Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या ‘प्रतिक्षा संपली! संगमनेर 2.0 जाहीर सभा!’ या समाज माध्यमातील व्हायरल पोस्टमुळे संगमनेर नगरपालिकेच्या निवडणुकीचे वातावरण ढवळून निघाले आहे. तांबे यांची ही नवी पोस्ट काय आहे? याची संगमनेरकरांमध्ये आता उत्सुकता वाढली आहे. आमदार सत्यजित तांबे यांची पत्नी मैथिली तांबे स्थानिक विकास आघाडीकडून नगराध्यक्षपदाच्या रिंगणात असल्याने अपेक्षा वाढल्या आहे. ‘संगमनेर 2.0’ च्या माध्यमातून आमदार तांबे हे शहराच्या विकासाचा एक नवा अजेंडा नागरिकांसमोर मांडणार असल्याची चर्चा आहे. या सभेच्या घोषणेमुळे नगराध्यक्षपदाच्या या लढाईला एक वेगळी दिशा मिळण्याची शक्यता आहे. तांबे समर्थकांमध्ये ही निवडणूक केवळ उमेदवारांमधील नसून, संगमनेरला ‘मुक्त’ करण्याची लढाई…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन | संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या तोंडावर संगमनेर शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. महायुतीच्या (भाजप-शिंदे गट) सभेसाठी जागा आरक्षित करण्याच्या नावाखाली, संगमनेर सेवा समितीच्या जाहीर सभांसाठी प्रशासनाकडून जाणीवपूर्वक जागा नाकारल्याचा गंभीर आरोप सेवा समितीने केला आहे. सभांसाठीच्या या जागा ‘ब्लॉकिंग’च्या धक्कादायक घडामोडींमुळे प्रशासनावर राजकीय ‘दबाव’ असल्याच्या चर्चांना उधाण आले असून, आगामी निवडणुका मुक्त आणि निष्पक्ष वातावरणात होतील का, असा थेट प्रश्न उपस्थित केला जात आहे. सेवा समितीने २७ नोव्हेंबर रोजी नवीन नगर रोड येथील मैदानावर सभेसाठी परवानगी मागितली होती, मात्र प्रशासनाने महायुतीच्या प्रचारासाठी येणाऱ्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा नियोजित असल्याने ही मागणी थेट नाकारली. परंतु, सर्वात…
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल राहील. विशेषत: आर्थिक आणि कार्यक्षेत्राच्या दृष्टीने हा दिवस चांगला आहे. पैसे कमविण्यासाठी नवीन संधी मिळतील आणि जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस उत्तम आहे आणि नशिबाची साथ मिळेल. मात्र, वडिलांच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. गुंतवणुकीपूर्वी जोडीदाराचा सल्ला घ्या. वृषभ: आज तुम्हाला नेतृत्व करण्याची वेगळी भूमिका पार पाडावी लागेल. तुमच्या कामामध्ये चांगली कमाई होईल आणि संपत्ती वाढल्याने कुटुंबाची प्रतिष्ठा वाढेल. नवीन प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आर्थिक परिस्थिती बरी असली तरी काही गोष्टींबाबत उदास वाटेल. मिथुन: आज कोणतंही काम पूर्ण करण्यासाठी नेहमीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल. कामावर जास्त लक्ष…
संगमनेर – प्रतिनिधी लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले. हीच विकासाची परंपरा आपण कायम ठेवणार असून, शहराच्या विकासकामांसाठी कोणताही निधी कमी पडू देणार नाही, असा ठाम विश्वास संगमनेरवासियांना देत थोरात यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान मोठे आहे. त्यांचे सर्व पक्षांतील नेत्यांशी अत्यंत चांगले संबंध असून, मंत्रालयात कोणत्याही मंत्र्याकडे काम घेऊन गेल्यास ते सर्वप्रथम थोरात साहेबांची चौकशी करतात आणि त्यांचा आदर करतात. थोरात साहेबांनी सातत्याने निधी आणून संगमनेर शहर घडवले, त्याला नावारूपाला आणले असल्याचे प्रतिपादन आमदार सत्यजीत तांबे यांनी केले. मालदाड रोड, अलकानगर, गणेश नगर आणि मोमीनपुरा येथे झालेल्या संगमनेर सेवा समितीच्या उमेदवारांच्या प्रचारसभांमध्ये ते…
मेष – आजचा दिवस तुमच्यासाठी उत्साहाचा आणि नवीन कार्याचा आरंभ करण्याचा असू शकतो. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या नेतृत्वाच्या गुणांमुळे तुम्हाला प्रशंसा मिळेल आणि तुम्ही इतरांना प्रेरित कराल. तुमच्या सहजतेने आणि आत्मविश्वासाने तुम्ही तुमचे ध्येय सहज साध्य करू शकता. कोर्ट-कचेरीच्या कामातून दिलासा मिळण्याची शक्यता आहे. वृषभ – आज तुम्हाला कुटुंबासोबत वेळ घालवल्याने सकारात्मक ऊर्जा मिळेल. बऱ्याच दिवसांपासून असलेली जुनी समस्या संपुष्टात आल्याने मानसिक समाधान मिळेल. चांगल्या आरोग्यासाठी जागरूक राहण्याची गरज आहे. व्यवसाय किंवा कार्यक्षेत्रात एखादी चांगली डील मिळण्याची शक्यता आहे. मिथुन – तुमची बुद्धिमत्ता आणि संवाद कौशल्ये आज इतरांना प्रभावित करतील. आज एखादा जुना मित्र किंवा परिचित व्यक्ती तुमच्या संपर्कात येऊ शकते,…
