Author: अनंत पांगारकर
सहाय्यक पोलीस निरीक्षक बन्सी कांबळे, ‘आधार’ सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल शिंदे, सामाजिक कार्यकर्ते संतोष गोसावी, शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे प्रसिद्धी प्रमुख राजाभाऊ भिलारे, मनेश भालेकर, संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे, तहसीलदार अमोल निकम तसेच राजेन्द्र वाकचौरे व मित्रपरिवारामुळे अजय प्रेमानंद कोल्हे, रा. संगमनेर, जि. अहमदनगर या आजोबांच्या राहण्याचा व उपचारांचा प्रश्न लागला मार्गी लागला महाराष्ट्र संवाद न्यूज अजय प्रेमानंद कोल्हे वय 52 हे ‘अर्धांगवायू’ या जीवघेण्या आजाराने पीडित आजोबा… अनेक वेदना अन यातनांनी निकामी झालेले बरेच अवयव… अशातच मायेच्या माणसांनीच दुरावा धरल्याने आलेले असहाय एकाकीपण, यामुळे जगण्याची आशा अन मार्ग अंधुक झालेल्या या आजोबांना युवकांच्या प्रयत्नांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज लातूर येथे झालेल्या महाराष्ट्र युथ सॉफ्टबॉल स्पर्धेत अहमदनगर जिल्ह्याचे नेतृत्व करणाऱ्या संगमनेर महाविद्यालयाच्या खेळाडूंनी अजिंक्यपद मिळवत सुवर्णपदकावर मोहर उमटविली. संघात आजी-माजी खेळाडूंचा सहभाग होता. अंतिम सामन्यात बलाढ्य ठरलेल्या जळगाव मनपा संघासोबत झालेल्या चुरशीच्या सामन्यामध्ये ८-४ च्या धाव संख्येने मोठा विजय मिळविला. अजिंक्यपद मिळविणाऱ्या या मुलांच्या संघात पवन गुंजाळ, आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, वैभव मुठे, स्वप्निल पथवे, सौरभ कानवडे, साईराज परचंडे, निखिल शिंदे, वैभव नेहे, गणेश साबळे, हनुमंता शिंदे, युवराज गुरव यांचा समावेश होता. पवन गुंजाळ याने पिचरची महत्त्वाची भूमिका पार पाडत प्रतिस्पर्धी संघाचे १५ गडी बाद केले तर बॅटिंग करताना आकाश कातोरे, अभिषेक सोनवणे, साईराज परचंडे यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज संगमनेर तालुका कार्यक्षेत्र असलेल्या सह्याद्री बहुजन विद्या प्रसारक संस्थेतील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सह्याद्री पतसंस्थेला ३१ मार्च अखेरीस १ कोटी १९ लाख रुपयांचा नफा झाल्याची माहिती सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष प्रा. गणेश गुंजाळ यांनी दिली. ३१ मार्च २०२३ अखेर संस्थेकडे ३० कोटी ३४ लाख रुपयांच्या ठेवी आहेत. संस्थेने २७ कोटी २४ लाख रुपयांचे सभासदांना कर्ज वाटप केले आहे. संस्थेचा राखीव निधी ६ कोटी ४९ लाख तर संस्थेचा स्वनिधी १ कोटी ३५ लाख रुपये आहे. संस्थेचे भाग भांडवल ७ कोटी ४१ लाख आहे. संस्थेची २० कोटी ११ लाख रुपये गुंतवणूक असून ३१ मार्च अखेर १ कोटी १९ लाख रुपये…
महाराष्ट्र संवाद न्यूज वर्ल्ड क्रिएटिव्हिटी फोरमच्यावतीने भारतीय हिंदी कवयित्री, कादंबरीकार मनीषा खटाटे यांच्या ‘मरुस्थल’ या काव्यसंग्रहावर नेपाळमधील नेपाळगंज शहरात समीक्षात्मक चर्चेचे आयोजन करण्यात आले होते. तत्वज्ञानात्मक परिभाषेत हिंदी साहित्यात एका स्त्रीने लिहिलेले हे पहिले आणि रांगेय राघवच्या ‘मेधावी’नंतरचे हे दुसरे खंडकाव्य आहे. एप्रिलच्या प्रारंभी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी मरुस्थळच्या मुखपृष्ठाचे प्रकाशन देखील भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लेखक डॉ. अमर गिरी, नेपाळ भाषा आयोगाचे सदस्य, कवी, लघुकथा लेखक गोपाळ अश्क यांनी केले. यावेळी नेपाळचे ज्येष्ठ साहित्यिक सनत रेग्मी, डॉ. राजेंद्र खटाटे उपस्थित होते. मराठी भाषिक हिंदी स्री साहित्यिकास नेपाळमध्ये असा सन्मान मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. या कार्यक्रमामुळे भारतीय साहित्य…
महाराष्ट्र संवाद न्यूज मुलाने गायांचा चारा कापण्याचे मशीन विकण्यास विरोध केला, शेत जमीन दुसऱ्याच्या नावे केल्याने विकता येत नाही, या कारणावरून वडिलांनी मुलाचा खून केल्याच्या आरोपातून संगमनेर न्यायालयाने वडिलांची निर्दोष मुक्तता केली आहे. दत्तात्रय रामचंद्र हुलवळे (रा. वडगाव पान, ता. संगमनेर) असे न्यायालयाने निर्दोष मुक्तता केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात या संदर्भात दत्तात्रय रामचंद्र हुलवळे यांच्या विरोधात त्यांचा मुलगा प्रवीण दत्तात्रय हुलवळे याने दिलेल्या तक्रारीवरून भाऊ अंकुश याचा खून केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. १० जून २०१९ रोजी वडगाव पान येथे दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असल्याचे तक्रारीत म्हटले होते. फिर्यादीनुसार अधिक माहिती अशी,…
