Author: अनंत पांगारकर
संगमनेर – महिलेच्या गळ्यातील दागिने लांबवत ते शहरातील सोनाराला विकण्यात आले. चोरीचे दागिने घेणाऱ्या त्या महिला सोनाराला संगमनेरच्या जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या न्यायाधीशांनी अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. जामीन अर्ज फेटाळताना अर्जदार आरोपीने स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी दागिने स्वीकारले असले तरी अशा स्वरूपाच्या गुन्ह्यात मुद्देमाल हस्तगत करण्यासाठीच नव्हे तर अशाच प्रकारचे इतर गुन्हे उघडकीस येण्यासाठी व गुन्हा करणाऱ्या आरोपींची गुन्हा करण्याची पद्धत जाणून घेण्यासाठी अर्जदार आरोपीचा पोलिसांकडून तपास होणे आवश्यक असल्याचा व अर्जदाराला अटकपूर्व जामीन दिला तर तपसी यंत्रणेला कायद्याने प्राप्त झालेले अधिकार हिरावून घेतले जाण्याची शक्यता असल्याचे स्पष्ट करत हा महत्त्वाचा निष्कर्ष न्यायाधीश योगेश मनाठकर यांनी नोंदविला आहे. झेंडावंदनाचा…
नाशिक – बांगलादेशी नागरिकांसह रोहिंग्यांना बनावट कागदपत्राच्या आधारे जन्म दाखल्यांचे वितरण केल्याचा खळबळजनक आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केल्यानंतर सरकारने यासाठी नेमलेल विशेष तपास पथक (एसआयटी) तीन दिवसापासून तळ ठोकून चौकशी करत असतानाच आता राज्य सरकारने मोठी कारवाई केली आहे. मालेगावचे तत्कालीन तहसीलदार व सध्या जळगाव जिल्ह्यात बोदवड येथे कार्यरत असलेले नितीनकुमार देवरे, मालेगावचे नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह पाच जणांवर निलंबनाचा बडगा उगारला आहे. निलंबन करण्यात आलेल्यांमध्ये तहसीलदार नितीन कुमार देवरे, नायब तहसीलदार संदीप धारणकर यांच्यासह मालेगाव तहसील कार्यालयातील लिपिक विजय अंभोरे, रेहान शेख तसेच अव्वल कारकून भरत शेवाळे यांचा समावेश आहे. तहसीलदार, नायब तहसीलदारांचे निलंबन राज्य सरकारने…
नाशिक : केंद्रीय गृह तसेच सहकारमंत्री अमित शहा हे शुक्रवारी (दि. २४) नाशिक जिल्हा दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यात ते त्र्यंबकेश्वर व मालेगाव येथे भेट देणार आहेत. अमित शहा शुक्रवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास त्र्यंबकेश्वर मंदिरात पूजा करतील. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ यात्रेच्या कालावधीत शहांचा हा दौरा होणार असल्याने या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. त्र्यंबकराजाचे दर्शन घेतल्यानंतर ते हेलिकॉप्टरने मालेगाव तालुक्यातील अजंग येथे व्यंकटेश्वरा सहकारी वीज आणि कृषी प्रक्रिया लिमिटेडतर्फे आयोजित सहकार परिषद आणि विविध कार्यक्रमांस उपस्थित राहणार आहेत. त्र्यंबकेश्वर येथील संत निवृत्तीनाथ महाराजांची यात्रा शनिवारी असून आदल्या दिवशी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी येणार असल्याने त्यांच्या…
विशेष प्रतिनिधी / मुंबई या सरकारमध्ये आपली कॉलर टाईट करा. पीर-बीर बाबांना विचारू नका. मोहम्मद पैगंबर यांना मानणारे मुस्लीमच पीर-बाबा वगैरे मोजत नाही. मैं इस बाप का हू की उस बाप का यातच यांचा गोंधळ सुरू असल्याचे वादग्रस्त वक्तव्य भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केले आहे. नितेश राणे यांच्या वक्तव्यानंतर वाद होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अयोध्या येथील राम मंदिर उभारणीच्या वर्षपूर्तीनिमित्त आयोजित आळंदी आणि निगडी येथील कार्यक्रमांना बुधवारी (दि. 22) नितेश राणे यांनी हजेरी लावली. यावेळी भाषण करताना नितेश राणे यांनी वादग्रस्त वक्तव्य केलंय. नितेश राणे म्हणाले की, हिंदूंच्या धर्म स्थळावर वक्फ बोर्ड दावा करत आहे. कुंभ मेळ्यातही वक्फ…
मुंबई, दि. २३ महाराष्ट्र शासनाच्या १३ वर्षे मुदतीच्या २,००० कोटींच्या (७.११ % महाराष्ट्र शासनाचे रोखे, २०३८) रोख्यांची विक्री शासनाच्या सुधारित अधिसूचनेतील अटी आणि शर्तींच्या अधीन राहून करण्यात येईल. या कर्जाद्वारे मिळालेल्या रकमेचा विनियोग शासनाच्या विकास कामासाठी अर्थपुरवठा करण्यासाठी केला जाईल, अशी माहिती वित्त विभागाच्या सचिव शैला ए. यांनी पत्रकान्वये दिली आहे. अस्पर्धात्मक लिलाव पद्धतीनुसार (सुधारित) एकूण अधिसूचित केलेल्या शासन कर्जरोखे रकमेच्या १० टक्के रक्कम पात्र वैयक्तिक व संस्थात्मक गुंतवणुकदारांना वाटप करण्यात येईल. मात्र एका गुंतवणुकदारास एकूण अधिसूचित रकमेच्या जास्तीतजास्त १ टक्का रकमेच्या मर्यादेपर्यंत वाटप करण्यात येईल. २८ जानेवारी, २०२५ रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेतर्फे मुंबई येथील कार्यालयात लिलाव केला जाईल. तर…
