Author: अनंत पांगारकर
गुरुवार, दि. ११ एप्रिल माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे आणि कडवट शिवसैनिकांमधील वाद सध्या न्यायालयीन प्रक्रियेत अडकला आहे. त्यातच वाकचौरे यांनी पुन्हा मातोश्रीची दारे ठोठावत शिवसेनेची (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) उमेदवारी मिळविण्यात यश मिळविले. मात्र या न्यायालयीन लढ्यामुळे शिवसैनिक वाकचौरे यांच्या प्रचारापासून चार हात दूर होते. संगमनेरमध्ये पार पडलेल्या महाविकास आघाडीच्या मेळाव्यात या संदर्भातील खदखद समोर आल्यानंतर या सर्वांमध्ये मनोमिलन घडविण्यात यश आले आहे. शिवसेनेसोबत गद्दारी करत २०१४ मध्ये काँग्रेस कडून लोकसभेसाठी उमेदवारी करणाऱ्या माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांना तत्कालीन शिवसेना शहरप्रमुख अमर कतारी, भाऊसाहेब हासे यांच्यासह काही शिवसैनिकांनी त्यांना भर रस्त्यात जाब विचारण्याचा प्रकार घडला होता. त्यामुळे हा प्रकार पोलीस…
गुरुवार, दि. ११ एप्रिल सद्यस्थितीत सुरू असलेली लोकसभा निवडणूक प्रक्रिया, त्या अनुषंगाने लागू असलेली आचारसंहिता, या दरम्यान येणारे विविध सण उत्सव शांततेत पार पडावेत, आचार संहिता उल्लंगणाच्या दृष्टीने कोणताही गैरप्रकार होऊ नये यासाठी संगमनेर उपविभागात असलेल्या संगमनेर-अकोले तालुक्यातील विविध पोलीस ठाण्याच्या हद्दीतील २३ लोकांना संगमनेर अकोले तालुक्याच्या स्थळ सीमा हद्दीमध्ये प्रवेशास बंदी करण्यात आली आहे, अशी माहिती संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी दिली. संगमनेर शहर पोलीस ठाणे, संगमनेर तालुका पोलीस ठाणे, आश्वी पोलीस ठाणे, घारगाव पोलीस ठाणे, राजुर पोलीस ठाणे व अकोले पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ज्या व्यक्तींवर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत, त्याचप्रमाणे सामाजिक शांतता भंग करण्यासंबंधाने गुन्हे ज्या…
बुधवार, दि. १० एप्रिल अहमदनगर जिल्ह्यातील एका व्यापाऱ्याच्या वाहनातून ५१ लाख १६ हजाराची रक्कम नाकाबंदी दरम्यान पथकाने ताब्यात घेतली आहे. चौकशीनंतर या रकमे संदर्भात उलगडा होणार आहे. स्टीलचा व्यवसाय असलेल्या नगर जिल्ह्यातील व्यापाऱ्यावर पुणे जिल्ह्यातील शिरूरमध्ये ही कारवाई करण्यात आली. बुधवारी सकाळी ११ वाजण्याच्या दरम्यान नगर-पुणे मार्गावर शिरूर मध्ये नाकाबंदी सुरू होती. पोलीस निरीक्षक ज्योतीराम गुंजवटे आणि त्यांच्या पथकाने या व्यापाऱ्याचे वाहन नाकाबंदी दरम्यान थांबवत वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पथकाला ५१ लाख १६ हजाराची रोकड आढळून आली. पथकाने वाहनात आढळलेली रोख रक्कम ताब्यात घेत याची माहिती निवडणूक आयोग आणि आयकर विभागाला दिली. त्यानंतर ही सर्व रक्कम आयकर विभागाच्या ताब्यात…
