Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – लोकसभा निवडणुकीआधी राज्यातील पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्याच्या गृह विभागाने राज्यातील ५८ वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढले आहे. नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षकपदी दत्तात्रय कराळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर विशेष पोलीस महानिरीक्षक बी. जी. शेखर यांची देखील बदली करण्यात आली असून त्यांना अद्याप नव्या नियुक्तीचे ठिकाण देण्यात आले नाही. याशिवाय श्रीरामपूरच्या अपर पोलीस अधीक्षक स्वाती भोर यांचीदेखील छत्रपती संभाजी नगरच्या लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी लातूर येथून वैभव कलुबर्मे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ठाण्याचे पोलीस सह आयुक्त असलेले व नाशिकच्या विशेष पोलीस महानिरीक्षक पदी नियुक्ती…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ज्यामध्ये विविध स्वरूपाची विविधता आहे. त्या विविधतेमध्ये देखील एकात्मता साधली गेली आहेत. रंग, वर्ण, भाषा, आचरण पद्धती यावरून भारतीय संस्कृती कोणाला विभागत नाही. देशात हजारो वर्षांपासून लोकशाही अस्तित्वात आहे. पूर्वी येथे राजाही लोकांमधून निवडला जायचा. लोकशाही या भूमीला नवीन नाही, असे प्रतिपादन केरळचे राज्यपाल आरिफ महंमद खान यांनी व्यक्त केले. चाणक्य मंडल परिवारातर्फे संगमनेर येथील गटविकास अधिकारी अनिल नागणे यांचे “प्राचीन व मध्ययुगीन भारताचा इतिहास” व भूषण केळकर संपादित ‘यशोगाथा’ या पुस्तकांचे प्रकाशन खान यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पूर्णा धर्माधिकारी, अनिल नागणे, भूषण केळकर, उपस्थित होते. माजी आयएएस अधिकारी व संचालक अविनाश धर्माधिकारी अध्यक्षस्थानी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – ऊस वाहतूक करणाऱ्या मालट्रकचा वीजवाहक तारेला स्पर्श झाल्याने संपूर्ण मालट्रकमध्ये विद्युत प्रवाह उतरल्याने झालेल्या अपघातात मालट्रकने पेट घेतला. यात वाहन चालकाचा विजेच्या प्रवाहाने मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना संगमनेर तालुक्यातील खांबा-वरवंडी शिवारामध्ये बुधवारी (ता. ३१ डिसेंबर) दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास घडली. संतोष राणू मोटे असे अपघातात मृत झालेल्या ट्रक चालकाचे नाव आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. संतोष मोटे हा मालट्रक चालक आपल्या ट्रकमध्ये राहुरी तालुक्यातील म्हैसगाव येथून ऊस घेऊन संगमनेरच्या दिशेने येत होता. खांबे शिवारामध्ये रस्त्यावरून आडव्या गेलेल्या वीज वाहक तारेला ट्रकमधील उसाचा स्पर्श झाल्याने या तारेतील वीज प्रवाह संपूर्ण मालट्रकमध्ये उतरला.…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान संगमनेरमध्ये सादर होत आहे. जाणता राजा मैदानावर होणाऱ्या या महानाट्याची तयारी अंतिम टप्प्यात असून माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी या तयारीची पाहणी करत आढावा घेतला. आमदार थोरात यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून संगमनेरकरांसाठी मोफत प्रयोग असलेल्या या महानाट्याची उत्सुकता ताणली गेली आहे. चार दिवस दररोज सायंकाळी ६ वाजता या महानाट्याचे प्रयोग होणार आहे. यासाठी संगमनेर शहर आणि तालुक्यातील नागरिकांना मोफत पास वाटप देखील सुरू आहे. थोरात दरवर्षी साध्या पद्धतीने आपला वाढदिवस साजरा करत असतात. यावर्षी मात्र कार्यकर्त्यांनी पुढाकार…
महाराष्ट्र संवाद न्यूज पुणे: राधाकृष्ण विखे पाटील सहकारी ट्रक वाहतूक संस्थेच्या पेट्रोल पंपावर १० हजारांची लाच घेताना पकडलेल्या वजन मापे निरीक्षकाच्या पुण्यातील घरात तब्बल २८ लाख ५० हजार रुपयांची रोकड सापडली आहे. अशोक श्रीपती गायकवाड (वय ५२, रा. वैध मापनशास्त्र, श्रीरामपूर) असे या निरीक्षकाचे नाव आहे. गायकवाड याने राज्य मंत्रिमंडळातील वजनदार मंत्री असलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अधिपत्याखाली असलेल्या प्रवरानगर येथील राधाकृष्ण विखे पाटील सहकारी संस्थेच्या पेट्रोल पंपाची वार्षिक तपासणी करुन स्टॅम्पिंग प्रमाणपत्र देण्यासाठी १२ हजार रुपयांची लाच मागितली होती. त्यानंतर लाच लुचपतच्या नगर विभागाच्या अधिकाऱ्यांनी सापळा रचून १० हजार रुपयांची लाच घेताना गायकवाड याला पकडले होते. त्यानंतर…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई – कोपर्डी प्रकरणातील पीडित मुलीच्या वडिलांनी उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची भेट घेत त्यांना सदर घटनेच्या केसच्या सद्यस्थितीबाबत व केसमधील प्रलंबित विषयाबाबत माहिती दिली. तसेच कुळधरण ग्रामपंचायत पोलीस पाटील समीर पाटील यांनी गावातील विविध विकासकामांबाबतचे निवेदन उपसभापती डॉ. गोऱ्हे यांना दिले. यावेळी डॉ. गोऱ्हे यांनी सदर केसच्यामध्ये शासनस्तरावर पाठपुरावा केला जाईल असे त्यांना सांगितले. तसेच या प्रकरणाची सद्यस्थिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचेकडे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. कुळधरण ग्रामपंचायत विकासासाठी सहकार्य केले जाईल असे डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले.