संगमनेर दि. – २३ गेल्या दोन-तीन महिन्यांपासून संगमनेर शहर आणि तालुक्यामध्ये राजकीय पक्षांच्या, बिगर राजकीय व व्यावसायिकांच्या फ्लेक्सला उधाण आले आहे. राजकीय नेत्याची छबी मिरवत हे फ्लेक्स विनापरवाना अनेक दिवसांपासून दर्शनी भागात लावण्यात आले आहे. या फ्लेक्सच्या माध्यमातून गावागावात तणावाचे वातावरण निर्माण होऊ शकते, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ हे फ्लेक्स बोर्ड हटविण्याची मागणी करत यासाठी फ्लेक्स फाडो आंदोलन करण्याचा इशारा शिवसेनेचे (ठाकरे) माजी शहरप्रमुख अमर कतारी यांनी दिला आहे. संगमनेर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अनिल नागणे यांना या संदर्भात शिवसेनेच्यावतीने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गुरुवारी निवेदन देण्यात आले. कतारी यांच्यासह युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष अमित चव्हाण, प्रशांत खजुरे, राजू सातपुते, इम्तियाज शेख, फैजल…
अहिल्यानगर दि. २३ – राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राजर्षी शाहू महाराज सभागृह, न्यू आर्टस कॉमर्स अँण्ड सायन्स कॉलेज, अहिल्यानगर येथे २६ व २७ जानेवारी २०२५ रोजी दोन दिवसीय अहिल्यानगर ‘ग्रंथोत्सव २०२४’ चे आयोजन करण्यात आले आहे. रविवारी (२६ जानेवारी) सकाळी १० वाजता जलसंपदा, (गोदावरी व कृष्ण खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान विधानपरिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे हे भूषविणार आहेत. कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून खासदार भाऊसाहेब वाकचौरे, खासदार निलेश लंके, आमदार किशोर दराडे, आमदार सत्यजीत तांबे, आमदार शिवाजीराव…
दावोस, दि. 23 जानेवारी दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये इतिहास घडला असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्राने आजच्या दुसर्या दिवशीपर्यंत 15.70 लाख कोटी गुंतवणुकीच्या एकूण 54 सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्या आहेत. यातून 15.95 लाख रोजगारनिर्मिती होईल. आजच्या सामंजस्य करारांपैकी सर्वांत मोठ्या गुंतवणुकीचा करार हा रिलायन्स समूहाचा असून, पेट्रोकेमिकल्स, पॉलिस्टर, नवीनीकरणीय ऊर्जा, बायोएनर्जी, हरित हायड्रोजन, ग्रीन केमिकल्स, औद्योगिक क्षेत्रविकास, रिटेल, डेटा सेंटर्स, टेलिकम्युनिकेशन्स, आदरातिथ्य आणि रिअर इस्टेट या क्षेत्रात ते 3,05,000 कोटी इतकी गुंतवणूक करणार आहेत. या एका करारातून 3 लाख रोजगारनिर्मितीचा अंदाज आहे. रिलायन्स समूहासोबत 3 लाख 5 हजार कोटींचा सामंजस्य करार करण्यात आला असून यातील बहुसंख्य गुंतवणूक ही सेवा…
मुंबई, दि. २२ :- जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीकच्या रेल्वे दुर्घटनेतील मृतांप्रती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शोकसंवेदना व्यक्त करून, मृतांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. मृतांच्या कुटुंबिंयांना पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची घोषणा करून, जखमींवर शासनाच्या वतीने मोफत उपचार केले जावेत असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस जागतिक अर्थ परिषदेच्या निमित्ताने दावोस दौऱ्यावर आहेत. तेथून त्यांनी या दूर्घटनेची माहिती घेतली. दूर्घटनास्थळी मंत्री गिरीश महाजन पोहचून मदत व बचावासाठी आवश्यक गोष्टींचे व्यवस्थापन करत असल्याची माहितीही त्यांनी दिली आहे. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दृकश्राव्य संदेश जारी केला आहे. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचा उल्लेख करून त्यांनी म्हटले आहे की, काही लोकांचा मृत्यूची ही…
अहिल्यानगर दि. २२- कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून शासनाच्या योजना प्रभावीपणे राबविण्यास मदत होणार असल्याने शेतकऱ्यांनी नोंदणीसाठी नजिकच्या सीएससी केंद्र, आपले सरकार केंद्र, सेतु केंद्र येथे जाऊन आपली आधार जोडणी विनामूल्य करुन घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे. शेतकऱ्यांना शेतातील हंगामी पिकांची आणि जमीन नकाशांची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाने कृषी योजनांसाठी ॲग्रीस्टॅक कार्डसाठी नोंदणी सुरु केली आहे. ॲग्रीस्टॅकद्वारे शेतकऱ्यांचा डेटा एकत्रित केला जाणार असून त्याआधारे कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनाचा शेतकऱ्यांना…
