Author: अनंत पांगारकर
प्रवीण पुरो – देशातील जनतेला असलेल्या मतदानाच्या मौलिक अधिकाराची पायमल्ली करणार्या देशाच्या निवडणूक आयोगाची कधी झाली नाही अशी बेईज्जती जगभर झाली आहे. आयोगाच्या अधिकार्यांना लोकांपुढे तोंड दाखवायला जागा राहिली नाही. काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘व्होटचोर’ मोहिमेने आयोगाची त्रेधा उडाली आहेच. पण मी नाही त्यातली, असं दाखवण्याचा केलेला प्रयत्नही आयोगाच्या आणि आयोगाचे प्रमुख ज्ञानेशकुमार गुप्ता यांच्या चांगलाच अंगलट आला. एकूणच लोकांच्या विश्वासापासूनही आयोग पुरता पारखा झाल्याचं चित्र निर्माण झालं आहे. टी. एन. शेषन यांच्या काळातील आयोग आणि ज्ञानेशकुमार यांच्या नेतृत्वातील आयोग यातला फरक आता सुस्पष्ट झाला आहे. शेषन यांच्या नेतृत्वातील आयोगाची शान आणि मान…
मेष (Aries): आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल आहे. तुम्हाला कठोर परिश्रमाचे फळ मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. आर्थिक क्षेत्रात केलेले प्रयत्न यशस्वी होतील. मात्र, कामाच्या ठिकाणी किंवा वैवाहिक जीवनात वादविवाद टाळणे आणि बोलण्यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. वृषभ (Taurus): व्यापार-व्यवसायाच्या दृष्टीने दिवस सकारात्मक राहील. नवीन संधी प्राप्त होतील आणि भागीदारीच्या कामात यश मिळेल. मालमत्ता किंवा भूमी संबंधित काही चांगल्या बातम्या मिळू शकतात. वरिष्ठांचे सहकार्य लाभेल आणि तुमचे कार्यक्षेत्र वाढेल. शांत आणि तणावमुक्त राहण्याचा सल्ला आहे. मिथुन (Gemini): आज तुम्हाला गुरूकृपा लाभेल आणि तुमचे मानसिक स्वास्थ्य व समाधान उत्तम राहील. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवल्यास, तुमचा मूड हलका होईल आणि…
संगमनेर: गोवंश हत्या बंदी कायद्यामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्यांवर राज्य सरकारने कोणताही तोडगा न काढल्याने शिव आर्मी शेतकरी संघटना आता आक्रमक झाली आहे. या कायद्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याचा आरोप करत, संघटनेने थेट नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्ग (NH 60) रोखण्याचा इशारा दिला आहे. सरकारला स्पष्ट शब्दांत ‘अल्टीमेटम’ देण्यात आला असून, मागण्या मान्य न झाल्यास कोणत्याही क्षणी महामार्गावर ‘चक्का जाम’ करण्याची तयारी संघटनेने केली आहे. गोवंश हत्या बंदीच्या विषयावर तोडगा काढण्यासाठी आज (शनिवारी ४ ऑक्टोंबर) संगमनेर येथील दुर्वे नाना हॉलमध्ये संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत कायद्यातील जाचक तरतुदी दूर कराव्यात, भाकड (दूध न देणाऱ्या) जनावरांची योग्य दरात खरेदी…
संगमनेर – अहिल्यानगर एलसीबीच्या पोलीस पथकाने संगमनेरमध्ये केलेल्या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्री करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले आहे. तसेच कारवाई दरम्यान पकडलेली दारू ही वेदांत वाईन्समधून घेतल्याची कबुली आरोपींनी दिली असली तरी वेदांत वाईन्समधून अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे मद्याची नियमबाह्य विक्री झालेली नसून याप्रकरणीचे दावे फेटाळताना संबंधितांनी एक-दोन बाटल्यांच्या माध्यमातून अवैध साठा करून त्याची विक्री केल्याची शक्यता वेदांत वाईन्सच्या संचालकांनी वर्तवली आहे. एलसीबीच्या कारवाईत अवैध मद्य विक्री केल्याप्रकरणी संबंधित आरोपींसह वेदांत वाईन्सच्या चालक-मालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले, या अनुषंगाने संबंधितांनी सर्व आरोप फेटाळून लावत यासंबंधी एका पत्रकार परिषदेच्या माध्यमातून खुलासा केला आहे. संबंधित प्रकार व्यापारी स्पर्धेतून बदनामीचा असल्याचे त्यांनी म्हटले…
संगमनेर – मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या महिलेवर दोघाजणांनी बलात्कार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर घारगाव संगमनेर पोलिसांनी यातील एका आरोपीला थेट राजस्थान मधून जेरबंद केले आहे. पकडलेल्या आरोपीला शनिवारी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने सात तारखेपर्यंत पोलीस करून ठेवण्याचा आदेश दिले. दरम्यान, या गुन्ह्यातील दुसरा आरोपी अद्यापही फरारच आहे. १५ सप्टेंबरला घडलेल्या या प्रकाराला पीडित महिलेने १ ऑक्टोंबरला संगमनेरच्या घारगाव पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनंतर वाचा फुटली होती. याप्रकरणी पोलिसांनी गणपत उर्फ गणेश जैसाजी प्रजापति (वय २६ वर्ष, मूळ रा. मंडवारीया पोस्ट बरलूट, ता. जि. सिरोही, राजस्थान) आणि सैफुल्ला अबूतय्यब शेख (हल्ली रा. १४ नंबर, नारायणगाव, पुणे) या…
