Author: अनंत पांगारकर
संगमनेर – राज्यभरात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचलेला असताना, संगमनेर शहरातही मान्यवरांच्या हस्ते श्री गणेशाच्या आरतीतून गणेशभक्ती दिसू लागली आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती आमदार सत्यजीत तांबे व मैथिली तांबे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी आमदार तांबे यांनी संगमनेर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी बाप्पाच्या चरणी प्रार्थना केली. आरती सोहळ्याला मोठ्या संख्येने संगमनेरकर आणि भाविकांनी उपस्थिती लावली होती. यानंतर आमदार तांबे यांनी शहरातील विविध गणेशोत्सव मंडळांना भेटी दिल्या. त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधून बाप्पाचे दर्शन घेतले. यावेळी अनेक नागरिकांच्या आग्रहामुळे आमदार तांबे यांनी शहरातील घरोघरी जाऊन गणपती बाप्पाचे दर्शन घेतले आणि आरतीमध्ये सहभाग घेतला. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक सोहळा…
संगमनेर- प्रसाद आप्पासाहेब गुंजाळ यांच्याशी झालेले आमचे सर्व आर्थिक व्यवहार हे व्यक्तीगत आहेत. या व्यवहारामध्ये आमदार अमोल खताळ यांचा कोणताही संबंध नाही. मात्र राजकीय हेतूने त्यांची बदनामी करण्यासाठी आमच्या आर्थिक व्यवहारांचा कोणताही उपयोग राजकारणासाठी करु नये, अन्यथा आम्हालाही कायदेशीर मार्ग अवलंबावे लागतील, असा इशारा प्रसाद गुंजाळ यांच्याशी आर्थिक व्यवहार केलेले रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी पत्रकाद्वारे दिला आहे. या संदर्भात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात रविंद्र ज्ञानदेव देशमुख यांनी म्हटले आहे की, प्रसाद गुंजाळ हे शेअर ट्रेडींगचा व्यवसाय करत होते. मागील २० वर्षापासून त्यांची आणि माझी मैत्री आणि घनिष्ठ संबंध राहिले. सप्टेंबर २०२३ मध्ये प्रसाद गुंजाळ शेअर ट्रेडींगच्या व्यवसायात आर्थिक अडचणीत सापडल्याने त्यांना…
संगमनेर, अहिल्यानगर – आमदार अमोल खताळ यांना मारहाण करणारा आरोपी प्रसाद गुंजाळ पोलीस कोठडीत असतानाच आता त्याच्या आईने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीमुळे या हल्ला प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. अनिता आप्पासाहेब गुंजाळ यांनी संगमनेर शहर पोलीस स्टेशनमध्ये आमदार अमोल खताळ, संदेश देशमुख व इतरांच्याविरोधात तक्रार केली आहे. ही तक्रार आपल्या मुलाची आर्थिक फसवणूक, ब्लॅकमेलिंग आणि मानसिक छळ केल्याप्रकरणी आहे. या घटनेचा राजकारणाशी कोणताही संबंध नसून, घटनेचे राजकारण झाले तर आम्हाला न्याय मिळणार नाही. हे केवळ आर्थिक फसवणुकीतून घडले असल्याचे गुंजाळ यांनी स्पष्ट केले आहे. अनिता गुंजाळ यांच्या तक्रार अर्जानुसार, त्यांचा मुलगा प्रसाद गुंजाळ आणि आमदार खताळ हे अनेक वर्षांपासून मित्र आहेत.…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन – माजी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुन्हा एकदा राजकारण्यांवर जोरदार टीका केली आहे. राजकारण्यांना धार्मिक कार्यांपासून दूर ठेवावे कारण ते जिथे जातात तिथे ‘आग लावतात’, असे ते म्हणाले. नागपूरमधील महानुभाव पंथ परिषदेत बोलताना गडकरींनी धर्माच्या नावाखाली सुरू असलेल्या राजकारणावर त्यांनी नाराजी व्यक्त केली. गडकरी म्हणाले की, धार्मिक कार्य, सामाजिक कार्य आणि राजकीय कार्य वेगवेगळी आहेत. राजकारणी जिथे जिथे जातात, तिथे ते आग लावल्याशिवाय निघत नाहीत. धर्माला सत्तेत आणल्यास समाजाचे नुकसान होते, असा इशारा त्यांनी दिला. धर्म हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे, मात्र काही राजकारणी त्याचा गैरवापर करतात. यामुळे विकास आणि रोजगारासारखे महत्त्वाचे मुद्दे मागे पडतात,…
संगमनेर / अकोले – अकोले तालुक्यात ‘हनीट्रॅप’चा एक धक्कादायक प्रकार समोर आला असून, यामध्ये एका 38 वर्षीय व्यक्तीला ब्लॅकमेल केल्याप्रकरणी तीन महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सापळा रचून एका आरोपी महिलेला रंगेहाथ पकडले आहे. या हनीट्रॅपमध्ये अनेक जण अडकले असल्याची शक्यता असून, संबंधित महिलांनी अनेक पुरुषांना धमकावून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात खंडणी उकळली आहे. यामुळे काही जण कर्जबाजारी झाल्याचेही बोलले जात आहे. विशेष म्हणजे, या टोळीने खंडणीसाठी अल्पवयीन मुलींचाही वापर केल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. पीडित व्यक्तीने अकोले पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीनुसार, त्याची ओळख संगमनेर येथील कविता विधाते हिच्याशी झाली.…
