Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी राज्याचे माजी मंत्री, काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखालील सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्याने वीज निर्मिती क्षेत्रात उत्कृष्ट आणि सातत्यपूर्ण कामगिरीचा राष्ट्रीय पुरस्कार पटकावला आहे. विशेष म्हणजे, या पुरस्काराने कारखान्याचा सलग दुसऱ्या वर्षी गौरव करण्यात आला आहे, जो कारखान्याच्या उत्कृष्ट कार्याचा हा पुरस्कार गौरव ठरला आहे. पुणे येथील बाणेरमध्ये नॅशनल को-जनरेशन फेडरेशनच्या वतीने आयोजित शानदार सोहळ्यात ज्येष्ठ राष्ट्रीय नेते शरद पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार कारखान्याचे चेअरमन बाबा ओहोळ यांनी स्वीकारला. या प्रसंगी सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील, जयप्रकाश दांडेगावकर, राज्य साखर संघाचे अध्यक्ष पी. एन. पाटील, प्रतापराव…
महाराष्ट्र संवाद न्यूज – छत्रपती संभाजी नगर पोलिसातून निलंबित असलेले वादग्रस्त पोलीस अधिकारी रणजीत कासले यांना १८ एप्रिल २०२५ रोजी अखेर पोलीस दलातून बडतर्फ करण्यात आले आहे. छत्रपती संभाजीनगर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक विरेंद्र मिश्रा यांनी ही कारवाई केली आहे. सध्या कासले एका ॲट्रॉसिटीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांच्या ताब्यात असून, शिवाजीनगर पोलिसांनी त्यांना अटक केली असून तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीड जिल्हा पोलीस दलातील सायबर विभागात कार्यरत असताना, एका गुन्ह्याच्या तपासासाठी गुजरातला गेलेल्या कासले यांनी पैशांच्या बदल्यात आरोपीला सोडले होते, या संबंधीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. यासोबतच, नागरिकांना सायबर गुन्हे दाखल करण्याच्या धमक्या दिल्याचाही त्यांच्यावर आरोप आहे.…
केंद्राच्या नव्या शैक्षणिक धोरणातील हिंदी भाषा सक्तीने महाराष्ट्रातलं वातावरण ढवळून निघालं आहे. राज्यातील महत्वाच्या प्रश्नांच्या सोडवण्यातील अडचणींना तोंड देता देता युती सरकारने विद्यार्थ्यांवर हिंदी सक्तीची तलवार उगारली आहे. राज्यातील सगळ्याच शाळांना पहिलीपासून सक्तीने हिंदी शिकवावी लागणार आहे. राष्ट्रभाषा म्हणून हिंदी स्वीकारावीच लागेल, असं मुख्यमंत्र्यांनी आधीच जाहीर केल्याने यातील गुंतागुंत वाढली आहे. केंद्राने कोणताही निर्णय घेतला की त्या निर्णयाचा अंमल करण्यासाठी देशातील काही ठराविक राज्यांवर समर्थनाची सक्ती असते. त्यात महाराष्ट्र येतं. महाराष्ट्रासह गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, उत्तरप्रदेश, बिहार अशा राज्यांनी निर्णयाचा अंमल आधी करायचा. या राज्यांना केंद्राने घेतलेल्या निर्णयाला विरोध करण्याचा अधिकार भाजप शासनप्रक्रियेने केव्हाच गुंडाळला आहे. निर्णय काहीही असो त्याची…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे दीनानाथ मंगेशकर रुग्णालयातील गर्भवती महिला तनिषा भिसे यांच्या दुर्दैवी मृत्यू प्रकरणी अखेर १७ दिवसानंतर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. अलंकार पोलीस ठाण्यात रुग्णालयातील प्रमुख स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. सुश्रुत घैसास यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम १०६(१) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ससून रुग्णालयाच्या पुनर्तपासणी अहवालात डॉ. घैसास यांच्या वैद्यकीय निष्काळजीपणाचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे. याच अहवालाच्या आधारावर पोलिसांनी ही कारवाई केली आहे. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी ससून प्रशासनाला विचारलेल्या चार प्रश्नांचा अहवाल आज प्राप्त झाला. या अहवालात डॉक्टरांनी वैद्यकीय निष्काळजीपणा केल्याचे नमूद आहे, त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संदर्भात अधिक माहिती…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणी पुरवठ्यासाठी स्वतंत्र ॲप तयार करावे. टँकर सुरू असलेल्या गावात पाणी पुरवठ्याचे वेळापत्रक जाहीर करावे, जेणेकरून ग्रामस्थांना टँकरची वाट पाहावी लागणार नाही. तालुका पातळीवर पाणी पुरवठ्यासाठी जबाबदार अधिकाऱ्याची नियुक्ती करावी, असे निर्देश जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिले. शनिवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पाणी टंचाई आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीसाठी आमदार काशिनाथ दाते, अमोल खताळ, विठ्ठलराव लंघे, विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, महापालिका आयुक्त यशवंत डांगे, उप वनसंरक्षक धर्मवीर