Author: अनंत पांगारकर

मेष – व्यवसायात काही अनावश्यक बदलांना सामोरे जावे लागेल. गुप्त शत्रूंचा त्रास संभवतो. प्रवासात अडचणी येऊ शकतात.  वृषभ – प्रलंबित कामे पूर्ण करण्यासाठी उत्तम दिवस आहे. तब्येत उत्तम राहील. वैवाहिक जीवनात गोडी राहील आणि अचानक धनलाभ संभवतो.  मिथुन – अपूर्ण कामे पूर्ण होतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. धनप्राप्ती होईल. प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. नोकरीत लाभ होईल. कर्क – सक्रिय दृष्टिकोन कनिष्ठ कर्मचाऱ्यांमध्ये आत्मविश्वास वाढवेल. वैयक्तिक जीवनात चांगला बदल आणि नात्यांमध्ये बहर येईल. मध्यस्थी करण्याची क्षमता वाढेल. सिंह – जुन्या गुंतवणुकीतून नफा मिळण्याची शक्यता आहे, पण कोणालाही पैसे उधार देणे टाळा. कन्या – आनंददायी परिणाम मिळतील आणि तुमची प्रशंसा होईल. उत्पन्न वाढेल.…

Read More

अहिल्यानगर – जिल्ह्यातील १३ पंचायत समिती सभापती पदांसाठीची आरक्षण सोडत मंगळवारी (७ ऑक्टोबर) दुपारी १२ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील पंडित नेहरू सभागृहात काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया यांच्या अध्यक्षतेखाली ही आरक्षण सोडत काढली जाणार आहे. जिल्ह्यातील पंचायत समित्या सभापती पदासाठी कुठल्या प्रवर्गासाठी आरक्षित होतात याकडे आता इच्छुकांचे लक्ष लागले आहे. जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुक प्रक्रिया यामुळे सुरू झाल्याची मानले जात आहे. ग्रामविकास विभागाच्या ९ सप्टेंबर २०२५ रोजीच्या अधिसूचनेनुसार, राज्यातील पंचायत समित्यांमध्ये सभापती पदासाठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग आणि महिलांसाठी (या सर्व प्रवर्गातील महिलांसह) आरक्षण निश्चित करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याच…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई विविध कारणांसाठी आंदोलन करणाऱ्या विरोधी पक्ष कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनाना जेरीस आणणाऱ्या राज्य सरकारने आता काळे झेंडे दाखवणारे आणि रस्ते अडवणाऱ्या कार्यकर्त्यांविरोधी पोलीस कारवाई करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.  अमरावतीमध्ये काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने आणि मराठवाड्यात पूर पाहणीसाठी आलेले आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांचीही गाडी आडवण्याचा प्रयत्न झाल्याने महसूल मंत्री बावनकुळे आक्रमक झाले आहेत. त्यांनी मंत्र्यांची गाडी अडवणारे आणि काळे झेंडे दाखवणाऱ्यांवर पोलीस कारवाई करण्याचा इशारा दिला आहे. मराठवाडा आणि विदर्भातील काही भागात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेती, पिके आणि…

Read More

संगमनेर – माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली संगमनेर शहर वैभवशाली आणि सुसंस्कृत ठरले असून, नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने महिला शक्तीचा सन्मान करण्यासाठी या आठवड्यात खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, (२७ सप्टेंबर) आणि रविवारी, (२८ सप्टेंबर) फक्त महिला भगिनींसाठी यशोधन मैदानावर सायंकाळी ७ ते १० या वेळेत मोफत ‘क्लब दांडिया’ होणार आहे. या कार्यक्रमाची विशेष बाब म्हणजे, रविवारी (२८ सप्टेंबर) ‘देवयानी’ मालिकेतून घराघरात पोहोचलेली आणि मराठी चित्रपटसृष्टीतील आघाडीची अभिनेत्री शिवानी सुर्वे दांडिया खेळण्यासाठी महिलांसोबत उपस्थित राहणार आहे. ती सहभागी झालेल्या सर्व महिला व युवतींसोबत स्वतंत्रपणे दांडिया खेळणार आहे. कुटुंब फाउंडेशन, शिवतांडव प्रतिष्ठान, हिंदुराजा प्रतिष्ठान आणि एकविरा फाउंडेशन यांच्या वतीने…

Read More

संगमनेर: संगमनेर-कोपरगाव रस्त्यावर भरधाव वेगाने जाणाऱ्या एका कंटेनरने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गुरुवारी (काल) दुपारी सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील तिगाव परिसरात हा अपघात झाला. अर्जुन सचिन लोणारी (वय २९, रा. जोर्वे, ता. संगमनेर) असे अपघातात मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. अर्जुन लोणारी हे आपल्या दुचाकीने (क्र. एम.एच. १५ ए.सी. ८८९३) तळेगाव दिघे येथील महाविद्यालयाकडे जात असताना हा अपघात झाला. प्राप्त माहितीनुसार, दुपारी सव्वा दोनच्या सुमारास तिगाव परिसरात समोरील दिशेने येणाऱ्या कंटेनर क्रमांक (एन. एल. ०१ ए. के. २३८८) वरील चालकाने अर्जुन यांच्या दुचाकीला भीषण धडक दिली. या अपघातात अर्जुन गंभीर…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वाळू, खडी आणि मुरुमाच्या वाहतुकीसाठी दरमहा २० हजार रुपयांची लाच (हप्ता) मागणाऱ्या पोलीस कॉन्स्टेबल अनिल रामनाथ गवांदे (वय ३५) याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) १५ हजार रुपये स्वीकारताना रंगेहाथ पकडले.  ही कारवाई राहाता पोलीस स्टेशन हद्दीत करण्यात आली असून, यामुळे पोलीस दलात खळबळ उडाली आहे. तक्रारदार यांचा खडी, मुरुम आणि वाळू वाहतुकीचा व्यवसाय आहे. त्यांच्या खडी भरलेल्या डंपरवर १८ सप्टेंबर २०२५ रोजी राहाता पोलिसांनी कारवाई करत तो जप्त केला होता. त्यानंतर २१ सप्टेंबर रोजी पोलीस कॉन्स्टेबल गवांदे यांनी तक्रारदारांना फोन करून भेटायला बोलावले. राहाता पोलीस ठाण्याच्या हद्दीत व्यवसाय सुरळीत चालू ठेवायचा असेल आणि डंपरवरील कारवाई टाळायची…

