Author: Annant Ppangarkar
बुधवार, दि. ०१ जानेवारी २०२५ नाशिक – वकील असलेल्या तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने निकाल लाऊन दिल्याचे मोबदल्यात ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवल्यामुळे विभागीय आयुक्त कार्यालयाचे महसूल सहायक कैलास वैरागे यांच्यावर लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई करत गुन्हा दाखल केला आहे. विभागीय आयुक्त कार्यालय नासिक येथे दाखल केलेल्या पुर्न निरिक्षण दाव्याचा निकाल तक्रारदार यांच्या पक्षकारांच्या बाजूने लाऊन देण्याचे व नंतर लागलेला निकाल जाणीवपूर्वक विलंबाने अपलोड करून तो तक्रारदार यांच्या पक्षकाराच्या बाजूने लाऊन दिल्याचे मोबदल्यात वेळोवेळी फोनवरून तक्रारदार यांच्याकडे ३० हजार रुपयांची लाचेची मागणी करून ती स्वीकारण्याची तयारी दर्शवली. लाचेची मागणी केल्याचे स्पष्ट झाल्याने लाच लुचपत प्रतिबंधक…
कष्टकरी, शेतकऱ्यांसह सगळ्यांना घेणार सोबत, नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिल्या नागरिकांना शुभेच्छा मुंबई, दि. ३१ :- नवा महाराष्ट्र घडवायचा आहे. प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी गतीशील बनवायचे आहे. त्यासाठी आपण सगळ्यांनी ..महाराष्ट्र आता थांबणार नाही…अशी प्रतिज्ञा करूया, एकजूट करुया असा निर्धार व्यक्त करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा निर्धार पूर्ण करण्यासाठी राज्यातील कष्टकरी, शेतकरी, कामगारासह सर्वांचीच साथ लाभेल, असा विश्वास देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी नववर्षाच्या पूर्वसंध्येला दिलेल्या शुभेच्छा संदेशात नमूद केला आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणतात, ‘येणारे वर्ष सुख, समाधान आणि समृद्धी घेऊन येवो. महाराष्ट्राच्या प्रगतीची पताका अखंडीत फडकत ठेवण्याची ऊर्जा आणि उर्मी मिळत राहो, हीच मनोकामना. छत्रपती शिवाजी…
मुंबई, दि. ३१ :- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ या नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर घेऊन जाणारं ठरेल, असा विश्वासही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात व्यक्त केला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या शुभेच्छा संदेशात म्हणतात की, महाराष्ट्रवासियांची एकजूट आणि निर्धाराच्या बळावर आपण आतापर्यंत राज्यावर येणाऱ्या प्रत्येक आव्हानांचा यशस्वी मुकाबला केला. महाराष्ट्राची ही एकजूट यापुढेही कायम ठेवायची आहे. कृषी, उद्योग व्यापार, शिक्षण, सहकार, कला, क्रीडा, साहित्य, संस्कृती, सामाजिक सुधारणा अशा अनेक क्षेत्रात महाराष्ट्र नेहमीच देशात अव्वल राहिला आहे. महाराष्ट्राचं हे अव्वल स्थान…
विशेष प्रतिनिधी / मुंबई मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी कथित आरोपी वाल्मिक कराड याचे पाठीराखे असलेले मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधातील पुरावे मिळाल्याशिवाय त्यांना मंत्रिमंडळातून दूर केलं जाणार नसल्याचं आता स्पष्ट झालं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीच यासंबधीचा खुलासा करत मुंडे यांची एकप्रकारे पाठराखण केली आहे. संतोष देशमुखांच्या हत्येच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सह्याद्री अतिथीगृहाबाहेर माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी विरोधक मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी करत आहेत असा प्रश्न केला. त्यावर उत्तर देताना फडणवीस म्हणाले की, “मला या प्रकरणातील राजकारणात जायचं नाही. मी अगोदरपासून सांगत आलो…
