Author: अनंत पांगारकर

मेष रास –  आज तुमचा मन हलके आणि उत्साही राहील. नवीन कामे सुरू करण्याचा उत्साह असेल आणि छोट्या-छोट्या समस्या तुम्ही सहज हाताळू शकाल. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तसेच, सामाजिक क्षेत्रात यश आणि प्रसिद्धी मिळेल. वृषभ रास –  आज तुमचे मन शांत राहील आणि कामे हळू-हळू पूर्ण करण्याची क्षमता तुमच्यात असेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या तुम्ही सहजपणे पार पाडू शकाल. व्यवसायात संयम बाळगण्याची गरज आहे. ज्यादा काम केल्यास फायदा होईल, पण खर्चही वाढू शकतो. मिथुन रास –  आज तुमच्या खाजगी जीवनातील समस्या संपतील. तुम्ही व्यवसायात कोणतीही मोठी डील करू शकता. बाजारपेठेत अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. कोणाशी तरी वाद संभवतो, त्यामुळे…

Read More

संगमनेर – संगमनेर शहर पोलिसांनी अंमली पदार्थविरोधात आतापर्यंतची आणखी एक मोठी आणि निर्णायक मोहीम यशस्वी केली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी तब्बल 3,09,000 रुपये किमतीचे ‘मेफेड्रोन’ (Mephredone – M.D.) हे उच्चभ्रू ड्रग्ज जप्त केले आहे. या कारवाईत नाशिक येथील एका तरुणाला अटक करण्यात आली असून, तस्करीसाठी वापरलेली 40 लाख रुपये किमतीची टोयोटा फॉर्च्युनर (क्र. MH 15 FF 9630) ही आलिशान गाडीही जप्त करण्यात आली आहे. जप्त केलेल्या ड्रग्ज आणि वाहनाची एकूण किंमत सुमारे 43 लाख रुपये इतकी आहे. संगमनेरचे पोलीस उपाधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील तपास पथकात असलेले पोलिस कॉन्स्टेबल राहुल कैलास सारबंदे यांच्या फिर्यादीनुसार, ही…

Read More

अहिल्यानगर: मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजनेच्या कामाचे देयक मंजूर करण्यासाठी पारनेर पंचायत समितीचे उपअभियंता आणि दोन कर्मचारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) जाळ्यात अडकले आहेत. यापैकी पॅनल तांत्रिक अधिकारी विलास नवनाथ चौधरी आणि तांत्रिक सहायक दिनकर दत्तात्रय मगर या दोघांना अटक करण्यात आली आहे, तर उपअभियंता अजय विठ्ठल जगदाळे हे पसार झाले आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदाराच्या नातेवाईकांच्या फर्मला पारनेर येथील ‘मातोश्री ग्राम समृद्धी पानंद रस्ते योजने’ अंतर्गत कारेगाव ते वाघोबा रस्ता खडीकरण व मजबुतीकरणाचे काम मिळाले होते. या कामाचे मोजमाप करणे, देयके तयार करणे आणि मंजुरीसाठी पाठवणे ही जबाबदारी उपअभियंता अजय जगदाळे, पॅनल तांत्रिक अधिकारी विलास चौधरी…

Read More

मेष –  आज तुमचा आत्मविश्वास उच्च असेल. कार्यस्थळी तुमच्या कल्पनांना आणि योजनांना यश मिळेल, ज्यामुळे तुमच्या कामाची प्रशंसा होईल. आर्थिक बाबतीत दिवस शुभ आहे आणि उत्पन्नाचे नवीन स्रोत मिळू शकतात. तब्येत चांगली राहील, उत्साह कायम असेल. वृषभ –  हा दिवस तुमच्यासाठी सकारात्मक आणि लाभदायक आहे. तुमच्या बुद्धीचा आणि अनुभवाचा योग्य वापर केल्यास मोठे यश मिळेल. कुटुंबाचे उत्तम सहकार्य मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. नोकरीत पदोन्नती किंवा वेतनवाढीचे संकेत आहेत. मिथुन – आज तुमचे लक्ष विचलित होण्याची शक्यता आहे, त्यामुळे कामावर पूर्ण एकाग्रता ठेवा. प्रवास संभवतो, परंतु काळजीपूर्वक करा. भागीदारीच्या कामात विचारपूर्वक निर्णय घ्या. सायंकाळपर्यंत कुटुंबासोबत वेळ घालवल्यास मनःशांती मिळेल. कर्क…

Read More

संगमनेर – शासनाने नागरी क्षेत्रांतील कोट्यवधी नागरिकांना मोठा दिलासा देणारा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार, नागरी भागांमध्ये तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमिनीचे व्यवहार आता विनाशुल्क नियमित करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे राज्यातील सुमारे ३ कोटी लोकांना थेट कायदेशीर आणि आर्थिक संरक्षण मिळणार आहे. या संदर्भात आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून माहिती देण्यात आली आहे. मागील अनेक वर्षांपासून, तुकडेबंदी कायद्याचे उल्लंघन करून झालेले जमीन खरेदी-विक्रीचे व्यवहार कायद्याच्या कचाट्यात अडकले होते, ज्यामुळे लाखो सर्वसामान्य नागरिक आर्थिक आणि कायदेशीर अडचणीत सापडले होते. हेच लक्षात घेऊन, आमदार खताळ यांनी विधानसभेत या समस्येकडे लक्ष वेधले आणि हे व्यवहार शुल्क न आकारता त्वरित…

