Author: अनंत पांगारकर
संगमनेर – प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळवून दिल्याबद्दल आमदार सत्यजित तांबे यांचा वेल्हाळे ग्रामस्थांच्यावतीने सत्कार करण्यात आला. नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले हरीबाबा देवस्थान हे हजारो भाविकांचे श्रद्धास्थान आहे. या देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी आमदार सत्यजित तांबे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या या प्रयत्नांना यश आले असून, देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला आहे. या कार्याबद्दल वेल्हाळे ग्रामस्थांनी आमदार तांबे यांचा संगमनेर येथे सत्कार केला. हरीबाबा देवस्थान हे वेल्हाळे परिसरातील एक प्रसिद्ध देवस्थान आहे. कारखाना, मालदाड, साईखिंडी, गुंजाळवाडी, चिकणी आदी परिसरातील हजारो भाविकांचे हे श्रद्धास्थान आहे. यापूर्वी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या…
महाराष्ट्र संवाद न्यूज – संगमनेर आरपीआय (आठवले) पक्षाच्या वतीने आमदार अमोल खताळ पाटील यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याप्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवर आणि कार्यकर्त्यांनी आमदार खताळ पाटील यांना शुभेच्छा दिल्या. याच कार्यक्रमात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आरपीआय) चे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात यांचाही आमदार खताळ पाटील यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. आमदार अमोल खताळ पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त कृष्णा हॉटेल येथे कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी केली होती. आमदार खताळ पाटील यांच्या कार्याचा गौरव करत उपस्थितांनी त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यकर्त्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत उत्स्फूर्तपणे आपला आनंद व्यक्त केला. या सोहळ्यादरम्यान, आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र भाऊ थोरात यांच्या सामाजिक…
संगमनेर – संगमनेर पोलिसांनी खांडगाव परिसरात एका कारवाईत अंमली पदार्थ असलेला गांजा जप्त केला आणि गांजाची विक्री करणाऱ्या एका व्यक्तीला अटक केली आहे. सोमवारी दुपारी झाला न्यायालयासमोर हजर करण्यात आले होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन ज्ञानेश्वर आरगडे (वय २७ वर्षे, रा. आरगडे मळा, खांडगाव, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) याच्याकडून ८५० ग्रॅम गांजा जप्त करण्यात आला. जप्त केलेल्या गांजाची किंमत ७,६५० रुपये असून तो एका प्लास्टिकच्या पिशवीत ठेवण्यात आला होता. पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, गांजा विक्रीसाठी आरोपी आला याची माहिती पोलिसांना मिळाली होती या माहितीच्या आधारे खांडगाव गावाच्या शिवारात आरगडे वस्तीच्या पुढे असलेल्या डोंगराच्या बाजूला काटवन परिसरात ही कारवाई…
संगमनेर – प्रतिनिधी टाटा एआयए लाईफ इन्शुरन्स कंपनीचे युवा अभिकर्ता आदित्य सुनील कडलग यांनी जागतिक विमा क्षेत्रात आपल्या उत्कृष्ट कार्याचा ठसा उमटवत मानाचा ‘एमडीआरटी’ (Million Dollar Round Table) सन्मान पटकावला आहे. या प्रतिष्ठित पुरस्कारामुळे त्यांना अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील अनाहिम येथे ७ ते १० जून २०२६ दरम्यान होणाऱ्या जागतिक विमा परिषदेत सहभागी होण्याचा बहुमान प्राप्त झाला आहे. विशेष म्हणजे, आदित्य यांनी २०२३ मध्ये विमा क्षेत्रात पदार्पण करताच एमडीआरटीचा मान मिळवला. त्यानंतर त्यांनी आपल्या उत्कृष्ट कामगिरीची मालिका कायम ठेवत २०२४ मध्ये एकाच वर्षात तीन वेळा एमडीआरटी मानांकन प्राप्त केले. या अद्वितीय कामगिरीमुळे त्यांना जागतिक स्तरावरील अत्यंत प्रतिष्ठित ‘सीओटी’ (Court of the Table)…
अहिल्यानगर, दि.११ मे: संगमनेर शहरात गौण खनिजांची चोरी, अवैध धंदे, मटका आणि चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून, पोलीस प्रशासनाने यावर तातडीने कारवाई करावी, अशी मागणी संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत केली. त्यांच्या या मागणीमुळे संगमनेरातील अवैध धंद्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन व विकास समितीची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत जिल्ह्याच्या विकासासाठी आणि पायाभूत सुविधांच्या बळकटीकरणासाठी निधीची तरतूद करण्यात आली. याच बैठकीत आमदार खताळ यांनी संगमनेर मतदारसंघातील विविध महत्त्वाचे मुद्दे मांडले असल्याची माहिती आपल्या समाज माध्यमातून दिली आहे. आमदार खताळ यांनी वेल्हाळे येथील हरिबाबा देवस्थानाला…