मंगळवार, ३१ डिसेंबर वाल्मीक कराड मंगळवारी पुणे पोलिसांना शरण आला आहे. या संदर्भात राज्याचे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महत्त्वपूर्ण विधान केले असून दहशत कायमची संपली तरच न्याय झाला असे म्हणता येईल, अन्यथा ही शरणागती तपासाची नौटंकी ठरेल असे म्हटले आहे. खंडणी प्रकरणातील आरोपी आणि बीडमधील सरपंच हत्या प्रकरणातील संशयित वाल्मिक कराड आज अखेर सीआयडीकडे शरण आला आहे. पवनचक्की कंपनीला खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर मागील २२ दिवसांपासून कराड हा फरार होता. वाल्मिक कराडसह सरपंच हत्या प्रकरणातील इतर फरार तीन आरोपींना अटक करावी, या मागणीसाठी बीडमध्ये नुकताच सर्वपक्षीय मोर्चाही काढण्यात आला होता. या मोर्चानंतर सरकारवर निर्माण झालेल्या दबावाच्या पार्श्वभूमीवर सीआयकडून…
मंगळवार, ३१ डिसेंबर पुणे – दोन कोटींच्या खंडणीप्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ऑफिसला शरण आला आहे. शरण येण्याआधी त्याचा एक व्हिडीओ पुढे आला होता. यात त्याने आपण शरणागती पत्करत असल्याची माहिती दिली आहे. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या होऊन २२ दिवस उलटले आहेत. या प्रकरणातही वाल्मिकी कराडचं नाव घेतलं जात आहे. त्या अनुषंगानेही कराडची चौकशी होणार असल्याचं सांगितलं जात आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणाने महाराष्ट्रभर संतापाचे लाट उसळली आहे. हत्या प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. तसेच, राज्यातील राजकीय वातावरणही तापले होते. त्यातच खंडणीसह इतरही गंभीर आरोप वाल्मीक कराड याच्यावर आहेत. पण खंडणी प्रकरणात तो सीआयडीला हवा होता. विरोधकांनी सातत्याने…
आरोपींना अटक करा, टोल प्रशासनाला सहकार्य करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करा आठ दिवसात टोल नाका बंद झाला नाही तर पुन्हा आंदोलन, टोल नाका फोडणार, संगमनेरकरांचा प्रशासनाला इशारा मंगळवार, ३१ डिसेंबर संगमनेर – नाशिक-पुणे मार्गावर असलेल्या संगमनेरलगतच्या हिवरगाव पावसा येथील टोल नाक्यावरील टोल कर्मचाऱ्यांची गुंडागर्दी पुन्हा एकदा समोर आली आहे. शनिवारी रात्री या टोलनाक्यावर भारतीय जनता पक्षाचे शहर उपाध्यक्ष असलेले अतुल कासट यांच्यासह त्यांच्या भावांना आणि मित्राला टोल कर्मचाऱ्यांनी बेदम मारहाण केली आहे. मारहाणीत अतुल आणि अमित हे दोघे कासट बंधू गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. दरम्यान टोल कर्मचाऱ्यांच्या गुंडागर्दी विरोधात आज एकवटले असून व्यापाऱ्यांसह सर्वपक्षीय संगमनेरकरांनी…
सोमवार ३० डिसेंबर संगमनेर – शहरातील बीएड कॉलेज रस्त्यावर असलेल्या भाजीपाला विक्रेत्यांवर नगरपरिषदेने कारवाईचा बडगा उगारला आहे. नगरपालिकेने ट्रॅक्टर पाठवून देतील भाजीपाला विक्रेत्यांना निघून जाण्यास सांगितले. नगरपालिकेची ही कारवाई अत्यंत मनमानी असून नगरपालिकेचा अन्याय सहन करणार नसल्याचा इशारा नगरपालिकेच्या पथविक्रेता समितीचे सदस्य ॲड. संग्राम जोंधळे यांनी दिला आहे. या मनमानी कारवाईचा निषेध करण्यासाठी भाजीपाला विक्रेते एकत्र जमा झाले होते, यावेळी जोंधळे बोलत होते. संघर्ष संघटनेचे जिल्हाध्यक्ष केशवराव जाधव, शहराध्यक्ष दत्तात्रय कांडेकर, भाजीपाला विक्रेते माजी सरपंच लांडगे यांच्यासह भाजीपाला विक्रेते यावेळी उपस्थित होते. जोंधळे म्हणाले, संगमनेर शहरांमध्ये नेहरू चौक, बी. एड. कॉलेज, मालदाड रोड, नवीन नगर रोड अशा अनेक ठिकाणी भाजीपाला…
सोमवार ३० डिसेंबर अहिल्यानगर – तालुक्यात अवैधरित्या गौणखनिज उत्खनन करुन वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या मालकांनी दंडात्मक कार्यवाहीत आदेशातील रक्कम शासन जमा न केल्याने ही रक्कम वसूल करण्यासाठी कारवाई जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. २ जानेवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता अहिल्यानगरच्या तहसील कार्यालयाजवळील गंगा उद्यानाच्या मागील बाजूस जप्त केलेल्या वाहनांचा लिलाव करण्यात येणार आहे. लिलावात भाग घेण्याचा अर्ज, लिलाव होणाऱ्या जंगम मालमत्तेची किंमत, अनामत रक्कम, तसेच लिलावाच्या अटी व शर्तीकरिता तहसीलदार अहिल्यानगर यांच्याशी कार्यालयीन वेळेत संपर्क साधावा, असे तहसीलदार संजय शिंदे यांनी कळविले आहे.