Read More

मेष (Aries) – आजचा दिवस अनुकूल आहे. कामांमध्ये यश आणि सन्मान मिळेल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. कामाची प्राथमिकता ठरवून पुढे जा.  वृषभ (Taurus) – मेहनतीने स्थिती मजबूत होईल. वेळ आणि कामाचे व्यवस्थापन महत्त्वाचे आहे. दीर्घकाळापासूनचे अडथळे दूर होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मिथुन (Gemini) – तुमच्या सूझबूझ आणि कल्पनाशक्तीमुळे मोठे लाभ मिळतील. साख (प्रतिष्ठा) आणि सन्मानात वाढ होईल. नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी दिवस चांगला आहे.  कर्क (Cancer) – भावूकतेवर नियंत्रण ठेवा. आरोग्य थोडे मध्यम राहू शकते. कुटुंबात सौहार्द राखणे महत्त्वाचे आहे. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. सिंह (Leo) – सकारात्मक परिस्थितीचा फायदा घ्या. आज धनलाभ होण्याची शक्यता आहे. सामाजिक कार्यांमध्ये सहभाग…

Read More

अहिल्यानगर – नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी आपला वाढदिवस यावर्षी वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. वाढदिवसाच्या अनुषंगाने त्यांचा एक मेसेज समाज माध्यमातून मोठ्या प्रमाणात वायरल होताना दिसत आहे.  काय म्हटले आहे तांबे यांनी या मेसेजमध्ये… प्रिय मित्र-मैत्रिणींनो, खरंतर 27 सप्टेंबरला माझा वाढदिवस आहे… दरवर्षी आपण सर्वजण मला प्रत्यक्ष अथवा डिजिटल माध्यमातून शुभेच्छा देता. तुमचे प्रेम व आपला ऋणानुबंध साजरा करण्याचा तो दिवस असतो. त्यामुळेच अनेकदा मला आवडत नसतानाही मी हा दिवस साजरा करतो, कारण तो दिवस आपल्याला भेटण्याची एक संधी असते. राजकीय-सामाजिक जीवनात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने हा एक अत्यंत महत्त्वाचा कार्यक्रम होऊन जातो. आणि स्पर्धेच्या…

Read More

संगमनेर – पुणे-नाशिक महामार्गावर चंदनापुरी गावाजवळ गुरुवारी दुपारी साडेतीन वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. संगमनेरकडून पुण्याकडे जाणाऱ्या कार आणि समोरून येणाऱ्या आयशर टेम्पो यांच्यात समोरासमोर जोरदार धडक झाली. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झाला असून, कारमधील चार जण गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कारचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. एमएच १२ एफ १४२१ क्रमांकाची कार पुण्याकडे जात होती, तर एमएच १३ सीयू ९१५६ क्रमांकाचा आयशर टेम्पो संगमनेरच्या दिशेने येत होता. दोन्ही वाहनांची जोरदार धडक झाल्याने कारमधील प्रवासी गंभीर जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच डोळासणे महामार्ग केंद्राचे पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि जखमींना संगमनेरमधील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल…

Read More

संगमनेर – आमदार सत्यजित तांबे यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या ‘आय लव्ह संगमनेर’ चळवळीच्यावतीने शहरात नवरात्रीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘खेळ पैठणीचा’ या विशेष कार्यक्रमाला महिलांनी पहिल्याच दिवशी प्रचंड प्रतिसाद दिला. या कार्यक्रमामुळे महिलांना त्यांच्या कलागुणांना वाव देण्यासोबतच आनंददायी मनोरंजनाचा अनुभव मिळाला. संगमनेरमधील गणेश नगर, महाराणा प्रताप चौक, आदर्श कॉलनी, मालदाड रोड, ऑरेंज कॉर्नर आणि आझाद चौक या भागांमध्ये हा कार्यक्रम बुधवारी रात्री उत्साहात पार पडला. कार्यक्रमासाठी प्रत्येक ठिकाणी महिलांचा मोठ्या संख्येने सहभाग होता, यामुळे या कार्यक्रमाची लोकप्रियता पहिल्याच दिवशी दिसून आली.  या कार्यक्रमाला माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, डॉ. मैथिलीताई तांबे आणि डॉ. जयश्रीताई थोरात यांची विशेष उपस्थिती होती. त्यांच्यासोबत ‘आय लव्ह…

Read More