Author: अनंत पांगारकर
महाराष्ट्र संवाद ऑनलाईन वृत्त संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरचे सुपुत्र, सीआरपीएफ जवान, मेजर संदीप घोडेकर यांच्या स्मरणार्थ संगमनेरमध्ये त्यांचे स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीने केली आहे. देशसेवा बजावताना हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे दिल्लीत निधन झाले होते. मेजर घोडेकर यांनी देशासाठी दिलेल्या बलिदानाचा विचार करून हे स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे काँग्रेसने म्हटले आहे. या मागणीसाठी संगमनेर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने नगरपालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले. यावेळी शहराध्यक्ष सोमेश्वर दिवटे, विश्वास मुर्तडक, राजेंद्र वाकचौरे, गणेश मादास, नितीन अभंग, जावेदखान पठाण, मुजिक खान, वसीम शेख, आवेद खान, डॉ. विजय पवार, शेहेबाजअली शेख, अलोक बर्डे, बादल जेधे, ललित शिंदे, शरद पावबाके, एकनाथ श्रीपत,…
संगमनेर, प्रतिनिधी: सीआरपीएफ जवान संदीप घोडेकर यांचा कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाला. देशसेवा बजावताना घोडेकर यांना वीरमरण आले आहे. त्यांनी देशाची केलेली सेवा उल्लेखनीय असल्याने त्यांचे संगमनेरात यथोचित स्मारक उभारण्याची मागणी करत यासाठी संगमनेरचे आमदार अमोल खताळ आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे पाठपुरावा करणार असल्याचे शिवसेनेचे (शिंदे)शहर प्रमुख विनोद सूर्यवंशी यांनी म्हटले आहे. दिल्लीत कर्तव्य बजावत असताना जवान संदीप घोडेकर यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. बुधवारी हजारो शोकाकुल नागरिकांच्या उपस्थितीत संगमनेरमध्ये त्यांच्यावर शासकीय इतनामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी श्रद्धांजली वाहताना सूर्यवंशी यांनी ही मागणी केली. सामान्य कुटुंबात परिस्थितीवर मात करत संगमनेरकर असलेल्या संदीप घोडेकर यांनी सीआरपीएफ जवान म्हणून…
संगमनेर, प्रतिनिधी: संगमनेरमधून जाणाऱ्या पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील चंदनापुरी घाटात ४ जुलै रोजी झालेल्या स्कूल बस अपघाताच्या पार्श्वभूमीवर आमदार अमोल खताळ यांनी विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात कठोर कारवाईची मागणी केली आहे. अपघाताला जबाबदार असलेल्या ठेकेदार कंपनीवर गुन्हा दाखल करण्याची आणि महाराष्ट्रातील सर्व स्कूल बसच्या फिटनेसचे ऑडिट करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. आमदार खताळ यांनी सभागृहात सांगितले की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून १ जानेवारी ते ३१ मे २०२५ या कालावधीत ४८ अपघातांमध्ये १५ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांना शंकर रामचंद्र इन्फ्रा कंपनी जबाबदार आहे. या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागासोबत केलेल्या कराराचे उल्लंघन केले असून, काँक्रिटीकरणाचे काम अपूर्ण ठेवल्यामुळे…
पुणे – महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त संगमनेरमधील सामाजिक कार्यकर्ते, राष्ट्रीय चर्मकार संघाचे प्रदेश उपाध्यक्ष व अहिल्यानगर काँग्रेस कमिटीचे (अ.जा.) जिल्हा कार्याध्यक्ष अरुण काका गावित्रे यांना पुण्याच्या संचेती रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पायावरील उपचारासाठी ११ जुलैला रुग्णालयात दाखल झालेल्या गावित्रे यांच्यावर मंगळवारी (१५ जुलै) रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. गावित्रे यांना पुढील काही दिवस वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आरामाचा सल्ला दिला आहे. रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाल्यानंतर ते संगमनेरात परतणार आहे.