सोमवार ३० डिसेंबर मुंबई – मुंबई उत्तर पश्चिम मतदार संघातून लोकसभा निवडणुकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी झालेले शिवसेना (शिंदे गट) खासदार रवींद्र वायकर यांच्या वाहनाला अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे. सुदैवाने या अपघातात कोणीही जखमी झाले नसून कोणतीही जीवितहानी झाली नाही. खासदार वायकर देखील या गाडीत असल्याची माहिती समोर येत आहे. रविवारी रात्री पश्चिम द्रुतगती महामार्गाजवळ जोगेश्वरीच्या एसआरपीएफ कॅम्पच्या प्रवेशद्वारासमोर हा अपघात झाला. अपघातावेळी वाहन चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आपण आता नंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी केली जात आहे. लोकसभा निवडणुकीत ४८ मतांनी विजयी… मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीत रविंद्र वायकर…
सोमवार ३० डिसेंबर नवी दिल्ली : राज्यात विधानसभा निवडणूक पार पडल्यानंतर मोठ्या बहुमताने सत्तेवर आलेल्या भाजपमध्ये लवकरच संघटनात्मक पातळीवर मोठे फेरबदल होणार असून, महाराष्ट्रासह सात राज्यांचे भाजप अध्यक्ष बदलण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पक्षाला नवा राष्ट्रीय अध्यक्ष मिळण्याची शक्यता आहे. या राज्यात बदल – मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, जम्मू-काश्मीर आणि झारखंडमधील प्रदेशाध्यक्ष बदलले जाणार आहेत. मात्र, भाजपच्या घटनेनुसार या फेरबदलांपूर्वी पक्षाला ५० टक्के राज्यांमध्ये संघटनात्मक निवडणुका पूर्ण कराव्या लागणार आहेत. राज्यात विद्यमान प्रदेशाध्यक्ष मंत्री – नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रात विद्यमान प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना मंत्रिमंडळात स्थान देण्यात आले…
रविवार, २९ डिसेंबर मुंबई – बीडमधील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे हत्या प्रकरण राज्यभरात चर्चेत आहे. या प्रकरणात थेट मंत्री धनंजय मुंडे यांच्या समर्थकांचे नाव समोर आल्याने राज्यभर खळबळ उडाली असतानाच सामाजिक कार्यकर्ता अंजली दमानिया यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील तीन फरार आरोपींची हत्या झाल्याचा धक्कादायक दावा केल्याने आता बीड पोलिसांनी त्यांना नोटीस पाठविली आहे. दमानिया यांनी आरोपींच्या मृत्यू संदर्भात जो दावा केला त्याचे अधिकचे स्पष्टीकरण देण्याची मागणी या नोटीसद्वारे बीड पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उस्मान शेख यांनी दिलेल्या नोटीसद्वारे केली आहे. ज्या मोबाईल नंबरवरून व्हॉइस मेसेज आलेत, तो मोबाईल नंबर, व्हॉइस मेसेज, इतर माहिती आणि पुरावे…
बीडच्या मस्साजोगचे सरपंच सुभाष देशमुख यांच्या निघृण हत्येच्या घटनेने महाराष्ट्राची लक्तरं गेल्या पंधरा दिवसांपासून सार्या देशभर निघत आहेत. सुसंस्कृत महाराष्ट्रात असं होऊ शकतं, याची खात्रीच देशमुख यांच्या हत्येने देशाला करून दिली आहे. या प्रकरणातला तपास ज्या गतीने सुरू आहे ते पहाता महाराष्ट्राला वळणावर आणण्याच्या आणाभाका देणार्या गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे राज्य सावरता येईल, असं वाटत नाही. एका सरपंचाचा खून होतो, लोकं रस्त्यावर उतरतात, सरपंचांची लहान मुलगी न्यायासाठी सरकारकडे याचना करत असतानाही गेल्या पंधरा दिवसांपासून खुनी सापडत नाही, हे कसं शक्य आहे? एक काळ होता दाऊद आणि गवळी गँगने दिवसाढवळ्या खून खराबा करत मुंबईची अवस्था बिकट करून ठेवली होती. सरकारने…