मेष: आज तुम्ही उत्साही आणि सकारात्मक राहाल. कामाच्या ठिकाणी तुमचे प्रयत्न यशस्वी होतील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. वृषभ: आज तुम्ही थोडे भावुक होऊ शकता. कुटुंबासोबत वेळ घालवणे फायदेशीर ठरेल. कामात काही अडथळे येऊ शकतात, पण संयम राखल्यास यश मिळेल. मिथुन: आजचा दिवस तुमच्यासाठी नवीन संधी घेऊन येईल. सामाजिक कार्यक्रमात भाग घेतल्याने फायदा होईल. तुमच्या संवाद कौशल्याचा उपयोग होईल. कर्क: आज तुम्हाला आर्थिक बाबतीत थोडे सावध राहावे लागेल. अनावश्यक खर्च टाळा. कामाच्या ठिकाणी लक्ष केंद्रित करा, तरच प्रगती होईल. सिंह: आज तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तुमच्या नेतृत्वामुळे इतरांना प्रेरणा मिळेल. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी चांगला दिवस आहे. कन्या:…
संगमनेर:- संगमनेर शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शमी महागणपतीची आरती उद्या, सोमवारी सायंकाळी नाशिक पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजीत तांबे यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी गणेशभक्तीच्या या मंगलमय वातावरणात मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहतील अशी माहिती आयोजकांनी दिली. दरम्यान सायंकाळच्या साडेसहाच्या आरतीनंतर आमदार तांबे संगमनेर शहरातील विविध घरगुती गणपती आणि गणेशोत्सव मंडळांना भेट देऊन शुभेच्छा देणार आहेत. या भेटीदरम्यान ते सर्व गणेशभक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतील.
संगमनेर:- माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार सत्यजित तांबे यांच्या अथक पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यासाठी ३.५ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. हा निधी जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाच्या विविध योजनांमधून उपलब्ध झाला असून, यामुळे तालुक्यातील गावांमध्ये रस्ते, तीर्थक्षेत्रे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठी चालना मिळणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांनी दिलेल्या माहितीनुसार, या निधीचा मोठा भाग रस्ते विकासासाठी वापरला जाईल. सुमारे १.५० कोटी रुपये गावांतर्गत रस्ते आणि शेतरस्त्यांच्या मजबुतीकरणासाठी खर्च केले जाणार आहेत. शिवाय, ५० लाख रुपयांच्या निधीतून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा विकास केला जाईल. उर्वरित १.५० कोटी रुपये गावातील मूलभूत सोयीसुविधांसाठी देण्यात आले आहेत. वर्ष २०२५-२६ या अंतर्गत…
संगमनेर- एका तथाकथित कीर्तनकाराच्या प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या संगमनेर तालुक्यातील घुलेवाडी गावात आता शांतता आणि सलोखा प्रस्थापित करण्यासाठी ग्रामस्थांनी कंबर कसली आहे. गावातील पूर्वापार चालत आलेली पुरोगामी आणि वारकरी संप्रदायाची चांगली परंपरा जपण्यासाठी, तसेच समाजात विष कालवणाऱ्या प्रवृत्तींना रोखण्यासाठी सर्व ग्रामस्थांनी एकमुखी ठराव केला आहे. गावातील मारुती मंदिरासमोर झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यावेळी सर्वांनी मिळून गावातील सलोखा आणि शांतता टिकवण्याचा दृढ निश्चय व्यक्त केला.यावेळी, सत्य बाजूने उभे राहिलेल्या वारकरी संप्रदायातील मान्यवर, कीर्तनकार, पत्रकार आणि समाज प्रबोधनकारांचे गावकऱ्यांनी अभिनंदन केले. गावात अशांततेचे आणि अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते, असे वातावरण यापूर्वी कधीही नव्हते. गावाची विकासाची वाटचाल लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या…
देशाच्या लोकशाहीला झालंय काय, असा प्रश्न पडण्यारख्या असंख्य घटना उघडपणे घडत आहेत. या लोकशाहीला बळकट करण्यासाठीच्या निवडणूक प्रक्रियेत प्रचंड घालमेल करणारं मतचोरीचं प्रकरण एकीकडे आवासून उभं असताना आता नरेंद्र मोदी आणि अमित शहांच्या गुजरातमध्ये राजकीय पक्षांच्या नावावर 1400 कोटींची लूट करण्यात आल्याचा नवा घोटाळा पुढे आला आहे. यंत्रणांच्या नावावर देशवासीयांचे पैसे लुटून खाणार्या या घोटाळ्याची चौकशी व्हावी, असं ना देशाच्या निवडणूक आयोगाला वाटत ना केंद्रातल्या मोदी सरकारला. गुजरात राज्य सरकार तर आमचा त्याच्याशी काय संबंध, असं सांगून हात वर करून मोकळंच झालं आहे. मतचोरीच्या घटनांचा मागोवा घेता घेता हा नवा घोटाळा बाहेर येऊनही निवडणूक आयोग मख्ख आहे. आयोगाने याची दखल…
