Author: अनंत पांगारकर

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्रात सध्या सुरू असलेला राजकीय गोंधळ, वाढती गुंडगिरी आणि विधानसभेतील राड्याच्या घटनांवरून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महायुती सरकारवर तीव्र शब्दांत हल्ला चढवला आहे. राज्यातील दहशतवाद आणि गुंडगिरी भाजप पुरस्कृत असल्याचा घणाघाती आरोप करत, विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार असल्याचं थोरात यांनी म्हटलं आहे. महायुतीचे सरकार सत्तेवर कसे आले, त्यांनी कोणते ‘फंडे’ वापरले, पक्ष कसे फोडले आणि कसे चुकीचे निकाल दिले, हे महाराष्ट्रातील जनतेला चांगलेच माहीत असल्याचं थोरात यांनी नमूद केलं. ते म्हणाले, आज महाराष्ट्रात गुंडांना आणि वाचाळवीरांना सरकारकडून एक प्रकारे मुभा दिली जात आहे. यामुळे राज्यात दहशत आणि गुंडगिरी…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेरचे सुपुत्र, वीर जवान संदीप किसन घोडेकर यांना देशसेवेत कर्तव्य बजावताना मरण आले. त्यांच्या निधनाबद्दल माजी महसूल मंत्री, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी तीव्र दुःख व्यक्त केले असून, घोडेकर यांच्या देशसेवेतील योगदानाला संगमनेरकर सदैव स्मरणात ठेवतील, असे प्रतिपादन केले. शुक्रवारी (१८ जुलै) बाळासाहेब थोरात यांनी घोडेकर मळा येथे शहीद संदीप घोडेकर यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी वीरपत्नी वर्षा संदीप घोडेकर आणि मुलगा यश संदीप घोडेकर यांचे तसेच संपूर्ण कुटुंबाचे सांत्वन केले. यावेळी थोरात म्हणाले की, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून शिक्षण घेऊन संदीप यांनी देशसेवेचे व्रत स्वीकारले होते. सैनिक सीमेवर अहोरात्र पहारा देत असतात, तर…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा संगमनेरमध्ये विविध पुरोगामी संघटना, विद्यार्थी संघटना, राजकीय पक्ष आणि सर्वपक्षीय नागरिकांनी शुक्रवारी एकत्र येऊन तीव्र निषेध केला. हा हल्ला करणारा ‘काटे’ केवळ एक मुखवटा असून, त्यामागील खरे सूत्रधार शोधून त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली आहे. संगमनेर बसस्थानक येथे आयोजित निषेध सभेत छात्र भारती, राष्ट्रसेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, बहुजन विकास मंच, गाथा परिवार यांसारख्या पुरोगामी संघटनांसह काँग्रेस, शिवसेना, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रिपाई) आदी पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बाळासाहेब थोरात…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, विशेष प्रतिनिधी:  महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात आमदार सत्यजित तांबे यांनी केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) अभ्यासक्रमात छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा पुरेसा समावेश नसल्याचा गंभीर मुद्दा उपस्थित केला. त्यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांनी यावर लक्ष घालून योग्य उपाययोजना करण्याची मागणी केली. आमदार तांबे यांनी भाषणाची सुरुवात करताना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचा सीबीएसईच्या अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या प्रयत्नांसाठी शालेय शिक्षण विभाग आणि मंत्र्यांचे अभिनंदन केले. मात्र, यासोबतच त्यांनी एक महत्त्वपूर्ण चिंता व्यक्त केली. त्यांनी निदर्शनास आणून दिले की, महाराष्ट्रातील सर्व शाळांमध्ये आणि सरकारी शाळांमध्ये या वर्षापासून सीबीएसईच्या धर्तीवर एनसीईआरटीचा अभ्यासक्रम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, तो एक स्तुत्य…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर शहरात गुरुवारी (17 जुलै 2025) सायंकाळी जिल्हा न्यायालयाच्या शिपायाला शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी दोघांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रवीण शंकर वेडे (वय 33, रा. साळीवाडा, रंगारगल्ली, संगमनेर) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, दोन आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 118 (1), 115, 352, 3(5) नुसार गुन्हा क्र. 655/2025 अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 17 जुलै 2025 रोजी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादीच्या मोटरसायकलला कट मारून धडक दिली आणि त्यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. फिर्यादीने शिवीगाळ न करण्यास सांगितल्यावर, आरोपीने त्यांच्या तोंडात हाताने चापटी मारली. तसेच, डोळ्यावर आणि छातीवर हाताने…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी:  घर भाडेकरू असलेल्या महिला आणि तिच्या पतीला मारहाण करून सोन्याचे गंठण व मोबाईल काढून घेतल्या प्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील आरोपी तलाठी मच्छिंद्र राहणे याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला असून आरोपीच्या पत्नीचा जामीन अर्ज संगमनेर येथील अतिरिक्त सत्र न्यायाधीश मंदार नेरलेकर यांनी मंजूर केला आहे. तक्रारदार महिला अनिता राहाणे यांच्या घरात भाड्याने राहत असताना, मच्छिंद्र राहाणे रात्री अपरात्री त्रास देत असे आणि लज्जास्पद संदेश पाठवत असे, असा आरोप आहे. १ जुलै २०२५ रोजी दुपारी, अनिता राहाणे आणि अन्य ८-९ महिलांनी फिर्यादीला घराबाहेर ओढून मारहाण केली. यावेळी त्यांच्या गळ्यातील २७,००० रुपयांचे…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  संगमनेर येथील गटार दुर्घटनेत दुर्दैवी निधन झालेल्या अतुल रतन पवार याच्या कुटुंबीयांना आमदार अमोल खताळ यांच्या प्रयत्नांमुळे शासनाकडून तातडीने १० लाख रुपयांची मदत मिळाली आहे. संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी रामदास कोकरे यांनी हा धनादेश पवार कुटुंबीयांच्या निवासस्थानी जाऊन सुपूर्द केला. आमदार खताळ यांच्या कार्यालयाकडून ही माहिती देण्यात आली आहे. १० जुलै २०२५ रोजी संगमनेर शहरातील कोल्हेवाडी रोडवरील नॅशनल इंग्लिश मीडियम स्कूलजवळ भूमिगत गटाराचे काम सुरू असताना गटार साफ करताना अतुल पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेनंतर आमदार अमोल खताळ यांनी पवार कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते आणि शासनाच्या वतीने ३० लाख रुपयांची मदत देण्याचे लेखी…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त बहिणीच्या मृत्यूस कारणीभूत ठरून जन्मठेपेची शिक्षा झालेल्या एका कैद्याला पोलिसांनी तब्बल सात वर्षांनी अटक केली आहे. विठ्ठल उर्फ सोनू प्रकाश काळवणे (रा. बीड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रजेवर बाहेर आल्यानंतर पोलिसांना गुंगारा देऊन तो फरार झाला होता. २०१४ मध्ये बीड येथे ही धक्कादायक घटना घडली होती. विठ्ठलला त्याच्या बहिणीचे प्रेमप्रकरण आणि प्रियकरासोबतचे लग्न मान्य नव्हते. यातून त्याने बहिणीला आणि तिच्या प्रियकराला रुग्णालयातच विष पाजून प्राणघातक हल्ला केला होता. दुर्दैवाने या हल्ल्यात बहिणीचा मृत्यू झाला, तर प्रियकर बचावला. या गुन्ह्यासाठी विठ्ठलला जन्मठेप आणि १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावण्यात आली होती. शिक्षा भोगत असताना…