शनिवार, २८ डिसेंबर संगमनेर – गुजरातच्या दोघा व्यापाऱ्यांनी संगमनेरमधील शेतमाल विक्रेत्याची पंधरा लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. येथील शेतमाल व्यापारी प्रशांत प्रताप नेहे रा. समनापुर, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात मनोज भारवाड व सुरेश भारती या दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नेहे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ते गेल्या पंधरा वर्षांपासून फ्लॉवर व टोमॅटो विक्रीचा व्यवसाय करत गेल्या पाच वर्षांपासून पांडुरंग माधव चांडे (रा. समनापुर) हे त्यांचे भागीदार असून दोघेही आपला शेतमाल बाहेरील राज्यात विक्रीसाठी पाठवीत असतात. फिर्यादी व्यापारानिमित्त अहमदाबाद येथे गेले असताना त्यांची दोन वर्षांपूर्वी मनोज भारवाड व सुरेश…
शनिवार, २८ डिसेंबर संगमनेर – हल्ली संगमनेरमध्ये दुचाकी, दागिने चोऱ्या वाढल्या असतानाच आता अज्ञात चोरट्याने चक्क दारूचे दुकान फोडून पाऊण लाखाची दारू लंपास केल्याचा प्रकार समोर आला आहे. नासिक-पुणे मार्गावर सातत्याने असलेल्या वर्दळीच्या ठिकाणी घडलेल्या या प्रकारामुळे गुन्हेगारांवरील नियंत्रण सुटलेल्या संगमनेर पोलिसांना दारूचे दुकान फोडत गुन्हेगारांनी नवे आव्हान दिले आहे. संगमनेर शहर पोलीस ठाण्यात या संदर्भात हॉटेल व्यवस्थापकाने दिलेल्या फिर्यादीनुसार शहर पोलिसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध ७१ हजार ६६० रुपयांची विविध कंपनीची दारू चोरून नेल्याचा गुन्हा दाखल केला आहे. अधिक माहिती अशी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ असलेल्या अरगडे गल्लीतील डिद्दी यांच्या मालकीचे हॉटेल वाईन स्पॉट हे हॉटेल बुधवारी (२५ डिसेंबर) रात्री…
शुक्रवार २७ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या प्रकरणात वाल्मिकी कराड यांचे समर्थक समजल्या जाणारे फडणवीस सरकारमधील मंत्री धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचा तात्काळ राजीनामा घेण्याची मागणी जोर धरू लागली आहे. देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ शनिवारी बीडमध्ये प्रचंड मोर्चा काढला जाणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार हे या मोर्चात सहभागी होणार असल्याने प्रचंड गर्दी होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी बीडमध्ये पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आणि हत्येतील मास्टर माईंडची माहिती त्यांना दिली. बीडच्या मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणातील आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी करत त्यांनी…
