Author: अनंत पांगारकर

विशेष प्रतिनिधी / मुंबई खासदार बजरंग सोनवणे यांनी केलेल्या प्रयत्नानंतर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाने उडी घेतली आहे. यामुळे पोलीस आणि सीआयडी तपासाची सारी माहिती राष्ट्रीय मानवी हक्क आयोगाला द्यावी लागणार आहे. खा. बजरंग सोनावणे यांनी दिल्ली येथे आयुक्तांची भेट घेऊन मस्साजोग येथील घटनेबद्दल सविस्तर माहिती दिली. संतोष देशमुख कुटुंबीयांना मदत मिळवून देणेबाबत आयोगाला त्यांनी विनंती केली. केज तालुक्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोश देशमुख यांची महिन्याभरापूर्वी म्हणजेच ९ डिसेंबरला अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली. या प्रकरणी संतोष देशमुखांच्या कुटुंबाला न्याय मिळवून देण्याकरिता राज्यभरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात येत आहे. या जिल्ह्याचे खासदार बजरंग सोनवणे सुद्धा आपल्या पद्धतीने सर्व…

Read More

पुणे – स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या बद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात सावरकरांचे पणतू सात्यकी सावरकर यांनी पुणे सत्र न्यायालयात बदनामीचा खटला दाखल केला होता. या खटल्यात राहुल गांधी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर आल्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन मंजूर केला आहे. खटल्याच्या सुनावणीसाठी राहूल गांधींनी उपस्थित रहावे यासाठी त्यांना न्यायालयाकडून वारंवार समन्स बजावण्यात आले होते. अखेर आज राहूल गांधी या खटल्याच्या सुनावणीवेळी व्हिडीओ कॉन्फरीन्सींग द्वारे न्यायालयासमोर आले. या खटल्याची पुढची सुनावणी १८ फेब्रुवारीला होणार आहे. दरम्यान, राहुल गांधी आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दलच्या वक्तव्याचा वाद सातत्याने माध्यमांत चर्चिला जातो. राहुल गांधींनी माफीवीर असे म्हणत सावरकर यांचा…

Read More

शिर्डी, दि.१० – भंडारदारा प्रकल्पात उपलब्ध असलेल्या पाणी साठ्यातून उन्हाळ्याचे तीन आणि रब्बीचे एक आवर्तन करण्यावर जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे महामंडळ) राधाकृष्ण विखे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत निर्णय घेण्यात आला. निळवंडे कालव्यांना १५ जानेवारी पासून पाणी देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला. भंडारदारा प्रकल्पाच्या कालवा सल्लागार समितीची बैठक लोणी येथील जलसंपदा विभागाच्या विश्रामगृहात झाली.‌ यावेळी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, अकोलेचे आमदार डॉ. किरण लहामटे संगमनेरचे आमदार अमोल खताळ, श्रीरामपूरचे आमदार हेमंत ओगले, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील, नाशिक विभाग मुख्य अभियंता प्रकाश मिसाळ, अधीक्षक अभियंता राजेश गोवर्धने, स्वप्निल काळे, निळवंडे प्रकल्पाचे अभियंता बाळासाहेब शेटे, कैलास ठाकरे आदी उपस्थित होते.…

Read More

संगमनेर – स्वार्थ विरहीत सेवा हे ब्रीदवाक्य घेऊन समाजातील उपेक्षित घटकांसाठी काम करीत असलेल्या रोटरी क्लब ऑफ संगमनेरने नुकतेच दिव्यांग शिबीराचे आयोजन केले होते. या शिबीरामध्ये २२८ दिव्यांग व्यक्तींची तपासणी करण्यात आली, त्यातील १३६ व्यक्तींना आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या साहित्याचे वाटप करण्यात आले. सोमवारी (६ जानेवारी) रोटरी आय केअर हॉस्पिटल येथे रत्ननिधी चॅरिटेबल ट्रस्ट, मुंबई यांच्या सहकार्याने हे शिबीर घेण्यात आले. या शिबीरामध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील तसेच इतर जिल्ह्यांमधून १३६ दिव्यांग व्यक्तींना १६२ प्रकारचे साहित्य वाटण्यात आले. वाटप करण्यात आलेल्या साहित्यामध्ये आरएनसीटी अत्याधुनिक पाय, एल एन ४ प्रोस्थेटिक हात, जयपुर फुट, कुबडी आदि साहित्याचे वाटप करण्यात आले, या साहित्याची अंदाजीत रक्कम सुमारे १…

Read More

मुंबई – उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण राज्यासाठी महत्वाच्या असलेल्या अनेक विषयांवर गेले अनेक दिवस विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे पाठपुरावा करत आहे. यातील अनेक प्रश्न मार्गी लागले आहेत, अनेक प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. या पार्श्वभूमीवर तांबे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाचा नव्याने पदभार स्वीकारलेल्या देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत मागण्यांसंदर्भात त्यांच्याशी चर्चा करत निवेदन दिले. संगमनेरसह राज्यातील विविध प्रश्नांसाठी आमदार तांबे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने महायुती सरकारमधील मंत्र्यांच्या भेटी घेत आहेत. संबंधित मंत्र्यांकडून विविध विषयांचा पाठपुरावा त्यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केला आहे. आपल्या कामाचे प्रगती पुस्तक मांडणारे ते राज्यातील एकमेव आमदार आहेत. सभागृहात आणि सभागृहाबाहेर केलेल्या कामांचा आढावा ते आपल्या मतदारांना समाज…