संगमनेर, प्रतिनिधी: रोटरी केवळ एक सेवाभावी संघटना नव्हे, तर ‘समाजसेवक घडवणारी जीवनशाळा’ आहे, एक उत्तम रोटेरियन कसा असावा आणि समाजाशी त्याचे नाते किती घट्ट असावे असे संबोधत रोटरीच्या ४२ वर्षांच्या समाजकार्याचा डॉ. उल्हास कोल्हटकर यांनी गौरव केला. २०२५-२६ या वर्षासाठी विश्वनाथ मालाणी यांची अध्यक्षपदी, सौरभ म्हाळस यांची सचिवपदी, तर संकेत काजळे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. या पार्श्वभूमीवर रोटरी क्लब संगमनेरने नुकताच आपला वार्षिक पदग्रहण सोहळा मालपाणी लॉन्स येथे मोठ्या उत्साहात साजरा केला. रविवार, १३ जुलै रोजी झालेल्या या सोहळ्याला डॉ. कोल्हटकर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार अमोल खताळ, सहाय्यक प्रांतपाल अमोल वैद्य, माजी अध्यक्ष साईनाथ साबळे, आणि…
संगमनेर, प्रतिनिधी: तत्कालीन गटविकास अधिकारी अनिल नागणे यांच्या बदलीनंतर गेल्या अनेक महिन्यापासून रिक्त असलेल्या जागेवर अखेर नव्या गटविकास अधिकाऱ्यांची ग्रामविकास विभागाकडून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता संगमनेरला नव्हे गटविकास अधिकारी मिळणार आहे. श्रीरामपूर पंचायत समितीमध्ये गटविकास अधिकारी असलेले पी. ए. सिनारे यांची विनंतीवरून संगमनेरच्या गटविकास अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. सिनारे यांच्या नियुक्तीचे आदेश मंगळवारी (15 जुलै) काढण्यात आले. सिनारे यांची जिल्हा अंतर्गत बदली करण्यात आले आहे. नवे गटविकास अधिकारी संगमनेरचा पदभार कधी स्वीकारता याकडे लक्ष लागले आहे. नागणे यांची मंत्रालयात बदली झाल्यानंतर संगमनेरला येण्यास अधिकारी उत्सुक नसल्याची चर्चा प्रशासकीय वर्तुळात होती. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून संगमनेरचे गटविकास अधिकारी…
अहिल्यानगर, दि. १५- जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी अपर जिल्हादंडाधिकारी दादासाहेब गिते यांनी मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये २७ जुलै २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी केला आहे. सदर आदेश धार्मिक कार्यक्रम, लग्नकार्य, मिरवणुका किंवा प्रेतयात्रांवरील जमावास लागू राहणार नाही. तसेच पोलीस अधिकारी, कामावर असलेले शासकीय अधिकारी व कर्मचारी, तसेच सभा अथवा मिरवणुका काढण्यासाठी रीतसर परवानगी घेतलेल्या व्यक्तींनाही हा आदेश लागू होणार नाही. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
संगमनेर, प्रतिनिधी: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मागणीनंतर निळवंडे धरणाच्या उजव्या व डाव्या दोन्ही कालव्यांमधून पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे लाभ क्षेत्रातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून, पाणीटंचाईने त्रस्त शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. यावर्षी भंडारदरा आणि निळवंडे धरणांच्या पाणलोट क्षेत्रात चांगला पाऊस झाल्याने जुलैच्या सुरुवातीलाच दोन्ही धरणांमध्ये पाण्याची चांगली आवक झाली. हे पाणी नदीमार्गे अगदी शेवटपर्यंत पोहोचले असले तरी, धरणाच्या लाभ क्षेत्रात मात्र पावसाचे प्रमाण खूपच कमी आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता. याच पार्श्वभूमीवर, निळवंडे धरण व कालव्यांचे निर्माते असलेल्या बाळासाहेब थोरात यांनी ८ जुलै २०२५ रोजी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील…
महाराष्ट्र संवाद न्यूज ऑनलाईन वृत्त नाशिक: महाराष्ट्राच्या राजकीय आणि प्रशासकीय वर्तुळात सध्या ‘हनी ट्रॅप’ची एक मोठी चर्चा सुरू आहे, यामुळे खळबळ उडाली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या एका बड्या नेत्याने अनौपचारिक गप्पांदरम्यान एक धक्कादायक गौप्यस्फोट केला आहे. त्यानुसार, राज्यातील तब्बल ७२ वरिष्ठ अधिकारी आणि काही आजी-माजी मंत्री ‘हनी ट्रॅप’मध्ये अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही प्रकरणे केवळ हनी ट्रॅपची आहेत की अधिकाऱ्यांच्या ‘रासलीला’ आहेत, याबाबत अद्याप स्पष्टता नाही, मात्र यामुळे नाशिकच्या राजकीय वर्तुळात प्रचंड उत्सुकता निर्माण झाली आहे. या प्रकरणात नाशिकमधील एका बड्या अधिकाऱ्याचाही समावेश असल्याची चर्चा असून, नाशिकमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये हा प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. या संदर्भात नाशिकच्या…
संगमनेर, प्रतिनिधी: आमदार सत्यजीत तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे संगमनेर तालुक्यातील ग्रामीण आरोग्य सुविधांमध्ये मोठी सुधारणा होणार आहे. संगमनेरच्या घुलेवाडी येथील सध्याचे ३० खाटांचे ग्रामीण रुग्णालय यापूर्वीच २०२२ मध्ये १०० खाटांच्या अद्ययावत रुग्णालयात श्रेणीवर्जित करण्यात आले असून, या नवीन रुग्णालयाचे बांधकाम सुरू असल्याची माहिती राज्याचे आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांनी सभागृहात दिली. आमदार सत्यजीत तांबे यांनी सुरू असलेल्या पावसाळी अधिवेशनात सोमवारी, (१४ जुलै) संगमनेरमधील साकूर आणि घुलेवाडी येथील ग्रामीण रुग्णालयांच्या सद्यस्थितीबद्दल प्रश्न उपस्थित केले होते. त्यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणले होते की, या रुग्णालयांमध्ये डॉक्टर, कर्मचारी, औषधे आणि उपकरणांची मोठी कमतरता आहे, ज्यामुळे रुग्णांना उपचारात अडचणी येत आहेत. विशेषतः, साकूर येथील ग्रामीण…