Read More

महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त मुंबई, १७ जुलै:  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिर्डी आणि पुरंदर विमानतळांच्या कामांचा आढावा घेतला. आगामी नाशिक-त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्यापूर्वी शिर्डी विमानतळावरील प्रस्तावित कामे पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. शिर्डी विमानतळाचे नूतनीकरण आणि विस्तारीकरण लवकरात लवकर पूर्ण होणे आवश्यक असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. विधानभवनात झालेल्या या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले की, शिर्डी विमानतळावर नवीन एटीसी इमारत, नवीन एकात्मिक मालवाहतूक इमारत आणि नवीन टर्मिनल इमारतीची कामे प्रस्तावित आहेत. ही कामे सध्या संथगतीने सुरू असून, ती कुंभमेळ्यापूर्वी पूर्ण होणे गरजेचे आहे. यासाठी आवश्यकतेनुसार अतिरिक्त…

Read More

संगमनेर, प्रतिनिधी:  महाराष्ट्रातील सहकारी संकल्पना ही जागतिक स्तरावर नावाजली जात असून, सहकारातूनच सामान्य माणसाची खरी प्रगती साधली आहे, असे प्रतिपादन सहकारी संस्थेचे विभागीय उपनिबंधक चंद्रशेखर बारी यांनी केले.  विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दुग्ध) नाशिक, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अहिल्यानगर आणि संगमनेर तालुका सहकारी दूध उत्पादक संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय सहकार वर्षाच्या निमित्ताने ‘सहकार दिंडी’ चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आयोजित सहकार दिंडी व सहकार परिसंवादात बारी बोलत होते.  राजहंस दूध संघापासून सुरू झालेली ही दिंडी सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या स्मृतिस्थळाला अभिवादन करून अमृतवाहिनी बँकेपर्यंत काढण्यात आली. “विना सहकार, नाही उद्धार” या घोषणांनी अमृत उद्योग समूह दुमदुमून गेला. या…

Read More