Author: अनंत पांगारकर
मुंबई राज्य सरकारने शेतसारा न भरल्यामुळे सरकारच्या ताब्यात गेलेल्या आकारीपड जमिनी मूळ शेतकऱ्यांना परत करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. तीन महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर या निर्णयावर शिक्कामोर्तब करणारा अध्यादेश अखेर जाहीर झाला आहे. या निर्णयामुळे राज्यातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असून, अंदाजे ५ हजार एकर जमिनींचा मार्ग मोकळा झाला आहे. निर्णयाची पार्श्वभूमी… सध्या राज्यात सुमारे ५ हजार एकर आकारीपड जमिनी आहेत, त्यापैकी एकट्या पुणे विभागात ५९७ एकर जमीन आहे. मार्च महिन्यात झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत या जमिनी मूळ शेतकरी, मालक किंवा त्यांच्या वारसांना परत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, अध्यादेश प्रसिद्ध न झाल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना या निर्णयाचा लाभ मिळत…
संगमनेर, अनंत पांगारकर दहावी, बारावीच्या निकालानंतर पुढील प्रवेशासाठी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी सध्या विद्यार्थी आणि पालकांची मोठी धावपळ सुरू आहे. उत्पन्न, जात, अधिवास, नॉन क्रिमीलेअर यांसारख्या दाखल्यांसाठी त्यांना तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजवावे लागत आहेत. या पार्श्वभूमीवर, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि तत्कालीन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी २०१३ मध्ये सुरू केलेल्या “शाळेतूनच दाखले वाटप” योजनेची आठवण पालकांना होत आहे. थोरातांच्या दूरदृष्टीने घेतलेला हा निर्णय विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देणारा ठरला होता आणि आता तो पुन्हा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे. थोरातांचा ऐतिहासिक निर्णय आणि त्याचे फायदे… २०१३ मध्ये महसूल मंत्री असताना, बाळासाहेब थोरात यांनी महसूल विभागाला अधिक लोकाभिमुख आणि पारदर्शक बनवण्यासाठी ‘सुवर्ण…
अहिल्यानगर – महाराष्ट्र संवाद न्यूज जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदाचा पदभार आनंद भंडारी यांनी सोमवारी स्वीकारला. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात अमरावती येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली झालेले मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांना निरोप देण्यात आला. यावेळी बोलताना येरेकर म्हणाले, आई-वडिलांमुळे लहानपणापासूनच कष्ट करण्याची आणि गुणवत्तेची सवय लागली. गडचिरोली ते अमरावती व्हाया अहिल्यानगर हा प्रवास माझ्यासाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणार आहे. अनेक अधिकारी आणि विविध विभागांसोबत काम करताना जिल्हा परिषद या संस्थेची प्रतिष्ठा वाढवण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला. येथील विविध उपक्रम आणि प्रगतीचा मला अभिमान आहे. केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांमध्ये जिल्ह्याला अग्रेसर ठेवण्यासाठी प्रत्येक अधिकारी, कर्मचारी आणि सहकारी संस्थांचे सतत…
महाराष्ट्र संवाद न्यूज – स्वस्तात सोने देण्याचे आमिष दाखवून मुंबईतील रिलायन्स कॉर्पोरेटच्या मॅनेजरला चार लाख रुपयांचा गंडा घातल्याप्रकरणी शेवगाव येथील शिवसेनेच्या नवप्रविष्ट महिला नेत्या विद्याताई जावेद गाडेकर आणि त्यांचे पती जावेद यासीन पठाण यांच्याविरोधात शेवगाव पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काय आहे प्रकरण… अतुल नामदेव अटकळे (वय ३७, रा. जुना ठाणे शहर), रिलायन्स कॉर्पोरेटचे मॅनेजर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, २३ डिसेंबर २०२० रोजी जावेद यासीन पठाणने अटकळे यांना त्यांच्या विद्यानगर येथील घरी बोलावले. त्यावेळी त्यांची पत्नी विद्या गाडेकरही उपस्थित होत्या. पठाणने त्यांना घरातील चैतन्य कानिफनाथ मढी यांच्या गादीचे दर्शन घ्यायला लावले आणि घरातील सोन्याचे दागिने दाखवून आपला सोने…
अहिल्यानगर, २६ मे: पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आषाढी वारीच्या दिंडी सोहळ्याचे उत्तम नियोजन करण्यासाठी प्रशासन आणि वारकरी यांच्यात समन्वयाची ग्वाही दिली आहे. त्यांनी वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी चोख व्यवस्था ठेवण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित आषाढी वारी नियोजन बैठकीत ते बोलत होते. या बैठकीला आमदार शिवाजी कर्डिले, आमदार विठ्ठलराव लंघे, आमदार अमोल खताळ, जिल्हाधिकारी डॉ. पंकज आशिया, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर जिल्हाधिकारी शैलेश हिंगे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे, ह.भ.प. अशोक सावंत आदी उपस्थित होते. मंत्री विखे यांनी सांगितले की, जिल्ह्यातून २६० दिंड्या करमाळा मार्गे सोलापूर जिल्ह्यात जातात.…