बुधवार दि. १० एप्रिल एका सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यावरील हद्दपारीचा प्रस्ताव रद्द करण्यासाठी दीड लाख रुपयांची लाच स्वीकारताना सोमवारी (१ एप्रिल) एलसीबीचे पीआय दत्तात्रय शिंदे, पोलीस हवालदार अशोक पाटील आणि नितीन मोहने यांना लाच लुचपत विभागाने अटक केली होती. आता या पीआयच्या घरात लाच लुचपत विभागाला मोठे घबाड सापडले आहे. धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथील राजकीय व सामाजिक चळवळीत सक्रिय असलेल्या व्यक्ती विरोधात दाखल असलेल्या गुन्ह्यांसंदर्भात स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस हवालदार नितीन मोहने व पोलीस हवालदार अशोक पाटील यांनी या राजकीय कार्यकर्त्याची भेट घेत त्याच्यावर आतापर्यंत दाखल असलेल्या गुन्ह्यांची माहिती काढून तसेच लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोंडाईचा पोलीस स्टेशनकडून प्रस्ताव मागवून…
बुधवार, दि. १० एप्रिल – अहमदनगर जिल्ह्यासह राज्यभरात बहुचर्चित ठरलेल्या संपदा नागरी सहकारी पतसंस्थेच्या १३ कोटी ३८ लाख रुपयांच्या गैरव्यवहार प्रकरणात आरोप सिद्ध झाल्याने जिल्हा व सत्र न्यायालयाने वाफारे पती-पत्नीसह पाच जणांना जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. तर अन्य बारा जणांना वेगवेगळ्या कलमाखाली पाच ते दहा वर्षांची शिक्षा सुनावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. एन. नाईकवाडी यांनी बुधवारी दोषी ठरलेल्या आरोपींना शिक्षा ठोठावली. तत्कालीन संस्थापक चेअरमन ज्ञानदेव सबाजी वाफारे याच्यासह त्याची पत्नी सुजाता ज्ञानदेव वाफारे, रवींद्र विश्वनाथ शिंदे, संजय चंपालाल बोरा व साहेबराव रामचंद्र उर्फ बाळासाहेब भालेकर यांचा जन्मठेप झालेल्या गुन्हेगारात समावेश आहे. तर उर्वरित बारा संचालक गुन्हेगारांना न्यायालयाने पाच…
बुधवार, दि. १० एप्रिल नगर अर्बन बँकेच्या कर्ज फसवणूक प्रकरणात अटक केलेल्या संचालक, अधिकारी व कर्जदार यांच्या विरोधात आर्थिक गुन्हे शाखेने न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केल्याची माहिती उपाधीक्षक अमोल भारती यांनी दिली. संगमनेरचा बडा कर्जदार आरोपी व सध्या अटकेत असलेल्या अमित पंडित यांच्यासह दहा जणांचा यामध्ये समावेश आहे. सुमारे आठ हजार पानांच्या या दोषारोप पत्रात अटक केलेल्या आरोपींच्या गुन्ह्याचे पुरावे आर्थिक व्यवहाराची माहिती आणि फॉरेन्सिक अहवालाचा समावेश असल्याचे सांगण्यात आले. ९० दिवसांच्या मुदतीच्या आत हे दोषारोपपत्र न्यायालयात दाखल करण्यात आले आहे. नगर अर्बन बँकेचे माजी संचालक राजेंद्र गांधी यांच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात या कर्ज फसवणूक प्रकरणाचा गुन्हा दाखल झाला आहे.…
बुधवार दि. १० एप्रिल प्रशासनाने तीन वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या माती मिश्रीत वाळूच्या लिलावाचे पडसाद अद्यापही उमटत आहेत. या कालावधीत अनेक घडामोडी झाल्या. त्याचा प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष फटका बसल्याने त्रस्त झालेल्या युवा शेतकऱ्याने महसूल विभाग व पोलीसांकडे केलेल्या तक्रारीनंतर शेवटचा उपाय म्हणून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सोमनाथ वाघचौरे यांना निवेदनाद्वारे वाळू तस्करांपासून वाचवण्याचे साकडे घातले आहे. तीन वर्षांपूर्वी तालुक्यातील जोर्वे येथील प्रवरा नदीपात्रालगतच्या माती मिश्रीत वाळूचा लिलाव झाला होता. या वाळूच्या ठेकेदारांनी प्रवरा नदीपात्रालगत क्षेत्र असलेल्या दिगंबर काकड या युवा शेतकऱ्याला विनंती करुन रस्ता देण्याची तसेच, शेतातील पाईप लाईन काढून घेण्याची विनंती केली होती. त्या मोबदल्यात नुकसान भरपाई देण्याची…
