Author: अनंत पांगारकर
संगमनेर, प्रतिनिधी – महसूल विभागातील भ्रष्टाचार थांबण्याचे नाव घेत नसून, संगमनेर तालुक्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई केली आहे. आश्वी बुद्रुक येथील तलाठ्यासह दोन खासगी इसमांना ६ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडण्यात आले आहे. कुणबी जातीचा दाखला आणि जात पडताळणी प्रमाणपत्र (कास्ट व्हॅलिडिटी) काढून देण्यासाठी या आरोपींनी लाचेची मागणी केली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी बाबासाहेब गंगाधर बोऱ्हाडे (वय ५७) हा आश्वी बुद्रुक येथे तलाठी म्हणून कार्यरत आहे. त्याच्यासोबत लाचेची रक्कम स्वीकारण्यात मदत करणारे हितेश सोमनाथ घोडेकर (वय २८, रा. गजापूर रोड, ढोलेवाडी) आणि प्रतीक विजयकुमार कातोरे (वय २६, रा. सांगवी) या दोन खासगी व्यक्तींनाही अटक करण्यात आली आहे.…
दैनिक राशीभविष्य: १८ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि नवीन संधी घेऊन येणारा ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कल्पकतेला वाव मिळेल, ज्यामुळे वरिष्ठांकडून तुमचे कौतुक होण्याची शक्यता आहे. कुटुंबातील सदस्यांसोबत असलेले मतभेद दूर होतील आणि घरात आनंदाचे वातावरण राहील. आर्थिक बाबतीत कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणे हिताचे ठरेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर नियंत्रण ठेवा. वृषभ: वृषभ राशीच्या व्यक्तींसाठी आजचा दिवस संमिश्र फळांचा असेल. मानसिक शांततेसाठी तुम्ही अध्यात्माकडे वळाल. व्यवसायात गुंतवणुकीचे विचार करत असाल तर आजचा दिवस शुभ आहे, परंतु कागदपत्रांची पडताळणी नीट करा. जोडीदारासोबत काही कारणावरून छोटेखानी वाद होऊ शकतात, त्यामुळे बोलताना संयम…
अहिल्यानगर – जिल्ह्यात सन २०२६ मधील सण व उत्सवांच्या काळात एकूण १५ दिवस सकाळी ६.०० ते रात्री १२.०० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक व ध्वनीवर्धक वापरण्यास जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी परवानगी दिली आहे. राज्य शासनाच्या पर्यावरण विभागाचे आदेश व सुधारित ध्वनी प्रदूषण (नियमन व नियंत्रण) नियम २०१७ नुसार ही सूट जाहीर करण्यात आली असून, श्रोतृगृहे, सभागृहे व मेजवानी कक्ष यांसारख्या बंद जागा वगळता इतर ठिकाणी ही सवलत लागू राहील. जिल्हा प्रशासनाने निश्चित केलेल्या या १५ दिवसांमध्ये १९ फेब्रुवारी रोजीची शासकीय शिवजयंती, १४ एप्रिल रोजीची डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, १ मे रोजीचा महाराष्ट्र दिन व २६ ऑगस्ट रोजीच्या ईद-ए-मिलादचा समावेश आहे.…
संगमनेर, प्रतिनिधी – शिर्डीच्या गोल्डन क्रिकेट अकादमीच्या मैदानावर रंगलेल्या पहिल्या राज्यस्तरीय 50 बॉल क्रिकेट स्पर्धेत संगमनेरच्या ध्रुव ग्लोबल स्कूलचा संघ चॅम्पियन ठरला. राज्यातून आलेल्या विविध शालेय संघांचा समावेश असलेल्या या अतितटीच्या स्पर्धेत ध्रुवच्या संघाने सर्वोत्तम कामगिरी करताना 11 सुवर्ण पदकांसह पाच चषकांची कमाई केली. शाळेच्या तेज जैनला ‘प्लेअर ऑफ द चॅम्पियन’ तर, प्रणव काकडेला सामनावीराचा पुरस्कार देवून गौरवण्यात आले. याशिवाय शाळेच्या खेळाडूंनी अन्य व्यक्तिगत पुरस्कार पटकावताना या पहिल्याच राज्यस्तरीय स्पर्धेवर आपला ठसा उमटवला. ध्रुव ग्लोबल स्कूलच्या पंधरा वर्षांखालील मुलांच्या संघाचा समावेश असलेल्या या स्पर्धेत प्रत्येकी 50 चेंडूचे सामने खेळवण्यात आले. साखळी फेरीतील पहिल्याच सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजीच्या जोरावर ध्रुवच्या संघाने पुणेसंघाचा…
संगमनेर, प्रतिनिधी – संपूर्ण जगाचे आराध्य दैवत आणि हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून जयहिंद लोकचळवळीच्या वतीने गुरुवारी, १९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजता कवी अनंत फंदी खुले नाट्यगृह येथे ‘रायबा हेच का आपले स्वराज्य’ या भव्य महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी या कार्यक्रमाबाबत माहिती दिली असून, ४० कलावंतांच्या संचात सादर होणारे हे महानाट्य शिवभक्तांसाठी एक विशेष पर्वणी ठरणार आहे. या सोहळ्याला काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, माजी नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, नगराध्यक्ष डॉ. मैथिलीताई तांबे आणि उपनगराध्यक्ष…