Read More

संगमनेर – थोर स्वातंत्र्यसेनानी सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात व हरीत क्रांतीचे प्रणेते डॉ. अण्णासाहेब शिंदे यांच्या जयंती महोत्सवानिमित्त रविवारी (१२जानेवारी) दुपारी साडेबारा वाजता होणाऱ्या पुरस्कार वितरण सोहळ्याची जय्यत तयारी यशोधन शेजारील मैदानावर सुरू असून या तयारीची माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पाहणी केली. यशोधन जनसंपर्क कार्यालयाशेजारील मैदानावर प्रेरणा दिनानिमित्त होणाऱ्या जयंती महोत्सव कार्यक्रमाची तयारी सुरू आहे. सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात व डॉ. अण्णासाहेब शिंदे यांचा जयंती महोत्सव हा उत्तर महाराष्ट्रातील मोठा सांस्कृतिक महोत्सव असतो. यानिमित्त भव्य दिव्य पुरस्कार वितरण सोहळ्यासह दरवर्षी विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यावर्षी रविवारी कोल्हापूरचे खासदार श्रीमंत शाहू महाराज व विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार यांच्या…

Read More

शुक्रवार, १० जानेवारी छत्रपती संभाजीनगर: जन्मदात्या आईवर बलात्कार करणाऱ्या आरोपी मुलास सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एस. आर. तांबोळी यांनी जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. ही घटना जालना जिल्ह्यातील पारेगाव येथे १ मे २०२३ रोजी रात्री घडली. आरोपी राहुल गौतम गोवकवाड (२७, रा. पारेगाव, ता. जि. जालना) याला न्यायालयाने सोमवारी जन्मठेपेची शिक्षा व ५ हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास ६ महिने साधा कारावास अशी शिक्षा ठोठावली आहे. पीडिता व आरोपी हे नात्याने मायलेक असून, १ मे २०२३ रोजी रात्री ८ वाजता आरोपी व पीडिता हे जेवण करून घराबाहेर अंगणात झोपलेले होते. आरोपीने घरात जाऊन घरातील लाईट बंद करून अंधार केला. मोबाईलची बॅटरी…

Read More

विशेष प्रतिनिधी / मुंबई अवादा कंपनीनं मे महिन्यांपूर्वी वाल्मिक कराडविरोधात तक्रार दाखल केली होती. मात्र, पोलिसांनी कारवाई का केली नाही? असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला आहे. तसेच, माजी मंत्री अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब मलिकांवर ऐकीव माहितीवर ‘ईडी’कडून कारवाई करण्यात आली, याकडे सुप्रिया सुळे यांनी लक्ष वेधले आहे. त्या मुंबईत प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होत्या. सुप्रिया सुळे म्हणाल्या, काळा पैसा रोखण्यासाठी काँग्रेसच्या आघाडी सरकारने ‘पीएमएलए’ कायदा आणला होता. खंडणीचा गुन्हा हा ‘पीएमएल’ कायद्याअंतर्गत येतो. वाल्मिक कराडवर खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. मग, ईडी आणि ‘पीएमएलए’अंतर्गत महाराष्ट्र आणि केंद्र सरकारनं कारवाई का केली नाही. अनिल देशमुख, संजय राऊत, नवाब…

Read More

विशेष प्रतिनिधी/ मुंबई राज्यपाल नामनिर्देशित विधानपरिषदेच्या बारा आमदारांच्या नियुक्तीबद्दल मुंबई उच्च न्यायालयाने ठाकरेंची शिवसेना आणि महाविकास आघाडीला मोठा धक्का दिला आहे. कॅबिनेट बैठकीत यादी मागे घेण्याचा निर्णय कायदेशीर असल्याचं म्हणत उच्च न्यायालयानं ठाकरेंच्या शिवसेनेची याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महायुती सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या लहरी निर्णयाची न्यायालयाने पाठराखण केल्याचा विरोधकांनी दावा केला आहे. महायुती सरकारच्या निर्णयाला आव्हान देणारी याचिका ठाकरेंच्या शिवसेनेचे कोल्हापूर शहराध्यक्ष सुनील मोदी यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाखल केली होती. उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळल्यानंतर सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचे मोदी यांनी म्हटले आहे. तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोषारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्ये विधान…

Read More

श्रीरामपूर : तालुक्यातील गोंडेगाव-पुणतांबा रस्त्यावर अवैधपणे गांजाची वाहतूक करणाऱ्या दोन जणांकडून ३ लाख ५२ हजार ६०० रुपये किंमतीचा ३५.२६ किलो गांजा जप्त करण्यात आला. सदर कारवाई तालुका पोलीस व अप्पर पोलीस अधिक्षक कार्यालय यांच्या एकत्रित पथकाकडून करण्यात आली. तालुका पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी यांना दोन इसम पिकअप (क्र. एमएच ४३ एडी ८२१८) मध्ये गांजासदृश अंमली पदार्थ घेवून मध्यप्रदेशकडून कोपरगाव पुणतांबा मार्गे श्रीरामपूरला येत असल्याची गुप्त माहीती मिळाली. मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलीस निरिक्षक दशरथ चौधरी, पोलीस उप-निरिक्षक संदिप मुरकुटे, सहाय्यक फौजदार सतिष गोरे, पोलीस हेड कॉन्स्टेबल राजेंद्र लवांडे, प्रशांत रणनवरे, साजीद पठाण, श्रीकांत वाबळे, अप्पर पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस हेड कॉन्स्टेबल…

Read More