साळविठ्ठल, अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आदी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर अहिल्यानगर जिल्ह्यात वाढत्या अवैध धंद्यांविरोधात जलसंपदा मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कठोर भूमिका घेतली आहे. जिल्ह्यातील अवैध धंद्यांवर पोलिसांनी निर्भयपणे आणि मोहीम स्तरावर कारवाई करावी, असे स्पष्ट निर्देश त्यांनी दिले आहेत. शनिवारी (१९एप्रिल) जिल्हाधिकारी कार्यालयात अवैध व्यवसायांवर कारवाईबाबत आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार काशिनाथ दाते, आमदार अमोल खताळ, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार विक्रम पाचपुते, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे आणि वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री विखे पाटील यांनी यावेळी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचा पाढाच वाचला. ते म्हणाले, “अंमली…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर तालुक्यातील आगामी पाच वर्षांसाठी म्हणजेच सन २०२५ ते २०३० या कालावधीसाठीच्या ग्रामपंचायत सरपंचपदाच्या आरक्षणाची विशेष सोडत येत्या २३ एप्रिल २०२५ रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही महत्त्वाची प्रक्रिया संगमनेरच्या नवीन नगर रस्त्यावरील यशवंतराव चव्हाण प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात सकाळी ११ वाजता पार पडणार आहे. तर २३ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपविभागीय अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली महिला सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत होणार आहे. तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी, संगमनेर यांच्या कार्यालयाने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. या संबंधीचे प्रकटन माध्यमांना न देता समाज माध्यमात व्हायरल होताना दिसत आहे. या महत्त्वपूर्ण सोडतीच्या वेळी जिल्ह्यातील सर्व संबंधित ग्रामपंचायत सदस्य,…
महाराष्ट्र संवाद न्यूज दागिने चोरांनी मोठा उच्छाद मांडला असून या दागिने चोरांचा शोध घेण्यास पोलीस यंत्रणा सपशेल अपयशी ठरली आहे. पोलिसांना दागिने चोरांचा शोध लागत नाही की पोलीस चोरांचा शोध घेत नाहीत असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होत आहे. नाशिकच्या जेलरोड परिसरात एका वृद्ध महिलेची तोतया पोलिसांनी फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. या भामट्यांनी महिलेला धमकावून तिच्याकडील सुमारे सव्वा दोन लाख रुपये किमतीचे सोन्याचे दागिने हातचलाखीने काढून घेतले. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ७० वर्षीय तक्रारदार महिला नेहमीप्रमाणे सकाळी आठ वाजता शिवमंदिरातून दर्शन घेऊन घरी परतत होती. नारायणबापूरोडने पायी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे हडपसर येथे एका तरुणाने पत्नीचे अनैतिक संबंध आणि व्याजाच्या पैशांसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी पत्नी आणि सावकाराला अटक केली आहे. गुरुवारी (दि. १७) मध्यरात्री हडपसरमधील सिद्धिविनायक विहारातील एका इमारतीत ही घटना घडली. सचिन सतीश गिरी (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्याची पत्नी कोमल सचिन गिरी (वय ३०) आणि रवींद्र मारुती मेमाणे (वय ४५) यांना पोलिसांनी अटक केली आहे. सचिनची बहीण सविता संतोष भारती (वय ३९) यांनी या संदर्भात पोलिसात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन आणि कोमल यांचा विवाह काही वर्षांपूर्वी झाला होता. कोमलचे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – मुंबई मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कृषी खात्यातील महत्त्वाच्या बदल्यांचे अधिकार कृषीमंत्र्यांकडून काढून स्वतःकडे घेतल्याने त्यांचा कल एकाधिकारशाहीकडे असल्याचे दिसून येत आहे, असा आरोप आमदार रोहित पवार यांनी केला आहे. मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून फडणवीस यांनी ठळक असे काही केले नसले, तरी एकाधिकारशाही मात्र मजबूत केली आहे. मंत्र्यांचे, विशेषतः मित्रपक्षांच्या खात्यावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे नियंत्रण ठेवण्यासाठी शक्य त्या उपाययोजना मुख्यमंत्र्यांकडून केल्या जात आहेत. मित्रपक्षांना आपल्या एकाधिकारशाहीच्या धाकात ठेवण्याचे भाजपचे मनसुबे आता महाराष्ट्राला कळाले आहेत, असेही पवार म्हणाले. रोहित पवार यांनी ट्वीट करत कृषी खात्यातील बदल्यांच्या अधिकारांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ते म्हणाले, “ज्याप्रमाणे बदल्यांचा अधिकार मुख्यमंत्र्यांनी स्वत:कडे घेतला, त्याचप्रमाणे राज्यभरातील…