महाराष्ट्र संवाद न्यूज गीता परिवार संचालित संस्कार बालभवनमध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी समर्थ रामदास स्वामींनी स्थापन केलेल्या विविध ठिकाणच्या अकरा मारुतींच्या वेशभूषा करुन मुलांनी उपस्थितांना शिवकाळाचे दर्शन घडवले. बालभवनमध्ये जमलेल्या पालक व नागरीकांच्या उपस्थितीत हनुमानरुपी बालकांचे यावेळी पूजन करण्यात आले. मारुती स्तोत्र आणि हनुमान चालीसाच्या पठणानंतर बजरंग बली की जयच्या घोषाने वातावरण दुमदुमून गेले होते. हनुमान जयंती निमित्ताने गीता परिवाराच्या संस्कार बालभवनमधील सर्व मुलांना महाबली हनुमानाच्या तर मुलींना अंजनी मातेच्या वेशभूषेत बोलावण्यात आले होते. यावर्षी शिवकाळात समर्थ रामदास स्वामींनी राज्याच्या कानाकोपर्यात स्थापन केलेल्या विविध अकरा मारुतींच्या वेशभूषा बालकांनी साकारल्या होत्या. यात चाफळ येथील विरप्रताप मारुती, शिंगणवाडी येथील…
महाराष्ट्र संवाद न्यूज शिर्डी: राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीला वित्त विभागाची मान्यता मिळाली आहे. राज्यातील कोतवालांचे मानधन आता ७ हजार ५०० वरून १५ हजार होणार असल्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीबाबत उपमुख्यमंत्री तथा वित्तमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ९ मार्च २०२३ रोजी राज्याचा सन २०२३-२४ अर्थसंकल्प सादर करतांना अर्थसंकल्पीय भाषणाच्यावेळी केलेल्या घोषणेप्रमाणे राज्यातील कोतवालांच्या मानधनवाढीच्या सादर केलेल्या प्रस्तावास मंत्रिमंडळाने १७ मार्च, २०२३ च्या बैठकीत मान्यता दिलेली आहे. त्यानुसार सध्या सेवा कालावधीनुसार कोतवालांना मिळत असलेले मानधन ७ हजार ५०० रुपयावरून १५ हजार करण्यात येणार आहे. राज्यातील सर्व १२,७९३ कोतवालांना यापुढे दरमहा सरसकट १५ हजार इतके मानधन लागू करण्यात आले…
महाराष्ट्र संवाद न्यूज चारित्र्याचा संशय घेत पत्नीच्या डोक्यात पाटा टाकून तिचा खून केल्याप्रकरणी पतीस संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाने जन्मठेप आणि दहा हजार रुपये दंड द्रव्याची शिक्षा ठोठावली आहे. प्रकाश नामदेव धांडे, वय 36 वर्ष, रा. आंबेवंगण, ता. अकोले, जि. अहमदनगर असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नांव आहे. संगमनेर तालुक्यातील जवळे बाळेश्वर येथे 12 नोव्हेंबर 2018 रोजी खुनाचा हा प्रकार घडला होता. आरोपी प्रकाश धांडे यांच्यावर पत्नी शांता हिच्या खुनाचा आरोप होता. या संदर्भात घारगाव (ता. संगमनेर) पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात मृत शांता धांडे हिच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. शांता हिचा मामेखेल येथील एका व्यक्तीशी…
महाराष्ट्र संवाद न्यूज अनैतिक संबंधाचा जाब विचारण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला वकिलाला गळा दाबून, मारहाण करीत जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना संगमनेर शहरालगतच्या घुलेवाडी गावामध्ये मंगळवारी अहिंसेचा संदेश देणाऱ्या महावीर जयंती दिनी घडली आहे. या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित वकील महिला जिल्ह्यातील एका न्यायालयात वकिली करत आहे. या महिलेच्या पतीचे बाहेर अनैतिक संबंध आहेत, ही बाब त्यांना माहीत झाल्यानंतर त्यांनी या संदर्भात पतीला समजावून सांगण्यासाठी आपल्या सासूला सांगितले होते. महावीर जयंतीदिनी 4 एप्रिल ला संबंधित महिला आपल्या घरी असताना सकाळी साडेदहा वाजण्याच्या सुमारास या महिलेच्या सासूने तिच्या पतीस आणि महिलेचा पती असलेल्या मुलास…
महाराष्ट्र संवाद न्यूज □ अनंत पांगारकर ऐतिहासिक असलेल्या संगमनेरच्या हनुमान रथोत्सव मिरवणूक गेल्या वर्षी एका वेगळ्याच वादात सापडल्यानंतर यावर्षी मात्र पोलीस प्रशासनाचा मानाचा ध्वज वाजत गाजत आणत तो रथावर फडकाविण्याचा मान शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांनी कायम ठेवला. गतवर्षी निर्माण झालेल्या वादामुळे हा ध्वज आणण्याचा मान पोलीस निरीक्षकांऐवजी इतिहासात पहिल्यांदाच महिला पोलीस उपनिरीक्षकाला मिळाला होता. संगमनेरच्या हनुमान जन्मोत्सव आणि त्यानिमित्ताने निघणाऱ्या रथ मिरवणुकीला एक वेगळी परंपरा लाभली आहे. कोरोना संकटानंतर गतवर्षी संगमनेरात हनुमान जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला होता. केंद्रीय राज्यमंत्री भारती पवार भाजपच्या नेत्या चित्रा वाघ जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष शालिनीताई विखे पाटील तत्कालीन नगराध्यक्ष…