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – समाजकल्याण विभागाच्या माध्यमातून संगमनेर तालुक्यातील १२८ लाभार्थ्यांना ९ लाख ८३ हजार रुपयांचे साहित्य महसूल तथा पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर झाल्याची माहिती संजय गांधी निराधार योजनेचे अध्यक्ष अमोल खताळ पाटील यांनी दिली. या साहित्यामध्ये कडबा कुट्टी, पीठ गिरणी, लेडीज सायकलींचा समावेश आहे. सरकारच्यावतीने विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी ग्रामीण भागातील गरजवंतांना योजनेचा लाभ व्हावा, यासाठी मंत्री विखे यांच्या माध्यमातून संगमनेरमध्ये भारतीय जनता पार्टीच्यावतीने काम सुरु आहे. पंचायत समिती व जिल्हा परिषद कार्यकाल संपलेला असल्यामुळे समाजकल्याण विभागाच्यावतीने सुरु असलेल्या योजनेचा लाभ मिळतो की नाही, अशी शंका काहींनी व्यक्त केली होती. भारतीय जनता…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – खंडणीसाठी राहुरीतील वकील दांपत्याचे अपहरण करून निघून खून केल्याप्रकरणी संगमनेर मधील वकिलांनी या घटनेचा कामकाज बंद ठेवत तसेच प्रांताधिकार्यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे. वकील संरक्षण कायदा तातडीने संमत करण्याची मागणी दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. राहुरी शहरातून बेपत्ता झालेल्या जयवंत राजाराम आढाव (वय ५२ वर्ष) व मनीषा राजाराम आढाव (वय ४२ वर्ष, दोघे रा. मानोरी, ता. राहुरी जि. अहमदनगर) या वकील दांपत्याचा पाच लाखाच्या खंडणीसाठी खून करण्यात आल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. या संदर्भात वकिलाच्याच पक्षकारासह चौघांना पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून एक आरोपी अद्यापही फरार आहे. वकील दांपत्याच्या खुनाच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज राहुरी कृषी विद्यापीठ – २०४७ चा विकसित भारत घडविण्याचे स्वप्न कृषी विद्यापीठांच्या प्रयत्नातून या विद्यापीठांमधून पदवी घेतलेले कृषी पदवीधर आपल्या ज्ञान व कौशल्याने साकारतील, असा विश्वास राज्याचे राज्यपाल तथा महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलपती रमेश बैस यांनी व्यक्त केला. राहुरी कृषी विद्यापीठाच्या ३७ व्या पदवी प्रदान समारंभात स्नातकांसह जिल्ह्याचे पालकमंत्री त्याचा राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, राजेंद्र बारवाले आणि विलास शिंदे यांना कृषी विद्यापीठाची डॉक्टर ऑफ सायन्स या मानद पदवीने सन्मानित करण्यात आले. यावेळी राज्यपाल दूरदृश्य प्रणाली द्वारे बोलत होते. यावेळी मंत्री विखे यांच्यासह ट्रस्ट फॉर अॅडव्हान्समेंट ऑफ अॅग्रीकल्चरल सायन्सेसचे (टास) अध्यक्ष, भारत सरकारच्या कृषि संशोधन…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर – काँग्रेसचे विधिमंडळ पक्षनेते माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त ४ ते ७ फेब्रुवारी दरम्यान दररोज खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची प्रमुख भूमिका असलेले “शिवपुत्र संभाजी” हे महानाट्य संगमनेरकरांना बघावयास मिळणार आहे. येथील जाणता राजा मैदानावर दररोज संध्याकाळी सहा वाजता या महानाट्याचे प्रयोग होणार असून या महानाट्याचे प्रयोग संगमनेरकरांना मोफत बघावयास मिळणार आहे. या महानाट्याची जाणता राजा मैदानावर जय्यत तयारी सुरू आहे. या भव्य दिव्य महानाट्यात खासदार डॉ. अमोल कोल्हे हे संभाजी महाराजांच्या मुख्य भूमिकेत असून महाराणी येसूबाईच्या भूमिकेत स्नेहलता वसईकर, अनाजी पंतांच्या भूमिकेत महेश कोकाटे, कवी कलशांच्या भूमिकेत अजय तपकिरे, सेनापती हंबीररावच्या भूमिकेत रमेश…
