Author: अनंत पांगारकर

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले जलजीवन मिशन हे एक क्रांतीकारी पाऊल असून तालुक्यात या योजनेसाठी ७५१ कोटी रूपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. अशी माहिती राज्याचे महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज येथे दिली. जलजीवन मिशन अंतर्गत आश्वी बुद्रुक येथील सुमारे १ कोटी ९९ लाख रुपयांच्या पाणी पुरवठा योजनेचा शुभारंभ महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. जेष्ठ नेते शाळीग्राम होडगर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास कैलास तांबे, भगवानराव इलग, पोपटराव वाणी, दिनकर गायकवाड, मच्छिंद्र थेटे, रोहीणी निघुते, कांचन मांढरे, गुलाबराव…

Read More

अनंत पांगारकर | महाराष्ट्र संवाद न्यूज सत्यजित तांबेंची बंडखोरी, तांबे भाजपच्या वाटेवर आदी प्रकारच्या अनेक बातम्यांनी गेल्या महिनाभरातील वातावरण ढवळून निघाल्यानंतर नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी शनिवारी आपली भूमिका जाहीर केल्यानंतर पक्षांतर्गत वादाचा माध्यमांनी फुगवलेला फुगा अखेरीस फुटला आहे. पत्रकार परिषदेत तांबे यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह पक्षातील नेत्यांवर टीका करत थोरात तांबे परिवारा विरोधात पक्षातूनच षडयंत्र रचल्याचे सांगत आपण अपक्ष म्हणून यापुढे काम करणार असल्याचे स्पष्ट केले. नाशिक पदवीधर मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार सत्यजित तांबे यांनी अखेरीस शनिवारी सर्वच राजकीय घडामोडींवर शनिवारी आपली भूमिका स्पष्ट करत सर्वच वादांवर पडदा टाकला आहे. तांबे यांनी स्पष्ट केलेल्या भूमिकेमुळे ते भाजप…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर निवडणुकीत निवडून आलेल्या सत्यजित तांबे यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार शुभांगी पाटील यांनी शनिवारी अधिकृतरित्या शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला आहे. याचबरोबर त्यांनी आपला धरणे आंदोलन करण्याचा निर्णय कायम ठेवला आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघात सत्यजित तांबे यांनी अपक्ष उमेदवारी केल्यानंतर शिवसेनेने पाटील यांना पाठिंबा दर्शविला होता. त्यानंतर त्यांना महाविकास आघाडीने आपला पाठिंबा जाहीर केला. तांबे यांच्या विरोधात कडवे झुंज देताना पाटील यांनी या मतदारसंघात सुमारे 40 हजार मते मिळविली. काही दिवसांपूर्वी भाजपमध्ये गेलेल्या पाटील यांना भाजपने नाशिक पदवीधर मतदारसंघात उमेदवारी नाकारल्यानंतर त्यांनी मातोश्रीचे दरवाजे ठोठावत शिवसेनेचा पाठिंबा मिळविला होता. निवडणुकीतील पराभवानंतर त्यांनी मातोश्रीवर जात उद्धव ठाकरे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क संगमनेरमध्ये गुन्हेगारीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली असून चोऱ्या, घरफोड्या, हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुन्हेगारीचा बिमोड करण्यात पोलीस यंत्रणा अपयशी ठरल्याने नागरिकात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याकडे संगमनेर व्यापारी असोसिएशनने पोलीस प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. संगमनेरचे प्रभारी पोलीस उपअधीक्षक संजय सातव यांना या पार्श्वभूमीवर निवेदन देण्यात आले आहे. गेल्या काही दिवसात स्थानिक पोलिसांचा गुन्हेगारांवरील वचक संपला असून गुन्हेगारांनी संगमनेरात आपले हातपाय पसरले आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात घडलेल्या खून प्रकरणाचा आणि त्या पाठोपाठ शहरात व परिसरात झालेल्या दरोडेच्या घटना चोऱ्या यांची उकल करण्यात पोलीस अयशस्वी ठरले आहेत. वाढत्या गुन्हेगारीमुळे हैराण झालेल्या संगमनेरकरांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क रात्रीच्या वेळी घराच्या पडवीमध्ये जेवण करत असताना घराचे छत अंगावर पडल्याने चुलत्याचा व पुतणीचा मृत्यू झाला आहे. याशिवाय वृद्ध महिला गंभीर जखमी झाले असून तिच्यावर रुग्णालयात उच्चार सुरू असल्याची माहिती देण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या दरम्यान ही दुर्दैवी घटना घडली. लक्ष्मण चंद्रभान सोनवणे (वय 42 वर्ष) व सानिका एकनाथ सोनवणे (वय 8 वर्ष) असे मृत झालेल्या चुलत्या-पुतणीचे नाव आहे. तर मृत लक्ष्मण सोनवणे यांची आई वैजयंतीबाई चंद्रकांत सोनवणे (वय 65 वर्ष) या जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.