Read More

संगमनेर – अनंत पांगारकर संगमनेर नगरपालिकेच्या होऊ घातलेल्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत शिवसेनेच्या उमेदवार श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांच्या उमेदवारी अर्जावर नगराध्यक्षपदाच्या दुसऱ्या अपक्ष उमेदवार सुषमा तवरेज यांनी कायदेशीर आक्षेप नोंदवत अर्ज अवैध ठरविण्याची मागणी केल्याने निवडणुकीच्या रिंगणात मोठी खळबळ उडाली आहे. हा आक्षेप थेट ‘दुहेरी मतदार नोंदणी’शी संबंधित असून, यामुळे उमेदवारी अर्जाची वैधता धोक्यात येण्याची चिन्हे निर्माण झाली आहे. संगमनेर नगर परिषद निवडणुकीसाठी नियुक्त केलेले निवडणूक निर्णय अधिकारी अरुण मुंडे यांच्याकडे तवरेज यांनी हा आक्षेप नोंदविला आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, श्रीमती सुवर्णा विठ्ठल रहाणे उर्फ सुवर्णा संदीप खताळ यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.…

Read More

संगमनेर: (प्रतिनिधी) – राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता माजी महसूलमंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी वर्तवली आहे. राज्यातील महायुतीमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली अंतर्गत घुसमट आता तीव्र होत चालली असून, या मतभेदांचा मोठा स्फोट लवकरच पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला. ते संगमनेर येथे प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. माजीमंत्री थोरात म्हणाले की, महायुतीतील घटकपक्षांमध्ये गेल्या काही आठवड्यांपासून प्रचंड वाद-विवाद, आरोप-प्रत्यारोप आणि नाराजीचे वातावरण आहे. हे मतभेद आता उघडपणे समोर येत आहेत. ही केवळ सुरुवात आहे; पुढे याचा मोठा राजकीय स्फोट दिसेल. थोरात यांच्या या विधानामुळे महायुतीतील अस्थिरतेच्या चर्चांना पुन्हा एकदा बळ मिळाले आहे. भाजपकडून काँग्रेस…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन: लाच घेणाऱ्यांवर न्यायालयात कारवाई करण्याची जबाबदारी असताना, त्याच सहायक सरकारी वकिलाने लाचेची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका लाच प्रकरणातील आरोपीला निर्दोष मुक्तता मिळाल्यानंतर, त्या निकालाविरुद्ध उच्च न्यायालयात अपील न करण्यासाठी लाच मागणाऱ्या सहायक सरकारी वकील शरद बन्सी बांगर (वय ४३) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदाराची एका लाच प्रकरणात १९ नोव्हेंबर २०२४ रोजी निर्दोष मुक्तता झाली होती. या निकालाला शासनातर्फे उच्च न्यायालयात आव्हान न देण्यासाठी वकील बांगर यांनी तक्रारदाराकडे २ लाख रुपयांची लाच मागितली होती. धक्कादायक बाब म्हणजे, तक्रारदाराने यापूर्वीच बांगर यांना १ लाख ५० हजार रुपये दिले होते आणि उर्वरित ५०…

Read More

मेष (Aries): आजचा दिवस उत्साहवर्धक असेल. भाग्याची साथ मिळेल. अडकलेली कामे मार्गी लागतील. आध्यात्मिक कार्यात रुची वाढेल. नोकरीच्या शोधात असलेल्यांना दिलासा मिळू शकतो. व्यवसायात चांगला नफा होण्याची शक्यता आहे. वृषभ (Taurus): आजचा दिवस उत्तम राहील. नवीन योजनांवर काम सुरू करू शकता. कामाच्या ठिकाणी नवीन जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. खर्चात वाढ होऊ शकते, पण अडकलेले पैसे परत मिळण्याचीही शक्यता आहे. मिथुन (Gemini): आज तुम्हाला चांगल्या बातम्या मिळू शकतात. नोकरीत नवीन ऑफर मिळू शकतील. व्यवसायाशी संबंधित नवीन करार होऊ शकतो. कर्क (Cancer): कौटुंबिक बाबींवर लक्ष देण्याची गरज आहे. घरातील वातावरण चांगले ठेवण्याचा प्रयत्न करा. प्रशासकीय बाबी तुमच्या बाजूने राहतील. सिंह (Leo): आर्थिक…

Read More

संगमनेर: संगमनेर नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आता निवडणुकीचे मैदान सोडणाऱ्या उमेदवारांची अर्थात ‘रणछोडदास’ बनणाऱ्यांची चर्चा सुरू झाली आहे. बुधवारी अर्ज मागे घेण्याच्या पहिल्याच दिवशी तीन उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेत निवडणुकीतून माघार घेतली आहे. अनेक इच्छुकांनी अर्ज दाखल केले असले तरी, ‘मनधरणी’नंतर अर्ज मागे घेणाऱ्यांची संख्या वाढू लागली आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अखेरचा दिवस शुक्रवार, 21 नोव्हेंबर असल्याने, अंतिम दिवसापर्यंत किती उमेदवार निवडणुकीचे मैदान सोडून ‘रणछोडदास’ बनतात, याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे. बुधवारी नगरसेवक पदासाठी अर्ज दाखल केलेल्या दिड्डी रूपाली अभिजीत आणि जहागीरआली जावेदअली सय्यद या दोन अपक्ष उमेदवारांनी तर नगराध्यक्षपदासाठी अर्ज भरणाऱ्या डॉ. रूपाली…

Read More