संगमनेर – नाशिक-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली आणि अपघातप्रवण ठिकाणांवरील कामे मार्गी लागणार आहेत. आमदार अमोल खताळ यांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी या कामांना तात्काळ मंजुरी देत, संबंधित विभागांना कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत. चंदनापुरी येथील प्रमोद राहाणे, रामभाऊ राहाणे आणि अंकुश राहाणे यांनी नाशिक-पुणे महामार्गावरील अपूर्ण व अपघातप्रवण ठिकाणच्या कामांना मंजुरी मिळावी, अशी मागणी आमदार अमोल खताळ यांच्याकडे केली होती. या मागणीची दखल घेत आमदार खताळ यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी लोणी येथे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या निवासस्थानी आले असता, त्यांना प्रत्यक्ष भेटून याबाबत पत्र दिले होते. त्यांच्या या मागणीला…
सिन्नर, नाशिक: मान्सूनच्या आगमनासोबतच नाशिक जिल्ह्याला मुसळधार पावसाने झोडपले असून, सिन्नर तालुक्यात पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. पावसामुळे राज्यात सर्वोत्कृष्ट व हायटेक गणल्या जात असलेल्या सिन्नरच्या अद्ययावत बसस्थानकाचा काही भाग तुफानी पावसामुळे कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एक शिवशाही बस आणि काही इतर वाहने ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती व्यक्त केली जात आहे. बसस्थानकातील दुर्घटनेने खळबळ… आज राज्यात मान्सूनचे दमदार आगमन झाले. नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागातही पावसाने जोरदार हजेरी लावली असून, नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. मात्र, या पावसाचा सर्वाधिक फटका सिन्नर बसस्थानकाला बसला आहे. सिन्नरच्या हायटेक बसस्थानकाचा स्लॅब कोसळल्याने एकच खळबळ उडाली आहे. तातडीने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण…
संगमनेर – अहिल्यानगर जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी संगमनेर शहरातील वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याचे आश्वासन दिले आहे. येत्या १५ जूनपर्यंत शहरातील सिग्नल पूर्ववत सुरू होतील, अशी माहिती त्यांनी दिली. तसेच, बंद पडलेली वाहतूक शाखा पुन्हा सुरू करण्याबाबत योग्य ती कार्यवाही केली जाईल, असेही ते म्हणाले. शनिवारी (२४ मे रोजी) अहिल्यानगर जिल्हा पोलीस अधीक्षकपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर दुसऱ्याच दिवशी जम्मू-काश्मीरमधील तिसवाड सेक्टर येथे दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीत शहीद झालेले अकोले तालुक्यातील ब्राह्मणवाडा गावचे सुपुत्र, जवान संदीप पांडुरंग गायकर (वय ३२) यांच्यावर आज त्यांच्या मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. या अंत्यसंस्कारासाठी ते उपस्थित होते. या निमित्ताने घार्गे यांनी…
अहिल्यानगर, दि. २५ मे: राज्याचे उद्योगमंत्री डॉ. उदय सामंत यांनी आज (रविवारी) अहिल्यानगर जिल्ह्यातील ब्राम्हणवाडा येथे शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार, डॉ. सामंत यांनी शहीद संदीप गायकर यांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची रोख आर्थिक मदत सुपूर्द केली. डॉ. सामंत यांच्या हस्ते शहीद संदीप गायकर यांच्या पत्नी दिपाली गायकर तसेच त्यांच्या आई-वडिलांकडे ही मदत देण्यात आली. याप्रसंगी जुन्नर तालुक्याचे आमदार शरददादा सोनवणे, पदाधिकारी राम रेपाळे, बाजीराव दराडे, एकनाथ यादव तसेच ब्राम्हणवाडा गावचे उपसरपंच सुभाष गायकर आणि ग्रामपंचायत सदस्य शिवाजी आरोटे आदी उपस्थित होते. या भेटीदरम्यान, डॉ. उदय सामंत यांनी गायकर…
शिर्डी: शिर्डीतून चोरी झालेल्या २ कोटी ५० लाख ५९ हजार १०३ रुपये किमतीचे, २ किलो ६८७ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केले आहेत. मात्र, या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी दिली आहे. गुजरात राज्यातील बनासकाटा येथील सोने व्यापारी विजयसिंह वसनाजी खिशी (वय ३५) हे होलसेल सोन्याचा व्यवसाय करतात. १३ मे २०२५ रोजी ते आपला ड्रायव्हर सुरेशकुमार भुरसिंह राजपुरोहित (रा. चौहटन, जि. बारमेर, राजस्थान) याच्यासोबत शिर्डी येथील हॉटेल साई सुनीता येथे मुक्कामी होते. याच रात्री ड्रायव्हरने ३ कोटी २६ लाख रुपये किमतीचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेले.…