वेल्हाळे येथे शुक्रवारी रात्री सोनवणे कुटुंबीय आपल्या बंगल्याशेजारी असलेल्या पत्र्याच्या पडवीमध्ये रात्री जेवण…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नाशिक पदवीधर मतदारसंघातून महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा मोठ्या मताधिक्याने पराभव करत सत्यजीत तांबे विजयी झाले आहेत. कॉग्रेसकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. विजयानंतर त्यांची पुढील वाटचाल कशी असेल याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू असतांनाच एकीकडे भारतीय जनता पक्षाने त्यांना थेट पक्षात येण्याची ऑफर दिली असतांनाच दुसरीकडे कॉग्रेसचेही दरवाजे त्यांच्यासाठी उघडे आहेत. या पार्श्वभूमीवर अजित पवारांनी सत्यजीत तांबेंना एक महत्वाचा राजकीय सल्ला दिला आहे. अजित पवार म्हणाले, इतके दिवस चेंडू कॉग्रेसच्या कोर्टात होता. सत्यजीत अपक्ष आमदार म्हणून निवडून आल्यानंतर त्याला कॉग्रेस, भाजपा त्यांच्याकडे बोलाविण्याचा प्रयत्न करणार. आता पुढे त्याला बरीच…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे नवीन आमदार म्हणून निवडून आले आहेत. या मतदारसंघावर सलग चौथ्या निवडणुकीतही तांबे यांचे वर्चस्व कायम राहिले आहे. सत्यजित तांबे यांनी अपेक्षित मतांचा कोठा पूर्ण केला. त्यांनी महाविकास आघाडीने परस्पर केलेल्या शुभांगी पाटील यांचा पराभव केला आहे. राजकीय घडामोडींमुळे रंगतदार ठरलेल्या नाशिक विभागीय पदवीधर मतदारसंघात कोण गुलाल उधळणार याविषयी आता राजकीय चर्चांना जोर आला होता. महाविकास आघाडीची उमेदवारी मिळून देखील आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी शेवटच्या क्षणापर्यंत आपला उमेदवारी अर्ज दाखल न करता मुलगा सत्यजित तांबे याचा अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मुदतीत एबी फॉर्म न मिळाल्याने तांबे यांनी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क विधान परिषदेच्या औरंगाबाद शिक्षक मतदार संघाचा निकाल जाहीर झाला असून या मतदारसंघातून महाविकास आघाडीचे उमेदवार विक्रम काळे यांचा विजय झाला आहे. त्यामुळे औरंगाबादवर राष्ट्रवादी काँग्रेसने तर नागपूरवर काँग्रेसने विजय मिळवत आपले खाते उघडले आहे. भाजपला कोकणातून विजय मिळाला आहे. आत्तापर्यंत समोर आलेल्या निकालामध्ये महाविकास आघाडीला दोन जागा तर भारतीय जनता पार्टीला एक जागा मिळाली आहे. काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपने प्रत्येकी एकेका जागेवर विजय मिळविला असून चुरशीच्या ठरलेल्या नाशिकच्या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. या मतदारसंघातून अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे दुसऱ्या फेरी अखेर आघाडी घेऊन असले तरी अद्याप तीन फेऱ्या बाकी आहेत. औरंगाबादच्या लढतीकडे राज्याचे…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क नासिक पदवीधर मतदार संघाची मतमोजणी सुरू असून दुसऱ्या फेरीचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे दुसऱ्या फेरी अखेर 15000 पेक्षा अधिक मतांनी आघाडीवर आहे. दुसऱ्या फेरीनंतर तांबे यांनी विजयाच्या दिशेने वाटचाल सुरू केले असल्याने त्यांच्या समर्थक कार्यकर्त्यांनी मतमोजणी परिसरात मोठा जल्लोष सुरू केला आहे. अपक्ष उमेदवार सत्यजित तांबे आणि महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या शुभांगी पाटील या दोन प्रमुख उमेदवारांमध्ये लढत दिसत आहे. असे असले तरी या पदवीधर मतदारसंघात मोठ्या प्रमाणात पदवीधरांनी आपली मते बाद केली आहेत. बाद मतांचे प्रमाण लक्षात घेता पदवीधरांनी असे का केले असावे अशी शंका निर्माण होते. दुसऱ्या फेरी अखेर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज नेटवर्क कोकण शिक्षक मतदार संघातून भाजपने विजयी सलामी दिल्यानंतर त्या पाठोपाठ सत्ताधारी भाजपसाठी महत्त्वपूर्ण असलेला फडणवीस-गडकरी यांचा बालेकिल्ला नागपूरचा गड मात्र महाविकास आघाडीने आपल्या ताब्यात घेतला आहे. नागपूर शिक्षक मतदार संघातून काँग्रेसचे सुधाकर आडबाले मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करणाऱ्या सुधाकर आडबाले यांच्या विजयाची घोषणा करण्यात आले असून महाविकास आघाडीचा पहिला विजयी उमेदवार जाहीर झाला आहे. सुधाकर आडबाले यांनी भाजपचे उमेदवार विद्यमान आमदार नागो गाणार यांचा पराभव केला. नागपूर मतदार संघ हा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हक्काचा बालेकिल्ला मानला जातो या बालेकिल्लातून काँग्रेसचा पर्यायाने महाविकास आघाडीचा उमेदवार…

Read More