Author: अनंत पांगारकर
नवी दिल्ली – भारतीय सुरक्षा दलांकडून चालवल्या जाणाऱ्या ‘ऑपरेशन सिंदूर’ मध्ये मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत, अशी माहिती संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी दिली आहे. गुरुवारी (८ मे) या संदर्भात सर्वपक्षीय बैठक पार पडल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही माहिती दिली. ‘ऑपरेशन सिंदूर’ अजूनही सुरू असून, सुरक्षा दल दहशतवाद्यांविरुद्ध कठोर कारवाई करत आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी सांगितले की, “आज सर्वपक्षीय बैठक झाली, ज्यामध्ये ‘ऑपरेशन सिंदूर’च्या प्रगतीवर चर्चा करण्यात आली. हे ऑपरेशन योग्य दिशेने सुरू आहे आणि सुरक्षा दलांनी यात मोठे यश मिळवले आहे. मोठ्या संख्येने दहशतवादी मारले गेले आहेत आणि दहशतवादी संघटनांचे कंबरडे…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर जिल्ह्यातील सोनई पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी संजय उर्फ गोंडया नितीन वैरागर (वय २२, रा. सोनई, ता. नेवासा) याला स्थानिक गुन्हे शाखेच्या सतर्क पथकाने मोठ्या युक्तीने जेरबंद केले आहे. आरोपी वैरागर याला जमावाच्या मारहाणीनंतर उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी संजय वैरागर याच्याविरुद्ध सोनई पोलीस ठाण्यात खुनाचा गंभीर गुन्हा दाखल आहे. २ मे २०२५ रोजी जमावाने केलेल्या मारहाणीत तो जखमी झाला होता, त्यामुळे त्याला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, ७ मे २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास त्याने रुग्णालयातील पोलिसांची नजर चुकवून पलायन केले. आरोपी फरार…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर संगमनेर पोलिसांनी काल (०७ मे) शहरातील मदिनानगर परिसरात छापा टाकून कत्तल करण्याच्या उद्देशाने निर्दयपणे बांधून ठेवलेल्या एक लाख रुपये किमतीच्या १० गोवंश जनावरांची सुटका केली. या प्रकरणी जावेद इसाक शेख (वय २७, रा. संगमनेर खुर्द) या व्यक्तीविरुद्ध महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम आणि प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संगमनेरचे पोलीस उपअधीक्षक डॉ. कुणाल सोनवणे यांना या संदर्भात गोपनीय माहिती मिळाली होती. त्यांनी लगेचच कार्यालयातील पोलीस नाईक राहूल डोके, पोलीस कॉन्स्टेबल राहुल सारबंदे यांच्या शहर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक रावसाहेब लोखंडे, पोलीस कॉन्स्टेबल विशाल कर्पे यांना माहिती मिळालेल्या ठिकाणी कारवाई करण्याचे आदेश…
महाराष्ट्र संवाद न्यूज – श्रीरामपूर श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याला साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडने दिलेला २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित झाल्याप्रकरणी श्रीगोंदा मतदारसंघाचे विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. श्रीरामपूर न्यायालयाने या प्रकरणी आमदार पाचपुते यांच्यासह साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडच्या व्यवस्थापकांनाही पकड वॉरंट बजावले आहे. न्यायालयाच्या या कठोर कारवाईमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. हिरडगाव येथील साईकृपा शुगर अँड अलाइड लिमिटेडचे माजी अध्यक्ष आणि विद्यमान आमदार विक्रम बबनराव पाचपुते आणि कारखान्याचे व्यवस्थापक यांच्याविरुद्ध श्रीरामपूर येथील अशोक सहकारी साखर कारखान्याने २० लाख रुपयांचा धनादेश अनादरित केल्याची तक्रार दाखल केली होती. या तक्रारीच्या अनुषंगाने श्रीरामपूर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अहिल्यानगर पोलिस अधीक्षक राकेश ओला यांच्या थेट आदेशानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांविरुद्ध जोरदार मोहीम उघडली आहे. एकाच वेळी जिल्ह्यातील २३ ठिकाणी धाडी टाकून एलसीबीने अवैध व्यावसायिकांचे धाबे दणाणून सोडले आहेत. या धडक कारवाईत अवैध दारू विक्री, जुगार आणि इतर अवैध धंद्यांमध्ये गुंतलेल्या ३४ आरोपींना अटक करण्यात आली असून, तब्बल २ लाख ८३ हजार ८७५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. एलसीबीच्या या ‘सर्जिकल स्ट्राईक’मुळे जिल्ह्यातील अवैध धंदे चालवणाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्याचे निर्देश दिल्यानंतर, स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक दिनेश आहेर यांनी…