मंगळवार दि. ९ एप्रिल पद्मश्री डॉ. विखे पाटील सहकारी साखर कारखान्याच्या झालेल्या टाकीच्या स्फोटातील अपघात प्रकरणी मृत कामगारांच्या नातेवाईकांना साठ लाखापेक्षा अधिक तर जखमी कामगारांना प्रत्येकी अडीच ते पाच लाख रुपयांची नुकसान भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने बजावले आहे. राहुरी तालुक्यातील तांभेरे येथील कुशाबापू रंगनाथ पवार व दादासाहेब कुशाबापू पवार यांनी विखे पाटील साखर कारखान्याने त्यांच्या शेतात परवानगी न घेता अवैधरित्या टाकलेल्या स्पेंट वॉशमुळे डाळिंब बागेला झालेल्या नुकसानी विरोधात महात्मा फुले कृषी विद्यापीठाकडे तक्रार केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने स्थापन करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय कमिटी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व साखर आयुक्त यांच्या अल्प कारवाईमुळे पवार यांना न्यायासाठी राष्ट्रीय हरित…
मंगळवार दि. ९ एप्रिल मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील वरिष्ठ व कनिष्ठ स्तर दिवानी न्यायाधीश, जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. या आदेशानुसार राज्यभरातील ६०० हून अधिक न्यायाधीशांच्या बदल्या करण्यात आल्या. यात संगमनेरमधील चार न्यायाधीशांचा समावेश आहे. एस. यु. महादार (मालेगाव, नाशिक), श्रीमती एस. एम. वाघमारे (को-ऑपरेटिव कोर्ट, सातारा), एम. एम. गांगुर्डे (साक्री, धुळे) व पी. डी. देवरे (कारंजा, वाशिम) यांचा बदली झालेल्या न्यायाधीशात समावेश आहे. तर कोल्हापूर येथून श्रीमती व्ही. पी. गायकवाड, फलटण (सातारा) येथून श्रीमती एस. बी. ढवळे व कराड (सातारा) श्रीमती यु. डी. जाधव हे न्यायाधीश संगमनेर न्यायालयात बदलून येत आहे. उच्च न्यायालयाने काढलेल्या आदेशात…
मंगळवार दि. ९ एप्रिल मंगळवारी शिवालयात झालेल्या महाविकास आघाडीच्या संयुक्त पत्रकार परिषदेत जागा वाटपाची अधिकृत घोषणा करण्यात आली. महाविकास आघाडीच्या पत्रकार परिषदेत ठाकरे गट २१ लोकसभा मतदार संघात निवडणूक लढवणार आहे. तर काँग्रेस पक्ष १७ लोकसभा मतदार संघात उमेदवार देणार आहे. शरदचंद्र पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १० लोकसभा मतदार संघातील जागा लढणार असल्याची घोषणा या पत्रकार परिषदेत एकत्रितपणे करण्यात आली. गेल्या काही दिवसांपासून सांगलीसह काही लोकसभा मतदारसंघातील सुरू असलेला वाद संपुष्टात आला आहे. सांगलीची जागा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेनाच लढणार असल्याचे शिक्कामोर्तब झाले. या पत्रकार परिषदेला उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे…