आजचे राशीभविष्य: १७ फेब्रुवारी २०२६ मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अत्यंत उत्साहाचा आणि ऊर्जावान ठरेल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कतृत्वाला दाद मिळेल, ज्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. आर्थिक बाबतीत काही नवीन योजना आखण्यासाठी काळ अनुकूल आहे. कुटुंबातील सदस्यांशी संवाद साधताना रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे, अन्यथा विनाकारण वाद होऊ शकतात. जोडीदारासोबतचा वेळ आनंदाचा जाईल आणि आरोग्य उत्तम राहील. वृषभ: आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. जुन्या गुंतवणुकीतून चांगला परतावा मिळू शकतो. मात्र, घाईघाईत कोणताही मोठा निर्णय घेऊ नका. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने प्रलंबित कामे पूर्ण होतील. सामाजिक कार्यात सहभागी झाल्यामुळे तुमचा मान-सन्मान वाढेल. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका, विशेषतः खाण्यापिण्याच्या सवयींवर…
श्रीरामपूर, विशेष प्रतिनिधी – वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांना अरेरावी करून सरकारी कामात अडथळा निर्माण करणाऱ्या आरोपीस श्रीरामपूरचे सत्र न्यायाधीश एस. एस. देशपांडे यांनी दोन महिने सश्रम कारावासाची आणि ५००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. या प्रकरणातील आरोपी गणेश रूपचंद गांगुर्डे याला न्यायालयाने दोषी ठरवत हा महत्त्वपूर्ण निकाल दिला. घटनेची पार्श्वभूमी अशी की, ५ ऑक्टोबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वसुली पथक श्रीरामपूर येथील वॉर्ड नं. २, सुभेदार वस्ती भागात थकीत वीज बिल वसुलीसाठी आणि कनेक्शन तोडण्यासाठी गेले होते. ग्राहक रूपचंद गांगुर्डे यांच्या घरी पथक पोहोचले असता, ग्राहक, त्यांचा मुलगा गणेश गांगुर्डे आणि पत्नी बबीता गांगुर्डे यांनी वीज बिल…
संगमनेर: प्रतिनिधी अहमदनगर जिल्ह्यातील प्रगत आणि व्यापारी केंद्र असलेल्या संगमनेर शहराला आता ‘स्मार्ट’ आणि ‘शिस्तबद्ध’ बनवण्यासाठी नगरपरिषदेने कंबर कसली आहे. यामुळे संगमनेर करांच्या दैनंदिनी मध्ये एक महत्त्वाचे वळण येणार आहे. ‘संगमनेर २.०: इट्स टाइम टू अपग्रेड’ या विशेष मोहिमेद्वारे शहराचा सर्वांगीण कायापालट करण्याचा संकल्प प्रशासनाने सोडला असून, येत्या १ मार्च २०२६ पासून शहरात नवीन आणि कडक नियमावली लागू केली जाणार आहे. या मोहिमेच्या पार्श्वभूमीवर, नगराध्यक्ष डॉ. मैथिली तांबे यांनी शहरवासीयांना, व्यापाऱ्यांना आणि व्यावसायिकांना शहराच्या सुव्यवस्थेसाठी मनापासून सहकार्य करण्याचे भावूक आवाहन केले आहे. शहरातील वाढती वाहतूक आणि पादचाऱ्यांची होणारी कुचंबणा लक्षात घेता, सार्वजनिक रस्ते आणि पदपथ (फुटपाथ) मोकळे असणे ही काळाची…
अकोले: अहमदनगर जिल्ह्यातील अकोले पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध रित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या एका स्विफ्ट डिझायर कारवर श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने यशस्वी कारवाई केली आहे. या कारवाईत पोलिसांनी एकूण ४ लाख ८१ हजार १५० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (१६ फेब्रुवारी) श्रीरामपूरचे अपर पोलीस अधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी त्यांच्या कार्यालयातील पथकाला अकोले पोलीस स्टेशन हद्दीत अवैध धंद्यांवर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल दादासाहेब लोढे, पोलीस नाईक संदीप दरंदले, पोलीस कॉन्स्टेबल अशोक गाढे आणि राजेंद्र बिरदवडे हे पथक गस्त घालत होते. यावेळी धामणगाव पाट…
संगमनेर, प्रतिनिधी – मालेगाव येथील उपमहापौरांच्या दालनात टिपू सुलतानचा फोटो लावल्याच्या घटनेचे समर्थन करताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी टिपू सुलतानची तुलना थेट छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी केल्याने महाराष्ट्रात संतापाची लाट उसळली आहे. या विधानाचा निषेध करण्यासाठी संगमनेर बसस्थानक परिसरात शिवसेना-भाजप महायुतीच्यावतीने मंगळवारी जोरदार निदर्शने करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक आणि महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहेत. त्यांच्या अतुलनीय पराक्रमाची आणि जाज्वल्य इतिहासाची तुलना कोणाशीही होऊ शकत नाही, अशी भावना आंदोलकांनी यावेळी व्यक्त केली. सपकाळ यांनी केलेले विधान हे महाराष्ट्राच्या अस्मितेचा अपमान करणारे असून, यामुळे प्रत्येक शिवप्रेमीच्या भावना दुखावल्या गेल्याचे आंदोलकांचे म्हणणे आहे. मालेगावमधील फोटो प्रकरणाने आधीच चीड…