महाराष्ट्र संवाद न्यूज – अकोले अकोले तालुक्यातील कळस बुद्रुक येथे काल दुपारी (दि. ७ मे) एक दुर्दैवी घटना घडली. वादळी वाऱ्यामुळे कोल्हार घोटी रस्त्यालगत असलेले एक मोठे झाड अचानक कोसळले. या दुर्घटनेत शिवाजी विश्वनाथ वाकचौरे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, काल दुपारी बाराच्या सुमारास कळस परिसरात पावसाचे वातावरण निर्माण झाले होते. शेतात असलेले कांदे झाकण्यासाठी शिवाजी वाकचौरे (वय अंदाजे ६० वर्षे) आपल्या मोटारसायकलवरून त्यांच्या सुनेसोबत जात होते. त्याचवेळी जोरदार वाऱ्यामुळे रस्त्याच्या कडेला असलेले एक मोठे महारुखचे झाड त्यांच्या अंगावर पडले. या अपघातात त्यांच्या सुनेला कोणतीही दुखापत झाली नाही, तर शिवाजी वाकचौरे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने त्यांना तातडीने संगमनेर…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पुणे-नाशिक महामार्गावर आंबीखालसा फाटा येथे गुरुवारी मध्यरात्री पोलिसांनी केलेल्या कारवाईत गोवंश जनावरांची अवैध वाहतूक उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून, सुमारे १४ लाख २५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अधिक माहिती अशी की, ०८ मे २०२५ रोजी मध्यरात्री १ वाजेच्या सुमारास पोलीस स्टेशनमध्ये बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ठाणे अमलदारांना कत्तलीच्या उद्देशाने गोवंश जनावरांची वाहतूक होत असल्याची गोपनीय माहिती दिली. पुणे-नाशिक महामार्गावरून एम.एच. २५ यु १४५५ क्रमांकाच्या ट्रक मधून गोवंश जनावरे कत्तलीसाठी घेऊन जाणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हेड कॉन्स्टेबल दिवटे यांनी तात्काळ पोलीस निरीक्षकांना याबाबत कळवले. त्यांच्या आदेशानुसार रात्रगस्तीवर असलेले पो. कॉ.…
नेत्याचा मुलगा आमदार झाला, खासदार झाला, मंत्री झाला तरी चर्चेचा विषयच बनत नाही, परंतु एका गरीब शेतकऱ्यांच्या पोरगा भावी मुख्यमंत्री म्हणून चर्चेत असलेल्या ४० वर्ष सत्तापदावर असणाऱ्या बलाढ्य नेत्यांला दहा हजार मतांचे फरकाने चितपट करून संदेश देतो की “राजा का बेटा राजा नहीं बन शकता, जो हकदार होगा वही राजा बनेगा.” खरंतर संगमनेर विधानसभा २०२४ निवडणुकीचा निकाल लागला, मतदानाचे सर्व ओपिनियन पोल खोटे ठरवून राजकीय चाणक्याच्या चाणक्य करत अमोलभाऊंनी ऐतिहासिक विजय मिळवला. खरंतर एकीकडे सत्ता, संस्था, संपत्ती आणि कार्यकर्त्यांची लागलेली रीघ, अनेक वर्षापासूनची तालुक्यात निर्माण केलेली वचक व सत्तेमुळे सामान्य लोकांवर आलेले दडपण अशा परिस्थितीमध्ये संगमनेरमध्ये तुल्यबळ उमेदवार शोधण्याची अडचण…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर पहलगाम येथे झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याने केलेल्या धडक कारवाईचे आमदार अमोल खताळ यांनी जोरदार कौतुक केले आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारतीय जवानांनी दाखवलेल्या शौर्याचे आणि त्यांनी दहशतवाद्यांचे 9 अड्डे उद्ध्वस्त केल्याबद्दल आमदार खताळ यांनी सैन्याचे अभिनंदन केले. ही कारवाई केवळ दहशतवादी हल्ल्याचा बदला नसून, भारताच्या सार्वभौमत्वाचे संरक्षण करण्यासाठी दिलेले एक कणखर प्रत्युत्तर असल्याचे त्यांनी म्हटले आहे. आमदार खताळ म्हणाले, “देशाच्या सीमेचे रक्षण करण्यासाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या आपल्या जवानांचे अभिनंदन करावे तेवढे थोडेच आहे. त्यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्यामुळेच आज प्रत्येक देशवासी सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत आहे. या यशस्वी ऑपरेशनमागे जवानांची निष्ठा, संयम…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर ज्यांच्या हातात आता राजकारणासाठी कोणतेही मुद्दे शिल्लक राहिलेले नाहीत, तेच लोक आपल्या बगलबच्च्यांना हाताशी धरून शेतकऱ्यांमध्ये हेतुपुरस्सर दिशाभूल करणारे वातावरण तयार करत आहेत आणि त्यांच्यात विष पेरण्याचा प्रयत्न करत आहेत. जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माझी प्रतिमा मलिन करून, हे काही लोक निळवंडे पाण्याच्या आड लपून राजकारण करत आहेत, अशी जोरदार टीका आमदार अमोल खताळ यांनी केली. संगमनेर तालुक्यात निळवंडेच्या पाण्यावरून सुरू असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून प्रसिद्धी पत्रक माध्यमांना पाठविण्यात आले यात त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले की, यापूर्वी जानेवारी महिन्यात देखील निळवंडे उजव्या आणि डाव्या कालव्यांना आवर्तन सोडण्यात आले…