संगमनेर: सहकार क्षेत्रासाठी दिशादर्शक असलेल्या सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२५-२६ या आगामी गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन समारंभ सोमवारी (०६ ऑक्टोबर) सकाळी १० वाजता आयोजित करण्यात आला आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीचे सदस्य, माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि कांचनताई थोरात यांच्या हस्ते हा समारंभ पार पडणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे हे असतील. तसेच, आमदार सत्यजीत तांबे, माधवराव कानवडे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष पांडुरंग घुले यांनी ही माहिती दिली आहे. माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली थोरात कारखान्याने मागील गळीत हंगामात ८ लाख मॅट्रिक टनांपेक्षा अधिक उसाचे गाळप केले होते.…
सोलापूर – राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे ओएसडी मंगेश चिवटे यांचे मोठे बंधू आणि शिवसेना शिंदे गटाचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर आज सकाळी प्राणघातक हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. करमाळा तालुक्यातील हिवरवाडी येथे सकाळी शेतात जात असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. गंभीर जखमी झालेल्या महेश चिवटे यांना तातडीने करमाळा उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. महेश चिवटे यांनी या हल्ल्यामागे दिग्विजय बागल आणि रश्मी बागल कोलते यांनी सुपारी दिल्याचा गंभीर आरोप केला आहे. दिग्विजय बागल हे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिंदे गटाकडून उमेदवार होते, तर रश्मी बागल कोलते या भाजपच्या महिला आघाडीच्या प्रमुख आहेत. या आरोपामुळे…
संगमनेर – आगामी नगर परिषद निवडणुकीसाठी गेल्या तीन वर्षांपासून रखडलेली संगमनेर नगरपालिकेची अंतिम प्रभाग रचना अखेर जाहीर करण्यात आली आहे. यापूर्वी जाहीर केलेल्या प्रभाग रचनेवर नागरिकांनी नोंदवलेल्या ३३ हरकतींवर सुनावणी पूर्ण झाल्यानंतर, त्यात किरकोळ बदल करून ही अंतिम रचना प्रसिद्ध करण्यात आली आहे. प्रभारी मुख्याधिकारी सतीश दिघे यांनी ही माहिती दिली. यामुळे आता नगरपालिकेच्या निवडणुकीच्या हालचालींना गती मिळाली असून, निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. इच्छुकांनी त्या दृष्टीने आपल्या परीने आता प्रयत्न सुरू करण्यास सुरुवात केली आहे. पालिकेच्या निवडणूक विभागाचे अधिकारी सध्या निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मतदार यादी तयार करण्याच्या कामात व्यस्त झाले आहेत. प्रारंभी १५ प्रभागांची रचना जाहीर झाल्यानंतर संभाव्य इच्छुक…
मेष – दैनंदिन कामांमध्ये प्रगती होईल आणि वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. वाणीवर नियंत्रण ठेवल्यास कामे मार्गी लागतील. वृषभ – आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमच्या उत्साहात आणि उमेदवारीत वाढ होईल. प्रॉपर्टीसंबंधी कामांसाठी दिवस चांगला आहे. मिथुन – भाग्यकारक घटना घडण्याची शक्यता आहे आणि नातेवाईकांचे सहकार्य लाभेल. संवाद स्पष्ट ठेवा. कर्क – व्यवसायात वाढ आणि अचानक धनलाभाची शक्यता आहे. भावनांवर नियंत्रण ठेवून योग्य निर्णय घ्या. सिंह – कामाच्या ठिकाणी नवी दिशा आणि मार्ग सापडेल. आपल्या जिद्दीने आणि आत्मविश्वासाने कार्यरत राहाल. कन्या – वस्तूंची काळजी घ्या आणि कोणताही महत्त्वाचा कागद गहाळ होणार नाही याची दक्षता घ्या. अध्यात्माकडे कल वाढेल. तुळ – आपल्या विचारांमध्ये…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन कर्तव्य बजावत असताना मद्यसेवन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर एसटी महामंडळाच्या एका चालकाने बसमध्येच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहिल्यानगर येथील तारकपूर बसस्थानकात गुरुवारी (दि. २) सायंकाळी उशिरा घडली. सुरेश चंद्रभान धामोरे (वय ५४, रा. सारोळा कसार) असे आत्महत्या केलेल्या चालकाचे नाव आहे. ते एसटी महामंडळाच्या अहिल्यानगर विभागात कार्यरत होते. मिळालेल्या माहितीनुसार, चालक सुरेश धामोरे हे तारकपूर-घोसपुरी बसवर (क्र. एमएच ४० एन ८८८७) कर्तव्यावर होते. त्यांनी दोन फेऱ्या पूर्ण केल्यानंतर ते तारकपूर बसस्थानकात परतले. यावेळी वाहतूक नियंत्रक शिवाजी मारुती खजिनदार यांना ते मद्यधुंद अवस्थेत असल्याचा संशय आला. त्यांनी लागलीच ही बाब आगारप्रमुख अविनाश कोल्हापुरे यांच्या निदर्शनास…