शुक्रवार, २७ डिसेंबर विशेष प्रतिनिधी / मुंबई देशाचे यशस्वी पंतप्रधान मनमोहन सिंग याचे सरकार उलथवून टाकण्यासाठी दिल्लीत आंदोलनाची हाक देणारे समाजसेवक अण्णा हजारे यांना उपरती झाली आहे. मोदींच्या भ्रष्ट सरकारवर एका शब्दात टीका न करणारे अण्णा हजारे यांनी मनमोहन सिंग यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहे. ‘आर्थिक सुधारणांचे जनक’ अशा शब्दात हजारे यांनी सिंग यांना आदरांजली वाहिली. समाज माध्यमामध्ये या स्तुतीवर जोरदार टीका होत आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे काल, गुरुवारी रात्री निधन झाले. सिंग यांच्या निधनाबद्दल देशभरातील आणि परदेशातील मान्यवरांनी शोक व्यक्त केला आहे. यूपीए सरकारच्या काळात भ्रष्टाचारविरोधी आंदोलन करणारे ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनीही डॉ. मनमोहन सिंग…
शुक्रवार, २७ डिसेंबर दुसऱ्या मजल्यावरील घरात गळफास घेत माय-लेकीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. आपल्या नववर्षाच्या मुलीसह आईने आत्महत्या केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मायलेकीच्या मृतदेहाजवळ पोलिसांना एका वहीमध्ये सुसाईड नोट आढळून आली आहे. सपना माळी (वय- ३३) व केतकी माळी (वय- ९) असे आत्महत्या करणाऱ्या माय लेकीचे नाव आहे. ही घटना गुरुवारी (२६ डिसेंबर) दुपारी तीनच्या सुमारास जळगाव जिल्ह्यातील एरंडोलमधील जहांगीरपुरा परिसरामध्ये घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सपना माळी यांचा आठ वर्षापुर्वी पतीसोबत घटस्फोट झाला होता. घटस्फोटानंतर त्या आपल्या माहेरी मुलीसह एरंडोलमधील महादेव मंदिर परिसरात राहत होत्या. दरम्यान, गुरुवारी दुपारच्या वेळी सपना यांचा भाऊ घरी आल्यानंतर त्याला दोघी माय-लेकींनी…
शुक्रवार, २७ डिसेंबर सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने एकावर खुनी हल्ला केला मात्र, राजकीय बड्या नेत्याने पोलिसांवर दबाव टाकल्याने या गुन्ह्यातून सराईत आरोपीचे नाव वगळण्यात आले. सराईत आरोपीचे नाव वगळणे संबंधित पोलीस उपनिरीक्षकाला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकाराची माहिती मिळतात पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी संबंधित आरोपीला तात्काळ बेड्या ठोकण्याची आदेश देत पोलीस उपनिरीक्षकाचे तडकाफडकी निलंबन केले आहे. रविवारी (२२ डिसेंबर) काळेवाडी येथे दोन गटात हाणामारी झाली यामध्ये आरोपींकडून एका व्यक्तीवर खुनी हल्ला करण्यात आला होता. एका सराईत गुन्हेगाराने आपल्या साथीदारांच्या मदतीने हा हल्ला केला. त्यानंतर एका बड्या राजकीय नेत्याने पोलिसांवर दबाव टाकत या सराईत गुन्हेगाराचे नाव आरोपीच्या यादीतून…
शुक्रवार २७ डिसेंबर संगमनेर – भारतीय रिझर्व बँकेचे गव्हर्नर, देशाचे अर्थमंत्री आणि पंतप्रधान अशी वेगवेगळी पदे अत्यंत कार्यक्षमपणे भूषवताना डॉ. मनमोहन सिंग यांनी जागतिक मंदीतून देशाला बाहेर काढले. खुली अर्थव्यवस्था, उदारीकरण स्वीकारून देशाची अर्थव्यवस्था बळकट करणारे डॉ. मनमोहन सिंग हे जागतिक पातळीचे अर्थतज्ञ होते. त्यांच्या निधनाने देशाचे महान व्यक्तिमत्व हरपले असल्याची भावना काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केली आहे. देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री रुग्णालयात उपचार घेताना निधन झाले. थोरात यांच्या यशोधन या जनसंपर्क कार्यालय त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, डॉ. जयश्री थोरात,…