अहिल्यानगर, दि. ११ – जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध करुन देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगातून सर्वसामान्यांच्या जीवनात आमूलाग्र परिवर्तन घडेल अशा पद्धतीने नावीन्यपूर्ण योजना राबविण्याच्या सूचना जलसंपदा तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिल्या. तालुक्यांचा विकास आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन अधिकाऱ्यांनी समन्वयाने काम करावे, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्याप्रसंगी पालकमंत्री श्री. विखे पाटील बोलत होते. बैठकीस सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते. बैठकीस खासदार भाऊसाहेब वाकचौरे, विधान परिषदेचे सदस्य किशोर दराडे, सत्यजित तांबे, शिवाजीराव गर्जे, आमदार मोनिका राजळे, डॉ. किरण लहामटे, आशुतोष काळे, विठ्ठलराव लंघे, काशिनाथ दाते, विक्रम…
संगमनेर, दि. ११ मे: माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या दूरदृष्टीमधून साकारलेली आणि ५० लाख रुपये खर्चून उभारलेली अत्याधुनिक सीसीटीव्ही यंत्रणा पोलीस प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे धूळखात पडली आहे. यामुळे संगमनेर शहराच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे, असा परखड सवाल आमदार सत्यजीत तांबे यांनी उपस्थित केला. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत त्यांनी संगमनेर शहरातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाला चांगलेच धारेवर धरले. तांबे यांनी संगमनेर मधील सीसीटीव्ही शोभेचे बाहुले बनले असल्याचे वास्तव समोर आणले आहे. हे सीसीटीव्ही कॅमेरे जर चालू राहिले तर यात अनेक अवैध चालणाऱ्या गोष्टी देखील छायाचित्रे होऊन त्याची मदत पोलीस यंत्रणेला होऊ शकणार आहे. मात्र यासाठी पोलीस यंत्रणेची मानसिकता दिसत…
संगमनेर: नाशिक-पुणे महामार्गालगत असलेले आणि हजारो भाविकांचे श्रद्धास्थान असलेले वेल्हाळे येथील हरीबाबा देवस्थान आता ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्र म्हणून ओळखले जाणार आहे. आमदार सत्यजित तांबे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे या देवस्थानाला हा मानाचा दर्जा प्राप्त झाला आहे. या निर्णयामुळे या परिसराच्या विकासाला नवी दिशा मिळणार असून, भाविकांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध होणार आहेत. वेल्हाळे आणि परिसरातील भाविकांसाठी हरीबाबा देवस्थान अत्यंत महत्त्वाचे आहे. दरवर्षी येथे हजारो भाविक दर्शनासाठी येतात. माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या माध्यमातून या मंदिर परिसरात विकासाच्या विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. मात्र, भौतिक सुविधांच्या अभावामुळे भाविकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. आमदार सत्यजित तांबे यांनी या समस्येची दखल घेत, जिल्हा…
महाराष्ट्र संवाद न्यूज – पुणे पुण्यातील कात्रज परिसरात एका धक्कादायक घटनेत एका व्यक्तीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. प्रेमसंबंधाला विरोध केल्यामुळे मेहुणीने प्रियकराच्या मदतीने हा कट रचल्याचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ४६ वर्षीय व्यावसायिक मनोहर शिंदे हे त्यांच्या कुटुंबासोबत कात्रज परिसरात वास्तव्यास होते. त्यांच्या पत्नीचे चार वर्षांपूर्वी निधन झाले. घरात त्यांचा मुलगा, सासू आणि मेहुणी (पत्नीची बहीण) सोबत ते राहत होते. शिंदे यांच्या मेहुणीचे बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या रोहित असोरे नावाच्या व्यक्तीसोबत प्रेमसंबंध होते. मनोहर शिंदे यांनी या प्रेमसंबंधाला विरोध दर्शवला होता. याच…
अहिल्यानगर – आता राज्यातील महापालिका, नगरपरिषदा आणि नगरपंचायतींमध्ये नागरिकांसाठी ‘आपले सरकार सेवा केंद्र’ सुरू होणार आहेत. राज्य सरकारच्या नगर विकास विभागाने याबाबत अधिकृत आदेश जारी केले आहेत. या केंद्रांच्या माध्यमातून राज्य शासनाच्या विविध विभागांच्या ऑनलाइन सेवांसाठी अर्ज स्वीकारले जातील आणि नागरिकांना आवश्यक सेवा पुरवल्या जातील. यापूर्वी ‘आपले सरकार’ सेवा केंद्र ग्रामपंचायती आणि खाजगी व्यक्तींमार्फत चालवली जात होती. अहिल्यानगर जिल्ह्यात सध्या १२४२ ग्रामपंचायती आणि ८४१ खाजगी केंद्रांच्या माध्यमातून एकूण २०८३ केंद्रे कार्यरत आहेत. या केंद्रांद्वारे राज्य सरकारच्या विविध विभागांच्या एकूण ७० अधिसूचित सेवा ऑनलाइन पद्धतीने पुरवल्या जातात. आता याच सेवा शहर भागातील नागरिकांसाठी त्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून उपलब्ध होणार आहेत.…
