोडण्यात आल्याने समन्यायी पाणी वाटप कायदा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. या पार्श्वभूमीवर संगमनेरमध्ये काँग्रेसने पाणी सोडण्याच्या निर्णयाला विरोध दाखवत आंदोलन केले. प्रवरा उपखोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे धरणातून जायकवाडीसाठी सोडण्यात आलेल्या पाण्याला स्थगिती देण्याची मागणी करीत आंदोलन करण्यात आले. थोरात कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, काँग्रेसचे शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस कार्यकर्ते व पदाधिकारी या आंदोलनात सहभागी झाले होते. का करावे लागले आंदोलन: अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरा खोऱ्यातील भंडारदरा व निळवंडे लाभ क्षेत्रामध्ये यावर्षी सरासरी आठ ते दहा इंचापेक्षा कमी पर्जन्यमान झाले असल्याने भीषण पाणीटंचाई…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज महाराष्ट्राला सुसंस्कृत राजकारणाची परंपरा आहे. वारकरी संप्रदायाने सर्व जाती व समाजांना एकत्र आणले. आता मात्र राजकारणाच्या नावावर समाज व जाती वेगळ्या केल्या जात आहे. राजकारणाचा सुवर्णकाळ अनुभवलेल्या महाराष्ट्रात सध्या आरोप-प्रत्यारोपांची होणारी चिखलफेक अत्यंत वाईट असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक रामदास फुटाणे यांनी केले. संगमनेरच्या अमृतवाहिनी शिक्षण संस्थेच्यावतीने यशवंतराव चव्हाण यांच्या ३९ व्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित अभिवादन व प्रकट मुलाखती दरम्यान फुटाणे बोलत होते. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, शेतकरी कवी भरत दौंडकर, ॲड. आर. बी. सोनवणे, तुळशीनाथ भोर, सुधाकर जोशी, विष्णुपंत रहाटळ, सिताराम वर्पे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, प्राचार्य…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नुकतेच जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्येक तालुक्यात छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्यात येईल अशी घोषणा केली आहे. या घोषणाचे स्वागत होत असतानाच संगमनेरमध्ये भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्याच्या मागणीने जोर धरला आहे. या पार्श्वभूमीवर एका शिष्टमंडळाने आमदार बाळासाहेब थोरात यांची भेट घेतली असून थोरात यांनी सकारात्मक भूमिका स्पष्ट केली आहे, अशी माहिती शिष्टमंडळाच्या वतीने देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा संदर्भात पालकमंत्र्यांनी केलेल्या घोषणेचे समस्त नागरिकांनी स्वागत केले. मात्र संगमनेर तालुक्याचा इतिहास आणि परंपरा वेगळ्या आहेत याचा संबंधितांना विसर पडल्याची टीका कार्यकर्ते करू लागले. या पार्श्वभूमीवर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यासंदर्भात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्यात मोठ्या तोडफोडीनंतर शिंदे-फडणवीस-पवार सरकार सत्तेत आले असले तरी लोकसभा निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट), भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्या वाट्याला जागा वाटपात किती जागा येणार यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत फॉर्मुलाच सांगितला. लोकसभा निवडणुका नेमक्या कधी होणार याबाबत अद्यापही स्पष्टता नसली तरी देखील राज्यात लोकसभा निवडणुकीत महायुती व महाविकास आघाडीमध्ये थेट सामना होण्याची चिन्हे आहेत. महायुती व महाविकास आघाडीमध्ये सामील असलेल्या घटक पक्षांच्या वाट्याला लोकसभेच्या किती जागा येणार? यावर नेहमी चर्चा सुरू असते. अशाच एका मुलाखतीमध्ये महायुतीच्या जागांबद्दल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केले आहे. फडणवीस यांनी या मुलाखतीत भारतीय…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदाची संधी असताना देखील आपण केवळ निळवंडे धरण पूर्ण करण्यासाठी पाटबंधारे राज्यमंत्रीपद मागून घेतले. त्यानंतर निळवंडे निर्मितीचा सर्व इतिहास समोर आहे. आता निळवंडेतून पाणी येत आहे. मात्र या कामासाठी ज्यांनी कष्ट केले, मदत केली, तो इतिहास आपण विसरून चालणार नाही, असे प्रतिपादन निळवंडे धरण व कालव्याचे निर्माते, जलनायक म्हणून ओळखले जाणारे आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले. संगमनेर तालुक्यातील लोहारे-मिरपुर येथे डाव्या कालव्याचे पाणी पूजन आमदार थोरात यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ, मिलिंद कानवडे, संपत गोडगे, प्रभाकर कांदळकर, प्रल्हाद मुर्तडक, कृती समितीचे उत्तमराव घोरपडे, गंगाधर गमे, विलास गुळवे,…

Read More

रविवार विशेष लेख @ प्रवीण पुरो आपणच संस्कृतीचे कसे पायिक आहोत, आपल्याहून संस्कृतीची अक्कल कोणालाच कशी नाही, याविषयी अक्कलेचे तारे तोडणारे भाजपचे नेते दोन दिवसांपासून जमिनीवर आलेले दिसतात. आपल्या प्रदेशाध्यक्षाच्या द्युत क्रीडेचे गोडवे गाऊ लागल्यापासून पक्षातल्या बोलबच्चन टग्यांची बोलती बंदी झालेली दिसते. आपण करत असलेल्या गुन्ह्यांवर पांघरूण घालण्यासाठी हे टगे कसलीही उदाहरण पुढे करायचे. मकाऊला पोहोचलेल्या आपल्या नेत्याच्या काळ्या कारनाम्याचं उत्तर देतानाही या मुर्खांनी आदित्य ठाकरेंपुढच्या भरलेल्या ग्लासचं उदाहरण देण्याचा निर्लज्जपणा केला आणि मकाऊच्या कॅसिनोतील जुगार झाकण्याचाही त्यांनी प्रयत्न केला. लाज विकलेलीच माणसं असले उद्योग करत असतात. आज भाजपचे नेते ते करत आहेत.  जगाला संस्कृतीचं ज्ञान शिकवणार्‍या या पक्षाच्या नेत्यांना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर: पहाटेच्या सुमारास धांदरफळ परिसरात बेकायदेशीर वाळूचे वाहतूक करणारी पिकअप मोठ्या प्रमाणात पाणी असलेल्या शंभर फूट खोल विहिरीमध्ये कोसळल्याने झालेल्या अपघातात चालकाचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त होत आहे. तर पिकअपमध्ये असलेले तिघे मजूर पाण्यातून वर येण्यात यशस्वी झाले. विहिरीत पडलेली पिकअप वर काढण्याचे प्रयत्न सुरू असून बेपत्ता असलेल्या चालकाचा देखील पाणबुडीच्या साह्याने शोध घेतला जात आहे. ‘अर्थ’कारणासाठी पाठलाग करणाऱ्या पोलिसांना चुकविण्याच्या प्रयत्नात बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्या पिकअपला हा अपघात झाल्याची चर्चा सुरू आहे. अशाच प्रकारे काही वर्षांपूर्वी पोलिसांकडून वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरचा पाठलाग सुरू असताना डंपर हिवरगाव पावसा शिवारात सुरू असलेल्या निळवंडे कालव्यात कोसळून तिघा मजुरांचा त्याखाली…

Read More