Author: अनंत पांगारकर
राज्याच्या राजकारणात नवा पैलू निर्माण करू पाहणार्या दोन ठाकरेंच्या एक होण्याच्या संभाव्य घटनेने शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांच्या आशा चांगल्याच पल्लवीत झाल्या होत्या. असं काही झालं तर त्याचे सकारात्मक परिणाम महाराष्ट्रात पहायला मिळतील आणि अनैतिक मार्गाने सत्तेवर बसलेल्या महायुतीला त्याची किंमत मोजावी लागेल, अशी चिन्हं दिसू लागली होती. दोन भाऊ एक होण्याची शक्यता दिसू लागल्याने महाविकास आघाडीच्या घटक पक्षांनाही हायसं झालं होतं. सत्तेचा वारू उधळणार्या भाजपला याचा सर्वाधिक फटका बसू शकतो हे लक्षात आल्याने आपला फायदा न होता भाजपची उडू पाहणारी संभाव्य त्रेधा महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना हवीच होती. यामुळे आतून काहीही वाटत असलं तरी दोन्ही भाऊ एक व्हावेत, अशा मानसिकतेत…
संगमनेर, प्रतिनिधी- सरकारने शेतकरी कर्जमाफीसाठी समिती स्थापन करण्याचा घेतलेला निर्णय म्हणजे शेतकऱ्यांची पुन्हा एकदा फसवणूक ठरू नये, अशी आग्रही मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी सुरू केलेले अन्नत्याग आंदोलन थांबवण्यासाठी सरकारने घेतलेली भूमिका फसवी असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. सत्ताधारी पक्षाने सत्तेवर येण्यापूर्वी पहिल्याच कॅबिनेट बैठकीत शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन दिलं होतं. हे आश्वासन पाळणं हे सरकारचं नैतिक आणि राजकीय कर्तव्य आहे. त्यामुळे सरकारने समिती स्थापन करण्याऐवजी सरसकट कर्जमाफीची घोषणा करावी, अशी स्पष्ट भूमिका थोरात यांनी मांडली. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी समिती कशाला? माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सरकारवर जोरदार टीका करताना म्हटलं…
अहिल्यानगर, अहिल्यानगर जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी अरुण उंडे यांनी मुंबई पोलीस अधिनियम १९५१ च्या कलम ३७ (१) (३) अन्वये जिल्ह्यात शस्त्रबंदी आणि जमावबंदी आदेश जारी केला आहे. हा आदेश १३ जून २०२५ पासून ते २६ जून २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत लागू राहणार आहे. या आदेशानुसार, जिल्ह्यात कोणतीही व्यक्ती शस्त्र बाळगणार नाही किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तींचा जमाव करणार नाही. जिल्ह्याची शांतता आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या आदेशातून कोणाला वगळण्यात आले आहे? प्रशासनाने नागरिकांच्या सोयीसाठी आणि काही अपवादात्मक परिस्थिती विचारात घेऊन काही घटकांना…
संगमनेर, प्रतिनिधी – शहरालगत असणाऱ्या खांडगाव शिवारात प्रवरा नदीपात्रातून बेकायदा वाळू वाहतूक करण्याच्या उद्देशाने सुमारे ४० ब्रास वाळू साठा करणाऱ्या वाळू तस्करांवर आणि पिकअपमधून वाळू वाहतूक करणाऱ्या एका अशा सहा जणांवर संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान वाळू वाहतूक करणारा वाहनचालक कारवाईदरम्यान पळून गेला असल्याची माहिती मिळाली. तलाठी प्रवीण डहाके यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलीस ठाण्यात शरद कारभारी गुंजाळ, गणेश बालोडे, सुनील बोऱ्हाडे, बबलू सातपुते, लहानु बालोडे, निकुंज सुधीर ढोले या सहा वाळू तस्करांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशासन या प्रकरणे आता या तस्करांवर नेमकी काय कारवाई करते याकडे लक्ष लागले आहे. वाळू तस्करी…
आषाढी यात्रेसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला २.६१ कोटींचा निधी मंजूर: वारकऱ्यांसाठी मिळणार अद्ययावत सुविधा
अहिल्यानगर- आषाढी वारीसाठी पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयीसाठी अहिल्यानगर जिल्ह्याला राज्य सरकारकडून २ कोटी ६१ लाख ८० हजार रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. राज्याचे जलसंपदामंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही माहिती दिली. ग्रामविकास विभागामार्फत उपलब्ध होणाऱ्या या निधीतून वारकऱ्यांसाठी वॉटरप्रूफ मंडप, शौचालये, स्नानगृहे, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सुविधा आणि ग्रामपंचायत सहाय्य अनुदान यांसारख्या आवश्यक सुविधा पुरवण्यात येणार आहेत. दरवर्षी अहिल्यानगर जिल्ह्यातून पैठण येथील संत एकनाथ महाराज, त्र्यंबकेश्वर येथील संत निवृतीनाथ महाराज, पिंपळनेर येथील संत निळोबाराय महाराज यांच्या प्रमुख पालख्यांसह सुमारे १६० स्थानिक पालख्या पंढरपूरकडे जातात. या प्रवासात वारकऱ्यांची, विशेषतः महिला वारकऱ्यांची कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी पालकमंत्री विखे…