संगमनेर – संगमनेरच्या श्रीराम फायनान्स लिमिटेडला कर्जाच्या हप्त्यापोटी दिलेला धनादेश (चेक) अनादरीत झाल्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. आरोपी संदीप सावळेराम पगारे (रा. संजयनगर, कोपरगाव) याला सहा महिने साधा कारावास आणि चेक रकमेच्या दुप्पट रक्कम फिर्यादी कंपनीला देण्याची शिक्षा माननीय न्यायाधीश जे. व्ही. भेंडे यांच्या न्यायालयाने ठोठावली आहे. आरोपी संदीप सावळेराम पगारे यांनी श्रीराम फायनान्स लिमिटेड कंपनीच्या संगमनेर शाखेकडून कर्ज घेतले होते. कर्जाच्या परतफेडीसाठी आरोपीने कंपनीला जो धनादेश दिला होता, तो बँकेत बाऊन्स झाल्यानंतरही आरोपीने कायदेशीर मुदतीत रक्कम परतफेड न केल्यामुळे कंपनीने त्याच्याविरुद्ध न्यायालयात खटला दाखल केला. या प्रकरणाची सुनावणी चौथे वरिष्ठ व ॲडिशनल मॅजिस्ट्रेट जे. व्ही. भेंडे यांच्या…
संगमनेर – संगमनेर नगरपालिका निवडणुकीत ऐनवेळी मोठा राजकीय ‘ट्विस्ट’ आला आहे. निष्ठावान कार्यकर्त्यावर अन्याय झाल्याचे कारण देत भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) माजी नगरसेविका मेघा दीपक भगत यांनी थेट बंडखोरी केली आहे. त्यांनी नगराध्यक्षपदासाठी आपली अपक्ष उमेदवारी कायम ठेवल्याने भाजपमध्ये खळबळ उडाली असून, पक्षाने त्यांच्यावर तातडीने कारवाई केली आहे. भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन सुरेश दिनकर यांनी ही कारवाई केली आहे. भगत यांनी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकारी असताना पक्षशिस्त आणि अनुशासन भंग करणारे कृत्य केल्याचा ठपका ठेवत, त्यांना तात्काळ पक्षातून निष्कासित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. यासंबंधीचे नितीन दिनकर यांचे अधिकृत पत्र समाज माध्यमांवर वेगाने प्रसारित होत आहे. मेघा भगत या…
संगमनेर / प्रतिनिधी संगमनेर नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या प्रचाराला निर्णायक गती देण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना (शिंदे गट) प्रमुख नेते एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. त्यांच्यासोबतच जिल्ह्याचे जलसंपदा मंत्री तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे-पाटील हे देखील उपस्थित राहणार आहेत. ही सभा गुरुवारी (दिनांक २७ नोव्हेंबर) दुपारी ३ वाजता, नवीन नगर रोड येथे होणार असून याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे. आमदार अमोल खताळ, नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ आणि महायुतीचे सर्व प्रभागांतील उमेदवार नागरिकांपर्यंत पोहोचून विकासाभिमुख योजना आणि नगरपरिषदेचा आगामी रोडमॅप मांडत आहेत. प्रत्येक प्रभागात मोठे जनसंपर्क अभियान, पदयात्रा आणि…
संगमनेर: सहकार हा संगमनेर तालुक्याचा श्वास राहिला आहे. मात्र गेल्या काही दिवसात तालुक्याचे सहकार समृद्धीची घडी विस्कटक चालली असून तालुक्यात अपप्रवृत्तींचा शिरकाव झाला आहे. तालुक्यातील शांतता व समृद्धी कायम राखण्यासाठी या गैर अपप्रवृत्तींचा सर्वांनी एकत्र येऊन बीमोड करण्याची आवश्यकता असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आणि लोकनेते बाळासाहेब थोरात यांनी केले. हंगेवाडी (संगमनेर) येथे सुभाषचंद्र बोस पतसंस्थेच्या नूतन इमारत लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने थोरात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, जिल्हा बँकेचे संचालक गणपतराव सांगळे, संगमनेर तालुका दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, शंकरराव खेमनर, डॉ. जयश्रीताई थोरात, सुधाकर जोशी, संपतराव डोंगरे, शरद नाना थोरात, आर. बी. राहणे, राजेंद्र चकोर,…
मेष – सकाळच्या वेळी काही महत्त्वपूर्ण सिद्धी मिळाल्यानंतर दिवसभर उत्साह टिकून राहील. धन आणि प्रतिष्ठेची प्राप्ती होईल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाशी जवळीक वाढेल. व्यावसायिक कामांमध्ये काही बदल होण्याची शक्यता आहे. मात्र, कोणत्याही गोष्टीवर जास्त हट्ट आणि कठोरता ठेवल्यास नुकसान होऊ शकते. तांत्रिक कामांशी संबंधित लोकांसाठी दिवस चांगला आहे. वृषभ – आज सल्ला आणि परिस्थिती या दोन्हींचे चांगले सहकार्य मिळेल. विरोधक त्रास देतील, पण वेळेची अनुकूलता तुमच्या बाजूने असल्याने फायदा होईल. आजचा दिवस खूप शुभ आणि लाभदायक ठरू शकतो. नशिबाची साथ मिळाल्याने कमी प्रयत्नात जास्त यश मिळेल, ज्यामुळे मन प्रसन्न राहील. कार्यक्षेत्रात काही अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते. मिथुन – आज विश्वस्त…
