Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : सर्वधर्म समभावाचा विचार जोपासत देशाच्या एकात्मतेसाठी अखंडपणे कार्य करणाऱ्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेस काँग्रेस पक्षाची अहमदनगर जिल्हा कार्यकारणी प्रांताध्यक्ष नाना पटोले व विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जाहीर झाली असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष राजेंद्र नागवडे यांनी दिली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या या कार्यकारिणीमध्ये सचिन गुजर (वरिष्ठ उपाध्यक्ष), प्रशांत दरेकर, ॲड. कैलास शेवाळे, डॉ. एकनाथ गोंदकर, प्रा. हिरालाल पगडाल, मधुकरराव नवले, अजय फटांगरे, अंकुश कानडे, राकेश पाचपुते, बाबासाहेब दिघे, ज्ञानेश्वर मुरकुटे, संपतराव मस्के, कारलोस साठे, दादा पाटील वाकचौरे, बापूसाहेब काळदाते, बाबासाहेब कांदळकर, मिनानाथ पांडे, प्रकाश भोसले, श्रीनिवास बिहानी, बाबासाहेब गुंजाळ, लताताई डांगे, सचिन गायकवाड व रोहिदास…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज मुंबई : या राज्याचा एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे, असं विधान मराठा आरक्षणासाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी केल्यानंतर एक फूल आणि दोन हाफ हेच काडीखोर आहेत. यांनीच महाराष्ट्र पेटवला आहे. यांनाच महाराष्ट्र पेटलेला हवाय. यांनीच राज्यातील सर्व प्रश्नांवरून लक्ष हटवण्यासाठी हा प्रश्न चिघळत ठेवलेला आहे, असं टीकास्त्र शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री, आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांवर सोडले आहे. राऊत म्हणाले, मरठा आरक्षणाचा मुद्दा या सत्ताधाऱ्यांनीच चिघळत ठेवला आहे. कारण, त्यांना इतर मुद्यांवरून लक्ष भरकटवायचं आहे. त्यामुळे जरांगे पाटील म्हणाले की, एक उपमुख्यमंत्री काडीखोर आहे तर तसं नाही, एक फुल आणि दोन हाफ हे सगळेच काडीखोर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज  संगमनेर – अहमदनगर येथे पार पडलेल्या जिल्हास्तरीय स्केटिंग स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलने उत्कृष्ट कामगिरी करताना तीन सुवर्ण पदकांसह सहा पदके मिळवली. जिल्हा क्रीडा कार्यालयाने आयोजित केलेली ही स्पर्धा भिंगार येथील प्रियदर्शनी पब्लिक स्कूलमध्ये पार पडली. अकरा वर्षांखालील मुलांच्या गटात सर्वेश जाधव याने सुवर्ण तर चौदा वर्षांखालील गटात सोहम मेहेर याने रौप्यपदक मिळवले. सतरा वर्षांखाली मुलींच्या गटात गुंजन जोशीने सुवर्ण आणि तनिष्का वर्पेने रौप्य पदकाची कमाई केली. तर, 19 वर्षांखालील गटात सर्वदा बाणखेलेने सुवर्ण व आविश्री इंदाणीने रौप्य पदक मिळवले. या संपूर्ण स्पर्धेत ध्रुव ग्लोबलच्या स्केटिंग खेळाडूंनी तीन सुवर्ण व तीन रौप्यसह एकूण सहा पदकांची कमाई केली.…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज राहाता – खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांचे शंभर टक्के नुकसान झालेले असताना देखील शासनाने काढलेल्या सन २०२३ च्या खरिप हंगामातील दुष्काळ मुल्यांकनातील शासन निर्णयात अहमदनगर जिल्ह्याचा समावेश करण्यात आलेला नसल्याने हे जिल्हाच्या पालकमंत्र्याचे अपयश नाही का? असा सवाल कृषीभुषण प्रभादेवी जनार्दन घोगरे यांनी उपस्थित केला आहे. दुष्काळी परिस्थितीचा अहमदनगर जिल्ह्याला देखील मोठा फटका बसलेला असताना शासन निर्णयात अहमदनगरचा समावेश करण्यात आलेला नाही. शेतकऱ्यांच्या खरीपाच्या सोयाबीन, बाजरी या पिकांच्या सोंगण्या करुन खळे झालेली आहे. त्यातुन मिळालेले उत्पन्न पाहता येथील शेतकरी शंभर टक्के पिकविम्याचा परताव्याला पात्र आहेत. खरीप हंगामात शेतकर्‍यांनी घेतलेले सोयाबीन, बाजरी ही हलक्या मुरमाठ जमीनीवर घेतलेली पिके पावसाआभावी पुर्णपणे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज अहमदनगर : फटाक्याच्या स्टॉलसाठी आवश्यक असलेली परवानगी देण्याकरिता 800 रुपयांची लाच घेणाऱ्या संगमनेर शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षकाला लाचलुचपत विभागाने पकडल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. अहमदनगरच्या लाचलुचपत विभागाने पोलीस उपनिरीक्षक बाळासाहेब यादव यांच्यावर ही कारवाई केली. दीपावली सणानिमित्त निंबाळे गावी फटाका स्टॉलसाठी संगमनेर शहर पोलीस स्टेशनच्या ना हरकत दाखल्याची आवश्यकता होती. आवश्यक असलेली ना हरकत परवानगी देण्यासाठी यादव यांनी तक्रारदाराकडे एक हजार रुपयांची मागणी केली असल्याचे तक्रारदाराचे म्हणणे आहे. यासंदर्भात संगमनेर तालुक्यातील निंबाळे येथील एका 20 वर्षीय तरुणाने अहमदनगरच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे मंगळवारी (31 ऑक्टोंबर) तक्रार केली होती. लाच लूचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक प्रवीणचंद्र लोखंडे यांच्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेले मनोज जरांगे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी युवकांना आत्महत्या करू नका अशी कळकळीची विनंती करून देखील राज्यात आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू असलेले आत्महत्येचे लोन आता संगमनेरपर्यंत येऊन धडकले आहे. आंदोलकांना भेटण्यासाठी आलेल्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना “विखे पाटील परत जा, परत जा” या आंदोलकांच्या निदर्शनाचा सामना करावा लागल्यानंतर आता संगमनेरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी तरुणाने आत्महत्या करण्याचा प्रकार समोर आला आहे. संगमनेर तालुक्यातील झोळे गावामध्ये सागर भाऊसाहेब वाळे (वय 25 वर्ष) या तरुणाने गळफास घेऊन मंगळवारी (31 सप्टेंबर) पहाटे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सागर वाळे याने घराच्या मागे असलेल्या…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : हजारो शेतकऱ्यांच्या अन्नाशी निगडित असलेल्या आणि संगमनेरची कामधेनु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ गुरुवारी (ता. २ नोव्हेंबर) सकाळी १० वाजता काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री, आमदार बाळासाहेब थोरात व त्यांच्या पत्नी कांचनताई यांच्या हस्ते तर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या प्रमुख उपस्थितीत होत असल्याची माहिती देण्यात आली. कारखान्याचे अध्यक्ष बाबा ओहोळ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी असतील. माजी मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कार्यरत असलेला सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखाना ऊस उत्पादक शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव देणारा अग्रगण्य कारखाना म्हणून ओळखला जातो. दिवंगत नेते भाऊसाहेब थोरात यांची…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : बंद घराचा कडीकोंडा तोडून आत प्रवेश करत पाच तोळे सोन्याचे दागिने लंपास करणाऱ्या दागिने चोरास पोलीस उपाधीक्षक व शहर पोलिसांच्या पथकाने पकडले आहे. पकडलेल्या आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून या गुन्ह्यामध्ये एका अल्पवयीन आरोपीसह एका महिलेचा समावेश असल्याचे निष्पन्न झाले आहे. तसेच पकडलेल्या आरोपीकडून आणखी काही गुन्हे समोर आले असल्याची माहिती देण्यात आली आहे. इम्रान चाँद शेख (वय 29 वर्षे, मुळ रा. एकतानगर, संगमनेर, ता. संगमनेर हल्ली रा. गल्ली नं 1, रमजानपुरा, ता. मालेगाव जि. नाशिक) असे पोलिसांनी पकडलेल्या आरोपीचे नाव आहे. या आरोपीसोबत पोलिसांनी त्याच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेवुन केलेल्या सखोल चौकशीत त्यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे उपोषणास बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ संगमनेरमध्ये सुरू असल्यास साखळी उपोषणास काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट देऊन पाठिंबा दिला असून सरकारने तातडीने आरक्षण द्यावे अशी मागणी त्यांनी केली आहे. संगमनेर बस स्थानक येथे सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षण मागणीच्या साखळी उपोषणास रविवारी आमदार बाळासाहेब थोरात यांनी भेट दिली. यावेळी समवेत नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, सुरेश थोरात, निखिल पापडेजा, लाला बेपारी, दत्ता जोंधळे यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यभरात मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाच्या समर्थनार्थ साखळी उपोषण सुरू…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर : संगमनेरमध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने सुरू असलेल्या साखळी उपोषणाला भेट देण्यासाठी आलेल्या राज्याच्या महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना काही आंदोलकांच्या घोषणांना सामोरे जावे लागले. “विखे पाटील परत जा, परत जा”, “एक मराठा लाख मराठा” अशा घोषणांनी विरोध करणाऱ्या आंदोलक कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. मराठा समाजाला आरक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सुरू केले आहे. जरांगे पाटलांच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरात विविध ठिकाणी साखळी आंदोलने उपोषणे सुरू आहे. राज्यभरातून त्यांच्या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळताना दिसत आहे. त्यांच्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून संगमनेरमध्ये देखील बस स्थानकाच्या प्रवेशद्वारात बाहेर मराठा समाजाने साखळी उपोषण सुरू…

Read More