संगमनेर, प्रतिनिधी: संत निवृत्तीनाथ महाराजांच्या आषाढी वारीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या पालखीतील वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी आमदार अमोल खताळ यांनी सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. पारेगाव बुद्रुक येथे पालखीचा मुक्काम असतो आणि यावर्षी वारकऱ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे. आमदार खताळ यांनी पारेगाव येथे ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेतला. गेल्या वर्षी पावसाने वारकऱ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय झाली होती, त्यामुळे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जिल्हाधिकारी व अन्य विभागांना गंभीरपणे नियोजन करण्याच्या सूचना दिल्या होत्या. या पार्श्वभूमीवर, आमदार खताळ यांनी यंदा प्रथमच वारकऱ्यांसाठी तीन वॉटरप्रूफ मंडपांची उभारणी करण्यात येणार असल्याचे सांगितले. यासाठी महायुती सरकारने ५…
संगमनेर, 12 जून: संगमनेर शहर आणि परिसरात वाढत्या लुटमारीच्या घटनांमुळे त्रस्त झालेल्या नागरिकांना संगमनेर पोलिसांनी मोठा दिलासा दिला आहे. दोन सराईत गुन्हेगारी टोळ्यांना जेरबंद करत पोलिसांनी एकूण सात आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून तब्बल 1,55,500/- किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे शहरातील गुन्हेगारीला आळा बसण्याची आशा निर्माण झाली आहे. सातत्याने घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांमुळे संगमनेरमधील नागरिक भयभीत झाले होते, पण आता पोलिसांच्या कारवाईमुळे दिलासा मिळाला असून या धडक कारवाईचं सर्वत्र कौतुक होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले सर्व नऊ आरोपी सराईत गुन्हेगार असून साई शरद सूर्यवंशी (वय 20, रा. अकोले नाका, संगमनेर), राहुल भरत सोनवणे (वय 24,…
संगमनेर, प्रतिनिधी अहिल्यानगर येथे विशेष भूसंपादन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले उपजिल्हाधिकारी अरुण उंडे यांची संगमनेर येथील उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारीपदी नियुक्ती करण्यात आली आहे. महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय कारणास्तव ही बदली केली असून नुकतेच याबाबतचे आदेश जारी केले असून, उंडे यांना तातडीने आपल्या नवीन पदाचा कार्यभार स्वीकारण्यास सांगण्यात आले आहे. गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे प्रांताधिकारी पद रिक्त होते. यापूर्वीचे प्रांताधिकारी शैलेश हिंगे यांची बढतीवर अपर जिल्हाधिकारी म्हणून अहिल्यानगर येथे बदली झाल्यानंतर हे पद रिक्त झाले होते. तेव्हापासून या जागेसाठी अनेक चर्चा सुरू होत्या, विशेषतः महसूल प्रशासनातील अधिकारी संगमनेरला येण्यास फारसे उत्सुक नसल्याची चर्चा होती. अरुण उंडे यांच्या नियुक्तीमुळे आता या चर्चांना…
संगमनेर, प्रतिनिधी – संगमनेर तालुक्यातील कर्जुलेपठार येथे शौचालयासाठी शेतात जाण्यावरून झालेल्या वादामुळे एका महिलेची चाकूने भोसकून हत्या झाल्याची तर आणखी एक महिला जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रुपाली ज्ञानदेव वाघ (वय २५) असे मृत महिलेचे नाव आहे, तर त्यांची नणंद मोनिका वाघ या चाकू हल्ल्यात गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर लोणी येथील प्रवरा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींना १६ जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१० जून) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास रुपाली वाघ या मुरलीधर पडवळ यांच्या शेतात शौचालयासाठी गेल्या असता, विक्रम पडवळ याने त्यांना शिवीगाळ केली. या घटनेनंतर…
संगमनेर, प्रतिनिधी – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी पक्षांनी ‘मॅच फिक्सिंग’ केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला आहे. निवडणूक आयोग आता स्वायत्त राहिलेला नसून, तो भाजपसाठी काम करत असल्याचा थेट दावा थोरात यांनी केला आहे. सत्तेसाठी भाजप आणि त्यांचे मित्रपक्ष कोणत्याही थराला जाऊ शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे. दिल्लीत दिलेल्या एका मुलाखतीमध्ये त्यांनी हे स्फोटक विधान केले आहे. काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी या मुलाखतीत सांगितले की, लोकसभा विरोधी पक्षनेते खासदार राहुल गांधी यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील गैरप्रकारांबाबत सरकार आणि निवडणूक आयोगाला अनेकदा प्रश्न विचारले आहेत. मात्र, अद्यापही निवडणूक आयोगाने…
